shabd-logo

रात्र खेळती खेळ 20

21 June 2023

19 पाहिले 19
वीर अनूला शोधत असतो पण त्या खड्ड्यातल्या अंधारात सतत धडपडायला होत असतो. तो प्रत्येक कोपरा बॅटरीच्या सहाय्याने न्याहाळत असतो. पण एका गोष्टीचा त्याला खूपच त्रास होत असतो तो म्हणजे तिथे तीव्र प्रमाणात दुर्गंध येत असतो. तो नाक दाबत दाबत नेमक तिथे काय आहे हे बघायला जात असतो. तो जस जस त्या दिशेने जात असतो तस त्याला ढवळून आल्यासारख होत असत. तरीही तो तसाच पुढे जातो.. पुढे गेल्यानंतर त्याच्या पायाला काहितरी लागत म्हणून तो खाली वाकून बघतो तर तिथे अनूश्रीच प्रेत पडलेल असत. ते पाहून त्याला तर घेरीच येते..

कावेरी आणि अधिराज हालवून हालवून अनूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात.. थोड्या वेळानंतर तिला शुद्ध येते. तस त्या दोघांना आनंद होतो.. ती शुद्धीवर येत येत वीरला आवाज देत असते.. तिच लक्ष कावेरी आणि अधिराजकडे जात तस तिला आनंद होतो. तिच्या डोळ्यांतून आपोआपच अश्रू ओघळतात.. तुम्ही खरच इथे आहात. ये अधी तू तू कसा आहेस रे आणि कोठे गेलेलास. आणि कावू तू तू अधीपाशी कशी पोहोचलीस आणि तुम्ही इथे कसे पोहोचला..

ये गप्प ये काय यार अनू एकतर आता कोठे शुद्धीवर आलेस आणि लगेच काय प्रश्नांची सरबत्ती चालू केलेस. हे देवा अवघडच आहे या बाईच..... कावेरी म्हणाली..

ये काय ग कावू मी काय तुला बाई वाटते होय.. मी मैत्रीण आहे नव्ह म्हणजे तू कावू नाहीच आहेस अरे अधी हि कोणीतरी दुसरीच आहे... अनूश्री म्हणाली.....

ये काय यार तुम्ही दोघी कोठेही सुरू होता... आपल्याला बाकिच्यांना पण शोधायच आहे विसरलात काय ? अधिराज म्हणाला... अरे हा हो पण तुम्ही दोघ एकत्र कसे आलात. अनूश्री विचारते..

ये अनू ते नंतर सांगू पण तु सांग तू आणि वीर कस एकत्र आलात. कावेरी विचारते....

अरे हा वीर वीर कोठे आहे आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचल पाहिजे.. तो मला शोधत असेल आम्ही तर अस ठरवलेल कि काहीही झाल तरी आता वेगळ व्हायच नाही आणि बघा तरीही आम्ही वेगळे झालो. आता त्याला कस शोधायच. हे देवा आपण चौघ भेटलो असतो ना... अस म्हणत अनूश्रीचे डोळे भरून येवू लागले......

ये सोड यार अनू आपण तिघ तर एकत्र आलो ना तू आता आणि कसली काळजी करते आपण त्या दोघांनाही नक्की शोधू.... कावेरी अनूश्रीची समजूत घालत म्हणते...

ये चला आपण आधी इथच शोधू मला वाटत वीरनेही तुझा हात सुटल्यावर या खड्ड्यात उड्डी घातलीच असणार तुला माहित आहे ना अनू गेल्यावेळी असचएकदा आपण साने काकूंचे घर बघायला गेल्यावर तिथे अशी गॅलरी होती ज्याला बाजूने काहीच नव्हत. तिथून राजचा पाय घसरलेला तेव्हा किती शर्थीन वीरने त्याला वाचवलेल.. स्वतः लाही घसरायला होईल या गोष्टीची पर्वा न करता तस तर त्याला ओढता ओढता तोही खाली घसरतच होता म्हणून आपण सगळ्यांनी मग त्यांना वर घेतल..

हो रे अधी असाच आहे आपला वीर नक्कीच तो मला वाचवायला खरच इथे आला असेल आपल्याला त्याला शोधल पाहिजे... चल आपण शोधू त्याला.... अनू म्हणाली.....

कावेरी, अनूश्री आणि अधिराज वीरला शोधू

लागतात...

