प्रश्नकर्ता: दोन प्रेमी असतील आणि घरच्यांची समंती नसेल तर, आत्महत्या करतात, असे बऱ्याचदा घडते. तर ते जे प्रेम आहे, त्यास कुठले प्रेम म्हटले जाईल ?
दादाश्री : उथळ प्रेम ! त्यास प्रेमच कसे म्हणता येईल ? इमोशनल होतात आणि रुळावर झोपतात ! आणि म्हणतात, 'पुढच्या जन्मी आम्ही दोघे सोबतच असू.' तर अशी आशा कोणीही बाळगू नये. ते त्यांच्या कर्माच्या हिशोबानुसार जन्म घेतात. पुन्हा कधी भेटतही नाहीत !!
प्रश्नकर्ता पुन्हा भेटण्याची इच्छा असेल तरीही भेटत नाहीत ?
:
दादाश्री : इच्छा ठेवल्याने काही निष्पन्न होते का? पुढचा जन्म तर कर्माचे फळ आहे ना, आणि हा तर इमोशनलपणा ( भावनिकता)
आहे.
तुम्ही तरुण असताना असे काही लफडे केलेले का ? जेव्हा संयोगिक पुरावे एकत्र होतात, सर्व एविडन्स एकत्र होतात तेव्हा असे लफडे चिकटते.
प्रश्नकर्ता लफडे म्हणजे काय ?
दादाश्री : हो, ते मी सांगतो, एक नागर ब्राम्हण होता, तो एक ऑफिसर होता. तो त्याच्या मुलाला म्हणतो, 'तू फिरत होतास ते मी पाहिले. तू लफडे सोबत घेऊन कशाला फिरतोस?' तो मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता आणि त्याला गर्लफ्रेंड (मुली) बरोबर फिरताना वडिलांनी पाहिले. हल्लीचे लोक त्यास लफडे म्हणत नाहीत परंतु जुन्या काळातील लोक त्यास लफडे म्हणत. तर वडिलांना असे वाटले की 'या मुलाला प्रेम म्हणजे काय ते समजत नाही, प्रेम काय ते समजत नाही म्हणून मार खाणार. हे लफडे चिकटले आहे, म्हणून त्याला पुष्कळ दुःखं सोसावे लागेल. 'प्रेम निभावणे इतके सोपे नाही, प्रेम करणे सर्वांना येते पण त्यास निभावणे सोपे नाही, म्हणून त्याच्या वडिलांनी सांगितले, की हे लफडे कशाला उभे केलेस ?"
त्यावर तो मुलगा म्हणतो, 'बाबा, हे तुम्ही काय बोलताय ?' ती तर माझी गर्लफ्रेंड आहे. तुम्ही तिला लफडे म्हणता ? माझे नाक कापले जाईल असे कसे बोलता? असे बोलू नका ना.' तेव्हा वडील म्हणाले ' बरं, आता नाही बोलणार.' त्या गर्लफ्रेंडबरोबर दोन वर्ष मैत्री चालली, मग एकदा ती मुलगी दुसऱ्या एका मुलासोबत सिनेमा पाहायला आली होती आणि ते त्या मुलाने पाहिले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की हे तर माझे वडील जे सांगत होते की हे लफडे आहे, तर खरोखर हे लफडेच आहे.
म्हणजेच पुरावे (घटक- परिस्थिती) एकत्र आले की, लफडे चिकटते. मग ते सुटत नाही, आणि ती मुलगी आता दुसऱ्यासोबत फिरते म्हणून रात्रंदिवस त्या मुलाला झोपही लागत नाही. असे घडते की नाही ? त्या मुलाने जेव्हा हे जाणले की हे तर लफडेच आहे, माझे वडील सांगत होते ती खरीच गोष्ट आहे, तेव्हापासून ते लफडे सुटत गेले. म्हणजे जोपर्यंत तिला गर्लफ्रेंड म्हणेल आणि हे लफडे आहे असे त्याला वाटत नाही, तोपर्यंत कसे सुटेल ?!
प्रश्नकर्ता: तर मग हा मोह आहे आणि हे प्रेम आहे याचा निर्णय करायचा असेल तर तो कसा करता येईल ?
दादाश्री : प्रेम नाहीच मुळी, मग प्रेमाच्या गोष्टी कशाला करता ? हे प्रेम नाहीच, हा सर्व मोहच आहे. मोह मूर्च्छित होतो. बेभान, बिलकुल
भान नाही.