त्या स्त्रीने सांगितलेला भूतकाळ ऐकून अनुश्री म्हणाली. ते दोघे नवरा बायको तर मेले ना मग परत हे सगळ का चालू झाले.. त्यावर ती स्त्री सांगू लागली. हा ते दोघे शरीराने गेले पण पूर्णपणे नाही मिटले.. पोलिसांनी त्या माणसाच्या बायकोला तर गोळ्या घातल्या तसेच त्या माणसाने स्वतः ला मारून घेतले म्हणून पोलिसांना वाटले की आता काही वाईट करायला कोण उरल नाही सगळे गुन्हेगार संपले. पण त्या माणसाच्या साथीदाराबद्दल कोणालाच काही माहिती नव्हते. फक्त त्या मुलग्याच्या आईला आणि त्या मुलग्याला माहित होत. पण त्या मुलग्याची आई सध्या हयात नव्हती आणि तो मुलगा पण तिथे नव्हता.. त्या माणसाच्या साथीदाराने त्या मुलग्याला एक ठिकाणी सोडले.
व पोलिस जेव्हा त्या मुलांना घेऊन त्याच्या मित्राला शोधण्यासाठी गेले तेव्हा त्या साथीदाराने त्या मुलाच्या आईची हत्या झालेल्या ठिकाणी येवून तिथून त्या नवरा बायकोची प्रेते उचलली व त्या घरात जावून तेथील पंख्याखालच्या जागेत पुरली.. व त्यावर स्वतः च्या मंत्र साधनेद्वारे मातीवर त्याचे रक्त सांडून ती माती त्यावर टाकली व नंतर ती प्रेत काढता यावीत यासाठीचा एक विचित्र शब्द कोड्या स्वरूपातला फॅनच्या झुंबरवर अशा पद्धतीने कोरला कि तो त्या झुंबरावरची नक्षी असल्यागत वाटावा..
त्या माणसाच्या साथीदाराने त्या मातीवर मंत्र साधना केली असल्यामुळे कोणालाच ती माती उकरता येत नाही. ती माती दूर करण्यासाठी त्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. व त्या दोघांचा कायमचा नाश करण्यासाठी एका पुस्तकाची गरज लागते. त्या पुस्तकात असे मंत्र आहे जे मृतात्म्यांस कायमची शांती देते. पण ते पुस्तक मिळवण खूप अवघड आहे.. तसच त्या फॅनजवळच्या ठिकाणी पोहोचण सुद्धा अवघड आहे कारण तो माणूस आणि त्याची बायको तिथपर्यंत कोणाला पोहोचू देत नाहीत. अनुश्रीला त्या आजोबांचे ओरडणे आठवले.....
म्हणूनच आधी तुम्हाला त्या झुंबरावर जो शब्द लिहिला त्याचा अर्थ पण शोधावा लागेल. पण ते पुस्तक आम्हाला कोठे मिळेल आणि त्या
शब्दाचा अर्थ.... अनुश्री विचारू लागली.... ते मी नाही सांगू शकत आम्हाला मर्यादा पडतात. पण एक आहे तुम्हाला हे सगळ करण्यासाठी एकत्र याव लागेल.... अनुश्री म्हणते हा मी नक्की त्यांना शोधेन... अचानकच ती स्त्री आणि तिथली जागा अदृष्य होवू लागली. तस ती स्त्री मिळाली. माझी आताची या जागेवरची वेळ संपत आली. आता बघू आपली भेट होते कि नाही ते पुढे......
अनुश्री ... थांबा ना थांबा तुम्ही कोण आहात ते तर सांगा अस म्हणू लागली......
