shabd-logo

रात्र खेळती खेळ भाग 8

19 June 2023

5 पाहिले 5
पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी एक स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले..... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्री आपण हार कस काय करत आहात...... त्यावर ती स्त्री विचित्र पद्धतीने हसत म्हणाली.. अग हे तिरडीसाठी करत आहे..... आणि हसू लागली..... अनुश्रीला थोड विचित्रच वाटल पण आपल्याला काय करायचे आहे अस म्हणत ती ने तो विषय तिथेच सोडून दिला..... व पुन्हा तिला विचारू लागली इथून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे काय? तुम्ही ये जा करत असाल ना म्हणून विचारल त्यावर ती स्त्री मोठमोठ्याने हसू लागली......आणि तिला म्हणाली काय इथून बाहेर पडण्याचा मार्ग.......... . अग इथे येणाऱ्याचा मार्गच संपतो......आणि तु बाहेर पडण्याचा मार्ग विचारालेस हा हा हा हा............ अनुश्रीला वाटल या बाईला वेड लागलय वाटत म्हणून अस बडबडतेय आपण हिला विचारूनच चूक केली आपणच शोधू आता मार्ग.....अग मला कसल वेड लागतय तुम्हीच वेड होशीला........ अनुश्री दचकलीच हिला मनातल कळत कि काय .......मनातलच काय इथल्या प्रत्येकाची हालचाल कळते आम्हाला......आणि परत हसू लागली.... अनुश्रीला आता तिची भिती वाटू लागली म्हणून ती तिथून दुसरीकडे जावू लागली.....ती थोड पुढे गेली.....तिथे तिला चार वेगवेगळे मार्ग दिसू लागले...ती ने आधी पहिल्या मार्गाने जायच ठरवल..... ती पहिल्या मार्गावरून जावू लागली..... थोड्या अंतरावर गेली तोवर तिला आश्चर्य वाटल मगाशी जी स्त्री ज्या झाडाखाली बसलेली ती तिथेच आलेली..... व परत समोर चार मार्ग दिसत होते.....ती ने आता दुसऱ्या मार्गावरून जायच ठरवल व ती जावू लागली...... थोड अंतर पार केल्यासारख वाटल म्हणून ती ने मागे पाहिले तर पुन्हा ती तिथेच होती जिथे तिला ती स्त्री दिसलेली........ . यामुळे ती तर खच्चत चाललेली पण तरीही स्वतः ला धीर देत. आपल्याला आपल्या मित्रांना भेटायचे असेल तर हार नाही मानायची अस मनाशी ठरवत होती... तीने आता तिसऱ्या मार्गावरून जायच ठरवल व पुढे जावू लागली... परत ती ने काही अंतर पार केल्यावर मागे वळून पाहिले तर परत एकदा तिला झटकाच बसला कारण ती परत त्याच ठिकाणी होती जिथून ती पुढे गेलेली....मनातली हिंमत तर तुटत चाललेली..... पण तरीही मित्रांना भेटायचे म्हणून ती पुढे जावू लागली चौथ्या मार्गाने पण यावेळी सुद्धा ती तिथेच होती..... तिला कायच समजेना कि हे काय होतय... ती तशीच ओरडली अरे इथून बाहेर पडण्याचा मार्गच नाही काय? तोवर परत त्या स्त्रीचा आवाज घुमला..... इथे आल्यानंतर मार्ग बंदच होतो.... ते ऐकून तर अनुश्रीचा उर भरून आला.... तीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले........आता कस बाहेर पडायच....... एकतर शरीरातले त्राण संपत आलेले आणि आता मनातले त्राण पण संपत आलेले....तसच पाण्यावाचून जीव तळमळू लागलेला... ती तशीच खाली ढासळली....... थोड्या वेळाने ती च्या कानात एक आवाज हळूवार पद्धतीने तिथल्या गवतालाही कळणार नाही अशा पद्धतीने कुजबुज करू लागला... ये बाळा अग इथे का कोलमडून पडलेस तिथे तुझे सगळे मित्र अडचणीत आहेत....त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मी तुला सांगू शकते पण तुला माझ्यापर्यंत पोहोचावे लागेल त्यासाठी तुला योग्य मार्ग ओळखावा लागेल व जरी मार्ग चूकला तरी येणाऱ्या अडचणींचा सामना करत परत येथे येवून परत सुरूवात करावी लागेल. पण तु आता जी चूक केलीस ती तुला टाळावी लागेल... तु पुढे जाऊन पुन्हा मागे पाहिलेस तर पुन्हा चकव्यात अडकशील तुला पुढेजायच आहे मागे न वळता. उठ लवकर उठ तुझे मित्र अडचणीत आहेत. जर तु हार मानलीस तर कोणीच नाही वाचणार उठ.........मित्रांचा प्राण जाईल या वाक्यानेच अनुश्री ताडकन उठली. ती ने मनाशी ठरवल आता आपल काहीही होवू दे आपण लढायचच.......