खरे प्रेम तर कोणत्याही परिस्थितीत तुटायला नको. प्रेम त्यास
म्हणायचे की जे कभी तुटत नाही. हीच तर प्रेमाची कसोटी आहे. पण तरी थोडेफार प्रेम आहे ते म्हणजे आईचे प्रेम.
प्रश्नकर्ता आपण असे म्हणालात की, आईचे प्रेम असू शकते, वडिलांचे नाही. तर यांना वाईट नाही का वाटणार ?
दादाश्री : पण तरी आईचे प्रेम आहे. याची खात्री पटते. आई मुलाला पाहताच खुश. याचे काय कारण? तर मुलाने आपल्या घरातच, आपल्या शरीरातच नऊ महिने मुक्काम केला होता. त्यामुळे आईला असे वाटते की हा माझ्या पोटी जन्मला आहे आणि त्या मुलालाही असे वाटते की, मी आईच्या पोटी जन्मलो. म्हणून इतकी एकता झाली आहे. आईने जे खाल्ले त्याचेच रक्त बनते. म्हणजे हे एकतेचे प्रेम आहे. पण तरी सुद्धा वास्तविक, 'रिवली स्पिकिंग' प्रेम नाही. 'रिलेटिव्हली स्पिकिंग' प्रेम आहे. त्यामुळे प्रेम जर कुठे असेल तर ते फक्त आई वरच. तिथे प्रेमाची काही तरी निशाणी दिसते. ते देखील पौद्गलिक (शारीरिक) प्रेम आहे, आणि प्रेम पण केवढ्या भागात ? तर एखादी वस्तू आईला आवडत असेल आणि त्या वस्तूवर मुलाने हक्क बजावला तर ते दोघेही भांडतात, तेव्हा प्रेम फ्रेंक्चर होते. मुलगा वेगळा राहायला जातो. म्हणेल, 'आई, तुझ्याशी जमणार नाही. '
हे रिलेटिव्ह नाते आहे. रियल नाते नाही. खरे प्रेम असेल ना, तर वडील मेल्यावर वीस वर्षाचा मुलगा सुद्धा त्यांच्यासोबत जाईल. त्यास प्रेम म्हणतात. एक तरी मुलगा सोबत जातो का ?
प्रश्नकर्ता : कोणीही गेला नाही.
दादाश्री : अपवाद नाही का कोणी ? जेव्हा वडील मरतात तेव्हा मुलगा, 'माझे वडील गेले, माझे वडील गेले, ' याचा एवढा परिणाम होतो की तो देखील वडिलांसोबत मरण्यास तयार होतो. अशी घटना मुंबईत घडली आहे का कधी ?
प्रश्नकर्ता नाही.
दादाश्री : मग तिथे स्मशानात जाऊन काय करतात ?
प्रश्नकर्ता: अग्नी देतात.
दादाश्री : असे होय? मग घरी घेऊन काही खात नसेल नाही का? खातो ना! तर हे असे आहे, औपचारिकता आहे, सर्वांना माहीत 2 आहे की हे रिलेटिव्ह नाते आहे. गेला तो गेला. मग घरी येऊन आरामात खातात.
प्रश्नकर्ता मग एखादी व्यक्ती मेली तर आपण त्याच्यासाठी मोहामुळे रडतो की शुद्ध प्रेम असते म्हणून रडतो ? दादाश्री दुनियेत शुद्ध प्रेम कुठेही नसते. हे सर्व मोहामुळेच
रडतात. बिनस्वार्थाची ही दुनिया नाहीच आणि जिथे स्वार्थ आहे तिथे मोह आहे. आई बरोबरही स्वार्थ आहे. लोक असे समजतात की, आई वर शुद्ध प्रेम असते, परंतु स्वार्थाशिवाय तर आई सुद्धा नाही, पण तरी तो लिमिटेड स्वार्थ आहे, म्हणून त्याची प्रशंसा केली आहे, कमीत कमी मर्यादित स्वार्थ आहे. शेवटी तर हा सुद्धा मोहाचाच परिणाम आहे.
प्रश्नकर्ता: ते ठीक आहे, परंतु आईचे प्रेम तर निःस्वार्थ असू
शकते ना?
दादाश्री बहुतांशी निःस्वार्थच असते. म्हणून तर आईच्या प्रेमाला
प्रेम म्हटले आहे.
प्रश्नकर्ता: तरी देखील आपण त्यास मोह आहे' असे का म्हणता ?
दादाश्री असे आहे, कोणी म्हणेल की, 'भाऊ, प्रेमासारखी वस्तू या दुनियेत नाहीच ?' तर पुरावा म्हणून दाखवायचे असेल तर ते आईचे प्रेम हे प्रेम आहे. असे दाखवू शकतो की इथे काही अंशी प्रेम आहे. बाकी दुसऱ्या गोष्टीत काही तथ्य नाही. मुलावर आईचे प्रेम असते, आणि आता इतर सर्व प्रेमापेक्षा ह्या प्रेमाची अधिक प्रशंसा करण्यासारखे आहे. कारण त्या प्रेमात बलिदान आहे. '
प्रश्नकर्ता आईच्या प्रेमाची वस्तुस्थिती अशी आहे, तर मग वडिलांचा काय वाटा आहे, या प्रेमात....
दादाश्री : वडिलांचे मतलबी प्रेम. 'माझे नाव उजळवेल असा आहे,' असे म्हणतील. फक्त आईचेच थोडेसे प्रेम, ते पण थोडेसेच. तिच्याही मनात असते की, मोठा होईल, माझी सेवा करेल, आणि श्राद्ध केले तरी खुप झाले. अशी एक लालूच आहे. म्हणजे जिथे कुठलीही लालूच असेल तिथे प्रेम नाही. प्रेम ही वस्तूच वेगळी आहे, आत्ता तुम्ही आमचे प्रेम पाहत आहात पण ते जर तुमच्या लक्षात आले तर. या जगातील कोणतीही वस्तू मला नकोच. तुम्ही लाखो डॉलर द्याल किंवा लाखो पाँड द्याल! जगभराचे सोने द्याल तरी ते माझ्या उपयोगाचे नाही. जगातील स्त्रीसंबंधी विचार सुद्धा येत नाही. मी ह्या शरीरापासून वेगळा राहतो. शेजान्यासारखा राहतो. ह्या शरीरापासून वेगळा, शेजारी. 'फस्ट नेवर '