shabd-logo

गोप्या प्रचारक होतो

1 June 2023

4 पाहिले 4
चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून पाहिला. त्याला ते आवडले. या गोष्टीचा आपण प्रचार केलाच पाहिजे असे त्याने ठरविले. त्याच्या संसाराचा पसारा आता फारसा नव्हता. दोन मुले नि तो. शेतकऱ्यांची संघटना करण्याचे त्याने नक्की केले.

एके दिवशी तो पुन्हा एका जमीनदाराकडे कामाला गेला होता. दुसरेही पुष्कळ मजूर आले होते. सारे गोप्याच्या ओळखीचे होते. सारे कामाला लागले. काम करता करता त्याच्या गोष्टी चालल्या होत्या. सुखदुःखाच्या गोष्टी.

“काय रे गोप्या, तुझ्याकडून मालकाने जमीन काढून

घेतली म्हणतात, हे खरे का ?' एकाने विचारले.

'अजून काढून घेतली नाही. परंतु कदाचित काढून घेईल. बघावे काय होते ते.'

'तू चार दिवसांत कुठे दिसला नाहीस, गोप्या !'

'अरे, माझी मुलगी तारा, ती मेली.'

'तारा मेली?'

'तळ्यात पडून मेली.’

'तू तिला शिवापूरला ठेवली होतीस पेन्शनराकडे. होय

ना? मिलिटरीवाला. त्यानेच केली असेल शिकार.'

तळ्यात बुडून मेली असे म्हणतात.'

'गोप्या, तुझी तारा गवत कापायला यायची. लहान पोर; परंतु झपझप कापीत जायची. अरे, माझ्या रामाचे लग्र तुझ्या ताराशी लावावे असे माझ्या मनात येई. तुझ्याजवल आज हे मनातले बोललो. चुणचुणीत हुशार मुलगी ! अशी कशी मेली ? आणि तू तिला अशी ठेवलीस तरी कशी दुसच्याकडे ?'

“गरिबाला उपास नसतो. घरी कर्ज झाले होते. मी एकटा. आणखी दोन लहान मुले घरात. म्हणून ठेवली तिला त्या पेन्शनराकडे. पुढे असे होईल हे का कोणाला माहित होते? आपली शेतकऱ्याची स्थिती फार वाईट.'

'आणि आपण सारे धनधान्य निर्माण करतो. आपण

गवत कापायचे; आपण मळे करायचे, आपण शेती पिकवायची. परंतु आपणाला काही नाही. आपल्या मुलांना शाला नाही. आपल्या बायकांच्या अंगावर नीट लुगड़ी नाही

आणि घरात मूठभर धान्य नाही.'

‘परंतु असे रट्टा काय होणार? आज दुपारी आपण भाकर खायला बसू तेव्हा मी काहीतरी वाचून दाखविणार आहे.'

'गोप्या, तू वानून दाखविणार?'

'अरे, मी लहानपणी थोडे शिकलो होतो आणि आपला हरबा आहे ना? त्याने मला वाचायची सवय ठेव रूपल सांगितले. तो मला आणून देतो जुनी वर्तमानपत्रे. बसतो

वाचीत. '

'अरे. तो हरबा रात्रीच्या शाळेत जातो तो नवीन मास्तर आला आहे ना मराठी शाळेत, त्याने रात्रीची शाळा काढली आहे.'

'पांडू मास्तर. फार चांगला आहे म्हणतात. पोराना काँग्रेसची गाणी शिकवितो.'

'काय रे गोप्या, ही काँग्रेस का इंग्रजाला दवडील येयून? इंग्रजाजवळ लष्कर, तोफा, विमाने. या कांग्रेसजवळ काय आहे?'

'अरे, एबढा चौदा चौकड्याचा रावण, तोहों का राहिला? शेवटी धुळीतच गेला. हे इंग्रज का कायमचा ताम्रपट घेऊन आले आहेत? आपण या काँग्रेसमध्ये एसले पाहिजे.'

'काँग्रेस का गरिबाची आहे? तिच्यात ते काही सावकार, जमीनदार सुद्धा आहेत. ढवळी टोपी घालतात. परंतु आपल्यात्हा पिळतातच. '

'अरे, त्यांना एक दिवस काँग्रेस सोडावी तरी लागेल नाही तर जपून बागावे लागेल. मी सांगतो त्यांच्या जमिनी काह राहणार नाहीत. थोडी त्यांना ठेवून बकीची तुम्हा-आम्हाला वाटून देण्यात येईल. महात्मा गांधींचे हेच मत आहे.'

