प्रश्नकर्ता: मग ईश्वराचे परम, पवित्र, प्रबळ प्रेम संपादन करण्यासाठी काय करायला हवे ?
दादाश्री : तुम्हाला परमेश्वराचे प्रेम प्राप्त करायचे आहे ?
प्रश्नकर्ता: हो, करायचे आहे. शेवटी प्रत्येक मनुष्याचे ध्येय हेच
आहे ना ? माझा प्रश्न हाच आहे की, परमेश्वराचे प्रेम कसे संपादन करावे ?
दादाश्री प्रेम तर सर्वांनाच करायचे असते, पण गोड लागले तरच
:
प्रेम करेल ना? तसे तुम्हाला परमेश्वर कुठे आणि कसा गोड लागला, ते मला सांगा ना !
प्रश्नकर्ता कारण हा जीव अंतिम क्षणी जेव्हा देह सोडतो तेव्हा सुद्धा परमेश्वराचे नाव घेऊ शकत नाही.
दादाश्री : पण परमेश्वराचे नाव कसे घेऊ शकेल ? त्याला ज्यात रुची असेल त्याचे नाव तो घेऊ शकेल. जिथे रुची असते तिथे त्याची रमणता असते. परमेश्वरात रुचीच नाही म्हणून परमेश्वरात रमणता देखील नाही, जेव्हा भीती वाटते तेव्हा परमेश्वराची आठवण येते.
प्रश्नकर्ता: परमेश्वरामध्ये रुची तर असते. पण तरी काही आवरण अशी बांधली जातात की ज्यामुळे परमेश्वराचे नाव घेऊ शकत नसतील.
दादाश्री : पण परमेश्वरावर प्रेम वसल्याशिवाय तो नाव कसे घेणार ? परमेश्वरावर प्रेम बसायला हवे ना ? आणि परमेश्वरावर अधिक प्रेम केले तर त्याचा काय फायदा ? मला असे म्हणायचे आहे की, आंबा जर गोड असेल तर प्रेम होते आणि कडू किंवा आंबट लागला तर ? तसेच परमेश्वर तुम्हाला कुठे गोड लागला की तुमचे त्याच्यावर प्रेम बसेल ?
असे आहे, जीवमात्रात परमेश्वर बसलेले आहेत. चैतन्यरुपात आहेत, की जे चैतन्य जगाच्या जाणीवेतही नाही आणि जे चैतन्य नाही, त्यालाच
चैतन्य मानतात. या शरीरात जो भाग चैतन्य नाही त्याला चैतन्य मानतात आणि जे चैतन्य आहे ते त्याच्या जाणीवेतच नाही, त्याचे भानच नाही. आता तो शुद्ध चैतन्य अर्थात शुद्धात्मा आणि तोच परमेश्वर आहे, त्याचे नाव केव्हा स्मरणात येईल ? तर जेव्हा आपल्याला त्यांच्याकडून काही लाभ झाला असेल तरच त्यांच्यावर प्रेम बसेल. ज्याच्यावर प्रेम बसते ना, त्याची आठवण झाली तर त्याचे नाव घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला प्रेम वाटेल असे जर कोणी भेटले तर ते नेहमीच आपल्या आठवणीत राहतात. तुम्हाला 'दादा' आठवतात ?
प्रश्नकर्ता: होय.
दादाश्री : हो. त्यांचे प्रेम आहे तुमच्यावर म्हणून आठवतात. आता
प्रेम का जडले ? कारण 'दादा' नी काहीतरी सुख दिले आहे की ज्यामुळे प्रेम जडले, आणि ते प्रेम जडले की मग कधीच त्यांचा विसर पडत नाही ना! त्यांना कधी आठवावे लागतच नाही.
म्हणजे परमेश्वराची आठवण केव्हा येते ? तर परमेश्वर जेव्हा आपल्यावर काही कृपा करतील. आपल्याला काहीतरी सुख देतील, तेव्हा त्यांची आठवण येते. एक माणूस मला म्हणतो की, 'मला माझ्या पत्नीशिवाय करमतच नाही.' अरे, असे का? मग पत्नी नसेल तर काय होईल ?
तेव्हा तो म्हणाला, 'मग तर मी मरूनच जाईन. अरे पण कशाला ?' तेव्हा म्हणतो, 'ही पत्नीच तर मला सुख देते. आणि जर ती सुख देत नसेल, मारझोड करत असेल तर ?' तरीही त्याला आठवते. अर्थात राग आणि द्वेष दोन्हीत आठवण येत राहते.