shabd-logo

मामाच्या घरी

1 June 2023

9 पाहिले 9
गोपाळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्दैवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे तिच्या मनात राहून राहून येई. त्या मोठ्या घरात ती नि गोपाळ दोनच जीव. गोठ्यात गाय होती. परंतु तिने गाय विकुन टाकली. तिला मजुरी करायला जावे लागे. एवढे मोठे घर असून काय उपयोग? मजुरीही रोज मिळत नसे. लोक तिची गिल टिंगल करीत. कोणी वाटेल ते बोलत. ती सारे सहन करी.

परंतु ते राहते घरही गेले. त्या घरावर सावकारांच्या जप्त्या आल्या. घरातून सावित्री मुलाला घेऊन बाहेर पडली. आता कोठे राहायचे? तिला कोठे आधार दिसेना. शेवटी एके दिवशी मुलाला घेऊन ती गावाबाहेर पडली. त्या गुणगुणी नदीच्या तीराने ती जात होती. मध्येच बाळाला ती कडेवर उचलून घेई. थोड्या वेळाने त्याला ती खाली उतरी. आईच्या पाठोंपाठ बाळ दगडधोंड्यांतून दुडूदुडू धावे. आई जरा लांब गेली की लहानगा गोपाळ रडू लागे. सावित्री थांबे. ती त्याला उचलून घेई. घामाघूम झालेल्या बाळाचा मुका घेऊन ती म्हणे; 'अशा दुर्दैवी आईच्या पोटी कशाला आलास बाळ?'

बाळ आईला धट्ट धरून ठेवी. जणू आई कोठे जाईल असे त्याला वाटे. जाता जाता देव मावळला. अंधार पडू लागला. गोपाळला उचलून घेऊन ती दुःखी माता जात होती. किती दूर जाणार, कोठे जाणार ती? ती आता थकली दमली. पायांना फोड आले. परंतु अद्याप गाव दिसेना. किती लांब आहे गाव? कोणत्या गावी तिला जायचे आहे? रानात कोल्हे ओरडत होते. रातकिडे किर्र आवाज करीत होते. गोपाळ आईला चिकटून होता. चांदणेही आज नव्हते. परंतु निरभ्र आकाशातील तारे चमचम करीत होते. त्यांच्या उजेडात ती प्रेममूर्ती माता जात होती. गार वारा सुटला. बाळाला थंडी लागत होती. आपल्या पदराचे पांघरूण घालून माता गोपानला सांभाळीत होती

आता दूरचे दिवे दिसू लागले. गुरांच्या गळ्यांतील घंटाचे आवाज कानांवर येऊ लागले. कोणता तरी गाव आला. हाच का गाव सावित्रीला पाहिजे होता ? ती झपझप पावले टकीत जात होती. ती गावात शिरली. तो मोठा गाव होता. सर्वत्र गजबज होती. शेतांतून गाड्या गावात येत होत्या. गुरांना शेतकरी दाणावैरण घालीत होते. कोठे दूध काढीत होते. कोठे मजूरांना मजुरी देण्यात येत होती. त्या मातेचे कशाकडेही लक्ष नव्हते. शेवटी ती एका मोठ्या घराजवळ थांबली. कोणाचे होते ते घर? कोण राहत होते तेथे ? गडीमाणसांची तेथे ये-जा सुरू होती.

'कोण आहे तिथे उभे ? चोर की काय?' कोणी विचारले. 'मी आहे.' सावित्री म्हणाली

‘मी म्हणजे कोण?’

'मी सावित्री. दादाकडे आले आहे.'

इतक्यात घराचा मालक तेथे आला. गडबड ऐकूने तोच माडीवरून खाली आला

'काय आहे रे गडबड ?' त्याने विचारले.

‘दादा, मी आले आहे.'

'कोण? सावित्री ?'

‘होय, दादा.’