गोप्या, तुला बरेच समजायला लागलें रे!'

‘माझे एक सांगणे आहे की, या कांग्रेसमध्ये घुसून तिला आपली केली पाहिजे. गाईचे वासरू गाईला ढुशा देते. गाईला त्याचा राग न येता तिला अधिकच पान्हा फुटतो. त्याप्रमाणे आपाण या कांग्रेसमध्ये शिरून आमच्यासाठी हे कर.

आमच्यासाठी ते कर, असे प्रेमाने सांगितले पाहिजे. काँग्रेस सारे करील आपण तिची शक्ती बाढविली पाहिजे.'

'गोप्या, तू आमचा पुढशि हो.'

“आपले सर्वाचे पुढारी महात्मा गांधी. '

अशी बोलणी चालली होती. आणि भाकरी खायला सारे निघाले. विहिरीवर हातपाय धुऊन सारे झाडाखाली बसले.

‘घ्या देवाचे नाव, बसा.'

'बसा, ध्या.'

सारे कांदा- भाकर खाऊ लागले. आनंदाने गप्पा मारीत जेवत होते. जवळची चटणी एकमेकांस देत होते.

गोप्या, लोणच्याची चिरी हवी रे?"

'दे, माझी मंजी थोडीच आहे थोडे लोणचे घालून ठेवायला?'

'अरे, माझ्या घरी कोण घालणार? आणि चालायचे कशात? का बरणी आहे घरी ठेवायला त्या धोंडशेटीकडे गेलो होतो कामाला. त्याच्या बायकोजवळ मागितले लोणचे. द्रोणभर तिन दिले.'

'धोंडशेटची बायको उदार आहे. '

'कोणाला ताक देईल. कोणाला काही. ती कधी नाही म्हणत नाही.'

'परंतु घोडशेंट कवडीचुंबक आहे. त्याची बायको त्याला

तारील. नाहीतर मेल्यावर नरकातच जायचा.'

‘आपण जिवंतपणीच नरकात आहोत. रोज घरी दुःखे,

चिंता, यातना.'

'गोप्या, तू वाचून दाखवणार होतास ना कार्हा तरी?'

'शनिमहात्म्य वाचणार की काय?' ‘का पांडवप्रताप आहे का शिवलीलामृत आहे?' 'मी तुम्हाला शेतकरीप्रताप वाचून दाखवणार आहे.' 'शेतकरीप्रताप? ही पोथी नव्हती ऐकली !' ‘ही नवीन पोथी आहे. तिचे पाठ अद्याप सुरू झाले नाहीत. '

असे म्हणून गोप्याने पिशवीतून ती पत्रके काढली. ते मित्र पाहू लागले, महात्माजींचे वर चित्र होते. तिरंगी झेंड्याचे चित्र होते.

'गोप्या, गांधीबाप्पाचे काही आहे वाटते यात? हा झेंडा काँग्रेसचा. वर चरखा आहे बघा.'

कसली तरी जाहिरात आहे बघा. '

'गोप्या, वानून दाखवू. आम्ही ऐकतो.'

'गोप्या वाद्य दाखबू लागला ते सारे ऐकत होते.' ‘शेतकरी बंधूंनो,’

तुम्ही वास्तविक जगाचे राजे. तुम्ही जगाचे पोशिंदे सारे जग तुमव्यामुळे जगते. सारा व्यापार तुमच्यामुळे चालतो. तुम्ही कापूस न पिकवाल तर या गिरण्या कशा चालतील? तुम्ही शेंगा न पिकवाल तर तेलाच्या गिरण्या कशा चालतील? तुम्ही उसाचे मळे तयार न कराल तर साखरेचे कारखाने कसे चालतील?