ती परत विचार करू लागली नेमक कोणत्या मार्गावर जायच. कोणता मार्ग आपल्याला तिच्याकडे घेऊन जाईल..... पण इथे उभ राहून ते समजन शक्यच नव्हते तिला प्रत्येक मार्गावर जावून शहानिशा करण गरजेचच होत...... परत ती ने पहिल्या मार्गावरून जायच ठरवल...... ती पुढे जावू लागली यावेळी ती ने मागे पाहायच टाळल आणि पुढे पुढे जावू लागली... अचानकच तिला समोर हाडांचे सापळे दिसू लागले ते तिच्यावर झडप घालू लागले. एक सापळा तीचा पाय पकडू लागला व दुसरा तिचा हात पकडू लागला ती त्यांना बाजूला हटवू लागली. तरीही ते तिच्या मागेच लागले ती परत माघारी वळू लागली तर एकाने तिला जोरात मागे ओढले..... आणि ते बोलू लागले... अस कस आमच्याशी खेळण्याआधीच तु बाहेर जाशील आ... बाकिचे पण तिच्या भोवती गर्दी करू लागले.... थोडावेळ तर ती गोंधळूनच गेली पण परत आता काय करायच हा विचार करू लागली तस ती ने इथे आल्या आल्या एक गोष्ट नोटीस केलेली.. हे सापळे त्या पाण्यापाशी जावून परत येत होते त्याच्यातला एक सापळा तर पाण्याला पाहून घाबरूच लागला आपल्याला यांना तिथे घेऊन जाव लागेल व पाण्यात पाडाव लागेल.... ती तिच्यात असलेली शक्य तेवढी ताकद लावून त्यांना ढकलत पुढे पुढे जावू लागली तरीही ते तिच्या हाताला पायाला वेढा घालत होती ती पूर्ण ताकदीनिशी त्या पाणी साचलेल्या मोठ्या खड्ड्यापाशी आली लागलीच त्यात जावून उभी राहिली. ज्या सापळ्यांनी ती चे हात पकडलेले ते ओरडतच बाजूला होवू लागले व बाकिची पण बाजूला जावू लागली.... आता ती ने स्वतः ला पूर्ण भिजवून घेतल व शक्य तितक बळ एकवटून पुन्हा त्या मार्गावरून मागे गेली... ती पुन्हा हार करणारी स्त्री दिसलेल्या ठिकाणी गेली... परत तिला समोर चार मार्ग दिसू लागले... आताच घेतलेल्या अनुभवामुळे ती प्रचंड घाबरलेली.ती ने एक सुस्कारा सोडला.. पुढचा मार्ग तपासावा कि नको अशी संभ्रमित अवस्था झालेली तिच्या मनाची... दुसरा मार्ग यापेक्षा भयानक असेल तर असा विचार पण आला तीच्या मनात तोच त्या हळू आवाजात कुजबूजलेल्या स्त्रीच बोलवण आठवल....आणि मित्रांच्या काळजीने ती ने पुन्हा ठाम निर्णय घेतला... आणि दुसऱ्या मार्गावरून जावू लागली मागे न बघता..... ती चालत चालत दुसऱ्या मार्गावरून आत गेली. पण समोर पाहिल्या पाहिल्या तीच्या उरात धडकीच भरली.... समोर डोळे नसलेली, कान नसलेली, जख्मांनी भरलेली काही मृत शरीर तिथे एकमेकांना मारत बसलेली. अनुश्रीला पाहून ती भलतीच खुश झालीत आता आपली भूख मिटनार म्हणून नाचू लागली... ती जीभ चाटत चाटत तीच्या जवळ येवू लागली... तीला वाटल आता काय आपल खर नाही....... पण तीच मन तिला सांगू लागल. नको नको हरू तु तुझे मित्र संकटात आहेत.. ती त्यांच्याशी हातापायी करू लागली. पण त्यांची संख्या जास्त असल्यामुळे तिची ताकद कमी पडत होती... त्यातील एका मृत शरीराने तीचा हात चावला त्यातून रक्त गळू लागल ते पाहून आणखीच चवताळली. तरीही ती मनाला समजावत होती काहितरी मार्ग नक्कीच सापडले तोवर ती च लक्ष त्या समोर जळून राख झालेल्या चितेकडे गेल ती तशीच त्यांच्याकडून सुटका करण्याचा प्रयत्न करत करत तसच ताकद लावत लावत त्यांना दूर ढकलून पळत धडपडत त्या चितेपाशी गेली व त्या राखेत हात घालून तीने ती राख सगळ्यांवर फेकली तशी ती किंचाळत जळू लागली... नंतर ती परत मागे जात जात आधीच्या ठिकाणी पोहोचली... आणि पुन्हा मनात निर्धार करून तिसऱ्या मार्गावर जायच ठरवल तोवर तीला आपल्या मागे ती स्त्री गुरगुरत उभी आहे अस जाणवल. तीला क्षणभर वाटल मागे वळून बघाव पण ती ने ते कटाक्षाने टाळले. त्या स्त्रीला तिला तिसऱ्या मार्गावर पोहोचू द्यायच नव्हत म्हणून ती तिला मागून पकडायला गेली तोवर तीचा हात पोळला... अनुश्रीच्या लक्षात आले मगाची राख थोडी तशीच आहे म्हणूनच अस असाव.... मागे न बघताच तिसऱ्या मार्गावरून जावू लागली..... या मार्गात मात्र तिला वेगळीच अनुभूती जाणवली.... मस्त फुलांचा सुगंध सुटला होता.. आजूबाजूला वेगवेगळी रोप डूलत होती... तीच्या समोर एक रक्षक आला तो तिला म्हणू लागला चला ना राजकुमारी तुमच्यासाठी काही सोनारांना बोलवल आहे ते तुमच्यासाठी हिरे, मोती आणि पाचूपासून बनवलेले दागिने घेऊन आलेत.... चला ना ते पाहून तर ती मंत्रमुग्ध झाली पण ती ने लगेच स्वतः ला त्या मोहापासून दूर ढकलत मनाला समजवल नाही अनू तुझ्यासाठी तुझे मित्र हेच सगळ्यात अनमोल आहेत तुला त्यांना वाचवण्यासाठी त्या स्त्रीची भेट घ्यायची आहे...... ती च्या मनात हा विचार आला तोच समोरच दृष्य गायब झाल व समोर एक स्त्री दिसू लागली.....

