खरे प्रेम कोठून आणायचे ? तर अहंकार आणि ममता गेल्यानंतरच खरे प्रेम असते. अहंकार आणि ममता गेल्याशिवाय खरे प्रेम नसतेच कधी, खरे प्रेम हे वीतरागतेमधून उत्पन्न झालेली वस्तू आहे.
द्वंद्वातीत झाल्यानंतर वीतराग होतो. द्वैत आणि अद्वैत हे द्वंद्व आहे. द्वैत आणि अद्वैतवाल्यांना द्वैताचे विकल्प येतात. 'ते द्वैत, ते द्वैत, ते द्वैत' ! त्यांना मग द्वैत चिकटते. पण तरी ते अद्वैत पद चांगले आहे. अद्वैतापासून तर अजून एक लाख मैल पुढे जाईल त्यानंतर वीतरागतेचे पद येईल आणि वीतरागतेचे पद आल्यानंतर आत प्रेम उत्पन्न होईल आणि तेव्हा जे प्रेम उत्पन्न होते ते म्हणजे परमात्म प्रेम. दोन चापट मारल्या तरी ते प्रेम घटत नाही आणि जर घटले तर आपण समजावे की ते प्रेम नव्हते,
समोरच्याचा धक्का आपल्याला लागला त्यास हरकत नाही, परंतु
आपला धक्का समोरच्यास लागणार नाही इतके आपण पाहावे तेव्हाच प्रेम संपादन होते. बाकी, प्रेम संपादन करायचे असेल तर ते असेच होत नाही.
हळूहळू सर्वासोबत शुद्ध प्रेम स्वरूप व्हायचे आहे. प्रश्नकर्ता शुद्ध प्रेम स्वरूप म्हणजे नक्की कशाप्रकारे राहायचे ?
दादाश्री एखादी व्यक्ती आता शिव्या देऊन गेली आणि नंतर ती व्यक्ती तुमच्याजवळ आली तरी तुमचे प्रेम घटत नाही, त्याचे नाव शुद्ध प्रेम. अशा प्रेमाचा धडा शिकायचा आहे, बस. दुसरे काही शिकायचे नाही. मी जे दाखवितो असे प्रेम असायला हवे. हे जीवन पूर्ण होईपर्यंत असे होईल ना? तेव्हा आता प्रेम शिका !