तेव्हा प्रेमात जो स्वत:ची आहुती देतो, म्हणजे स्वत: ची सेफ साईड न ठेवता स्वतःची आहुती देतो, ते खरे प्रेम. हल्ली तर ही गोष्ट कठीणच आहे.
प्रश्नकर्ता: अशा प्रेमास काय म्हटले जाते ? अनन्य प्रेम म्हटले
जाते ? दादाश्री : संसारात वाला प्रेम म्हटले जाते. हे आसक्तीमध्ये धरले जात नाही, आणि त्याचे फळ सुद्धा फार उच्च प्रकारचे मिळते. परंतु, स्वतःची आहुती देणे, असे तर कधी घडत नाही ना! हे तर स्वतःची 'सेफसाईड' ठेऊनच काम करतात. 'सेफसाईड' करणार नाहीत अशा स्त्रिया किती आणि असे पुरुष किती ?
सिनेमाला जातेवेळी आसक्तीच्या धुंदीतच जातात आणि परत येताना म्हणेल 'तुला अक्कलच नाही.' तेव्हा ती म्हणेल 'तुमच्यात तरी कुठे हुशारी आहे?' असे बडबडत घरी येतात. ती हुशारी शोधत असते.
प्रश्नकर्ता हा, तर सर्वांचाच अनुभव आहे. कोणी बोलत नाही, पण प्रत्येकाला समजते की, 'दादा' म्हणतात, ती गोष्ट खरी आहे.