'तू पुन्हा येथे कशाला आलीस? काही वर्षांपूर्वी तू एकदा आली होतीस. तुझा पहिला नवरा तेव्हा मेला होता. परंतु मी तुला घरात ठेवले नाही. तू पांढच्या पायांची अवदसा आहेस. जाशील तेथे निःसंतान करशील. तुला मी घालबून लावले होते. पुढे कळले की तू पुन्हा दुसरा नवरा केलास आणि तोही मेल्याचे परवा कळले. परंतु येथे कशाला आलीस? भावाचीच सत्त्वपरीक्षा घ्यायला आलीस बाटते? तू चालती हो. माझ्या भरल्या घरात दुर्दैव नको.'

'दादा, आजची रात्र राह दे. आजच्या रात्रीचा विसावा दे. उद्या ही बहीण येथे राहणार नाही. देव उगवायच्या आत मी निघून जाईन. राह दे. नाही नको म्हणूस. '

'बरे तर. आजची रात्र राहा. या पडवीत झोप. सकाळ

होण्यापूर्वी निघून जा. सकाळी तुझे तोंड दिसायला नको. समजलीस? आणि हा तुझा मुलगा वाटते?'

'होय. माझा गोपाळ . '

‘बस त्या पडवीत.' असे म्हणून भाऊ माडीवर निघून गेला. तिला एक फाटकी घोंगडी देण्यात आली. खयाला शिळीपाकी भाकर देण्यात आली. परंतु भाच्यासाठी मामाने दूध पाठविले.

'त्याला तू दूध पाज. उपाशी नको निजबू' मामा

म्हणाला.

‘त्याला कोरडबा भाकरीची सवय आहे.'

'सवय न होऊन कसे चालेल?"

मामा गेला. गोपाळ ते दूध प्याला. आईच्या मांडीवर दमलेला बाळ झोपी गेला. किती तरी वेळ त्याच्या तोंडाकडे माता पाहात होती. शेवटी त्याला कुशीत घेऊन तीही झोपली. घरात सर्वत्र सामसूम होती. माणसे झोपली होती. गडीमाणसे झोपली होती. गोठ्यात गुरे झोपली होती. फक्त आकाशातील तारे शोपले नव्हते. भिरभिर करणारा वारा झोपला नव्हता.

अद्यापि प्रहरभर रात्र होती. माता जागी झाली होती.

तिने मुलाला घट्ट जवळ घेतले. थोड्या वेळाने ती उठली. ती दारापर्यंत गेली. पुन्हा ती माघारी आली. बाळाच्या अंगावर प्रेमळ हात ठेवून पुन्हा ती पडून राहिली. तिचे डोळे भरन आले होते. छाती खालीवर होत होती. बाळ जागा होऊ नये म्हणून उठून बसली. तिने त्याचा रुळूच पापा घेतला. ती

'बाळ, मामाच्या घरी सुखी राहा. त्याने तुला दूध दिले. तो तुझ्यावर प्रेम करील. अभागी आईजवळ राहण्यापेक्षा मामाजवळ राहा हो बाळ. सुखी हो. मोठा झाल्यावर आईला नावे नको हो ठेवू. साच्या जगाची जी माता त्या जगदंबेच्या ओटीत तुला घालून मी जात आहे. जाते हं बाळ. सुखी अस.'

मोहपाश दूर करून माता उठली. तिने हळूच दार उघडले. ती बाहेर अंगणात आली. तिने आकाशातील ताच्यांकडे पाहिले. तिने हात जोडले. ती निघाली. तो पाहा. कोंबडा आरवला. शेतकरी उठू लागतील. ती माया ममता पोटात ठेवून लगबगीने निघून गेली. कोठे गेली ती? कोणाला माहीत ! वाच्याला माहीत. कदाचित् गुणगुणीच्या त्या गंभीर डोहाला माहीत असेल.

आता बाहेर उजाडले. कामाची गर्दी झाली. दुधाच्या धारा वाजू लागल्या. गोठे झाडले जाऊ लागले. गायीगुरे रानात जाऊ लागली. गोपाळचा मामा उठला. मामी उठली. घरातील मुले उठली. परंतु लहानगा गोपाळ अद्याप गोड झोपेतच होता. मामा तेथे डोकावला. तेथे बहीण नव्हती. कोठे गेली बहीण ? मुलाला टाकून गेली की काय?

