एका माणसाची बायको वीस वर्षापूर्वी वारली होती, तर दुसऱ्या एका व्यक्तीने मला सांगितले की 'या काकांना मी रडवू?' मी म्हणालो, 'कसे रडवणार ?' या वयात तर ते रडणार नाहीत, त्यावर तो म्हणाला 'पाहा तरी, ते कसे सेन्सिटिव्ह (भावूक आहेत!' मग तो पुतण्या बोलला, 'काका, काकींची तर गोष्टच विचारू नका, किती चांगला त्यांचा स्वभाव !' तो असे बोलत होता तेवढ्यात तर काका खरोखरच रडायला लागले. अरे, काय हा वेडेपणा! साठाव्या वर्षी सुद्धा बायकोसाठी रडायला येते ? कसली ही माणसे ? हे लोक तर सिनेमात देखील रडतात ना ? सिनेमात कोणी मेला तर पाहणारा सुद्धा रडायला लागतो.
प्रश्नकर्ता: पण मग ती आसक्ती सुटत का नाही ?
दादाश्री : आसक्ती तर सुटत नाही, 'माझी, माझी' करून केले आहे, तर आता 'माझी नाही', 'माझी नाही' असा जप केल्याने बंद होईल. हे तर जे आटे फिरवले आहेत, ते आता उलगडावेच लागतील ना !