shabd-logo

गोप्याचा संसार सुरू झाला

1 June 2023

15 पाहिले 15
गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या मनात कोणते विचार उसळले होते? कोणत्या भावना उचंबळल्या होत्या? त्यालाही ते सांगता आले नसते.

'काय रे पाहतों आहेस? कोणी परका दिसतोस. चोरीचा विचार आहे की काय? नीट पाहून जातो आहेस असे वाटते? तुझे नाव काय! कोठला तू.' घराच्या मालकाने बाहेर येऊन विचारले.

'माझे नाव गोपाळ. मला सारे गोप्या म्हणून हाक मारतात. मी या गावाला आजच आलो, परंतु ज्या घरात तुम्ही आहात, त्या घरात मी जन्मलो होती. '

'या घरात?'

'हो, या घरात मी जन्मलो. याच घरात माझे वडील देवाघरी गेले. म्हणून या घरासमोर उभा राहिलो होतो.'

'तुझ्या बापाचे नाव काय?'

'बाळा. '

'तू बाळाचा का मुलगा ? तो एवढासा लहान गोपाल तो तू? इतकी वर्षे कोठे होतास? तुझी आई कोठे आहे?'

'माझी आई बहुधा देवाघरी गेली. मामाकडे मला निजवून ती गेली. पुन्हा या गोप्याला ती दिसली नाही. या पोरक्या गोप्याला मामाने इतकी वर्षे वाढविले. परंतु आता मी स्वतंत्रपणे राहायचे ठरविले आहे. अपमानाचे मिंधे जिणे नको. स्वाभिमानाची भाकर - तिची सर कशालाही येणार नाही. मी माझ्या जन्मग्रामी येऊन राहण्याचे ठरविले. काल रात्री मी गावाबाहेरच्या देवीच्या देवळात येऊन झोपलो होतो; आणि उजाडल्यावर गावात माहिती विचारीत हिंडत, बाळा शेतकऱ्याचे घर कोठे होते असे विचारीत मी येथे आलो. मी उभा राहिलो म्हणून रागावू नका. माझ्या मनात किती तरी विचार आले. माझे बाबा कसे दिसत असतील? मला काही आठवत नाही. आईचीसुद्धा मला नीट आठवण नाही. कसे दिसत हो माझे बाबा? तुम्ही पाहिले होते का त्यांना?'

'अरे, पाहिले होते म्हणून काय सांगू? त्याचा माझा किती घरोबा ! बाळा रोज आमच्याकडे यायचा. धिप्पाड होता. त्याच्या मिशा मोठया रुबाबदार असत. अंगाने उंच. रंगाने काळासावळा. डोक्याला पिवळा फेटा बांधायचा. हातात जाड सोटा असायचा. भीती त्याला माहीत नव्हती. तुझी आई एक गरीब बाई होती. परंतु जरा उजळ रंगाची होती. तू आईच्यावळणावर गेला आहेस. तुझ्या आईचे डोळे विशेष भरण्यासारखे होते असे सांगतात. तुझे डोळे तसेच आहेत. तुझ्या बापाने पुन्हा पुन्हा लग्रे केली. कर्जबाजारी? झाला. मी त्याला किती सांगितले की हा लग्राचा नाद पुरे कर म्हणून. परंतु तो हटवादी होता. एकदा त्याच्या मनात आले की त्याप्रमाणे केल्याशिवाय तो राहात नसे. तो मेला परंतु तुला मात्र काही उरले नाहीं.'

‘हा देह देऊन तर गेले ना? ते पुन्हा लग्र न करते तर मी कसा जन्माला आलो असतो? मला त्यांनी ही शरीरसंपत्ती दिली आहे. पुष्कळ आहे. सांगा, बाबांच्यागोष्टी मला सांगा. हे आमचे घर तुम्ही लिलावात घेतले वाटते?'

'हो. आम्ही आता पुष्कळ सुधारणा केल्या आहेत. जुने घर म्हणायचे. परंतु नवीनच जणू झाले आहे. तू का येथे शेती करणार?'

‘असे मनात तर आहे. तुमच्याजवळ आहे का खंडाने द्यायला जमीन? मी खपेन, कष्ट करीन. तुमचा नि माझ्या वडिलांचा ऋणानुबंध होता, घरोबा होता. त्यांचाच मी मुलगा. तो घरोबा पुन्हा सुरू करू या. मी या गावात नवीन आहे. ओळख ना देख. तुम्ही देता का आधार ? माझ्याजवळ पैचे भांडवल नाही. थोडी जमीन द्या करायला. थोडे कर्जाऊ पैसे द्या. बघा. बाळाच्या मुलाला नीट मार्गाला लावा. माझी गाडी नीट सुरू करून द्या. '

'तू अद्याप लहान आहेस. कोवळा आहेस.'