तुम्ही धान्य न निर्माण केले तर धान्याचे व्यापारी व्यापार कसला करतील? मोठमोठे कारखानदार, मोठमोठे व्यापारी, तसेच सारे शेटसावकार, जमीनदार या सर्वांच्या चैनी तुमच्या जिवावर

चालल्या आहेत. परंतु तुमची काय स्थिती आहे? तुम्हाला पोटभर खायला नाही. अंगभर कपडा नाही. तुम्हाला ज्ञान नाही. लिहिता वाचता येत नाही. ही सारी स्थिती आपण बदलली पाहिजे. आपण क्रांती केली पाहिजे. शेतकरी खरा मालक झाला पाहिजे. कामगार खरा मालक झाला पाहिजे. असे शेतकरी-कामगारांचे राज्य आपणास आणायचे आहे. त्यासाठी आपण एकी केली पाहिजे. शेतकरी संघ ठायी ठायी स्थापिले पाहिजेत. काँग्रेसच्या झेंड्याखालचे शेतकरी - संघ. परकी सरकारशी लढणारी फक्त काँग्रेसच आहे. तिच्या झेंड्याखाली जाऊन आपणही आपली स्थिती सुधारून घेतली पाहिजे, तिच्यामार्फत आपण आपली दुःखे दूर करून घेतली पाहिजेत. आणि तिचा लढा आला तर त्यात सर्वांनी उड्या घेतल्या पाहिजेत. आपल्या पायावर आपण उभे राहिले पाहिजे. म्हणून संघटना करा. ‘काँग्रेसकी जय' म्हणा; 'महात्मा गांधीकी जय' म्हणा. 'शेतकरी-कामकरी राज्याचा जय' म्हणा. वंदे मातरम्!'

'संपले का रे?'

‘ते का पुराण आहे लंबेचौडे ! हँडबिल आहे ते सुटसुटीत.'

'गोप्या, तू आमचा म्होरक्या. तू सांगशील तसे आपण

वागू.'

'आपण किती दिवस असे किड्यासारखे जगायचे? वास्तविक सर्वांच्या डोक्यांवर आपण बसायला हवे, तर उलटीच जगाची रीत, उलटाच न्याय. सारे आपल्या डोक्यांवर बसमात. जो तो आपल्याला दरडावतो. बस म्हटले, की आपण बसतो; ऊठ म्हटले, की उठतो. कधी मामलेदार कचेरीत आपल्याला खुर्ची मिळते का ! येसफेस करणारा आला की त्याचा खुर्ची. आमची घरेदारे, शेतवाडी सारे गिळंकृत करणारा त्याला खुर्ची.'

'कोर्टकचेरीत वकील साक्षीदाराला विचारतो : तू शेतसारा किती भरतोस?

इन्कमटॅक्स भरणारा तेवढा प्रामाणिक ! त्याला जणू अब्रू. आणि आम्हा गरिबांना का जणू नाही? सारे इन्कमटॅक्स भरणारे नि ते सावकार हेच वास्तविक अप्रामाणिक म्हणून तर बकासुराप्रमाणे त्यांनी जमिनी गिळल्या. परंतु न्याय त्यांच्या बाजूला. सत्य जणू त्यांच्याजवळ ! सारा चावटपणा आहे!'

'गोप्या, तू कोठे शिकलास असे बोलायला?'

‘अरे, हल्ली मी वर्तमानपत्र वाचतो आणि हे विचार का आपल्या मनात नयतात? असे बोलायला कोणी शिकवायला नको.'

इतक्यात मालक तेथे आला. त्याची चर्चा रागावलेली दिसत होती. ते सारे मजूर तसेच बसूल होते. कोणी उठले नाही.

‘वाच गोप्या, पुन्हा एकदा वाजून दाखव नीट.'

'काय रे, काय वाचून दाखवायचे आहे ? गोप्या, काय आहे ते तुइया हातात? अरे, दोन बाजून गेले. आता तीन वाजतील. तरी तुम्ही झाडाखालीच ? फुकाची मजुरी असते वाटते? उठा कामाला! अजून चिलीम प्यायचीच असेल ? सुपारी खायचीच असेल? होय ना? उठा उठता की नाही.'

'अरे जा रे! मोठा आला उठा उठा कराणारा. आम्ही का शेळ्यामेंढ्या आहोत? माणसे आहोत आम्ही. वाच, गोप्या. '

‘गोप्या वाचू लागला. मालकाने त्याच्या हातातील ते पत्रक ओढुन घेतले. मालकाने ते वाचून पाहिले. तो चिडला.

'गोप्या, हा चावटपणा तू सुरु केलास का? शेतकरी-

संघ काढणार वाटते आता? काँग्रेसच्या नादी लागू नका. उद्या तुरुंगात जाल फुकट मराल.

'नाही तरी किड्यासरखे मरतच आहोत. आम्ही खंडोगणती धान्य पिकवितो; परंतु आम्ही उपाशी असतो. या गोप्याची बायको उपाशी राहून राहून मेली.'