थोड्या बेळाने गोपाळ उठला. त्याने आजूबाजूस पाहिले. आई दिसेना. तो रडू लागला. आई, आई करीत, तो इकडे तिकडे रडत जाऊ लागला. मामा जवळच होता. त्या लहान मुलाचे अश्रू पाहून, तो विलाप ऐकून मामाचे हृदय द्रवले. त्याने मारार उचलून घेतले. त्याला त्याने घरात नेले. खाऊ देऊन त्याला उगी केले.

‘गेली कुठे त्याची आई? येथे पोराला टाकून गेली वाटते अवदसा ! आता याला का तुम्ही पोसणार तुम्ही; वाढवणार? भाच्याला टाकवत नाही वाटते?' मामी म्हणाली.

'अगं, या लहान मुलाचा काय दोष? त्याची आई दुर्दैवी आहे. याला आपण पाळू बाढवू.'

दुर्दैवी आईची पोरे कोठली सुदेवी निघायला !'

'परंतु या लहान मुलाला का आपण फेकून देणार? राहू दे आपल्याकडे. उद्या मोठा होईल. शेतीच्या कामाला उपयोगी पडेल. तुझी मुले आहेत, त्यांत तो वाढेल. त्याचे का ओझे आहे?'

मामा भाच्याला घेऊन माडीवर गेला. गोपाळ 'आई आई’ करीत होता. ‘येईल हं तुझी आई, उगी.' असे म्हणून मामा त्याची समजूत घालीत होता.

गोपाळ त्या घरात वाढू लागला. मामी त्याला हिडीसफिडीस करी.मारीही. परंतु मामा मधून मधून त्याला जवळ घेई. खाऊ देई. प्रेमाने एखादा मुकाही घेई. गडीमाणसांना गोपाळ आवडे. तो स्वच्छ होता. डोळ्याला पाणी नाही, नाकाला शेंबूड नाही. तो तरतरीत व हुषार दिसे. गोपाळ गोठ्यात जाई. दूध काढणारा गडी तेथेच त्याला वाटीभर दूध देई. फेसाळ धारोष्ण दूध. गोपाळ गुटगुटीत झाला

पुढे मामाने भाच्याला शाळेत घातले. एकदोन इयत्ता झाल्या, परंतु गोपाळचे अभ्यासात लक्ष नसे. तो खेळण्यात पटाईत होता. खोड्या करण्यात त्याचा पहिला नंबर. मुलांचा तो म्होरक्या होता. परंतु मास्तर त्याच्यावर रागवत. एके दिवशी तर पंतोजी फारच संतापले व म्हणाले,

‘गोप्या, चालता हो शाळेतून. तुला काही यायचे नाही. कशाला येतोस शाळेत? घरी राहशील तर मामांची गुरे तरी राखशील. थोडा उपयोग तरी होईल तुझा. येथे दगडासारखा बसून काय फायदा ? तू नुसता नंदीबैल आहेस. साधा हिशेब तुला समजत नाही. अजून गुणाकार चुकतोस आणि तुला त्याची लाजही नाही. हो चालता. '

आणि गोप्या खरेच पाटीदप्तर घेऊन घरी आला. मामा अंगणात उभे होते.

'काय रे गोप्या, घरी का आलास?' त्यांनी विचारले.

'मास्तर म्हणाले, तू शाळेत नको येऊस. घरीच राह । . मग काय करू?'

‘अरे त्यांनी असे सांगितलें म्हणून आपण का निघून यायचे? तू अभ्यास करीत नसशील म्हणून ते तसे म्हणाले.

चल, मी 'तुला शाळेत पोचवितो. सांगतो मास्तरांना, की गोप्या अभ्यास करील उद्यापासून; चल.'

'मी नाही शाळेत जाणार, मामा. मास्तर म्हणतात की तू मामाची गुरे राख. मी गुरे राखायला जाईन. नको ती शाळा. कोंडवाडा. खरेच, नको मामा.'

