म्हणजे जगात कधीही पाहिले नसेल, तसे प्रेम उत्पन्न झाले आहे. कारण प्रेम उत्पन्न झाले होते, पण तिथे ते वीतराग झाले होते. जिथे प्रेम उत्पन्न होईल अशी जागा होती, तिथे ते संपूर्ण वीतराग होते. म्हणून तिथे प्रेम दिसत नव्हते. आम्ही कच्चे पडलो म्हणून प्रेम राहिले पण संपूर्ण वीतरागता आली नाही.
प्रश्नकर्ता: आपण म्हणालात ना की आम्ही प्रेम स्वरूप झालो पण तेव्हा संपूर्ण वीतरागता उत्पन्न झाली नाही. हे जरा समजायचे होते. दादाश्री : प्रेम म्हणजे काय ? तर कोणाबद्दल किंचितमात्रही भाव बिपडत नाही, त्याचे नाव प्रेम संपूर्ण वीतरागता म्हणजेच प्रेम.
प्रश्नकर्ता तर प्रेमाचे स्थान नक्की कुठे आहे? इथे कोणत्या स्थितीत प्रेम म्हटले जाईल ?
दादाश्री प्रेम तर जितके वीतराग झालात तितके प्रेम उत्पन्न झाले. संपूर्ण वीतराग म्हणजे संपूर्ण प्रेम म्हणजे वितद्वेष तर तुम्ही सर्व झालातच. आता प्रत्येक बाबतीत हळूहळू वीतराग होत जाल तसतसे प्रेम उत्पन्न होत राहिल.
प्रश्नकर्ता तर इथे आपण म्हणालात की आमचे प्रेम म्हटले जाते, पण वीतरागता नाही आली, म्हणजे काय ?
दादाश्री : वीतरागता म्हणजे आमचे प्रेम आहे, ते असे दिसून येते आणि या वितारागांचे प्रेम असे दिसत नाही. परंतु खरे प्रेम तर त्यांचेच म्हटले जाते आणि आमचे प्रेम लोकांना दिसते. परंतु ते खरे प्रेम म्हटले जात नाही. एक्जेक्टली (खरोखर ) ज्याला प्रेम म्हटले जाते ना, ते म्हणता येणार नाही, एक्जेक्टली तर संपूर्ण वीतरागता असेल तेव्हा खरे प्रेम, आणि आमचे तर अजून चतुर्दशी म्हटली जाते. पौर्णिमा नाही !!
प्रश्नकर्ता : म्हणजे पौर्णिमावाल्याचे प्रेम यापेक्षाही अधिक असते ?
दादाश्री : पौर्णिमावाल्याचेच खरे प्रेम ! चतुर्दशीवाल्यामध्ये काही
ठिकाणी कमतरता असते. तेव्हा पौर्णिमावाल्याचेच खरे प्रेम असते. प्रश्नकर्ता: संपूर्ण वीतरागता असेल आणि बिनप्रेमाचा असेल, असे तर शक्यच नाही ना ?
दादाश्री : ते बिनप्रेमाचे नसतातच ना !
प्रश्नकर्ता: म्हणजे दादा चतुर्दशी आणि पौर्णिमेत एवढा फरक असतो ? एवढा सारा फरक ?
दादाश्री : बराच फरक ! हे तर आपल्याला पौर्णिमेसारखे वाटते परंतु बराच फरक आहे! आमच्या हातात आहे तरी काय ? आणि त्यांच्या, तीर्थंकरांच्या हातात तर सर्व काही आहे. आमच्या हातात काय आहे !! पण तरीही आम्हाला पौर्णिमेसारखे समाधान वाटते! आमची शक्ती, स्वतः साठी इतके काम करीत असते की आम्हाला पौर्णिमा झाल्यासारखेच वाटते !!