तेव्हा ती स्त्री म्हणाली आधी तुमची लढाई पूर्ण होवू दे मग तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि अनूश्रीला माझा आशिर्वाद तुमच्या पाठिशी आहे अस म्हणत गायब झाली.....तस अनुश्रीच्या डोळ्यात पाणी भरून आले..... अचानकच तिथल सगळ वातावरणही इतर ठिकाणच्या वातावरणासारख भयावह होवू लागल...... आजूबाजूच्या झाडावरची पाने गळू लागली. पक्षी जागच्या जागी फांद्यांवरून खाली पडू लागली.... सगळीकडे काळोख पसरू लागला.... वेगवेगळे भयावह आवाज कानी ऐकू येवू लागले.... तिथूनच काळ्या आकृत्या फिरू लागल्या..... त्यातच भर म्हणून की काय वारा बेफाम होऊन वाहू लागला... समोरच वातावरण पाहून अनूश्रीच्या हृदयात धडकीच भरली.... तरीही ती ने मनाचा निर्धार केला.... तिला आता इथून काळ्या
आकृत्यांना चकवा देत बाहेर पडावे लागणार होते
आणि ती जिथून आली होती तिथे पोहोचून मित्रांचा पण शोध घ्यावा लागणार होता....
ती तशीच हळूहळू वृक्षांचा आडोसा घेत घेत पुढे जावू लागली.. मनात तर भिती डोक वर करत होती.. पण ती मित्रांना आठवून काय होईल ते होईल आता अस म्हणत जावू लागली.....
ती पुढे पुढे जावू लागली.. झाडाच्या मागून लपत छपत जावू लागली... तोवर एका झाडावरून अचानकच एक आकृती तीच्या समोर आली.... तिला तर समजेनाच कि आता काय करायच.... तोवर ती ने खालचा एक दगड उचलला आणि त्याच्या दिशेने भिरकावला. तस ते किंचाळू तसच विव्हळू लागल.. तिला वाटल आता आपल्याला पुढे जाता येईल..... पण त्या आकृतीचा आवाज ऐकून बाकिच्या आकृत्या पण तिच्याभोवती गर्दी करू लागल्या... ते पाहून तर तिला प्रचंड भिती वाटायला लागली... पण काहीही झाले तरी आता आपण थांबायच नाही अस मनोमन ठरवून खालचा आणखी चार दगड स्वतः भोवती गोल फिरत हातातून पटकन भिरकावल्या तशा काही आकृत्या दूरच झाल्या तस अनूश्री ज्या बाजूने आकृत्या कमी झाल्याला त्या बाजूने पळत पळत पुढे जावू लागली..... पण झाल्या प्रकारामुळे त्या आकृत्या जास्तच चवताळल्या पण अनूश्री मनातली भिती घालवून तशीच पुढे पुढे पळत जावू लागली.... एका आकृतीने अनूश्रीच्या पायाचा चावाच घेतला तीच्या पायातून रक्त ओघळू लागले.... तरीही ती ने झटकन पाय जोरात ढकलून त्या आकृतीला स्वतः पासून दूर केल व पळत राहिली...थोड पुढे गेली तोच समोर एक झाड धाडकन खाली पडले. ती तशीच एका कडेने पुढे गेली.. तोच त्या झाडाची फांदी तीच्या भोवती गोळा होवू लागली... ती ने जोर लावत त्या फांद्या बाजूला केल्या....व परत आजूबाजूचा वेध घेत घेत पुढे जावू लागली.... अस पडत धडपडत ती जिथून आलेली ती हारवाली स्त्री जिथे बसलेली तिथे परत आली......
पण आता तिच्यासमोर एक अडचण होती ती म्हणजे आपल्या मित्रांना शोधायचे कसे. कोठे असतील सगळे.... तोवर तिला तो चौथा मार्ग आठवला... पण तिच्या मनात बऱ्याच शंका उपस्थित झालेल्या कारण तीन्ही मार्गावर वेगवेगळे अनुभव आलेले... दोन मार्गावरचे अनुभव तर भयावह होते... तिसरा मार्ग पण ती स्त्री गेल्यावर खूपच भयानक होता... आणि कशावरून कि ते चौथ्या मार्गावरून गेल्यावर
आपल्याला भेटतील..... पण आपल्याला एकदा प्रयत्न करायलाच हवा. तसही इथ बाकिचे काही दिसतच नाही.... म्हणून ती ने चौथा मार्ग तपासण्याचा निश्चय केला......