'तुझ्या नशिबीच विद्या नसली तर तू तरी काय करणार? ठेव पाटी-दप्तर घरात. उद्यापासून जा शेळ्या-मेंढ्या घेऊन; जा गायीगुरे घेऊन, सांभाळून आणीत जा म्हणजे झाले. '

आणि गोप्या आता गुराखी झाला. त्याला गोपाल कोणी म्हणत नसे. गोप्या हेच नाव घरीदारी झाले. तो इतर गुराख्यांचा आवडता झाला. तो त्यांचा पुढारी बनला. तो नदीत हुंबे, झाडावर चढ़े, कुस्ती करी, पावा वाजवी. दुपारच्या वेळेस सर्व गुराखी एकत्र बसत, गोपाळ आपल्पातील चटणी-भाकर इतरांना देई. जणू तो त्यांचा गोपाळकृष्ण होता.

काही वर्षे अशी गेली. एकदा एक मोठीच गंमत झाली. गोप्याचा मामा जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार होता. त्याने मोठमोठ्या जमीनदारांना, सावकारांना एक मोठी मेजवानी देण्याचे ठरविले. रात्री मेजवानी होती. जाणे होते. मोठा थाट होता. गोप्याच्या मामाच्या घरी त्या दिवशी कोण गर्दी.

गावोगावचे बड़े बहे पाहुणे आले होते. कोणी छकड्यांतून आले. कोणी टांग्यांतून आले. कोणी मोटारींतून आले. नाना प्रकारची वाहने तेथे आली होती.

मोठी पंगत झाली नाना पक्कत्रे होती. जेवण झाल्यावर सारी मंडळी दिवाणखाऱ्यात बसली विडे - पानसुपारी सर्व काही झाले. अत्तर- गुलाबादी प्रकार झाले. आणि मग गाण्याची बैठक सुरू झाली. मध्यरात्र होऊन गेली. गाण्याला चांगला रंग चढला. वाहवा वाहवा असे धन्योद्रार निघत होते. मध्यंतरी चहा -कॉफी होऊन पुन्हा गाणे सुरू झाले

परंतु गोप्या इकडे काय करतो आहे? त्याच्याभोरती हे सारे गुराखी कशाला जमले आहेत? काय आहे कारस्थान ? कोणते चालले आहेत त्यांचे बेत?

गोप्या, करायची का मजा? मोटारींचे टायर पंक्चर करून ठेवू. मारू खिळे त्यांच्यात. आणि छकडे नि हे टांगे त्यांच्या खिळ काल ठेवू म्हणजे पटापट चाके घळघळतील. सारे आपटतील खाली. गंमत होईल. घरात एवढा समारंभ चालला आहे,परंतु तुला गोंड घास तरी मिळाला का?' एक गुराखी म्हणाला,

‘आपण करूच या गंमत.' दुसरे म्हणाले.

"काही हरकत नाही. ही बड़ी धेंडे आपटू देत चांगली.अद्दल घडू दे.' गोप्या म्हणाला.

आणि त्या सर्वांनी ते प्रकार करून ठेवले. सारे पसार झाले. गोप्या आपल्या खोलीत गुपचूप येऊन निजला. तिकडे जागे संपले. सारी प्रतिष्ठित मंडळी जायला निघाली. गोप्याचे मामासर्वांना निरोप देत होते.

'मला मते पडतील असे करा . मी तुम्हासर्वांवर विसंबून राहतो. मी तुमचाच आहे. तुमच्यापैकी एक.' मामासर्वांना सांगत.

'तुम्ही निश्चिंत राहा हो. तुम्ही निवडून आलेतच म्हणून

समजा. आमचासर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे.' लोक म्हणाले.

मामा पोचवीत आला. मोटारवाले मोटारीत बसले.

टांगेवाले टांग्यात बसले. छकडेवाले बसले. निघाले सारे. परंतु

काय? मोटार थांबली. टायर सारे फुसफुशीत ! आत हवा नाही

आणि टांगे निघाले नाहीत तो चाके घरंगळली! छकड्यांची तीच

रडकथा. प्रशस्त पोटांचे ते लोक खाली आपटले. हा काय

प्रकार? सारे संतापले.