prajakta panari ची आणखी पुस्तके

1

रात्र खेळीते खेळ भाग १

17 June 2023
0
0
0

सदर कथा ही पूर्णतः हा काल्पनिक आहे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी......आई ....... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला.समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट

2

रात्र खेळीते खेळ भाग 2

17 June 2023
0
0
0

ये अधिराज अरे ये कि इकडे केव्हाची वाट पाहतोय तुझी किती उशीर केलास अस म्हणत म्हणत त्याच्या समोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येवून उभा राहिला. डोक्याला मार लागलेला. डोळे पांढरे झालेले, हाता

3

रात्र खेळीते खेळ भाग 3

17 June 2023
0
0
0

सगळेजण थोड्या गप्पा मारून तिथेच बाजूच्या खोलीत झोपायला जाऊ लागले. जाता जाता ते आजोबांच घर पाहू लागले. त्या आजोबांच्या घराची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची होती. बाहेरून अगदी पडक घर वाटायच.पण आत आल्यावर वे

4

रात्र खेळीते खेळ भाग 4

17 June 2023
0
0
0

टक टक टक टक असा आवाज येवू लागला तस कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या जागेवरून उठली.तस आवाज कोठून येत आहे याचा वेध घेवू लागली. तस तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारख जाणवल ती हळू हळू पुढे जा

5

रात्र खेळती खेळ भाग 5

19 June 2023
0
0
0

त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होवू लागली व तशीच पुढे येवून अनुश्रीच्या जागी येवून झोपली.... खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लाग

6

रात्र खेळती खेळ भाग 6

19 June 2023
0
0
0

कावेरी हळूहळू आपल्या बेडवर आजूबाजूला मोबाईल सापडतो का हे शोधू लागली. यावेळी मात्र आधीसारखा जरा ही विलंब न होता तिला पटकन मोबाईल सापडला.. पण ती ने जस टाइम बघितला तस तिला आश्चर्याचा झटकाच बसला तीच्या घड

7

रात्र खेळती खेळ भाग 7

19 June 2023
0
0
0

राज यंत्रवत चालत चालत पुढे जात होता आणि अचानकच त्याला समोर दिसणारे ते डोळे दिसेनासे झाले. तसा लगेचच तो भानावर आला व जस तो भानावर आला तस त्याच्या मनात भितीने संचार केला कारण तो एका मोठ्या गुहेत पोहोचला

8

रात्र खेळती खेळ भाग 8

19 June 2023
0
0
0

पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी एक स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले..... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्र

9

रात्र खेळती खेळ भाग 9

20 June 2023
0
0
0

अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि नक्की कोण आहे... पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण

