shabd-logo

रात्र खेळती खेळ भाग 9

20 June 2023

0 पाहिले 0
अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि नक्की कोण आहे... पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण तिलाच माहिती नव्हत.... ती तर नेमक आपल्याला या स्त्रीविषयी आपलेपणा का जाणवतोय याचा विचार करत होतीच कि त्या स्त्रीने तीच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून तिला भानावर आणले......

काय ग कसला एवढा विचार करतेस..... तीच्या या प्रश्नाने अनुश्री गोंधळलीच....... न न न नाही कसला नाही...

बर मला वाटत तु खूप थकली असणार आतापर्यंत ज्या संकटांना तोंड देवून आलीस त्यामुळे तु आत चल आपण थोड मोकळ होवून बोलू तसही अजून धोका टळला नाहीय..... त्यामुळे जास्त वेळ बाहेर थांबन धोक्याच आहे..... आत गेल्यावर सुरक्षितरित्या मला तुझी मदत करता येईल.....

बर चला मग चालेल आपण आत बोलू अस म्हणून अनुश्री तीच्या पाठोपाठ जावू लागली.....
अनुश्री जाता जाता आजूबाजूच दृष्य न्याहाळू लागली....
इथे अंधाराच प्रमाण थोड कमी होत त्यामुळे तिला

मनातून थोड हायस वाटू लागल अधिराज हरवल्यापासून म्हणजे त्या जंगलात आल्यापासून

त्यांना फक्त अंधारच दिसला होता. तीला तिथे जाता जाता थोडी सकारात्मकता जाणवू लागली त्या परिसरात असंख्य नारळाची झाड होती, भोपळीचा वेल होता, पक्ष्यांची घरटी होती एका झाडावर तर एक पक्षी आपल्या पिल्लांच्या चोचीत दाणा भरत होता तिला ते पाहून सगळ्या मित्रांची आठवण येवू लागली ते पण असच एकमेकांना घास भरवत रोज जेवायचे. ती च्या डोळ्यात तर नकळत पाणीच येवू लागल... तोवर ती स्त्री तिच्या जवळ येवून तीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली.. धीर नको हरू सगळ ठीक होईल... तस अनुश्रीने त्या स्त्रीला मिठीच मारली.. का माहिती का पण तिला त्या स्त्रीला पाहिल्या पासून अपार माया जाणवत होती तिला तिच्या मिठीत पण माया जाणवली......
ती त्या स्त्रीसोबत एका खोलीत गेली.. तस अनुश्री विचारू लागली बर आता मला सांगाल का मी माझ्या मित्रांना कस वाचवू ते.....अग थांब खूप थकली असशील थोड पाणी पिऊन घे

आणि थोड जेवून घे..... ती स्त्री म्हणाली..... तस अनुश्री म्हणाली नाही नको मला काही जाणार नाही मला आता माझ्या मित्रांना भेटायच आहे. तस तर ते पण अन्न पाण्यावाचून तळमळत अग असतील..... मी समजू शकते सध्या तुला तुझ्या मित्रांव्यतिरिक्त काहीच सुचत नाही पण जरा बघ किती अशक्तपणा दिसालाय चेहऱ्यावरूनच थोड काहीतरी खा...... नाही नको मला काहीच नको.......

बर पण थोडा सरबत तरी घे माझ्या समाधानासाठी तरी थोडी ताकद येईल तुझ्यातच ......

आता अनुश्रीला ती ला नकार देण जमल नाही कारण

ती इतक्या कठीण काळात आपली मदत करत आहे व

आपल्याला धीर पण देत आहे ते बघून.

अनुश्री ने त्या स्त्रीने दिलेला सरबत संपवला तस त्या स्त्रीला बर वाटल.... आता ती स्त्री अनुश्रीशी बोलू लागली......

बर ऐक आता मी तुला जे सांगणार आहे ते लक्ष्यपूर्वक ऐक खरतर मी तुला आता भुतकाळ सांगणार आहे.....

मला तुला मार्गच सांगायचा होता पण आमच्यावर काही 
बंधन आहेत त्यामुळे मी तुला डायरेक्ट मार्ग नाही सांगू शकत...पण तुला भुतकाळातूनच बऱ्याचशा गोष्टी समजतील... आणि हा तुम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी एकत्र तर याव लागेल....तस तु एकटी बाहेर पडू शकतेस कारण तु या मार्गापर्यंत पोहोचलेस..... जर तुला एकटीला बाहेर पडायच असेल तर सांग तुला आता बाहेर काढू शकते मी त्यामुळे तुझा जीव धोक्यात न येता सहीसलामत बाहेर पडशील तु.....

