वेगळे न होणे. याचे नाव प्रेम. भेद न करणे, याचेच नाव प्रेम! अभेदता झाली तेच प्रेम. प्रेम ही नॉर्मालिटी म्हटली जाते. भेद असेल तर कोणी चांगले काम करून आले की, खुश होतो. परत थोड्यावेळाने काही चुकीचे झाले, चहाचे कप पडले तर चिडतो, म्हणजे अबॉव नॉर्मल, बिलो नॉर्मल होतच असते. प्रेम, काम पाहत नाही, मूळ स्वभावाचे दर्शन करते. काम तर आपल्याला नॉर्मालिटीत प्रॉब्लेम होणार नाही, असेच काम होतात.
प्रश्नकर्ता: आम्हाला आपल्याप्रति जो भाव जागृत होतो ते काय आहे ?
दादाश्री : ही तर आमच्या प्रेमाची पकड आहे. आमच्या प्रेमाने तुम्हाला पकडले आहे. खरे प्रेम सान्या जगास पकडू शकते. प्रेम कुठे कुठे असते? तर जिथे अभेदता असते तिथे प्रेम असते. म्हणजे जगासोबत अभेदता केव्हा म्हटली जाते ? प्रेमस्वरूप व्हाल तेव्हा. संपूर्ण जगासोबत अभेदता म्हटली जाते तिथे मग प्रेमाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही.
आसक्ती केव्हा म्हटली जाते ? तर जेव्हा कोणती संसारी वस्तू घ्यायची असेल तेव्हा, संसारी वस्तूचा हेतू असतो तेव्हा आणि ह्या खा सुखासाठी तर फायदा होईल, याची हरकत नाही. आमच्यावर जे प्रेम राहते याची हरकत नाही. ते तुम्हाला हेल्प करेल. दुसऱ्या आड जागेवर होणारे प्रेम उठून जाईल.
प्रश्नकर्ता : म्हणजे आमच्यात जागृत होणारा भाव, तो आपल्या हृदयाच्या प्रेमाचाच परिणाम आहे असेच ना ?
दादाश्री : हो, प्रेमाचाच परिणाम आहे. म्हणजे प्रेमाच्या शस्त्रानेच शहाणे होतात. मला ओरडावे लागत नाही. मी कोणासोबतही भांडू इच्छित नाही, माझ्याजवळ तर फक्त एक
प्रेमाचेच शस्त्र आहे, 'मी प्रेमाने जगाला जिंकू इच्छितो. '
कारण मी सर्व शस्त्रे खाली ठेवून दिली आहेत. जग शस्त्रांमुळेच विरोधी होत असते, क्रोध-मान-माया लोभ, ही शस्त्रे मी खालीच ठेवून दिली. म्हणजे ती मी वापरत नाही, मी प्रेमाने जगास जिंकू इच्छितो. जग जे समजते ते तर लौकिक प्रेम आहे. प्रेम तर त्याचे नाव की तुम्ही मला शिव्या दिल्या तर मी डिप्रेस होणार नाही आणि हार घालाल तर एलिवेट होणार नाही, त्यास प्रेम म्हटले जाते. खऱ्या प्रेमात तर कधीच फरक पडत नाही. या देहाच्या भावामध्ये फरक पडेल, परंतु शुद्ध प्रेमात फरक पडत नाही.
मनुष्य सुंदर असले तरी अहंकारामुळे कुरूप दिसतात. सुंदर केव्हा दिसतात ? तर म्हणे, प्रेमात्मा होतात तेव्हा, तेव्हा तर कुरूप देखील सुंदर दिसतो. शुद्ध प्रेम प्रकट होते तेव्हाच सुंदर दिसायला लागतो. जगातील लोकांना काय हवे आहे ? मुक्त प्रेम. ज्या प्रेमात स्वार्थाचा गंध किंवा कोणत्याही प्रकारचा मतलब नसतो.
हा तर निसर्गाचा कायदा आहे, नॅचरल लॉ! कारण प्रेम हे स्वतःच परमात्मा आहे.