दादाश्री : वॉट इज द डेफिनेशन ऑफ लव ? (प्रेमाची व्याख्या काय ?)
दादाश्री : वॉट इज द डेफिनेशन ऑफ लव ? (प्रेमाची व्याख्या
प्रश्नकर्ता: मला माहीत नाही. तुम्ही समजवा.
दादाश्री : अरे, मीच लहानपणापासून प्रेमाची व्याख्या शोधत होतो ना? मला वाटत असे की हे प्रेम काय असेल ? लोक 'प्रेम-प्रेम' बोलतात, ते प्रेम म्हणजे नेमके काय असेल ? म्हणून मग मी सर्व पुस्तके उघडून पाहिली, सर्व शास्त्रे वाचली, परंतु मला प्रेमाची व्याख्या कुठेही सापडली नाही. मला आश्चर्यच वाटले की, कोणत्याही शास्त्रात 'प्रेम म्हणजे काय, ' याची व्याख्याच नाही ?! मग जेव्हा कबीर साहेबांची काही पुस्तके वाचली, तेव्हा मनाची संतुष्टी झाली की प्रेमाची व्याख्या तर या कबीर साहेबांनीच दिली आहे. ती व्याख्या मला उपयोगी पडली, ते काय म्हणतात,
'घड़ी चढ़े, घड़ी उतरे, वह तो प्रेम न होय, अघट प्रेम ही हृदय बसे, प्रेम कहिये सोय.
अशी त्यांनी व्याख्या दिली, मला तर ती व्याख्या फार सुंदर वाटली, 'मानावे लागेल कबीर साहेब, धन्य आहे!' हेच सर्वात खरे प्रेम ! घटक्यात वाढते आणि घटक्यात उतरते त्यास प्रेम कसे म्हणता येईल ?
प्रश्नकर्ता: मग खरे प्रेम कशास म्हणतात ?
दादाश्री खरे प्रेम, म्हणजे जे कधी वाढत नाही, कमी होत नाही ते! आम्हा ज्ञानींचे प्रेम असेच असते, ते कधी कमी-जास्त होत नाही. असे आमचे खरे प्रेम संपूर्ण जगावर असते, आणि असे प्रेम तोच परमात्मा.
प्रश्नकर्ता: पण तरीही जगात कुठे तरी प्रेम असेलच ना ? दादाश्री प्रेम कुठेच नाही. प्रेमासारखी वस्तूच या जगात नाही. ही सगळी आसक्तीच आहे. काहीतरी उलट-सुलट बोलल्यावर लगेच कळते.
समजा, आज आपला भाऊ परदेशातून आला, तेव्हा आज तर अगदी त्याच्याचसोबत बसून राहायला आवडते. त्याच्यासोबत जेवायला- फिरायला खूप आवडते.
आणि जर दुसऱ्या दिवशी तो आपल्याला म्हणाला की, 'तुम्ही नोनसेन्स आहात' तर मग झाले आणि 'ज्ञानी' पुरुषास तर सात वेळा नोनसेन्स म्हटले तरीही ते म्हणतील 'हो भाऊ, तू बैस ना, इथे बैस. ' कारण 'ज्ञानी' जाणतात की हा बोलतच नाही. ही तर रेकॉर्ड बोलत आहे.
खरे प्रेम तर कसे असते की ज्याच्या मागे कधी द्वेष नसतो. जिथे प्रेमात प्रेमामागे द्वेष आहे, त्या प्रेमाला प्रेम कसे म्हणता येईल ? एकसमान प्रेम असले पाहिजे.