नाही भलेही कितीही संकटात अडकायला लागू दे मला माझ्या मित्रांना सोडून एकट बाहेर पडायच नाही.... गेलो तर सगळेच बाहेर जावू.... हे ऐकून त्या स्त्रीच्या डोळ्यात पण पाणी आल ती मनातच म्हणाली तुमच्या मैत्रीतील हे प्रेमच तुम्हाला यातून बाहेर काढेल व आमची पण मुक्तता करेल......

ती स्त्री आता अनुश्रीला भुतकाळ सांगू लागली....

आजपासून पाच वर्षा आधी घडलेली घटना आहे.... या जंगलात राहायला एक माणूस आला. खरतर तो खूप विचित्र आणि पाषाणहृदयी होता.. तो लहान लहान मुलांना उचलून आणायचा त्यांच्याकडून जबरदस्ती कुकर्म करून घ्यायचा व नंतर त्याच मुलांना दूर ठिकाणी नेऊन विकायचा व भरपूर पैसे कमवायचा... यातूनच त्याने एक भव्य घर बांधल व सोन्या चांदीच्या वस्तू तयार केल्या.... त्याचे हे कारनामे दोन वर्ष चालू होते... पण दोन वर्षानंतर अशी एक घटना घडली कि त्यांना ती मुले तर गमवावी लागलीत व स्वतः चा जीव पण गमवावा लागला..... सोबतच त्याच्या बायकोचा पण अंत बघावा लागला......

अनूश्री विचारू लागली पण अस काय झाल नेमक दोन वर्षानंतर सांगते ऐक..... त्यांनी दोन वर्षांनंतर असच मैदानात खेळणाऱ्या सहा मुलांना उचलून आणल त्यांना कस फसवून एकदम उचलून आणल हे तर नाही माहिती पण त्यांना उचलून आणल हे मात्र खर........

ती मुल जवळजवळ सात वर्षाची होती पण हा खूपच हुषार होती. ती मुल जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा पहिल्यांदा तर खूप घाबरली तिथल ते सगळ दृष्य पाहून ती हरामी माणस त्या मुलांना दगडावर हातोडीने जस घाव घालावेत तस लोखंडाने यांनी जस सांगतील तस केल नाही तर मारायचेच मारायचे... ती सगळी मुल खूप हतबल झालेली...त्यात आता हि सहा मुल त्यांच्या हाती लागलेली......पण त्या माणसाला मात्र ती मुल कशी आहेत हे नाही जाणवल ती मुल बाकिच्या मुलांपेक्षा चालाख होती फक्त सात वर्षाची असून पण......

इकडे त्या मुलांची आई त्यांना शोधत होती सारख पोलिसात जावून विचारणा करत होती पोलिस पण त्यांचा शोध घेत होते......

त्या मुलांना एका वेगळ्या खोलीत डांबून ठेवले होते. नंतर बंदोबस्त करता येईल म्हणून.....

ती मुलग खिडकीतून रोज त्या गोष्टी बघायचे कि कस त्यांच्याकडून नको ती काम करून घेतली जातात कस त्या निष्पाप मुलांना छळल जात..... त्यांनी त्या मुलांना बाहेर काढायच ठरवल......

त्यांनी त्या माणसाकडे जे लोखंड पाहिलेल ते हळूच आणायच अस ठरवल पण कस आणायच हा एक प्रश्न होता. त्यानूसार त्यांनी एक योजना बनवली... ते एकमेकांवर जस दहीहंडी करायला उभे राहतात तसे राहिले व उंचावर असलेली खिडकी उघडली त्यातून त्यांनी त्यांच्या एका मित्राला पळत जाऊन पोलिसांना घेऊन यायला सांगितले.... व दुसऱ्या मित्राला लोखंड घेऊन येण्यासाठी पाठवल ते दोन्ही मित्र चालाख होते एक जण नजर चुकवत चुकवत खरच पोलिस स्टेशनमध्ये गेला.. व दुसरा लोखंड घेऊन हळूच दरवाजा उघडून आत आला.. अचानकच त्या माणसाची बायको त्यांच्या खोलीपाशी आली तस ती ला ते दार बाहेरुन उघड असल्याच दिसल... तीच्या मनात संशय डोकावला व ती दार उघडून आत आली. व पाहते तर सगळे जण गाढ झोपलेले तिला वाटल ती चा नवराच कडी लावायची विसरून गेला व ती ने बाहेर जावून कडी लावली.....