‘गप बसा. कामाला लागा; आणि गोप्य, तू अशी फंदफितुरी करशील तर खबरदार! गावात भींडणे माजवू नको. तेढ उत्पन्न करू नको. ते बापूसाहेब तुझ्याकडून जमीन काढून घेऊ म्हणतात, ते उगीच नाही. उद्या त्या जमिनीचा तूच मालक होऊन बसायचास!'

‘आमचीच जमीन आहे ही. तुम्ही चोर आहात सारे. दामदुपटी करून सप्या जमिनी घेतल्यात. सवाई, दिढी असे तुमचे प्रकार. यंदा मणभर धान्य द्यायचे आणि पुढील वर्षी सव्वा मण, दीड घ्यायचे. याचा अर्थ शंभर रूपये देऊन त्याचे सव्वाशे. दीडशे लगेच घ्यायचे. आणि अशी व्याजे भरता आली नाहीत, बाकी थकली की सारे तुम्ही घशात घालायचे. राक्षस आहात तुम्ही सारे, राक्षस!'

‘गोप्या, जपून बोल.’

‘इतके दिवस जपून बोललो. परंतु बायको-मुले उपाशी राहून तडफडून मरत आहेत. तरीही का जपून बोलू? हा गोप्या आता पेटला आहे. तो सर्वाना पेटवील. येथे गरिबांचे राज्य आम्ही सुरू करू.'

‘काँग्रेस का हे शिकविते?'

'आज ना उद्या काँग्रेस हेच करणार! मला खात्री आहे.'

'गरिबांसाठी गांधीजी आहेत. गरिबांसाठी नेहरू आहेत. आम्ही संघटना करणार. वेळ आली म्हणजे, काँग्रेसचा हुकूम झाला म्हणजे आम्ही बंड करणार, उघड बंड. '

'मरशील, फाशी जाशील!'

'तसे झाले तर माझ्यावर पोवाडे होतील, आमचे नवीन रामायण- महाभारत कोणी लिहिल!'

'जा रे माकडांनों!'

'माकडांनीच पराक्रम केले नि सोन्याच्या लंका जाळल्या

आणि माकडांचा पराक्रम सांगण्यासाठीच रामायण लिहावे लागले. '

‘पुरे, पुरे! गोप्या, तू असला चावटपणा करशील तर याद राख! फाजीलपणे बोलत जाऊ नकोस. नाही तर, तुला कोणीही कामावर बोलावणार नाही असे आम्ही करू. तुझ्याकडचे शेतही काढून घ्यायला सांगतो. फार माजलास तू.'

'शेतकऱ्यांना पिळून तुम्ही माजला आहात.'

गोप्या, तोंड संभाळून बोल.'

“आधी तुम्ही आपले सांभाळा. तुम्ही आधी मला म्हणालेत की ‘माजलात'. तुम्ही का पोसता मला? आम्ही तुम्हा सर्वांना पोसतो. कृतघ्न आहात सारे. चोर आहात तुम्ही. दरोडेखोर आहात तुम्ही.'

'गोप्या, चालता हो येथून.'

'हा निघालो मी.'

'तुला अन्नाला मोताद करीन.'

‘गोप्या, आम्ही तुला पीसू.' ते मजूर म्हणाले.

'तुम्ही लागा रे कामाला.'

‘महात्मा गांधीकी जय !' त्यांनी सर्वांनी गर्जना केली.

गोप्या तेथून निघून गेला. इतर मजूर काम करू लागले.

मधून मधून ते 'तिरंगी झेंडाकी जय', 'महात्मा गांधी की जय' अशी गर्जना करीत होते आणि मालक झाडाखाली बसून त्या नवगर्जना ऐकत होता, दांतओठ खात होता. आपल्या मुठी जमिनीवर आपटीत होता. नवयुगधर्म त्याला केव्हा कळणार?

गोप्या आता शेतकऱ्यांत प्रचार करी. रात्री निरनिराळ्या ठिकाणी तो जाई. त्यांना अनेक गोष्टी समजावून देई. त्याने ग्रामकाँग्रेस समितीही स्थापली. काँग्रेस शेतकरी-कामकरी संघही त्याने स्थापिला. तो सर्वांनी आवडता झाला. त्यालाही आत्मविश्वास आला. तो सुंदर बोले. गाणी म्हणे. त्याच्याकडची मी काढून घेण्यात आली. परंतु त्याची झोपडी तेथेच होती. इतर शेतकरी- कामकरी त्याला काही कमी पडू देत नसत. तो त्यांना नवजीवन देत होता. तो त्यांना नवीन प्रकाश देत होता. नवयुगधर्मं तो त्यांना शिकवीत होता. तो त्यांना विचाराची भाकर देई; ते त्याला धान्याची भाकर देत.

