प्रश्नकर्ता: आई-वडिलांचे जे प्रेम आहे, ते कसे म्हटले जाते?
दादाश्री : एखाद्या दिवशी मुलाने जर आई-वडिलांना शिव्या दिल्या ना, की मग ते दोघेही मुलाशी भांडतात. हे 'संसारी' प्रेम टिकतच नाही ना. पाच वर्षाने, दहा वर्षाने कधी ना कधी ओसरते. परस्पर प्रेम असायला हवे. कमी-जास्त होणार नाही असे प्रेम असायला हवे,
तरी सुद्धा वडील कधी तरी मुलांवर रागावतात, पण त्यात हिंसक भाव नसतो.
प्रश्नकर्ता: खरोखर तर ते प्रेमच आहे.
दादाश्री : ते प्रेम नाहीच. प्रेम असेल तर राग येतच नाही. पण त्यामागे हिंसकभाव नाही, म्हणून त्यास क्रोध म्हणत नाही. क्रोध हिंसकभावासहित असतो.