वीरच्या जवळ असलेल ते प्रेत त्याला बेशुद्ध पडलेल पाहून उठत आणि जीभ चाटत चाटत त्याच्यासमोर जात व ते रूप बदलून मुळ रूपात येत.. ते वीरच्या भोवती एक रिंगण आखत व समोर शैतानाची मातीने प्रतिमा तयार करू लागत व म्हणत.... आपली वाट बघण कामी आल आज सैतान आपल्यावर प्रसन्न होणार आणि खूप शक्ती प्रदान करणार आपण शक्तिशाली बनणार हा हा हा.......

ते खूपच खूष होत वीर भोवतीच्या रिंगणाजवळून एक प्रदक्षिणा पण घालत खूष होऊन व सैतानाची पूजा करायला सज्ज होत....

कावेरी, अनूश्री आणि अधिराज वीरला आवाज देत देत पुढे चाललेले असतात.. पण त्यांना वीर सापडतच नसतो... ते एक एक कोपरा लक्षपूर्वक तपासत असतात... त्या खड्ड्यात अचानकच प्रचंड आवाज येतो त्या आवाजाने सारेच दचकतात... कोणीतरी नाचत आहे असा आवाज येत असतो त्यासोबतच विचित्र भाषेत कसलेतरी मंत्र म्हटले जात आहेत. सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने जावू लागतात.

थोडा वेळ ते आवाजाचा वेध घेत घेत चाललेले असतात. पण काही वेळानंतर नेमक कोणत्या दिशेने आवाज येत आहे. हेच समजण अवघड होवून जात त्यांना कारण तिथल्या प्रत्येक कोपऱ्यातून तो आवाज येत आहे असच भासत असत ते तर पुरते गोंधळात पडतात. त्यांना वीरला शोधायच असत म्हणून प्रत्येक बाजूने तपासायच ठरवतात... त्या आवाजाने त्यांना वीरचा जीव धोक्यात आलाय असच वाटत होत.. ते प्रत्येक दिशेकडे जायच ठरवतात ते एका दिशेला जातात. पण पुन्हा गोंधळात अडकतात त्या मार्गाचा अंतच त्यांना सापडत नाही..

अरे अधी असच चालत राहिलो तर वीरपर्यंत लवकर पोहोचता येणार नाही आपल्याला काहितरी केल पाहिजे... कावेरी म्हणाली....

हो ग कावू पण काय कराव हेच आता सूचेनास झालय... अधिराज म्हणाला.....

ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केला काय? बाकिच्या ठिकाणाहून आवाज सारखाच येत आहे पण एका ठिकाणाहून कमी जास्त होत आहे... नक्की त्याच ठिकाणी असतील ते....... अनूश्री म्हणाली........

हो ग अनू आम्ही ही गोष्ट नोटीसच नाही केली.. कसली भारी आहेस यार तू असाच भारीपणा वापरत जा.... म्हणजे सगळ्याच विषयात पास होशील.... कावेरी म्हणाली......

ये कावू काय यार तू सारखी खेचतच असतेस थांब इथून बाहेर पडलो ना कि आधी तुलाच अद्दल घडवते.... अनूश्री म्हणाली.....

देव करो आणि ती वेळ लगेच येवो किती तरसलोय आपण मोकळ्या हवेत एकमेकांसोबत दंगा मस्ती करण्यासाठी एकमेकांना भेटण्यासाठी अशी वेळ याआधी कधीच आली नसेल ना आपल्यावर... कावेरी म्हणाली....

हो ग कावू पण आता बास कर विचार आपल्याला त्या आवाजाच्या ठिकाणी पोहोचल पाहिजे.... अनूश्री म्हणाली.....

हो चला यार वीर आहे कि आणखी कोण आहे तिथ हे तिथ गेल्याशिवाय कळणार नाही पण तिथे वीरच असेल नाहीतर अस आपल्याला कोणी भुलवल नसत... अधिराज म्हणाला....

तोवर परत तिथून वीरचा आवाज येतो.. तस सगळे धावत पटकन तिथ जातात....

वीर शुद्धीवर आलेला असतो तो त्या रिंगणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच्या आजूबाजूला एकप्रकारच कवचच निर्माण झालेल असत ज्यामुळे त्याला तिथून बाहेर पडता येतच नाही.. तो तिथूनच सगळ्या मित्रांना हाक मारत असतो....

ते सगळेच तिथ पोहोचतात... तो माणूस समोर बसून मंत्र उच्चारतच असतो... ते सगळे वीरच्या दिशेने झेपावतात व आगीचा झटका बसावा तसे बाजूला होतात..... फक्त कावेरीला काहीच जाणवत नाही तरीही आत मात्र जाता येत नाही......