तोवर त्यांच्यातली एक मुलगी म्हणू लागली अरे आता काय करायच दार तर उघडता नाही येणार मग यांना बाहेर कस काढायच असा विचार करत असतानाच त्या मुलीला एक आइडिया सुचली ती ने लगेच ती सगळ्यांना सांगितली.....

ती जोरजोरात दरवाजा ठोठावू लागली वाचवा वाचवा म्हणून तस त्या माणसाची बायको लगेच पळत तिथे आली तिने दरवाजा उघडला व विचारू लागली काय ग थेरडे काय झाल तुला एवढ्याने ओरडायला तस ती म्हणली वॉशरूम वॉशरूमला जायचय... तस ती स्त्री चल माझ्या मागून ये अस म्हणू लागली व पाठमोरी वळली तस ती नेती च्या डोक्यात ते जे कसल लोखंड होत ते घातल.. ती तशीच बेशुद्ध पडली तस त्यांनी त्या मुलांना बाहेर काढल व बाहेर पाठवल ती मुल पळत पळत बाहेर गेली... आता ही पोर पण जाणार होती तोच ती त्या माणसाची बायको शुद्धीवर आली.... व तो माणूस पण तसाच दारात उभा होता चिडलेल्या अवस्थेत..... 

prajakta panari ची आणखी पुस्तके

1

रात्र खेळीते खेळ भाग १

17 June 2023
0
0
0

सदर कथा ही पूर्णतः हा काल्पनिक आहे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी......आई ....... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला.समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट

2

रात्र खेळीते खेळ भाग 2

17 June 2023
0
0
0

ये अधिराज अरे ये कि इकडे केव्हाची वाट पाहतोय तुझी किती उशीर केलास अस म्हणत म्हणत त्याच्या समोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येवून उभा राहिला. डोक्याला मार लागलेला. डोळे पांढरे झालेले, हाता

3

रात्र खेळीते खेळ भाग 3

17 June 2023
0
0
0

सगळेजण थोड्या गप्पा मारून तिथेच बाजूच्या खोलीत झोपायला जाऊ लागले. जाता जाता ते आजोबांच घर पाहू लागले. त्या आजोबांच्या घराची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची होती. बाहेरून अगदी पडक घर वाटायच.पण आत आल्यावर वे

4

रात्र खेळीते खेळ भाग 4

17 June 2023
0
0
0

टक टक टक टक असा आवाज येवू लागला तस कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या जागेवरून उठली.तस आवाज कोठून येत आहे याचा वेध घेवू लागली. तस तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारख जाणवल ती हळू हळू पुढे जा

5

रात्र खेळती खेळ भाग 5

19 June 2023
0
0
0

त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होवू लागली व तशीच पुढे येवून अनुश्रीच्या जागी येवून झोपली.... खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लाग

6

रात्र खेळती खेळ भाग 6

19 June 2023
0
0
0

कावेरी हळूहळू आपल्या बेडवर आजूबाजूला मोबाईल सापडतो का हे शोधू लागली. यावेळी मात्र आधीसारखा जरा ही विलंब न होता तिला पटकन मोबाईल सापडला.. पण ती ने जस टाइम बघितला तस तिला आश्चर्याचा झटकाच बसला तीच्या घड

7

रात्र खेळती खेळ भाग 7

19 June 2023
0
0
0

राज यंत्रवत चालत चालत पुढे जात होता आणि अचानकच त्याला समोर दिसणारे ते डोळे दिसेनासे झाले. तसा लगेचच तो भानावर आला व जस तो भानावर आला तस त्याच्या मनात भितीने संचार केला कारण तो एका मोठ्या गुहेत पोहोचला

8

रात्र खेळती खेळ भाग 8

19 June 2023
0
0
0

पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी एक स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले..... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्र

9

रात्र खेळती खेळ भाग 9

20 June 2023
0
0
0

अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि नक्की कोण आहे... पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण

10

रात्र खेळती खेळ भाग 10

20 June 2023
0
0
0

ती पाच जण तिथून पळून जाणार तोच समोर तोमाणूस चिडलेल्या स्वरूपात उभा होता आणि त्याचीबायको सुद्धा शुद्धीवर आली होती. बाकिची मुल तिथूनकधीच पसार झालेली त्यामुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसून ये

