प्रश्नकर्ता जितका जिव्हाळा जास्त, तितके त्याचे प्रेम अधिक
आहे, अशी समज आहे. दादाश्री ते प्रेमच नसते ना! ती सर्व आसक्ती आहे. या जगात प्रेम हा शब्दच नाही. तेव्हा प्रेम बोलणे हे चुकीचे आहे. ती आत आसक्ती
असते.
प्रश्नकर्ता: तर हा जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचा अतिरेक हे
समजावण्याची कृपा करावी.
दादाश्री : जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचा अतिरेक यास इमोशनल (भावूकता) म्हटले जाते. मनुष्य मोशनमध्ये राहू शकत नाही, म्हणून इमोशनल होतो..
किंचितही जिव्हाळा आहे, आसक्ती आहे, तोपर्यंत माणसाला 'टेन्शन' उत्पन्न होते आणि टेन्शनमुळे चेहरा उतरलेला असतो. आमच्यात प्रेम आहे म्हणून तर आम्ही बिनटेन्शनचे राहू शकतो. दुसरा कोणी टेन्शनशिवाय राहूच शकत नाही! सर्वांनाच टेन्शन असते, संपूर्ण जग टेन्शनवालेच आहे.