म्हणजे आसक्ती कुठे असते ? तर जिथे समोरच्याकडून काही
मोबदल्याची अपेक्षा असेल, तिथे आसक्ती असते. मोबदल्याची अपेक्षा नसेल असे किती लोक असतील हिंदुस्तानात ?
आपले लोक आंब्याचे झाड लावतात ना, ते काय फक्त लावण्यासाठीच लावतात? 'भाऊ, आंब्याच्या झाडासाठी एवढे कष्ट का घेता?' तेव्हा म्हणे, 'झाड मोठे होईल ना, तेव्हा माझ्या मुलांची मुले आंबे खातील आणि आधी तर मीच खाईन, म्हणजे फळाच्या अपेक्षेने आंब्याचे झाड वाढवतो. तुम्हाला काय वाटते? की तो निष्काम वाढवतो ?' निष्काम कोणी वाढवतच नाही? म्हणजे सर्वजण स्वतःची चाकरी (सेवा) करवून घेण्यासाठी मुलांना वाढवत असतील ना, की भाकरी करण्यासाठी (दुःख भोगण्यासाठी) ?
प्रश्नकर्ता सेवा चाकरी करविण्यासाठी.
दादाश्री : परंतु आजकाल तर भाकरीच करुन टाकतात. मला एक गृहस्थ म्हणाले ' माझा मुलगा माझी सेवा-चाकरी करत नाही.' तेव्हा मी म्हणालो मग आता भाकरी नाही करणार तर काय करणार ? लाडू बनतील असे तर तुम्ही नाहीत. म्हणून भाकरी केली की निपटारा (!) होईल.