'तसा फारसा काही लहान नाही. लौकरच सतरा-अठरा वर्षांचा होईन. मी कामाला वाघ आहे. माझ्या बापाचा मी मुलगा आहे. ते ज्याप्रमाणे मनात आले म्हणजे त्याप्रमाणे केल्याशिवाय राहात नसत. तसेच माझे आहे. तुम्ही जमीन द्या मी तिच्यात सोने पिकवीन.'

'नदीकाठची जमीन देऊ? पलीकडे जंगल आहे. तेथे तू

एकटा राहशील?'

'नदीकाठची जमीन. मग तर फारच छान. पलीकडे जंगल असले म्हणून काय झाले? मला भयभीती माहीत नाही. वाघाला मी काठीने होलपटीन. एकदा मामाच्या घरी असताना गुरे घेऊन मी रानात गेलो होतो. लांडगे आले. परंतु मी भ्यालो नाही. असा आरडाओरडा केला की लांडगे घाबरून पलळून गेले. '

'तुझे नाव गोप्या; होय ना?'

'ह'

'आमच्याकडेच दोन दिवस जेवायला राहा. उद्या तुला मी जमीन देतो. नीट पिकव. '

‘तेथे मी झोपडी बांधून राहिलो तर चालेल ना?"

'राहा ना. नाही तर कोठे राहणार? झोपडी बांध. आनंदाने राहा. तुला थोडे पैसेही कर्जाऊ देईन. बाळाचा तू मुलगा. पूर्वीचा ऋणानुबंध कसा विसरू? प्रेमाचे संबंध काही निराळे असतात. तुला लहानपणी बाळलेणे करण्यासाठी शेवटी मीच पैसे दिले. तुम्हाला म्हातारपणी मुलगा झाला असता तर तुम्ही केवढा उत्सव केला असतात, असे तो म्हणाला. गोण्या तू केवढा मोठा झालास ! आज बाळा असता तर त्याला धन्य वाटले असते.'

गोप्या दोन दिवस आपल्या त्या जन्मघरी राहिला. सावकार बापूसाहेब मोठे गोडबोले. गोप्या खूष झाला आणि एके दिवशी नदीकाठच्या त्या शेतीवर गोप्या राहायला गेला. तो दिवसभर शेतात खपे. त्याने जमीन साफ केली. हरळी खणून टाकली. बांधबंधारे नीट घातले. स्वतःसाठी त्याने बाजूला एक झोपडी बांधली. लहानशी सुंदर झोपडी. झोपडीच्या चारी बाजूस त्याने मोकळे अंगण केले आणि एके दिवशी तो जंगलात गेला. जंगलातून त्याने बांबू तोड़न आणले. आपल्या झोपडीच्या भोवती चारी बाजूस त्याने बांबूचे सुंदर रेलिंग केले आणि चारी बाजूंना फुलझाडे लाविली. तुळशी लावल्या. तेथे झेंडू होते. गुलाब होते. गोप्याच्या मामाच्याघरी मोठी बाग होती. गोप्याला सारी माहिती होती. दिवसभर थकलेला गोप्या तेथे मोकळ्या अंगणात शिंदीच्या चटईवर बसे आणि गोड गोड बासरी वाजवी.

एके दिवशी तो असाच बासरी वाजवीत होता. सायंकाळ झाली होती. आकाशात शेकडो रंगछटा पसरल्या होत्या. कृष्णवर्ण मेघांतून डोक्यावर किरीट घातलेला कृष्णच उभा आहे की काय असा भास होई. भूमीवरच्या गोपाळची मुरली ऐकायला का गोपाळकृष्ण वर उभा होता? गोप्याला भान नव्हते, परंतु त्याचे धनी बापूसाहेब तेथे येऊन उभे होते. थोडया वेळाने बासरी थांबली. गोप्या उठला. तो तेथे बापूसाहेब उभे. तो शरमला, वरमला.

'तुम्ही केव्हा आलेत ? बासरी वाजवताना मला भान राहात नाही. बसा. रागावू नका.'

आहे.'

“किती छान वाजवतोस तू! आता येथे एकच गोष्ट कमी 

'कोणती?'

