प्रश्नकर्ता : मनुष्य प्रेमाशिवाय जगू शकतो का ?
दादाश्री : ज्याच्यावर प्रेम केले त्याने घटस्फोट घेतला, मग तो कसा जगेल ? आता का बोलत नाही ? बोला ना ?
प्रश्नकर्ता: खरे प्रेम असेल तर जगू शकतो ? जर मोह असेल तर नाही जगू शकणार ?
दादाश्री हे बरोबर बोललात. आपण प्रेम करतो आणि तो घटस्फोट घेईल, तर जळल मेलं ते प्रेम! त्याला प्रेम म्हणायचेच कसे? आपले प्रेम कधीही तुटणार नाही असे असायला हवे, मग काहीही झाले तरी प्रेम तुटणार नाही. अर्थात खरे प्रेम असेल तर जगू शकतो.
प्रश्नकर्ता: फक्त मोहच असेल तर नाही जगू शकणार.
दादाश्री : मोहाचे प्रेम तर बेकार आहे. तेव्हा अशा प्रेमात फसू नका. व्याख्येनुसार प्रेम असायला हवे. प्रेमाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे परंतु प्रेम व्याख्येनुसार असायला हवे.
प्रेमाची व्याख्या आपल्या लक्षात आली ना ? मग तसे प्रेम शोधा. आता असे प्रेम शोधू नका की लगेच दुसऱ्या दिवशी घटस्फोट घेतील. यांचा काय भरवसा ?
प्रश्नकर्ता: प्रेम आणि मोह, त्यात मोहात समर्पित होण्यात मोबदल्याची अपेक्षा आहे आणि या प्रेमात मोबदल्याची अपेक्षा नसते, मग प्रेमात समर्पित झाला तर तो पूर्ण पदास प्राप्त करू शकतो ?
दादाश्री : या जगात जर कोणत्याही व्यक्तीने सत्य (खऱ्या) प्रेमाची सुरुवात केली तर तो परमेश्वर होईल. त्या प्रेमात भेसळ नसते. त्या खऱ्या प्रेमात विषय विकार नसतो, लोभ नसतो, मान नसतो, असे निर्भेळ प्रेम त्याला परमेश्वर बनवतो. संपूर्ण बनवतो. मार्ग तर सर्व सोपे आहेत, परंतु असे होणे कठीण आहे ना !
प्रश्नकर्ता: त्याचप्रमाणे जर कोणत्याही मोहामागे जीवन समर्पित करण्याची शक्ती मिळवली तर परिणाम स्वरूप त्याला पूर्णता प्राप्त होते ? तर तो ध्येय पूर्ण करु शकतो ?
दादाश्री : जर मोहासाठी समर्पित केले तर मग मोहच प्राप्त करेल ना, आणि मोहच प्राप्त केला आहे ना लोकांनी!
प्रश्नकर्ता : आत्ताच्या काळात ही जी मुले-मुली प्रेम करतात ते
मोहाने करतात, म्हणून फेल (नापास) होतात ?
दादाश्री : केवळ मोहच! वरून चेहरा सुंदर दिसतो, म्हणून प्रेम दिसते. पण ते प्रेम म्हटले जात नाही ना! आता इथे जर एखादे गळू झाले, तर जवळ देखील जाणार नाही. हे तर आंबा चाखून पाहिला तर कळेल. तोंड खराब झाले तर झाले पण महिनाभर खाणेही चांगले वाटत नाही. वर्षभर तोंडावर गळू झाले ना तर तोंड सुद्धा पाहणार नाही, मोह सुटून जाईल. आणि जर खरे प्रेम असेल तर एक काय दोन गळू झाले, तरीही प्रेम सुटणार नाही. म्हणजे असे प्रेम शोधून काढा, नाही तर लग्नच करू नका, केलेत तर फसाल. मग ती जेव्हा तोंड फुगवेल तेव्हा म्हणाल, 'मला तर हिचे तोंडच बघावेसे वाटत नाही.' अरे तोंड चांगले वाटले होते म्हणून तर तू तिला पसंत केलेस आणि आता पसंत नाही म्हणतोस ? गोड गोड बोललात तर आवडते. आणि कडू बोलाल तर म्हणेल, 'मला तू अजिबात आवडत नाही. '
प्रश्नकर्ता: ती सुद्धा आसक्तीच म्हणायची ना ?
दादाश्री सर्व आसक्तीच. आधी पसंत होते आणि आता पसंत 4 नाही, आधी पसंत होते आणि आता पसंत नाही' अशी कुरकुर करत राहतो. अशा प्रेमाचा काय उपयोग ?