प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुकीचे करत असेल तेव्हा त्याला टोकावे लागते, त्यामुळे त्याला दुःखं होते, तर मग तिथे काय करावे?
दादाश्री : टोकण्यास हरकत नाही, पण आपल्याला टोकता आले
पाहिजे ना ! सांगता आले पाहिजे ना !
प्रश्नकर्ता: ते कसे सांगावे ?
दादाश्री : तुम्ही मुलाला म्हणाल तुला अक्कलच नाही, गाढव आहेस,' असे म्हटल्यावर काय होईल! त्याला सुद्धा अहंकार आहे की नाही? तुम्हालाच जर तुमचा बॉस म्हणेल की 'तुम्हाला अक्कल नाही, गाढव आहात,' असे म्हणेल तर काय होईल? असे बोलू नये, टोकता आले पाहिजे...
प्रश्नकर्ता ते कसे सांगावे ?
दादाश्री : तुम्ही मुलाला म्हणाल 'तुला अक्कलच नाही, गाढव आहेस,' असे म्हटल्यावर काय होईल! त्याला सुद्धा अहंकार आहे की नाही? तुम्हालाच जर तुमचा बॉस म्हणेल की 'तुम्हाला अक्कल नाही, गाढव आहात,' असे म्हणेल तर काय होईल? असे बोलू नये, टोकता आले पाहिजे.
प्रश्नकर्ता मग कशाप्रकारे टोकावे ?
दादाश्री : त्याला जवळ बसवावे, मग म्हणावे आपण हिंदुस्तानातील
लोक, आपली आर्य प्रजा, आपण काही अडाणी नाही, तेव्हा आपल्याकडून असे व्हायला नको. असे सर्व प्रेमाने समजवायचे तेव्हा मार्गावर येईल. आणि तुम्ही तर लेफ्ट अॅन्ड राईट, लेफ्ट अॅन्ड राईट घेत राहता, असे कसे चालेल ?
प्रेमाशिवाय परिणाम येणार नाही. एखादे रोपटे जरी वाढवायचे असेल ना, तरीही तुम्ही ते प्रेमाने वाढवले तर खूप छान वाढते. तुम्ही जर असेच पाणी टाकून आरडाओरडा कराल तर काहीही निष्पन्न होणार नाही. एक रोपटे वाढवायचे असेल तरीही! तुम्ही म्हणाल की ओहोहो, हे रोपटे तर फार छान वाढले, तर ते त्याला चांगले वाटते! मग तो सुद्धा चांगली मोठमोठी फुले देतो! मग या मनुष्यावर केवढा परिणाम होत असेल ?