ह्या जगात कोणाशीही संघर्ष होतो ती तुमचीच चुक आहे, समोरच्याची चुक नाही. समोरचा तर धडकणार आहेच, 'तुम्ही का बरे धडकलात?" तर म्हणाल, 'समोरचा धडकला म्हणून.' म्हणजेच तुम्ही आंधळे व तो ही आंधळा झाला.
प्रश्नकर्ता संघर्षात संघर्ष कराल तर काय होते?
दादाश्री : डोके फुटेल ! तर संघर्ष झाला म्हणजे आपण काय समजावे?
प्रश्नकर्ता: आपलीच चुक आहे.
दादाश्री हो, आणि त्याला लगेच स्वीकार करून घ्यावे. वाद : झाला कि आपण समजावे कि 'असे कसे मी बोलून गेलो कि त्यामुळे हा वाद झाला!' स्वत:ची चुक समजली, कि समाधान होईल. नंतर पाल सॉल्व होईल. नाहीतर आपण जो पर्यंत ती 'समोरच्याची चुक आहे' असे शोधत राहिलो तर ही पझल सॉल्व होणारच नाही. 'आपली चुक आहे' हे आपण स्वीकारु तेव्हाच ह्या जगातून सुटका होईल, दुसरा कुठलाच उपाय नाही. इतर सर्व उपाय गुंतवणारे आहे आणि उपाय करणे हा आपल्यातील एक लपलेला अहंकार आहे. उपाय कशासाठी शोधता ? समोरच्याने आपली चुक काढली तर आपण असे सांगावे कि 'मी तर पहिल्यापासून वाकडा आहे. '
बुद्धिमुळे संसारात भांडणं होत असतात. अरे बायकोचे ऐकून वागाल तर पतन होईल आणि त्यामुळे वादविवाद होतील, ही तर बुद्धिबाई! तिचे ऐकाल तर कुठल्या कुठे फेकले जाल, रात्री दोन वाजता उठून ह्यांची बुद्धिबाई काही उलटच दाखवते. बायको तर काही कालासाठी भेटते, परंतु बुद्धि तर निरंतर बरोबरच असते. ही बुद्धि तर डिथ्रोन करणारी (पाडून टाकनारी) आहे.
जर तुम्हाला मोक्षाला जायचे असेल तर बुद्धिचे जरा सुद्धा ऐकू नका. बुद्धि ही तर अशी आहे कि ती ज्ञानी पुरुषांचे सुद्धा उलट दाखवते. अरे, ज्यांच्यामुळे मोक्ष प्राप्ति होऊ शकेल, त्यांचीच चुक पाहतोस? अशाने तर मोक्ष तुमच्यापासून अनंत अवतार लांबला जाईल.
संघर्ष हीच आपली अज्ञानता आहे. कुणाही बरोबर वादविवाद झाला तर ती आपल्या अज्ञानतेची निशाणी! खरे-खोटे परमेश्वर पहात नाही. परमेश्वर तर हेच पहात असतो कि, 'तो कसेही बोलला पण वादविवाद तर झाला नाही ना?' तेव्हा म्हणे, 'नाही. "बस, आम्हाला एवढेच पाहिजे.' अर्थात् परमेश्वरा जवळ खरे-खोटे काही नसते. हे सारे लोकां जवळ असते.. परमेश्वरा जवळ द्वंद्व नसतो ना!