या मुली नवरा पसंत करतात, सर्व प्रकारे बघून पसंत करतात, नंतर
भांडत नसतील ? भांडतात का ? मग त्यास प्रेम म्हटलेच जाणार नाही ना !
प्रेम तर कायमचेच असते. जेव्हा पाहाल तेव्हा तेच प्रेम, तसेच प्रेम दिसते.
त्यास म्हणतात प्रेम. आणि तिथे आश्वासन घेता येते.
हे तर तुम्हाला तिच्यावर प्रेम वाटते आणि ती जर कधी रुसून
बसली असेल, तेव्हा जळलं मेलं ते प्रेम ! गटारात टाका त्या प्रेमास, तोंड फुगवून बसली असेल तर त्या प्रेमाचा काय उपयोग ? तुम्हाला काय वाटते ?
प्रश्नकर्ता: बरोबर आहे.
दादाश्री : कधीही तोंड वाकडे करणार नाही असे प्रेम असायला हवे. आणि तसे प्रेम आमच्याकडून मिळते.
नवऱ्याने झिडकारले तरी प्रेम कमी-जास्त होणार नाही, असे प्रेम हवे. हिऱ्याच्या कुड्या आणून देतो त्यावेळेस प्रेम वाढते, ती सुद्धा आसक्तीच. म्हणजे हे जग आसक्तीने चालत आहे. प्रेम तर 'ज्ञानी पुरुषांपासून' ते थेट भगवंतापर्यंत असते, त्यांच्याजवळ प्रेमाचे लाईसन्स असते. ते त्या प्रेमानेच लोकांना सुखी करतात. प्रेमानेच बांधतात म्हणून सुटू शकत नाही. ज्ञानी पुरुषांपासून ते थेट तीर्थंकरांपर्यंत सर्वच प्रेमवाले, अलौकिक प्रेम ! ज्यात लौकिकता नाममात्रही नसते.