प्रेम हा शब्द इतका चुरगळला गेला आहे की आपल्याला पावलोपावली असा प्रश्न पडतो की याला काय प्रेम म्हणायचे ? प्रेम असेल तिथे असे असू शकते का? खरे प्रेम कुठे मिळेल ? खरे प्रेम कशास म्हणावे ? प्रेमाची यथार्थ व्याख्या तर प्रेममूर्ती ज्ञानीच देऊ शकतात. जे कधी वाढत नाही आणि कमी होत नाही तेच खरे प्रेम. जे वाढत जाते आणि नंतर कमी होते ते प्रेम नव्हे, ती आसक्ती आहे. ज्यात काही अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, मतलब नाही, की दोषदृष्टी नाही, निरंतर एकसमान वाहतच राहते, फुले वाहिली तरी उफाडा येणार नाही आणि शिव्या दिल्या तरी अभाव होणार नाही, असे अघट-अपार प्रेम तेच साक्षात परमात्म प्रेम आहे. अशा अनुपम प्रेमाचे दर्शन तर ज्ञानी पुरुषात किंवा संपूर्ण वीतराग भगवंतातच होते. आपले लोक तर मोहालाही प्रेम समजतात ! मोहात मोबदल्याची अपेक्षा असते. अपेक्षा पूर्ण झाली नाही की आत कोलाहल माजतो. त्यावरुन कळते की ते शुद्ध प्रेम नव्हते. प्रेमात तर सिन्सियारिटी असते संकुचितता नसते. व्यवहारात आईचे प्रेम उच्च दर्जाचे मानले आहे. पण तरीही त्यात कुठे ना कुठे अपेक्षा आणि अभाव दिसतोच. आणि मोह असल्यामुळे ती आसक्तीच म्हटली जाईल.
0 अनुयायी
5 पुस्तके