‘येथे एक गाय हवी. म्हणजे तू खरोखरच गोपाळ होशील आणि गोप्या, येथे तू अगदी सिमला केला आहेस रे ! जणू साहेबांचा बंगला. हे बांबूचे रेलिंग आणि ही फुलबाग. अरे, एवढा थाट कशाला हा?'

'आमच्या गरीबाच्या नाकाला का फुलांचा वास आवडत नाही? मी तुमची जागा घेऊन कोठे जात नाही. ही तुमचीच जमीन. परंतु मी तिला शोभवीत आहे. तुम्हीही पूजेला दुर्वा, तुळशी, फुले नेत जा. तुम्हालाही येथे फिरायला यावे असे वाटेल. येत जा, बापूसाहेब.'

‘गोप्या, तू असा एकटा किती दिवस राहणार?'

'दोच-चार वर्षे जाऊ देत. जवळ चार पैसे जमा होऊ

देत. मग करीन लगीन. सध्याच काय घाई आहे?'

'तुझा बाप असता तर त्याने कधीच तुझे लग्र लावून दिले असते. तुझे लग्र व्हावे असे मला वाटते. मी मदत करीन, बरे का गोप्या!'

'आभारी होईन. '

गोप्याने फुलांचा एक गुच्छ करून बापूसाहेबांना दिला. ते खूष झाले नि गेले. गोप्या अंगणात फिरत होता. गाय पाहिजेच, असे त्यालाही वाटले. त्याने पुढे एक गाय विकत घेतली. सुंदर गाय! तो तिची सेवा मनापासून करी.

एक दोन वर्षे गेली. शेतही बरे पिकले. भावही जरा बरा होता. गोप्याजवळ चार पैसे राहिले. आपण लग्र करावे असे त्याला वाटू लागले. परंतु त्याला कोण देणार मुलगी? त्याच्यासाठी खटपट तरी कोण करणार?

त्या गावात एक गरीब मुलगी राहात होती. तिचे आईबाप नव्हते. तिव्याजवळ आणखी एक पाचसात वर्षांचा मुलगा होता. तो तिचा दूरचा नातलग होता. परंतु त्याला कोणी नसल्यामुळे तो तेथेच राहात असे. लहानशा झोपडीत ती मुलगी राहात होती. ती मोलमजुरी करून स्वतःचे व त्या मुलाचे उदरभरण करी. त्या मुलीचे नाव होते मंजी एकदा गोप्याच्या शेतात काम करायला मंजीही आली होती. परंतु उन्हात काम करताना तिला घेरी आली. गोप्याने तिला झोपडीत नेले. तिथे तिने विसाया घेतला. सायंकाळी ती जायला निघाली. तिने तेथील फुले तोड़न आपल्या केसात घातली.

'मंजे, आणखी हवीत का फुले ?'

‘आज दोनच पुरेत.’

'अधिक केव्हा लागतील?'

'या झोपडीत पुन्हा येईन तेव्हा.'

‘तू आणशील तेव्हा.’

त्या दिवशी मंजी हसत गेली. त्या दोघांचे एकमेकांवर

प्रेम बसले. परंतु मंजीच्या घरी तो एक मुलगा होता. मंजीबरोबरच लग्र लावायचे म्हणजे त्या मुलासही घरी आणणे भाग होते. काय करायचे?

मंजी नि गोप्या यांच्याविषयी गावात कुजबूज सुरु झाली. बापूसाहेबांच्या कानांवर गोष्टी गेल्या. बापूसाहेब एके दिवशी मंजीकडे गेले व म्हणाले,

‘मंजे, तू गोप्याबरोबर लग्र लावायला तयार आहेस?'

‘परंतु मला कर्ज आहे. आणि हा मुलगा आहे. तो कोठे

जाणार?'

“किती आहे तुला कर्ज?'

'आहे पन्नास रुपये.'

‘ते कर्ज मी फेडतो आणि हा मुलगा काही तुम्हाला

जड होणार नाही. शेतात काम करील. शेण गोळा करील.

गाय चारील. उद्या तुम्हाला माणसाची गरज लागेल. तू बाळंत

झालीस तर तेथे जंगलात कोण आहे दुसरे ? मी गोप्याला

विचारतो. '

बापूसाहेब गोप्याकडे गेले. गोप्या फुलांची वेणी गुंफीत

होता.

'काय रे गोप्या, वेणी कोणाला?'

'मंजीला नेऊन देणार होतो. '

'कोठे शिकलास वेणी गुंफायला? तुला आपले सारे येते.'

