हे कशासारखे आहे? येथे हा लोहचुंबक असेल आणि येथे टाचणी
असेल तर आपण लोहचुंबकाला जरा असे असे फिरवले तर टाचणी वर-खाली होते की नाही? तर होते. लोहचुंबक जवळ नेले तर टाचणी त्याला चिकटते. त्या टाचणीमध्ये आसक्ती कोठून आली ? तसेच या शरीरात लोहचुंबक नावाचा गुण आहे. कारण आत इलेक्ट्रिक बॉडी आहे. म्हणजे त्या बॉडीच्या आधाराने ही इलेक्ट्रिसिटी उत्पन्न झाली आहे. त्यामुळे शरीरात लोहचुंबक नावाचा गुण उत्पन्न होतो, तेव्हा जिथे स्वतः चे परमाणू जुळतात तिथेच आकर्षण निर्माण होते. इतरांबरोबर काहीच होत नाही. त्या आकर्षणालाच आपले लोक राग-द्वेष म्हणतात. म्हणतील 'माझा देह ओढला जात आहे. अरे, तुझी इच्छा नाही तरीही देह का ओढला जातो ? मग तिथे 'तू कोण आहेस ?'
आपण देहाला म्हटले की, 'तू जाऊ नकोस' तरी उठून चालायला लागतो. कारण हा देह परमाणुंपासून बनलेला आहे ना, परमाणुंचीच ओढ आहे ही. जुळणारे परमाणू असतील तिथे हा देह ओढला जातो. नाही तर आपली इच्छा नसेल तरीही हा देह कसा ओढला जाईल ? देह ओडला जातो त्यास जगातील लोक म्हणतात 'मला याच्यावर फार राग (मोह) आहे. आपण जर त्याला विचारले की, भाऊ, ओढवून घ्यायची तुझी इच्छा आहे ?' तर तो म्हणतो 'नाही, माझी इच्छा तर नाही, तरी सुद्धा, मी ओढला जातो. ' तर मग हा राग नाही. हा तर आकर्षणचाच गुण आहे. पण तरी ज्ञान नसेल तर त्यास आकर्षण म्हटले जात नाही. कारण त्याला तर असेच वाटते की, 'हे मीच केले' आणि हे 'ज्ञान' असेल तर 'स्वतः ' फक्त जाणतो की आकर्षणामुळे हा देह ओढला गेला यात मी काहीच केले नाही. म्हणजे हा देह क्रियाशील बनतो आणि ओढला जातो, हे सर्व परमाणुंचेच आकर्षण आहे.
हे मन-वचन काया आसक्त स्वभावाचे आहेत. आत्मा आसक्त स्वभावाचा नाही. आणि हा जो देह आसक्त होतो ते लोहचुंबक आणि टाचणीसारखे आहे. कारण कोणतेही लोहचुंबक असो पण ते तांब्याला ओढत नाही. ते कशास ओढेल ? हो, फक्त लोखंडालाच ओढेल. पितळ असेल तर ओढत नाही. अर्थात स्वजातीयलाच ओढतो. तसेच आपल्या शरीरात जे परमाणू आहेत ते लोहचुंबकवाले आहेत, ते स्वजातीयलाच ओढतात. समान स्वभावाचे परमाणूच ओढले जातात. वेडया बायकोशी पटते आणि शहाणी बहिण जरी त्याच्याशी चांगले बोलत असेल तरी तिच्याशी पटत नाही. कारण तिथे परमाणू जुळत नाहीत.
म्हणजे या मुलांवर सुद्धा आसक्तीच आहे. परमाणू परमाणू जुळून
आले. तीन परमाणू आपले आणि तीन परमाणू त्यांचे, असे परमाणू जुळून आलेत म्हणून आसक्ती होते. माझे तीन परमाणू आणि तुमचे चार परमाणू असतील तर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे हे सर्व विज्ञानच आहे.
आसक्ती हा देहाचा गुण आहे, परमाणूंचा गुण आहे. तो गुण कसा आहे ? लोहचुंबक आणि टाचणीचा जसा संबंध आहे तसाच हा संबंध आहे. देहास जुळतील, अशा परमाणुंमध्येच देह ओढला जातो, तेव्हा ती आसक्ती आहे.
आसक्ती तर अबॉव नॉर्मल आणि बिलो नॉर्मल सुद्धा असू शकते. जेव्हा की प्रेम नॉर्मालिटीत असते. एकसमानच असते. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होतच नाही. ही आसक्ती तर जडची आहे, चैतन्यात नाममात्र आसक्ती नसते.
व्यवहारात अभेदता राहते त्यामागे पण कारण आहे. ते परमाणु आणि आसक्तीचे गुण आहेत. परंतु त्यात कुठल्याक्षणी काय घडेल ते सांगता येत नाही. जोपर्यंत परमाणू जुळतात तोपर्यंत आकर्षण होते आणि त्यामुळे अभेदता वाटते. आणि जर परमाणू जुळले नाहीत तर विकर्षण होते व वैर निर्माण होते. अर्थात आसक्ती असेल तिथे वैर असतेच. आसक्तीमध्ये हित-अहिताचे भान राहत नाही. प्रेमात संपूर्ण हित-अहिताचे भान राहते.
म्हणजे हे परमाणूंचे सायन्स आहे. यात आत्म्याला काही सुद्धा देणेघेणे नाही. परंतु लोक भ्रांतीमुळे परमाणुंच्या आकर्षणालाच असे मानतात की 'मी ओढला गेलो' आत्मा कधीच ओढला जात नाही.