जसे आपण रस्त्यावरुन काळजीपूर्वक चालत असतो ना! मग समोरचा माणूस किती ही वाईट असो, तो आपल्याला टक्कर मारुन जाईल आणि नुकसान करेल तर ती गोष्ट वेगळी, परंतु कोणाचे नुकसान करायचा आपला हेतु नसावा. आपण त्याचे जर नुकसान करायला गेलो तर आपले ही नुकसान होईलच. म्हणून नेहमी प्रत्येक संघर्षात दोघांचेही नुकसान होते. तुम्ही समोरच्या व्यक्तिला दुःख दिले, तर त्याच क्षणी आपोआप तुम्हाला सुद्धा दुःख झाल्याशिवाय रहाणारच नाही. ही टक्कर (संघर्ष) आहे म्हणून मी हे उदाहरण दिले आहे कि रस्त्यावरील वाहनव्यवहाराचा काय धर्म आहे कि टक्कर झाली तर तुम्ही मरुन जाल. टक्करमध्ये धोका आहे म्हणून कोणाशीही टक्कर (संघर्ष) करू नका. अशाच प्रकारे ह्या व्यवहारिक कार्यात सुद्धा संघर्ष नको. संघर्ष करण्यात धोका आहे नेहमीच संघर्ष कधी तरी होतो. महिन्यात दोनशे वेळा असे थोडेच होते? महिन्यात असे प्रसंग किती वेळा होतात?
प्रश्नकर्ता: काही वेळा ! दोन-चार वेळा.
दादाश्री : हं, म्हणजे तितके सावरून घ्यावे आपण माझे असे म्हणणे आहे कि, आपण कशासाठी बिघडवायचे, प्रसंग बिघडवणे हे आपल्याला शोभत नाही. तेथे रस्त्या वर सर्व वाहतुकीच्या नियमा प्रमाणे चालतात, तेथे आपल्या समज (मर्जी) प्रमाणे कोणी नाही ना चालत? आणि येथे व्यवहारात स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालणार! कुठलाही कायदा नाही? रस्त्यावर तर कधीच अडचण येत नाही, ते किती छान वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे? आता हा जो कायदा तुम्ही नीट समजून चाललात, तर मग कधी अडचण येणार नाही. म्हणजे हे कायदे समजण्यात चुक आहे. कायदा समजविणारा समजूतदार असला पाहिजे.
ट्राफिकचे (वाहतूकीचे) नियम पाळण्याचा तुम्ही निश्चय केलात, तर त्यामुळे किती छान नियम पाळले जातात! त्यात का अहंकार जागृत होत नाही 'ते काहीही सांगू देत, पण मी तर असेच करणार.' कारण कि तो ट्राफिकच्या नियमांना आपल्या बुद्धिनुसार बरोबर समजतो, स्थूल आहे. म्हणून, हात कापला जाईल, लगेच मरेन, असे हे संघर्ष करून ह्यात मरुन जाईन याची जाणीव नव्हती. ह्यात बुद्धि पोहचू शकत नाही. ही सूक्ष्म वस्तु आहे. ह्यामुळे सारे नुकसान सूक्ष्म प्रकारेच होतात.