मुळात जग जसे आहे तसे तो समजेल, नंतर अनुभव करेल तर तो प्रेमस्वरूपच होईल. जग 'जसे आहे तसे' म्हणजे काय ? तर कोणताही जीव किंचितमात्र दोषी नाही, जीवमात्र निर्दोषच आहे. कोणी दोषी दिसतो तो भ्रांतीमुळेच दिसतो.
चांगले दिसतात ती सुद्धा भ्रांती आणि दोषी दिसतात ती सुद्धा भ्रांती. दोन्ही अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट (आकर्षण-विकर्षण) आहेत. म्हणजे खरोखर तर कोणी दोषी नाहीच आणि दोषी दिसतो त्यामुळे प्रेम होतच नाही. या जगासोबत जेव्हा प्रेम होईल, जेव्हा जग निर्दोष दिसेल तेव्हा प्रेम उत्पन्न होईल. हे 'तुझे-माझे' कुठपर्यंत वाटत असते? तर जोपर्यंत दुसऱ्यांना परके मानतो तोपर्यंत. त्यांच्याशी भेद आहे तोपर्यंत हे माझे वाटतात. म्हणून या अटॅचमेंटवाल्यांना माझे मानतो आणि डिटॅचमेंटवाल्यांना परके मानतो, कोणाशीही प्रेमस्वरूप राहत नाही.
प्रेम हा परमात्म गुण आहे, म्हणूनच त्या प्रेमामुळे आपले सर्व दुःख विसरायला होतात. अर्थात प्रेमाने बांधले गेले म्हणजे मग दुसरे काही बांधण्याचे राहिले नाही.
प्रेम केव्हा उत्पन्न होते ? तर आतापर्यंत ज्या चुका झाल्या असतील,
त्यांची माफी मागून घेतली, तेव्हा प्रेम उत्पन्न होते.
त्यांचा एकही दोष झाला नाही, पण मला त्यांचा दोष दिसला म्हणून तो माझाच दोष होता.
ज्यांच्याशी प्रेम स्वरूप व्हायचे असेल, तिथे अशाप्रकारे वागावे. तेव्हा तुम्हाला प्रेम उत्पन्न होईल. प्रेम करायचे आहे की नाही ? प्रश्नकर्ता हो दादा.
दादाश्री : आमची हीच पद्धत आहे. आम्ही ज्याप्रकारे तरलो
त्याचप्रकारे सर्वांना तारतो.
तुम्हीही प्रेम उत्पन्न कराल ना? आपण प्रेम स्वरूप होतो तेव्हा समोरच्याला अभेदता वाटते. अशाच प्रकारे आमच्याशी सर्व अभेद झाले आहेत. ही रीत आम्ही उघड करून टाकली.