आता काय करायच आधी या माणसालाच दूर केल पाहिजे अधिराज अस म्हणतो... त्याबरोबर तो माणूस मागे वळून बघतो तस सगळे जागीच गारठतात... कावेरी, अनुश्री, वीर आणि राजच्या मागे लागलेला तो माणूस म्हणजे एक प्रेत असतो तो.... त्याला पाहून पुन्हा त्यांना ते दृष्य आठवत...

त्याच्या मंत्राबरोबर वीरच्या अंगावर चट्टे उठत असतात ते पाहून ते सर्वच जण हळहळतात.... त्यांना काय कराव हेच कळेना जणू काय मेंदूच बधीर झाला.....

पण मित्राला वाचवण्याच्या भावनेने त्यांच मन पुन्हा पेटून उठल.... कावेरीला त्या शस्त्राची आठवण झाली... पण ते शस्त्र पाहून ते प्रेत अधिकच भडकल.... त्याने तिथल्या धुळीचा गोळा करत कावेरी दिशेने भिरकावला तस ते शस्त्र तिच्या हातातून दूर गेल... आणि पुस्तकही बाजूला गेल....

ते पाहून त्या प्रेताला प्रचंड आनंद झाला त्याने त्याच्या साथीदारांचे म्हणजेच त्या जागेत अंत झालेल्यांना बोलवल... ते सगळेच त्यांच्या भोवती गर्दी करू लागले... ते पाहून ते सगळेच परत गोंधळून गेले......


कथा शेवटाकडे वाटचाल करत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तुमच्या सहकार्याने छोट्याशा कल्पनेने विस्तारित रूप साकार केल पुढचा भाग शेवटचा असेल.....

prajakta panari ची आणखी पुस्तके

1

रात्र खेळीते खेळ भाग १

17 June 2023
0
0
0

सदर कथा ही पूर्णतः हा काल्पनिक आहे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी......आई ....... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला.समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट

2

रात्र खेळीते खेळ भाग 2

17 June 2023
0
0
0

ये अधिराज अरे ये कि इकडे केव्हाची वाट पाहतोय तुझी किती उशीर केलास अस म्हणत म्हणत त्याच्या समोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येवून उभा राहिला. डोक्याला मार लागलेला. डोळे पांढरे झालेले, हाता

3

रात्र खेळीते खेळ भाग 3

17 June 2023
0
0
0

सगळेजण थोड्या गप्पा मारून तिथेच बाजूच्या खोलीत झोपायला जाऊ लागले. जाता जाता ते आजोबांच घर पाहू लागले. त्या आजोबांच्या घराची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची होती. बाहेरून अगदी पडक घर वाटायच.पण आत आल्यावर वे

4

रात्र खेळीते खेळ भाग 4

17 June 2023
0
0
0

टक टक टक टक असा आवाज येवू लागला तस कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या जागेवरून उठली.तस आवाज कोठून येत आहे याचा वेध घेवू लागली. तस तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारख जाणवल ती हळू हळू पुढे जा

5

रात्र खेळती खेळ भाग 5

19 June 2023
0
0
0

त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होवू लागली व तशीच पुढे येवून अनुश्रीच्या जागी येवून झोपली.... खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लाग

6

रात्र खेळती खेळ भाग 6

19 June 2023
0
0
0

कावेरी हळूहळू आपल्या बेडवर आजूबाजूला मोबाईल सापडतो का हे शोधू लागली. यावेळी मात्र आधीसारखा जरा ही विलंब न होता तिला पटकन मोबाईल सापडला.. पण ती ने जस टाइम बघितला तस तिला आश्चर्याचा झटकाच बसला तीच्या घड

7

रात्र खेळती खेळ भाग 7

19 June 2023
0
0
0

राज यंत्रवत चालत चालत पुढे जात होता आणि अचानकच त्याला समोर दिसणारे ते डोळे दिसेनासे झाले. तसा लगेचच तो भानावर आला व जस तो भानावर आला तस त्याच्या मनात भितीने संचार केला कारण तो एका मोठ्या गुहेत पोहोचला

8

रात्र खेळती खेळ भाग 8

19 June 2023
0
0
0

पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी एक स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले..... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्र

9

रात्र खेळती खेळ भाग 9

20 June 2023
0
0
0

अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि नक्की कोण आहे... पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण

