लोक आसक्तीला प्रेम मानून गोंधळतात. पत्नीला पतीकडे काम आणि पतीला पत्नीकडे काम, हे सर्व कामामुळेच उभे झाले आहे. काम झाले नाही तर आत सर्व बोंबा मारतात, हल्ला करतात. या संसारात एक मिनिट देखील आपले कोणी झालेच नाही. आपले कोणी होतच नाही. हे तर जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल. तुम्ही तासभर मुलाला रागवाल तेव्हा कळेल की मुलगा आपला आहे की परका ? अरे, कोर्टात केस करायला सुद्धा तयार होईल, मग वडील सुद्धा काय म्हणतील ? ' ही माझी स्वतःची कमाई आहे तुला एक पै देखील देणार नाही' त्यावर मुलगाही म्हणेल 'मी तुम्हाला मारून झोडून पैसे घेईन. यात आपलेपणा असतो का?' फक्त ज्ञानी पुरुषच आपले होतात.
बाकी, यात प्रेमासारखे काहीच नाही. या संसारात प्रेम शोधूच नका. प्रेम कुठेही नसते. प्रेम तर ज्ञानी पुरुषांजवळ असते. इतर सर्व ठिकाणी तर प्रेम ओसरते आणि मग भांडणे होतात. भांडणे होतात की नाही ? याला प्रेम म्हणत नाही. ती सर्व आसक्ती आहे. आसक्तीलाच जगातील लोक प्रेम म्हणतात. वेडेवाकडे बोलणे हाच धंदा प्रेमाचा परिणाम म्हणजे कधी भांडण होतच नाही. प्रेम त्याचे नाव की कोणाचाही दोष दिसत नाही.
प्रेमात आयुष्यभरात कधीही मुलांचा दोष दिसत नाहीं, पत्नीचा दोष दिसत नाही, त्यास प्रेम म्हणावे. प्रेमात दोष दिसतच नाहीत आणि इथे तर लोकांना कितीतरी दोष दिसतात ? 'तू अशी आणि तू तशी!' अरे, तू प्रेम म्हणत होतास ना ? मग कुठे गेले ते प्रेम ? म्हणजे हे प्रेमच नाही, दुनियेत कधी प्रेम असते का? एका केसा इकतेही प्रेम जगाने पाहिले नाही. ही तर निव्वळ आसक्तीच आहे.
आणि जिथे आसक्ती असेल तिथे आक्षेप झाल्याशिवाय राहतच नाही, आसक्तीचा हा स्वभावच आहे. आसक्ती झाली म्हणूनच आक्षेप करत राहतात ना, की 'तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात' 'तुम्ही असे आणि तू अशी' असे नाही बोलत नाही का ? तुमच्या गावी असे बोलतात की नाही बोलत? बोलतात!, तर ते आसक्तीमुळे. पण जिथे प्रेम आहे तिथे दोष दिसतच नाहीत.
संसारात या भांडणामुळेच आसक्ती होते. या संसारात भांडण तर आसक्तीचे विटामिन आहे. भांडण नसेल मग तर वीतराग होता येईल.