'तुम्ही का आमची फजिती करायला आम्हाला बोलावलेत? हा चांगला आहे पाहुणचार ! ही थट्टा आम्ही सहन करणार नाही. या अपमानाचा आम्ही सूड घेऊ. म्हणे मते द्या. कोण देणार तुम्हाला मते?' असे ते बडे लोक बडबडू लागले.

'रागावू नका. मी असे कसे करीन? गावातीलखट्याळ पोरानी हा चावटपणा केला असेल. गोप्याला विचारले पाहिजे. बोलवा रे त्या गोप्याला. कोठे आहे तो?' मामा म्हणाले.

गोपाळला अंथरुणातून ओढून आणण्यात आले. डोळे चोळीत तो उभा होता.

'काय रे गोप्या, हा चावटपणा कोणाचा?'

'कसला चावटपणा मी तर निजलो होतो.'

'टांग्यांच्या, छकड्यांच्या खिळी कोणी काढल्या? हे टायर कोणी फाडले बोल!"

'मला माहीत नाही, मामा. मी कशाला करू? माझा काय संबंध? मी रानातून आलो तसाच निजलो. तुमची मेजवानी चालली होती. मी उपाशी पोटीच झोपलो.

इतक्यात सारे गुराखी तेथे जमले. गावातील चार मंडळीही जमली. कोणी कारणमीमांसा करीत होते. उलगडा होईना. परंतु एक गुराखी एकदम म्हणाला, 'अहो, तुमची बहीण भूत झाली आहे. तुम्ही तिला घरातून घालवलेत. तिने जीव दिला असे सारे म्हणतात. तिचा मुलगा दिवस रात उपाशी झोपतो आणि तुमच्यामेजवान्या चालतात. त्या मातेला कसे सहन होईल? तिनेच हा भुताटकीचा प्रकार केला असावा नक्की.'

‘खरेच, खरेच, ही भुताटकी असावी. पळा रे पळा!' शेतकरी म्हणाले.

‘चांगली मेजवानी. येथे भुताटकी आहे असे माहीत असते तर आम्ही आलोच नसतो. राम राम !' असे म्हणून ते सारे बडे लोक भीतीने पायीपायीच निघून गेले. त्या मोटारी, ती गाड्याघोडी दुसच्या दिवशी गेली.

दुसच्या दिवशी रानात मुराख्यांची हसता हसता मुरकुंडी वळली. झाडाखाली सारे बसले होते. कांदाभाकर खात होते. इतक्यात एक गुराखी गोप्याला म्हणाला,

‘गोप्या, तुला मी एक गंमत करायला सांगणार आहे. करशील का?

'काय करू

'तू तुझ्या मामाचा भाचा आहेस की नाहीस?"

'आहे’

'मग तू असा भुक्कडासारखा काय करतोस? मामाला शोभेसा राहात जा. एखादे दिवशी तरी जरा ऐट कर. तुझ्या मामाचा मुलगा आहे तुझ्याच वयाचा. त्याची कशी ऐट असते. त्याचे ते कपडे बघ. डोक्याला तेल. भांग पाडतो. तू एके दिवशी सकाळी उठ. त्या दिवशी रानात गायीगुरे घेऊन येऊ नकोस. मामाच्या मुलाच्या खोलीत जा. त्याचे इस्तरीचे कपडे तू आपल्या अंगात घाल. केसांना तेल लाव. सुंदर भांग पाड. तू राजपुत्र शोभशील. बस तेथे दियाणखाऱ्यात खुर्चीवर. कर अशी

मत.

'अरे, असे करीन तर मामा घरातून चालबून देईल.'

‘त्याची छाती नाही, तुझ्या आईच्या भुताला तो भितो. त्या दिवसापासून त्याने पक्कीच धास्ती घेतली आहे.'

'परंतु ते भूत म्हणजे आपणच होतो!'

'मामाला ते गुपीत थोडेच माहीत आहे?'

