व्यवहार स्वच्छ होण्यासाठी काय हवे? 'कॉमनसेन्स' पूर्णपणे (संपूर्ण व्यवहारिक समज) पाहिजे, स्थिरता गंभीरपणा असायला पाहिजे. व्यवहारात कॉमनसेन्सची जरूरी आहे. 'कॉमनसेन्स' म्हणजे 'एवरीव्हर एप्लिकेबल' ( सर्वत्र उपयोगी). स्वरूपज्ञाना बरोबर 'कॉमनसेन्स' असेल तर खूपच उजळेल, उत्तम.
प्रश्नकर्ता: 'कॉमनसेन्स' कसा प्रगट होतो?
दादाश्री : कोणी आपल्याशी संघर्ष केला तरी आपण कोणाशी पण संघर्षात पडू नये, अशा रीतिने राहिलो तर कॉमनसेन्स निर्माण होतो. परंतु स्वतः कोणा ही बरोबर संघर्ष करायला नको, नाही तर कॉमनसेन्स निघून जाईल. आपल्याकडून संघर्ष व्हायला नको.
समोरच्या माणसाच्या संघर्षाने 'कॉमनसेन्स' निर्माण होतो. ह्या आत्माची शक्ति अशी आहे कि, संघर्षाच्या वेळेला कसे वागावे ह्याचा सर्व उपाय दाखवून देते, आणि एकदा दाखविल्यानंतर ते ज्ञान जात नाही. असे करता करता 'कॉमनसेन्स' जमा होतो. मला खास संघर्ष होणार नाही. कारण कि मला 'कॉमनसेन्स' जबरदस्त, म्हणजे तुम्ही काय सांगू इच्छिता हे लागलीच लक्षात येते. लोकांना असे वाटले कि, हे दादांचे अहित करून राहिले आहेत, परंतु मला लगेच कळून जाते कि हे अहित, अहित नाही. सांसारिक अहित नाही आणि धार्मिक अहित पण नाही आणि आत्मासंबंधात अहित नाहीच. लोकांना असे वाटेल कि, आत्माचे अहित करून राहिले आहेत, परंतु आम्हाला त्यात हित दिसते. एवढा ह्या 'कॉमनसेन्स'चा प्रभाव. म्हणून आम्ही 'कॉमनसेन्स'चा अर्थ लिहीला आहे कि, 'एवरीव्हेर एप्लिकेबल' सध्याच्या पिढीत 'कॉमनसेन्स' सारखी वस्तुच नाही. जनरेशन टू जनरेशन (पिढी दर पिढी) 'कॉमनसेन्स' कमी होत आहे.
आपले (आत्म) विज्ञान मिळाल्यानंतर माणूस असा राहू शकतो. किंवा सामान्य जनतेत एखादा माणूस अशा रीतिने राहू शकतो, असे पुण्यवान लोक असतात! पण ते तर अमूक ठिकाणीच राहू शकतात. प्रत्येक ठिकाणी ते राहू शकत नाही!
प्रश्नकर्ता: सर्व घर्षणांचे कारण तेच आहे ना कि एका 'लेयर' (पातळी) हून दुसऱ्या 'लेयर'चे अंतर खूप जास्त आहे ?
दादाश्री : घवर्ण ही एक प्रगति आहे जेवढी डोकेफोडी होईल, घर्षण होईल तेवढा ऊंच चढण्याचा रस्ता मिळेल. घर्षण नाही झाले तर तिथल्या तिथेच राहणार. लोक घर्षण शोधत असतात.