प्रश्नकर्ता: हे जे प्रेमस्वरूप आहे ते सुद्धा असे म्हटले जाते की, हृदयातून येत असते आणि इमोशनलपणा (भावनिकता) सुद्धा हृदयातूनच ते येत असते ना?
दादाश्री : नाही, ते प्रेम नाही, प्रेम तर शुद्ध प्रेम असले पाहिजे.
ट्रेनमध्ये सगळी माणसे बसली असतील आणि ट्रेन इमोशनल झाली तर काय होईल ?
प्रश्नकर्ता: गडबड होईल, एक्सिडेंट हाईल.
प्रश्नकर्ता: गडबड होईल, एक्सिडेंट हाईल.
दादाश्री लोक मरतील. त्याचप्रमाणे ही माणसे जेव्हा इमोशनल होतात तेव्हा (शरीराच्या) आत इतके सारे जीव मरतात आणि त्याची जबाबदारी स्वत: वर येते. इमोशनल झाल्यामुळे अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात.
प्रश्नकर्ता: इमोशन नसलेला मनुष्य दगडासारखा नाही का होणार ?
दादाश्री : मी इमोशनल नाही, मग मी काय दगडासारखा वाटतो? माझ्यात अजिबात इमोशन नाही. इमोशन असलेला मिकेनिकल होऊन जातो. पण मोशनवाला मिकेनिकल होत नाही ना!
प्रश्नकर्ता: पण जर स्वतः चे 'सेल्फ रियलाइज' झाले नसेल, तर मग इमोशन नसलेला माणूस दगडासारखाच वाटेल ना ?
दादाश्री : असे नसतेच. असे होतच नाही ना. असे कधीच होत नाही, नाही तर मग त्याला मेंटल हॉस्पिटलला घेऊन जातात. पण ते मेंटल सुद्धा इमोशनलच असतात. संपूर्ण जगच इमोशनल आहे.
अश्रुने जो व्यक्त होतो, तो नाही खरा जिव्हाळा
प्रश्नकर्ता संसारात राहण्याकरिता जिव्हाळ्याची गरज आहे. जिव्हाळा व्यक्त करावाच लागतो. जिव्हाळा व्यक्त केला नाही तर कठोर म्हणतात. परंतु आता ज्ञान मिळाले, ज्ञानाची समज आत उतरली त्यानंतर जिव्हाळा तितका व्यक्त केला जात नाही. तर आता व्यवहारात जिव्हाळा व्यक्त करावा का ?
दादाश्री काय घडते ते पाहायचे.
प्रश्नकर्ता : उदाहरणार्थ मुलगा परदेशी शिकायला जात असेल तेव्हा एयरपोर्टवर आई आणि वडील दोघेही गेले आईच्या डोळ्यातून अश्रू
वाहिले पण वडील रडले नाहीत. म्हणून तू कठोर दगडासारखा आहेस असे म्हणतात.
दादाश्री : नाही, जिव्हाळा असा नसतो. परदेशी जात असेल तरी काय? जर तिच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर तिला दटावले पाहिजे की, मोक्षाला जायचे असेल तर इतकी हळवी कुठवर राहशील ?
प्रश्नकर्ता: नाही, म्हणजे असे की जिव्हाळा नसेल तर मनुष्य
फार कठोर होऊन जातो. जिव्हाळा नसलेला मनुष्य फार कठोर असतो.
दादाश्री : ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत त्याचाच खरा जिव्हाळा आहे आणि तुमचा जिव्हाळा खोटा आहे. तुमचा जिव्हाळा दिखाव्याचा आहे आणि त्याचा जिव्हाळा खरा आहे. खरा जिव्हाळा हार्टिली असतो. हे सर्व चुकीचे धरून बसले आहेत. जिव्हाळा काही कळजबरीने होत नसतो. ती तर नेचरल गिफ्ट आहे. जर असे म्हणत असतील की कठोर दगडासारखा आहे तर जिव्हाळा उत्पन्न होत असेल तोही बंद होतो. हे रडणे आणि मग लगेच विसरून जाणे त्यास जिव्हाळा म्हटले जात नाही. जिव्हाळा तर रडू सुद्धा न येणे आणि आठवण राहणे तोच खरा जिव्हाळा.
आमचा जिव्हाळा तर असा की आम्ही कधीच रडत नाही पण तरीही सर्वांवर आमचा कायमचाच जिव्हाळा. कारण जितके अधिक लोक भेटतात तितके सर्व तर रोज आमच्या ज्ञानात येतच असतात.
प्रश्नकर्ता: आई-वडील स्वतःच्या मुलांवर ज्या प्रकारे जिव्हाळा व्यक्त करतात, तेव्हा बऱ्याचदा असे वाटते की ते अति प्रमाणात व्यक्त करतात.
दादाश्री : ते सर्व इमोशनलच आहे. कमी दाखवणारे देखील इमोशनल म्हटले जातात. नॉर्मल असायला हवे. नॉर्मल म्हणजे फक्त नाटकीय ! नाटकातील बायकोसोबत नाटक करणे, तो अगदी तंतोतंत, एकजेक्ट. लोकांना त्यात कुठेही चूक दिसणार नाही. पण मग त्या नाटकातील बायकोला बाहेर निघताना सांगितले की आता तू चल
माझ्याबरोबर, तर ती काही येणार नाही. ती म्हणेल हे तर नाटकापुरतेच होते. कळतंय का तुम्हाला ?
प्रश्नकर्ता हो कळतंय.
दादाश्री : म्हणजे मुलाला म्हणावे 'ये बेटा, बैस इथे. 'तुझ्याशिवाय माझे आहे तरी कोण ? आम्ही तर हिराबांना (दादाश्रींची पत्नी) म्हणत होतो की मला तुमच्याशिवाय करमत नाही. मी परदेशी जातो पण तुमच्याशिवाय मला करमत नाही.
प्रश्नकर्ता हिरावांनाही ते खरेच वाटायचे.
दादाश्री : हो, ते खरेच असते. पण त्यास आम्ही आत शिवू देत नाही.
प्रश्नकर्ता: पूर्वीच्या काळी आई-वडिलांना मुलांवर प्रेम करण्यासाठी
किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी वेळच नसायचा आणि प्रेम देतही नव्हते. जास्त लक्ष देत नसत. हल्ली तर आई-वडील मुलांना फार प्रेम देतात, खूपच काळजी घेतात, सर्व काही करतात तरी सुद्धा मुलांना आई-वडिलांवर जास्त प्रेम का नसते ? दादाश्री हे प्रेम तर, आजकाल बाहेरचा मोह इतका जागृत झाला
आहे की त्यातच त्यांचे सगळे चित्त जाते. पूर्वी मोह फार कमी होता
आणि आज तर मोहाचे पुष्कळ स्थान झाले आहेत.
प्रश्नकर्ता: हो, आणि आई- वडील सुद्धा प्रेमाचे भुकेले असतात की ही आमची मुले आहेत, त्यांनी विनय वगैर ठेवावा.
दादाश्री प्रेमच, जग प्रेमाधीन आहे, मनुष्यास जितकी भौतिक सुखाची पर्वा नाही तितकी प्रेमाची पर्वा आहे. परंतु प्रेमात संघर्ष होतच राहतात. काय करणार ? प्रेमात संघर्ष होता कामा नये.
प्रश्नकर्ता: मुलांना आई-वडिलांवर खूपच प्रेम आहे.
दादाश्री मुलांना सुद्धा खूप प्रेम आहे! पण तरीही संघर्ष होतातच.