‘आणि मामाने घालबले तर तू स्वतंत्र होशील. तू काही आता लहान नहिस. वाटेल तेथे काम करशील.'

अशी बोलणी झाली आणि गोप्याने तो प्रयोग

करण्याचे कबूल केले

एके दिवशी गोप्या उठला. त्याने आघोळ केली. मामाचा मुलगा अद्याप झोपलेला होता. गोप्याने मामाच्या मुलाचे कपडे घातले. तो सुंदर धोतर नेसला, तो रेशमी सदरा त्याने घातला. केसांना तेल लावून त्याने सु दर भांग पाडला. राजबिंडा दिसू लागला. दिवाणखन्यातील एका आरामखुर्चीत गोप्या पडून राहिल. हातात त्याने वर्तमानपत्र घेतले. जणू वाचनाचा शौकीन.

थोड्या वेळाने मामाचा मुलगा उठला. त्याला स्वत:चे कपडे सापडेनात. तो आरडाओरडा करीत दिवाणखाऱ्यात आला. तो तेथे गोप्या एखाद्या राजाप्रमाणे ऐंटीत बसला होता.

'काय रे गोप्या, हा सदरा कोणाचा?"

'मी घातला आहे आज अंगात.'

'हा काय चावटपणा! दे माझा सदरा. आणि हे धोतरही माझेच. तुला गुराख्याला हे कपडे रे कशाला?'

'मी का नेहमीच गुराखी राह बाटते? मीही माझ्या मामाचा भाचा आहे. मामाला शोभेशा रीतीने मी वागले पाहिजे. नाही तर लोक मला हसतील. तू माझ्या मामाचा मुलगा तर तू म माझ्या मामाचा भाचा आहे. आज गुरे घेउन मी गेलो नाही. गुराखीपणा पुरे झाला. आता मी आरामखुर्चीत बसणार. तुझ्याप्रमाणे ऐट करणार, चैन करणारा, समजलास?'

'बच्या बोलाने माझे कपडे दे.'

'मी देणार नाही. अंगाला हात तर लावून बघ !'

मामाचा मुलगा काडीपेहेलवान होता. गोप्याने एक थप्पड दिली असती तर तो कोलमडून खाली पडता. तो गोप्याच्या वाटेस गेला नाही. न्याने आईला हाक मारली. गोप्याची मामी तणतणत वर आली.

'काय रे आहे भानगड ? आणि हा कोण, गोप्या का? चांगला आहे उद्योग! तू गुरे घेऊन गेला नाहीस बाटते? हे ढंग तुला सूचले आज? दे त्याचे कपडे. तू तुझी घोंगडी घेऊन रानात जा. ऊठ बच्या बोलाने. गोप्या, माजलास होय तू?'

'मामी, मी माझ्या मामांचा भाचा आहे. मी का भिकाच्यासारखा राहू? मामांचा तो अपमान आहे. मी गुराखी होणे यात मामांची काय प्रतिष्ठा, काय शोभा ? मी आजपासून झकपक रहियचे ठरवले आहे. मला नवीन कपडे द्या. तोपर्यंत हे वपिरू दे. आता गुराखीपणा नको. मामी, मी तुझा भाचा नाही का?'

'दुर्दैवी आईच्या पोटी कशाला आलास?"

'माझी आई दुर्दैवी असेल तर आईचा भाऊही दुर्दैवी असला पाहिजे. एकाच आईबापाच्या पोटी दोघांचा जन्म. मामी जगात कोणी जन्मत: दुर्देवी नसतो. माझ्या आईला नावे ठेबू नका. तुमचा आधार मला देऊन ती गेली. तिने तुमच्यावर विश्वास ठेवून मला येथे ठेवले. तुम्ही का मला एखाद्या मिकाच्याप्रमाणे वागवाणार? माझी आई रागवेल.'

'रागावू दे तुझी आई. कुठे भूत होऊन बसली असेल तर बसू दे आमच्या मानगुटीस. परंतु तू आणखी नकोस मानगुटीस बसायला. समजलास?'

