प्रश्नकर्ता जीवनात स्वभाव जुळून येत नाही त्यामुळे भांडणं
(संघर्ष) होतात ना?
दादाश्री : संघर्ष होते त्याचेच नांव संसार.
प्रश्नकर्ता: संघर्ष होण्याचे कारण काय?
दादाश्री : अज्ञानता. जो पर्यंत कोणा ही बरोबर मतभेद होतात, ते तुमची निर्बलताची निशाणी आहे. लोक खोटे नाहीत. मतभेदमध्ये चुक तुमचीच आहे. लोकांची चुक नसतेच तो जाणून-बूजुन करीत असेल तर आपण तिथे माफी मागून घ्यावी कि 'भाऊ मला हे कळत नाही.' तसे लोकं चूका करतच नाही, लोकं मतभेद करतील असे नाहीच. जेथे संघर्ष होते तेथे आपलीच चुक आहे.
प्रश्नकर्ता: संघर्ष टाळायचा असेल आणि जर मध्येच खांब आला असेल तर आपण बाजूला सरकून जावे. परंतु तो खांबच आपल्यावर पडला तर आपण काय करायचे?
दादाश्री : पडला तर आपण सरकून जायचे.
प्रश्नकर्ता: आपण किती ही बाजूला झालो तरी तो खांब आपल्याला
लागल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ माझी पत्नी संघर्ष करते.
दादाश्री : संघर्ष होतो त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे ते
शोधून काढायचे.
प्रश्नकर्ता: समोरची व्यक्ति आपला अपमान करेल आणि आपल्याला
तो आपला अपमान झाला असे वाटेल, त्याचे कारण आपला अहंकार आहे का?
दादाश्री : खरे पहाता समोरचा आपला अपमान करीत आहे, तो
आपला अहंकार वितळून टाकतो, आणि ते ही नाटकीय अहंकाराला. जेवढा एक्सेस (अधिक) अहंकार असेल त्याला वितळून टाकतो. ह्यात आपले काय बिघडून जाणार आहे? ही आपली कर्म काही सुटू देत नाही. आपण तर लहान मूल पण समोर असेल तरी त्याला सांगावे कि आमची सुटका कर!