म्हणून तर कबीर साहेबांनी म्हटले,
'पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित भया न कोई, ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होई.
प्रेमाचे अडीच अक्षर, एवढेच जरी समजले तरी पुष्कळ झाले. बाकी, पुस्तक वाचणाऱ्यांना तर कबीर साहेबांनी फार कडक शब्दात सांगितले की, ही पुस्तके वाचून वाचून तर जग मेले, परंतु पंडित कोणीही झाले नाही, फक्त प्रेमाची अडीच अक्षरे समजण्याकरीता, पण तरी अडीच अक्षरे प्राप्त झाली नाहीत आणि भटकत राहिले. म्हणजे फक्त पुस्तकच वाचत बसतात, तर हा सर्व बेडपणाच आहे. परंतु प्रेमाची मात्र अडीच अक्षरे समजला तो पंडित झाला. असे कबीर साहेबांनी सांगितले. तुम्ही कबीर साहेबांच्या गोष्टी ऐकल्या आहेत का ?
प्रेम असेल तर कधीही वेगळे होणार नाही. हे सर्व तर मतलबी प्रेम आहे. मतलबी प्रेमाला प्रेम म्हणता येईल का ?
प्रश्नकर्ता : मग त्यास आसक्ती म्हटली जाते ?
दादाश्री आसक्तीच आहे. आणि प्रेम हा तर अनासक्त योग : आहे, अनासक्त योगामुळे खरे प्रेम उत्पन्न होते.