करुणा हा सामान्य भाव आहे आणि तो सर्वत्र वर्तत असतो की सांसारिक दुःखांमुळे हे जग फसलेले आहे आणि ती दुःखं दूर कशी होतील ?
प्रश्नकर्ता मला जरा प्रेम आणि करुणेचा काय संबंध आहे हे समजायचे आहे.
दादाश्री : करुणा, काही खास दृष्टीने असेल तेव्हा करुणा म्हटली जाते. आणि दुसऱ्या कुठल्या दृष्टीने असेल तेव्हा प्रेम म्हटले जाते. करुणेचा उपयोग केव्हा करतात ? सामान्य भावे सर्वांचे दुःख स्वतः पाहू शकतो, तिथे करुणा असते. करुणा म्हणजे काय ? तर ती एक प्रकारची कृपा आहे आणि प्रेम ही वेगळी वस्तू आहे. प्रेमास तर विटामिन म्हटले जाते. असे प्रेम पाहिले की त्याच्यात विटामिन उत्पन्न होते, आत्मविटामिन. देहाचे विटामिन तर पुष्कळ दिवस खाल्ले, परंतु आत्म्याचे विटामिन चाखले नाही ना? त्याच्यात आत्मवीर्य प्रकट होते. ऐश्वर्य पण प्रकट होते.
प्रश्नकर्ता: हे सहजच होते ना दादा ?
दादाश्री : सहजच.
प्रश्नकर्ता : म्हणजे त्यासाठी त्याला काहीच करावे लागत नाही.
दादाश्री : काहीच नाही. हा मार्गच सहज आहे.