‘मामाकडे शिकलो. तेथे माळी गुंफीत. मी बघत असे.'

'तुझे मंजीवर प्रेम आहे. होय ना?'

'हो'

'मग लवकर लग्र लाव खेडेगावात नुसतं प्रेम फार दिवस

ठेवू नये. लोक उगीच टीका करतात. तू बाळाचा मुलगा. तुझा संसार नीट सुरळीत व्हावा असे मला वाटते. मंजीला पन्नास रुपये कर्ज आहे. ते मी देऊन टाकतो. तुलाही शंभर रुपये लग्रासाठी देतो. देणगी समज. मंजीच्या घरी तो एक मुलगा आहे. तो तुला जड नाही होणार. दोन धंदे तोही करील. काय आहे तुझे म्हणणे'

'तुमच्या विचाराबाहेर नाही.'

आणि गोप्या नि मंजी यांचे लग्र लागले. बापूसाहेबांनी पुढाकार घेतला. आज मंजी आपल्या झोपडीतून गोप्याच्या झोपडीत जाणार होती. गोप्याने बैलगाडी आणली. त्या झोपडीतील सामान गाडीत घालण्यात आले. काही मडकी होती. एक खाट होती. काही टिनपाटे होती. दोन मोळ्या होत्या. सारे सामान गोळा करून नेण्यात आले. गरिबाला सारेच महत्त्वाचे लाकडाची एक दळणीही त्याला किमतीची.

'तो झाडू राहिला. तो घ्या.'

'कशाला तो?"

‘घ्या, उद्या तो उपयोगी पडेल. आणि तो फळीचा तुकडा झाकण ठेवायला होईल. काही ठेवू नका. पुरुषांना समजत नसते.'

'सारी अक्कल जणू तुम्हाला.'

'घरातील अक्कल आम्हालाच. '

शेवटी एकदाची बैलगाडी निघाली. दोघे गाडीत

बसली.

‘तो दौल्या कुठे आहे?' त्याने विचारले.

‘तो आधीच पुढे गेला.’ ती म्हणाली.

गाडी झोपडीजवळ आली. मंजी आत शिरली. तिने सारे समान नीट लावले. बाहेर संध्याकाळ झाली. गोप्या आज पुन्हा फुलांची वेणी गुंफति होता.

“मी तिकडे काम करीत आहे, आणि तुम्ही माळा गुंफीत

'बसा.'

'तुला कामाचे बक्षीस नको? तू म्हणाली होतीस की या झोपडीत पुन्हा येईन तेव्हा भरपूर फुले केसांत घालीन. मला त्याची आठवण आहे. घाल ही वेणी केसांत. '

मंजीने केसात वेणी घातली. ती तेथे खाटेवर बसली. वरती चंद्र होता. तिकडे नदीचे पात्र रुपेरी चमकत होते. आणि गोप्याने बासरी वाजवायला घेतली. सारे वातावरण जणू प्रेममय नि प्रसन्न होते. गोप्या नि मंजी यांचा तो गरिबीचा परंतु प्रेमाचा नि सुखाचा संसार सुरू झाला.

7
Articles
गोप्या
0.0
येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अनेक छात्रालयांतून सांगितली. सर्वांना ती आवडे. ती गोष्ट मी जशी सांगत असे, तशीच लिहून काढून आज प्रसिध्दीसाठी देत आहे. मूळची कादंबरी माझ्याबरोबर नाही. फक्त सूत्र आहे. मूळच्या सूत्राचा आधार घेऊन माझ्या भाषेत मी मांडून देत आहे. आवडत्या गोष्टी तील हा दुसरा भाग सर्वांना आवडो. – साने गुरुजी
1

गोप्याचा जन्म

1 June 2023
1
0
0

गोप्याचा जन्मत्या गावचे नाव गोपाळपूर गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. प

2

मामाच्या घरी

1 June 2023
0
0
0

गोपाळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्दैवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे

3

गोप्याचा संसार सुरू झाला

1 June 2023
1
0
0

गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या

4

मंजी देवाघरी गेली

1 June 2023
1
0
0

झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात ल

5

संसारातील आणखी दुःखे

1 June 2023
1
0
0

गोप्याला अती दुःख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी

6

गोप्या प्रचारक होतो

1 June 2023
0
0
0

चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून प

7

बलिदान

2 June 2023
0
0
0

देशातील व जगातील परिस्थिती झपाताड्याने बदलत होती. जगात महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड त्या युद्धात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्याप्रतिनिधींना

---

एक पुस्तक वाचा