आई हे देवीचे स्वरूप आहे. आपण देवीला मानतो ना, ते आईचे स्वरूप आहे. आईचे प्रेम खरे आहे, परंतु ते प्राकृत प्रेम आहे, आणि दुसरे म्हणजे भगवंताचे प्रेम असे असते. ज्यांनाही इथे भगवंत मानत असतील तिथे आपण पडताळून पाहिले पाहिजे. तिथे काही उलट केले किंवा उलट बोललो तरीही ते प्रेम करतात आणि खुप फुले वाहिली तरी देखील तसेच प्रेम करतात. घटत नाही, वाढत नाही, असे ते प्रेम असते. म्हणून त्यास प्रेम म्हटले जाते, आणि ते प्रेम स्वरूप, तेच परमात्म स्वरूप आहे.
बाकी, जगाने खरे प्रेम पाहिलेच नाही. महावीर भगवंत गेल्यानंतर प्रेम शब्दच पाहिला नाही. सर्व आसक्तीच आहे. या संसारात प्रेम शब्दाचा उपयोग आसक्तीसाठीच केला जातो. प्रेम जर त्याच्या लेव्हलमध्ये असेल, नॉर्मालिटीत असेल तोपर्यंत ते प्रेम म्हटले जाते आणि नॉर्मालिटी सोडतो तेव्हा त्या प्रेमास आसक्ती म्हटली जाते. आईचे प्रेम त्यास प्रेम अवश्य म्हटले जाते पण जेव्हा नॉर्मालिटी सुटते तेव्हा आसक्ती म्हटली जाते. बाकी, प्रेम हेच परमात्म स्वरूप आहे. नॉर्मल प्रेम परमात्मा स्वरूप आहे.