11

रात्र खेळती खेळ भाग 11

20 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितलेला भूतकाळ ऐकून अनुश्री म्हणाली. ते दोघे नवरा बायको तर मेले ना मग परत हे सगळ का चालू झाले.. त्यावर ती स्त्री सांगू लागली. हा ते दोघे शरीराने गेले पण पूर्णपणे नाही मिटले.. पोलिसांन

12

रात्र खेळती खेळ भाग 12

20 June 2023
0
0
0

वीरच्या समोरून तो मुलगा हळूहळू गायब होतो तस वीर एकीकडून गोंधळून जातो आणि एकीकडून त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. काही क्षण तो स्तब्धच उभा राहतो पण जस मित्रांची आठवण येते तस लगेच स्वतः च्या भावना आवरत

13

रात्र खेळती खेळ भाग 13

20 June 2023
0
0
0

वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता समोर काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रक

14

रात्र खेळती खेळ 14

21 June 2023
0
0
0

ए अनू तु तु इथे कशी पोहोचलीस.... नाही तु पण कोणीतरी दुसरीच आहेस मगाचपासूनच सगळ्यांच्या आवाजाने दुसरच कोणीतरी बोलत आहे तु तु पण अनू नसणारच आमची नक्कीच त्या माणसाने तुझ रूप घेऊन कोणाला तरी पाठवल असणार..

15

रात्र खेळती खेळ 15

21 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे थोडा विचार करून कावेरी तिथल्याच त्या खड्ड्यातल्याच काही वस्तू शोधून घेते तिला वाटल कधी कोणत्या गोष्टींची गरज लागेल सांगता येत नाही म्हणून जे हाती येईल ते सगळ घेते व नंत

16

रात्र खेळती खेळ 16

21 June 2023
0
0
0

अधिराजला काहीच सुचेना झालेल कि काय करायच ते त्याच्यासोबत कावेरीच रूप घेऊन ती स्त्रीच चाललेली होती. तीने त्याला भिती दाखवली नसली किंवा जरी चांगल वागण्याच नाटक करत असली तरी तीला दूर करण गरजेच होत कारण त

17

रात्र खेळती खेळ 17

21 June 2023
0
0
0

अधिराज मित्रांना शोधत शोधत पुढे चाललेला प्रचंड घाबरलेला तरीही मित्रांना वाचवण्यासाठी तीळ तीळ तुटत होता. याच्यापासून अनभिज्ञ कि कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.एका वळणावर त्याला पावलांचा आवाज येतो तसा तो ग

18

रात्र खेळती खेळ 18

21 June 2023
0
0
0

अधिराज आणि कावेरीच रूप घेऊन आलेली ती स्त्री पुढे पुढे चालले होते. तिथून पुढे एक नदी दिसत होती. त्या नदिच्या जवळ गेल्यावर अधिराजचे पाय जमिनीपासून आपोआपच वरवर जावू लागले. पण त्या कावेरीच्या रूपात आलेल्य

19

रात्र खेळती खेळ 19

21 June 2023
0
0
0

पाऊस चालूच असतो पण त्यासोबत मोठ वादळ येत कावेरीने ठेवलेला दगड एक काळी सावली जमिनीपासून वर स्वतः कडे खेचून घेते त्यासोबत ती ने लिहिलेली अक्षर पुसली जातात..ते थोड्या अंतरावर जातात आणि वीर व अनूश्रीला आव

20

रात्र खेळती खेळ 20

21 June 2023
0
0
0

वीर अनूला शोधत असतो पण त्या खड्ड्यातल्या अंधारात सतत धडपडायला होत असतो. तो प्रत्येक कोपरा बॅटरीच्या सहाय्याने न्याहाळत असतो. पण एका गोष्टीचा त्याला खूपच त्रास होत असतो तो म्हणजे तिथे तीव्र प्रमाणात दु

21

रात्र खेळती खेळ 21

21 June 2023
0
0
0

ती सगळी प्रेत त्या तिघांच्या अवतीभवती गोळा होवू लागतात. तस त्यांना काय कराव हेच सूचेनास होत. एकतर वीरला पाहून सगळ्यांच हृदयच हळहळत होत. त्यात ते पुस्तक आणि शस्त्र दोन्हीही त्यांच्यापासून दूर झालेल. तर

---

एक पुस्तक वाचा