आम्हा ज्ञानीपुरुषांना जिव्हाळा असतो. हो, जसा असायला हवा तसाच असतो. आम्ही त्यास 'होम' ला (आत्म्याला) शिवूही देत नाही. असा नियम नाही की आत 'होम मध्ये शिवू द्यावे. जिव्हाळा नसेल तर त्याला मनुष्यच कसे म्हणाल?
प्रश्नकर्ता: आपण म्हणालात की जिव्हाळा तर आम्हालाही असतो. तुम्हाला जसा असतो त्यापेक्षा आमचा उच्च प्रकारचा असतो, सर्वांसाठीच असतो.
दादाश्री : जिव्हाळा तर असतो. आम्ही बिनजिव्हाळ्याचे नसतो.
प्रश्नकर्ता: पण तरी तो जिव्हाळा तुम्हाला टच होत नाही..
दादाश्री : जिथे नैसर्गिक रित्या ठेवायला हवे तिथेच आम्ही त्यास
ठेवतो आणि तुम्ही अनैसर्गिक ठिकाणी ठेवता. प्रश्नकर्ता ही डिमार्केशन जरा स्पष्ट करा ना ?
:
दादाश्री : 'फॉरेन' ची गोष्ट फॉरेनमध्येच ठेवायची ना, 'होम' मध्ये आणायची नाही. लोक 'होम' मध्ये आणतात. 'फॉरेन'ची गोष्ट फॉरेनमध्ये ठेऊन स्वतः 'होम'मध्ये शिरायचे.
प्रश्नकर्ता: पण मग जेव्हा त्या जिव्हाळ्याचा प्रवाह असतो तेव्हा 'त्याला' 'फॉरेन' आणि 'होमचे' (आत्मा आणि अनात्म्याचे) डिमार्केशन होऊ देत नाही ना? त्याक्षणी दोन भाग वेगळे पडत नाहीत ना?
दादाश्री : ज्यांनी 'ज्ञान' घेतले असेल, त्यांना का वेगळे करता
येणार नाही...
प्रश्नकर्ता: आपण हे कशाप्रकारे 'अप्लाय' करता. ते मला समजायचे आहे.
दादाश्री आम्ही जिव्हाळ्यास 'फॉरन' मध्ये ठेऊन 'होम' मध्ये (आत्म्यात) शिरतो आणि तो जिव्हाळा जर आत घुसत असेल तर त्यास म्हणतो, 'बाहेर बस.' आणि तुम्ही तर म्हणाल 'ये, भाऊ, ये, ये, आत ये,