आणि गोप्याचे नाव तालुक्याच्या मुख्य गावाला जाऊन पोचले. त्याची कीर्ती पसरली. त्याला व्याख्यानासाठी बोलावणी येऊ लागली. परंतु तो अद्याप जात नसे. त्याला बाहेर जायला धीर होत नसे. एप्रिल महिन्यातील राष्ट्रीय सप्ताह त्या वेळेस सुरू होता. ६ एप्रिल ते १३ एप्रिल. जालियनवाला बागेतील कत्तलीचे ते दिवस. शेवटचा तेरा तारखेचा दिवस हिंदुस्थानभर हुतात्मा-दिन म्हणुन पाळण्यात येई. तालुक्याच्या ठिकाणी त्या दिवशी प्रचंड सभा भरणार होती.

शिवापूर हेच तालुक्याचे मुख्य गाव. दौल्या तेथेच राहात होता. दौल्या तेथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना म्हणाला, 'हुतात्मा दिनाच्या दिवशी गोपाळपूरच्या गोप्याला बोलायला बोलवा. तो फार सुंदर बोलतो.' त्याप्रमाणे काही काँग्रेस कार्यकर्ते गोपाळपूरला आले. रात्री त्यांनी सभा घेतली. सभेनंतर थोडी चर्चा करीत ते बसले.

“काय गोपाळराव, मग येणार ना शिवापूरला ? याच.'

‘मला गोपाळराव म्हणू नका. गोप्या नावच मला आवडतं.'

“परंतु सभेत गोप्या म्हणून कसे म्हणायचे?'

'त्याला गोपाळदादा म्हणा, किंवा भाई गोपाळ म्हणा.'

'गोपाळदादा हेच नाव ठीक आहे.'

‘गोप्या, जा शिवापूरला. तेथेही कर ठणठणीत भाषण. मिळव टाळ्या. आपल्या गावाचे नाव सर्वत्र होईल. वर्तमानपत्रांत येईल. आमच्या गोप्याचा फोटो आला पाहिजे बघा‘नवा काळा' त.' एक शेतकरी म्हणाला.

शेवटी हो ना करता करता गोप्याने यायचे कबूल केले.

ती पाहा शिवापूरची प्रचंड सभा. खेड्यापड्यांतून हजारो शेतकरी आले आहेत. तो पहा मोठा तिरंगी झेंडा डौलाने फडफडत आहे. खांद्यावर घोंगडी घेतलेला गोप्या एका खुर्चीवर बसला आहे. त्याच्याकडे लोक कुतूहलाने पाहात आहेत.

सभेला सुरुवात झाली. अनेकांची भाषणे झाली आणि आता गोप्याची पाळी आली. अध्यक्ष म्हणाले, 'आतापर्यंत शहरी व्याख्यात्यांची भाषणे ऐकलीत. आता खेडेगावी नमुना पाहा. आपल्या गोपाळपूरचे भाई गोपाळ किंवा गोपाळदादा हे आले आहेत. ते काँग्रेसचे भक्त आहेत. शेतकऱ्यांचे प्राण आहेत. स्वत : श्रमणारे ते श्रोतमाजूर आहेत; ते आता बोलतील ते ऐकून घ्या.'

टाळ्यांच्या कडकडाटात गोप्या उभा राहिला. शेतकरी जरा सरसावून ऐकू लागले. गोप्या प्रथम जरा बावरला. परंतु पुढे त्याची रसवंती सुरू झाली. ते अपूर्व भाषण झाले. ती प्रचंड सभा चित्रासारखी होती. अनुभवाच्या शब्दांना निराळेन तेज असते. गोप्या म्हणाला:

