प्रश्नकर्ता मग या प्रेमाचे प्रकार किती आहेत, कसे आहेत, ते सर्व समजवा ना.
दादाश्री प्रेमाचे दोनच प्रकार आहेत. एक आहे घटणारे वाढणारे, घटते तेव्हा आसक्ती म्हणतात आणि वाढते तेव्हाही आसक्ती म्हणतात. आणि दुसरे घटत वाढत नाही, असे अनासक्त प्रेम, असे प्रेम ज्ञानींचेच असते.
ज्ञानींचे प्रेम तर शुद्ध प्रेम आहे. असे प्रेम कुठेही पाहायला मिळणार नाही. जगात तुम्ही जिथेही पाहता ते सर्वच प्रेम स्वार्थवाले प्रेम आहे. पती-पत्नीचे, आई-वडिलांचे, पिता पुत्राचे, आई- मुलाचे, शेठ- नोकराचे, प्रत्येकांचे प्रेम स्वार्थवाले आहे. ते केव्हा लक्षात येते की, जेव्हा ते प्रेम फ्रैक्चर होते तेव्हा. जोपर्यंत गोडवा वाटत असतो तोपर्यंत काही वाटत नाही, पण जर कटुता उत्पन्न झाली की मग समजते. अरे, आयुष्यभर वडिलांच्या आज्ञेत राहिला असेल आणि एकदाच जरी परिस्थीतिवश रागाने मुलगा वडिलांना म्हणाला की, तुम्ही बेअक्कल आहात, तर आयुष्यभराचे संबंध तुटतात. वडील म्हणतील, 'तू माझा मुलगा नाहीस, आणि मी तुझा
प्रेम
बाप नाही.' जर खरे प्रेम असेल तर ते नेहमीसाठी जसेच्या तसेच राहील. मग शिव्या देवों की भांडण करो. याशिवायच्या प्रेमास खरे प्रेम कसे म्हणता येईल ? स्वार्थ असलेले प्रेम त्यासच आसक्ती म्हटली जाते. ते म्हणजे व्यापारी आणि ग्राहकासारखे प्रेम आहे, सौदेबाजी आहे. जगातील प्रेमास आसक्ती म्हटली जाते. प्रेम तर त्यास म्हटले जाते की नेहमी सोबतच रहावेसे वाटते. त्याच्या सर्व गोष्टी चांगल्याच वाटतात. त्यात अॅक्शन आणि रिअॅक्शन नसतात. प्रेमाचा प्रवाह एक सारखाच वाहत असतो. कमी-जास्त होत नाही. पूरण गलन होत नाही. आसक्ती पूरण- गलन स्वभावाची असते..
एखादा मुलगा जर बिनअक्क्लेची गोष्ट करेल की, 'दादाजी, आपल्याला तर मी कधी जेवायला सुद्धा बोलवणार नाही आणि पाणी सुद्धा पाजणार नाही. तरी पण 'दादाजी' चे प्रेम कमी होणार नाही आणि नेहमीच चांगले भोजन खाऊ घातले तरी सुद्धा 'दादाजी' चे प्रेम वाढणार नाही, याला प्रेम म्हणतात. म्हणजे जेवायला बोलवले तरी प्रेम आणि नाही बोलवले तरी सुद्धा प्रेम, शिव्या दिल्या तरी प्रेम आणि शिव्या दिल्या नाहीत तरी प्रेम, सर्वत्र प्रेमच दिसेल. म्हणूनच खरे प्रेम तर आमचे म्हटले जाते. प्रेम जसेच्या तसेच आहे ना ? पहिल्या दिवशी जसे होते तसेच्या तसेच आजही आहे ना? अरे, तुम्ही मला वीस वर्षांनी भेटाल ना, तरी सुद्धा प्रेम कमी-जास्त होणार नाही, प्रेम जसेच्या तसेच दिसेल.