अधिराज पळत पळत पुढे चालला होता... त्याला तो कोठे चाललाय तेच समजत नव्हते... पण मित्रांना भेटण्याची एकच इच्छा त्याला पळत राहण्याच्या इच्छेला बळ देत होती.... तो पळत होता. अचानकच समोर धडकला... तर समोर कावेरी होती... तिला पाहून अधिराजला खूपच आनंद झाला पण आधी तर ती च्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.. पण तरीही नंतर ती ने चेहऱ्यावर हास्य आणल.. ती चे हास्य अधिराजला थोड विचित्र वाटल पण तरीही खूप दिवसांनी कोणी तरी भेटल. एका तरी फ्रेंडला भेटता आले या विचारात त्याच्या मनातली शंकाच विरून गेली.....
कावेरी अधिराजला रडव्या आवाजात म्हणू लागली अरे हे काय झालेय तुला.. इथे कोठे आला आहेस तू... तुला माहिती आहे किती शोधल आम्ही तुला पण तू इथे बसलायस.... ते ऐकून अधिराजला पण रडू कोसळल..... तो पण त्याच्यासोबत काय काय झाल ते सांगू लागला..... कावेरी तर मनातच म्हणू लागली याला काहीही करून अनूश्री म्हणजेच ती मुलगी इथे पोहोचायच्या आत दूर ल पाहिजे.. काहीही करून हे एकत्र येता कामा नयेत..... त्यासाठी थोड नाटक चालू ठेवून याला वेगळ्या मार्गावर नेल पाहिजे.....
कावेरी त्याला म्हणू लागली.. ये अधिराज चल ना आपण इथून बाहेर पडू...
अधिराज म्हणाला पण इथून कस बाहेर पडायच आपल्याला तर काही मार्ग माहिती नाही... पण मला माहिती आहे... कावेरी म्हणाली......
काय पण तुला कस माहिती.. अधिराज ने विचारल... मी तुला शोधत शोधत इथे येताना सगळे मार्ग बघून ठेवले म्हणून मला माहिती आहे.... कावेरी म्हणाली.... आता मात्र अधिराजला थोडी शंका आली. व मनात भयाची भावना डोक वर काढू लागली पण त्याने तिला ते जाणवू दिले नाही... त्या ने एकदा खात्री करून घ्यायचे ठरवले.... त्याने मध्येच एक वाक्य म्हटल तेरी मेरी दोस्ती.... त्याला अपेक्षित होत कि कावेरीने पुढच वाक्य उच्चाराव पण तस झालच नाही.. उलट ती त्याला म्हणली हे काय बोलतोयस तू अधिराज आपण बाहेर तू पडूया चल लवकर....
आता मात्र अधिराजने ओळखल कि ही कावेरी नाहीच आहे... कारण ते वाक्य ते दोघ कधी कधी इतरांना चिडवण्यासाठी म्हणायचे... त्यांच्यासाठी ते मैत्रीतल एक गोड वाक्य होत.. ते चिडवण्यासाठी तसच नेहमी कोठे फिरायला जाताना म्हणायचे....
आणि अस कधी व्हायचच नाही कि ते वाक्य उच्चारल्यावर त्याचे मित्र शांत बसलेत. ते ते वाक्य पूर्ण करायचेच.....
पण त्याला आता हा प्रश्न पडलेला हि जी कोण व्यक्ती तक कात्रास देत आहे. आधी माझेच रूप घेऊन एक मुलगा आलेला आणि आता कावेरीच....
आता या नकली कावेरी पासून दूर कस जायच... तसच
आपल्या मित्रांना शोधायचे कसे......
मन तर खूपच तडफडत होत मित्रांना भेटण्यासाठी तसच आपले मित्र ठिक असतील ना या काळजीने.....