‘जालियनवाला बागेतील शेकडो हुतात्म्यांचे आपण स्मरण करीत आहोत. ते योग्यच. सरकारच्या गोलीबाराळा ते शेकडो बांधव बळी पडले. त्यांना प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. परंतु हुतात्मे रोज होत आहेत. सरकारी नि सावकारी जुलमाला सीमा नाही. लाखो खेड्यापाड्यांतून लाखो हुतात्मे; शहरांतील कारखल्यांतून हुतात्मे: खेड्यातील झोपड्यांतील हुतात्मे. माझी बायको मंजी, ती का हुतात्मा नेव्हती? ती उपाशी राहून तुम्हा प्रतिष्ठितांना पोशीत होती. तुम्हांला धान्य देत होती. तिचे बलिदान कोणाला आहे का ठाऊक? आणि माझी तारा ! आकाशातील तऱ्याप्रमाणे तेजस्वी! ती का हुतात्मा नव्हती? लहानपणी अपार काम तिला करावे लागे. तिचे खेळण्या - बागडण्याचे व्य. परंतु या शिवापुरात तिला मोलकरीण म्हणून राहावे लागले. रासभर धुणे धुवावे लागे. या गावच्या तळ्यात ती बुडून मेली! बुडून मेली की तिने तुम्हाला जागे करायला स्वत:चे बलिदान केले ? बंधुनो, माझ्याच काय, लाखो शेतकऱ्यांच्या घरात ही अशी मुकी बलिदाने दररोज होत आहेत. कोण जागा होतो? कोण उठतो? ही काँग्रेस काही करील आशी आश आहे. तिने हुकुम करावा. आम्ही बंड करू. यापुढे किड्यांप्रमाणे आम्ही रहणार नाही. आम्ही आपली मान उंच करणार. करणार!'

किती तरी वेळ गोप्या बोलत होता. शेवटी तो बसला. टाळ्यांचा कडकडाट थांबेना. अध्याक्षांनी कसा तरी समारोप केला. 'वंदे मातरम्' होऊन सभा संपली नि गोप्याला भेटायला ही गर्दी लोटली.

'फार छान बोललेत तुम्ही.' कोणी म्हणाले.

‘अहो, मीच तेथे डुड्ढाचार्य. तेथे कोठली अभ्यासमंडळे? अनुभवाच्या शाळेत आम्ही शिकतो.'

'परंतु तुम्ही महाराष्ट्राचे पुढारी व्हाल. '

‘मला पुढारी होण्याची इच्छाच नाही.'

'इच्छा नसली तरी जनतेचे स्वराज्य यावे म्हणून पुढे व्हावे लागते.'

अशी बोलणी चालली. कार्यकर्त्यांना भेटून आपल्या गावच्यामंडळीबरोबर गोप्या पुन्हा गोपाळपूरला आला. तो आता शिवापूरला वरचेवर जाई. कार्यकर्त्यांशी त्याची मैत्री जमली. तो हुशार होऊ लागला. माहिती मिळवू लागला. त्याने शेतकऱ्यांचे सेवादल सुरू केले. मुलांचीही सेवादले सुरू केली. शेतकऱ्यांच्या बायकांतही तो प्रचार करी. त्यांनाही समजून देई. गोप्या आदर्श प्रचारक बनला. निरलस नि उत्साही!


7
Articles
गोप्या
0.0
येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अनेक छात्रालयांतून सांगितली. सर्वांना ती आवडे. ती गोष्ट मी जशी सांगत असे, तशीच लिहून काढून आज प्रसिध्दीसाठी देत आहे. मूळची कादंबरी माझ्याबरोबर नाही. फक्त सूत्र आहे. मूळच्या सूत्राचा आधार घेऊन माझ्या भाषेत मी मांडून देत आहे. आवडत्या गोष्टी तील हा दुसरा भाग सर्वांना आवडो. – साने गुरुजी
1

गोप्याचा जन्म

1 June 2023
1
0
0

गोप्याचा जन्मत्या गावचे नाव गोपाळपूर गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. प

2

मामाच्या घरी

1 June 2023
0
0
0

गोपाळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्दैवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे

3

गोप्याचा संसार सुरू झाला

1 June 2023
1
0
0

गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या

4

मंजी देवाघरी गेली

1 June 2023
1
0
0

झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात ल

5

संसारातील आणखी दुःखे

1 June 2023
1
0
0

गोप्याला अती दुःख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी

6

गोप्या प्रचारक होतो

1 June 2023
0
0
0

चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून प

7

बलिदान

2 June 2023
0
0
0

देशातील व जगातील परिस्थिती झपाताड्याने बदलत होती. जगात महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड त्या युद्धात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्याप्रतिनिधींना

---

एक पुस्तक वाचा