10

रात्र खेळती खेळ भाग 10

20 June 2023
0
0
0

ती पाच जण तिथून पळून जाणार तोच समोर तोमाणूस चिडलेल्या स्वरूपात उभा होता आणि त्याचीबायको सुद्धा शुद्धीवर आली होती. बाकिची मुल तिथूनकधीच पसार झालेली त्यामुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसून ये

11

रात्र खेळती खेळ भाग 11

20 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितलेला भूतकाळ ऐकून अनुश्री म्हणाली. ते दोघे नवरा बायको तर मेले ना मग परत हे सगळ का चालू झाले.. त्यावर ती स्त्री सांगू लागली. हा ते दोघे शरीराने गेले पण पूर्णपणे नाही मिटले.. पोलिसांन

12

रात्र खेळती खेळ भाग 12

20 June 2023
0
0
0

वीरच्या समोरून तो मुलगा हळूहळू गायब होतो तस वीर एकीकडून गोंधळून जातो आणि एकीकडून त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. काही क्षण तो स्तब्धच उभा राहतो पण जस मित्रांची आठवण येते तस लगेच स्वतः च्या भावना आवरत

13

रात्र खेळती खेळ भाग 13

20 June 2023
0
0
0

वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता समोर काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रक

14

रात्र खेळती खेळ 14

21 June 2023
0
0
0

ए अनू तु तु इथे कशी पोहोचलीस.... नाही तु पण कोणीतरी दुसरीच आहेस मगाचपासूनच सगळ्यांच्या आवाजाने दुसरच कोणीतरी बोलत आहे तु तु पण अनू नसणारच आमची नक्कीच त्या माणसाने तुझ रूप घेऊन कोणाला तरी पाठवल असणार..

15

रात्र खेळती खेळ 15

21 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे थोडा विचार करून कावेरी तिथल्याच त्या खड्ड्यातल्याच काही वस्तू शोधून घेते तिला वाटल कधी कोणत्या गोष्टींची गरज लागेल सांगता येत नाही म्हणून जे हाती येईल ते सगळ घेते व नंत

16

रात्र खेळती खेळ 16

21 June 2023
0
0
0

अधिराजला काहीच सुचेना झालेल कि काय करायच ते त्याच्यासोबत कावेरीच रूप घेऊन ती स्त्रीच चाललेली होती. तीने त्याला भिती दाखवली नसली किंवा जरी चांगल वागण्याच नाटक करत असली तरी तीला दूर करण गरजेच होत कारण त

17

रात्र खेळती खेळ 17

21 June 2023
0
0
0

अधिराज मित्रांना शोधत शोधत पुढे चाललेला प्रचंड घाबरलेला तरीही मित्रांना वाचवण्यासाठी तीळ तीळ तुटत होता. याच्यापासून अनभिज्ञ कि कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.एका वळणावर त्याला पावलांचा आवाज येतो तसा तो ग

18

रात्र खेळती खेळ 18

21 June 2023
0
0
0

अधिराज आणि कावेरीच रूप घेऊन आलेली ती स्त्री पुढे पुढे चालले होते. तिथून पुढे एक नदी दिसत होती. त्या नदिच्या जवळ गेल्यावर अधिराजचे पाय जमिनीपासून आपोआपच वरवर जावू लागले. पण त्या कावेरीच्या रूपात आलेल्य

19

रात्र खेळती खेळ 19

21 June 2023
0
0
0

पाऊस चालूच असतो पण त्यासोबत मोठ वादळ येत कावेरीने ठेवलेला दगड एक काळी सावली जमिनीपासून वर स्वतः कडे खेचून घेते त्यासोबत ती ने लिहिलेली अक्षर पुसली जातात..ते थोड्या अंतरावर जातात आणि वीर व अनूश्रीला आव

20

रात्र खेळती खेळ 20

21 June 2023
0
0
0

वीर अनूला शोधत असतो पण त्या खड्ड्यातल्या अंधारात सतत धडपडायला होत असतो. तो प्रत्येक कोपरा बॅटरीच्या सहाय्याने न्याहाळत असतो. पण एका गोष्टीचा त्याला खूपच त्रास होत असतो तो म्हणजे तिथे तीव्र प्रमाणात दु

21

रात्र खेळती खेळ 21

21 June 2023
0
0
0

ती सगळी प्रेत त्या तिघांच्या अवतीभवती गोळा होवू लागतात. तस त्यांना काय कराव हेच सूचेनास होत. एकतर वीरला पाहून सगळ्यांच हृदयच हळहळत होत. त्यात ते पुस्तक आणि शस्त्र दोन्हीही त्यांच्यापासून दूर झालेल. तर

---

एक पुस्तक वाचा