10

रात्र खेळती खेळ भाग 10

20 June 2023
0
0
0

ती पाच जण तिथून पळून जाणार तोच समोर तोमाणूस चिडलेल्या स्वरूपात उभा होता आणि त्याचीबायको सुद्धा शुद्धीवर आली होती. बाकिची मुल तिथूनकधीच पसार झालेली त्यामुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसून ये

11

रात्र खेळती खेळ भाग 11

20 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितलेला भूतकाळ ऐकून अनुश्री म्हणाली. ते दोघे नवरा बायको तर मेले ना मग परत हे सगळ का चालू झाले.. त्यावर ती स्त्री सांगू लागली. हा ते दोघे शरीराने गेले पण पूर्णपणे नाही मिटले.. पोलिसांन

12

रात्र खेळती खेळ भाग 12

20 June 2023
0
0
0

वीरच्या समोरून तो मुलगा हळूहळू गायब होतो तस वीर एकीकडून गोंधळून जातो आणि एकीकडून त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. काही क्षण तो स्तब्धच उभा राहतो पण जस मित्रांची आठवण येते तस लगेच स्वतः च्या भावना आवरत

13

रात्र खेळती खेळ भाग 13

20 June 2023
0
0
0

वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता समोर काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रक

14

रात्र खेळती खेळ 14

21 June 2023
0
0
0

ए अनू तु तु इथे कशी पोहोचलीस.... नाही तु पण कोणीतरी दुसरीच आहेस मगाचपासूनच सगळ्यांच्या आवाजाने दुसरच कोणीतरी बोलत आहे तु तु पण अनू नसणारच आमची नक्कीच त्या माणसाने तुझ रूप घेऊन कोणाला तरी पाठवल असणार..

15

रात्र खेळती खेळ 15

21 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे थोडा विचार करून कावेरी तिथल्याच त्या खड्ड्यातल्याच काही वस्तू शोधून घेते तिला वाटल कधी कोणत्या गोष्टींची गरज लागेल सांगता येत नाही म्हणून जे हाती येईल ते सगळ घेते व नंत

16

रात्र खेळती खेळ 16

21 June 2023
0
0
0

अधिराजला काहीच सुचेना झालेल कि काय करायच ते त्याच्यासोबत कावेरीच रूप घेऊन ती स्त्रीच चाललेली होती. तीने त्याला भिती दाखवली नसली किंवा जरी चांगल वागण्याच नाटक करत असली तरी तीला दूर करण गरजेच होत कारण त

17

रात्र खेळती खेळ 17

21 June 2023
0
0
0

अधिराज मित्रांना शोधत शोधत पुढे चाललेला प्रचंड घाबरलेला तरीही मित्रांना वाचवण्यासाठी तीळ तीळ तुटत होता. याच्यापासून अनभिज्ञ कि कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.एका वळणावर त्याला पावलांचा आवाज येतो तसा तो ग

18

रात्र खेळती खेळ 18

21 June 2023
0
0
0

अधिराज आणि कावेरीच रूप घेऊन आलेली ती स्त्री पुढे पुढे चालले होते. तिथून पुढे एक नदी दिसत होती. त्या नदिच्या जवळ गेल्यावर अधिराजचे पाय जमिनीपासून आपोआपच वरवर जावू लागले. पण त्या कावेरीच्या रूपात आलेल्य

19

रात्र खेळती खेळ 19

21 June 2023
0
0
0

पाऊस चालूच असतो पण त्यासोबत मोठ वादळ येत कावेरीने ठेवलेला दगड एक काळी सावली जमिनीपासून वर स्वतः कडे खेचून घेते त्यासोबत ती ने लिहिलेली अक्षर पुसली जातात..ते थोड्या अंतरावर जातात आणि वीर व अनूश्रीला आव

20

रात्र खेळती खेळ 20

21 June 2023
0
0
0

वीर अनूला शोधत असतो पण त्या खड्ड्यातल्या अंधारात सतत धडपडायला होत असतो. तो प्रत्येक कोपरा बॅटरीच्या सहाय्याने न्याहाळत असतो. पण एका गोष्टीचा त्याला खूपच त्रास होत असतो तो म्हणजे तिथे तीव्र प्रमाणात दु

21

रात्र खेळती खेळ 21

21 June 2023
0
0
0

ती सगळी प्रेत त्या तिघांच्या अवतीभवती गोळा होवू लागतात. तस त्यांना काय कराव हेच सूचेनास होत. एकतर वीरला पाहून सगळ्यांच हृदयच हळहळत होत. त्यात ते पुस्तक आणि शस्त्र दोन्हीही त्यांच्यापासून दूर झालेल. तर

---

एक पुस्तक वाचा