पत्नीशी मतभेद होतात की नाही होत ? प्रश्नकर्ता: मतभेदाशिवाय तर पती पत्नी म्हटलेच जात नाहीत ना ?
दादाश्री : हो, का ? असे आहे ? असा नियमच असेल ? पुस्तकात असा नियम लिहिलेला असेल की मतभेद झाले तरच त्यांना पती पत्नी म्हणायचे ? मतभेद कमीजास्त होतात की नाही ?
प्रश्नकर्ता: हो. कमी-जास्त होतात.
दादाश्री तर मग पती आणि पत्नी, हेही कमी होत जाते, नाही
का ?
प्रश्नकर्ता: नाही, उलट प्रेम वाढत जाते.
दादाश्री प्रेम वाढत जाते तसतसे मतभेद कमी होत जातात, नाही
का ?
प्रश्नकर्ता जितके मतभेद वाढत जातात. जितके बाद वाढत जातात, तितके प्रेमही वाढत जाते.
दादाश्री : हो, ते प्रेम वाढत नाही, ती आसक्ती वाढते. प्रेम तर जगाने पाहिलेच नाही. प्रेम हा शब्द जगाने कधी पाहिलाच नाही. ही सर्व आसक्तीच आहे. प्रेमाचे स्वरूप वेगळ्याच प्रकारचे आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर बोलत आहात ना, तर तुम्ही इथे प्रेम पाहू शकता, तुम्ही मला झिडकारले तरी सुद्धा तुमच्यावर माझे प्रेमच असेल. तेव्हा तुम्हाला समजेल की ओहोहो ! प्रेम स्वरूप असे असतात. ही गोष्ट ऐकण्यात काही फायदा आहे का ?
प्रश्नकर्ता पुरेपूर फायदा आहे.
दादाश्री : हो, सावधान व्हा. नाही तर मूर्ख बनलात समजा. आणि प्रेम असेल का ? तुमच्यात तरी प्रेम आहे का, की त्यांच्यात असेल ? आपल्यात प्रेम असेल तर समोरच्यात प्रेम असेल. आपल्यात प्रेम नाही आणि समोरच्यात प्रेम शोधतो की 'मला तुमच्यात प्रेम दिसत नाही.' मूर्खा, प्रेम शोधतोस ? तो प्रेमी नव्हे! हा तर प्रेम शोधतो. सावध हो, हल्ली प्रेम असेल का कुठे ? जो ज्याच्या तावडीत सापडतो त्याला तो भोगतो, लुटबाजी करतो.