इतक्यात मामा तेथे आले. गोप्याचा तो नवा अवतार

पाहून ते चकित झाले!

'काय रे गोप्या हे कोणते नाटक ?"

'हे नाटक नाही मामा, आजपासुन तुमच्या इतमामास शोभेशा रीतीने वागायचे मी ठरवले आहे. लोक मला म्हणतात, 'तुझा मामा श्रीमंत नि तू असा गुराखी काय होतोस? भिकाच्याप्रमाणे काय राहतोस?' मला आता नीट राहू दे. आज कसा दिसतों मी. मामा? खरे सांगा. एखाद्या राजपुत्राप्रमाणे मी दिसतो की नाही?'

'तू राजपुत्र! आणि आता कोणी राजा आपली मुलगी तुला देईल. खरे ना? आणि तुला गादीवर बसवील. खरे ना? भिकारडा पोर! म्हणे मी राजपुत्र शोभतो. ऊठ. त्याचे कपडे दे. तुझे तू अंगावर घाल. आज गुरे घेऊन गेला नाहीस वाटते?'

'मी आजपासून तुमच्याकडे गुराखी म्हणून राहणार नाही. तुम्हांस शोभेसा भाचा म्हणूनच राहीन.'

‘मी पहिल्यापासूनच तुम्हांस सांगत होते की याला घरात घेऊ नका, घरात घेऊ नका. याचे हे थेर पाहा. हा उद्या तुमच्या डोक्यावर मिरी वाटील. तुम्हांला घरातून घालवील मी सांगते, याला आजच घरातून घालवा. झाला आहे आता मोठा. कोठेही मजुरी करील नि पोट भरील.' मामी संतापाने म्हणाली.

'गोप्या, खरेच तू आता या घरातून जा. आता काही लहान नाहीस. तुला लहानाचा मोठा केला. चार अक्षरे यावीत म्हणून तुला मी शाळेतही घेतले होते. परंतु विद्या तुझ्या नशिबी नव्हती. तू आपण होऊन गुराखी झालास. परंतु आता तुला मी इतके दिवस सांभाळले. त्या वेळेस दोन-तीन वर्षांचा होतास.

आज सोळा-सतरा वर्षांचा झालास. आता तुला जा म्हटले तर बहीण रागावणार नाही. जा. या घरात आता तू नकोस.'

'ठीक. मामा, तुम्ही इतके दिवस घरात ठेवलेत. मी आधीच निघून गेले पाहिजे होते. मिंधेपणाचे जिणे काय कामाचे? कष्टाची भाजीभाकरी बरी. स्वाभिमानाने मी कोठेही राहीन. तुमच्याकडे अपमानास्पद रीतीने आता मी राहणार नाही. येतो मामा. येतो मामी येतो अप्पा.' असे म्हणून सर्वांना नमस्कार करून गोप्या त्या घरातून बाहेर पडला. घरातील गडीमाणसे गोप्याभोवती जमली. सर्वांचे त्याव्यावर प्रेम होते. कारण तो कोणाचा अपमान करीत नसें. स्वत:ला गोड गोड मिळे ते सर्वांना देई.

‘काय गोप्यादा, चालले तुम्ही?' ते प्रेमाने म्हणाले.

‘होय गड्यांनो, तुमच्यासारखाच मीही कोठे तरी एक मजूर होईन. येथले मिंधे जिणे नको. 'माझी आठवण ठेवा. कधी भेटलो तर एकमेकांस प्रेम देऊ. '

“होय, गोप्यादा. तुमची आम्हास हरघडी याद येईल. आमच्यात तुम्ही बसायचे, हसायचे, खेळायचे, तुमचा स्वभाव गोड, दिलदार नि निर्भय. आमची बाजू घेऊन तुम्ही मामांजवळ भांडायचे. आम्हाला दोन रुपये मजूरी अधिक देववायचे तुम्हाला कसे विसरू? देव तुम्हाला सुखी ठेवो. तुम्ही याच गावात का नाही राहात?'

'या गावात नको. ज्या गावात माझा जन्म झाला, जेथे माझे वडील राहात असत, त्या माझ्या गावी मी जातो. तेथे खंडाने जमीन घेईन. शेती करीन. स्वाभिमानाने जगेन. तुम्ही मला लहानपणी गोठ्यात दूध द्यायचे. पोरक्या पोरावर तुम्ही माया केलीत. सख्खा मामा परकेपणा दाखवी; परंतु तुम्ही परके जवळचे झालात. तुमच्या प्रेमाचा उतराई मी कसा होणार, राजांनो? देव तुम्हास सुखी ठेवो. रामराम.' असे म्हणून गोप्या गेला. गावातील मित्रांना भेटून तो रानात गेला. दुपारची वेळ होती. गुराखी वडाच्या झाडाखाली शिदोच्या सोडून बसले होते. तो गोप्या आला.

'मामाचा भाचा आला.' एक जण म्हणाला.

‘काय रे गोप्या, पुन्हा खांद्यावर घोंगडीशी दूसच्याने विचारले.

‘अरे ही स्वाभिमानी घोंगडीच बरी. गोपाळकृष्ण घोंगडी खांद्यावर घेई. नको ते रेशमी इस्तरीचे कपडे. मी आज हा गाव सोडून जात आहे. मामाने जा म्हणून सांगितले. मी यापुढे स्वतःच्या श्रमाने जगेन. माझी जन्मभूमी अद्याप मी पाहिली नाही. गोपाळपुरात मी जन्मलो. तेथे गुणगुणी नदी आहे. मोठा डीह आहे. नदीच्या तिरी मळे आहेत. एका बाजूला जंगल आहे. असे लोक वर्णन करतात. फार सुंदर असेल माझा गाव. तेथे मी आज जाणार. तुम्हाला शेवटचा भेटायला आलो आहे. शेवटची चटणीभाकरी तुमच्याबरोबर खाऊ दे. क्षणभर बासरी वाजबू दे. तुमच्याबरोबर थोडे बोलू दे. हसू दे आणि जाऊ दे.'

गोप्या त्यांच्याबरोबर जेवला. ते नंतर खेळले. पाण्यात डुंबले. गोप्याने वडाच्या झाडाखाली गोड बासरी वाजवली.

‘येतो आता, ओळख ठेवा माझ्या बालमित्रांनो. पुन्हा

कधी भेटलो, तर एकमेकांस हृदयाशी धरू. सारे सुखी असा.'

'गोप्यादा, तू जाशील तेथे सुखी राहा. तुला आम्ही विसरणार

नाही.'

'मीही तुम्हाला विसरणार नाही.'

7
Articles
गोप्या
0.0
येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अनेक छात्रालयांतून सांगितली. सर्वांना ती आवडे. ती गोष्ट मी जशी सांगत असे, तशीच लिहून काढून आज प्रसिध्दीसाठी देत आहे. मूळची कादंबरी माझ्याबरोबर नाही. फक्त सूत्र आहे. मूळच्या सूत्राचा आधार घेऊन माझ्या भाषेत मी मांडून देत आहे. आवडत्या गोष्टी तील हा दुसरा भाग सर्वांना आवडो. – साने गुरुजी
1

गोप्याचा जन्म

1 June 2023
1
0
0

गोप्याचा जन्मत्या गावचे नाव गोपाळपूर गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. प

2

मामाच्या घरी

1 June 2023
0
0
0

गोपाळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्दैवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे

3

गोप्याचा संसार सुरू झाला

1 June 2023
1
0
0

गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या

4

मंजी देवाघरी गेली

1 June 2023
1
0
0

झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात ल

5

संसारातील आणखी दुःखे

1 June 2023
1
0
0

गोप्याला अती दुःख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी

6

गोप्या प्रचारक होतो

1 June 2023
0
0
0

चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून प

7

बलिदान

2 June 2023
0
0
0

देशातील व जगातील परिस्थिती झपाताड्याने बदलत होती. जगात महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड त्या युद्धात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्याप्रतिनिधींना

---

एक पुस्तक वाचा