संघर्ष, वादविवाद झाला नाही तर त्याचा तीन अवतारानंतर मोक्ष होईल. ह्याची मी गॅरंटी देतो. संघर्ष झाला तर प्रतिक्रमण करावे. संघर्ष पुद्गलचा आहे आणि पुद्गल, पुद्गलचा संघर्ष प्रतिक्रमणाने नाश पावतात.
तो भागाकार करत असेल तर आपण गुणाकार करावा, म्हणजे रक्कम उडून जाईल. समोरच्या व्यक्तिसाठी अशा विचार करावा कि, 'त्यानी मला असे म्हटले, तसे म्हटले, ' हाच गुन्हा आहे. रस्त्याने जाताना भिंतीला आपण आपटलो तर आपण त्या भिंतीला का ओरडत नाही? झाडाला जड का म्हणतात? जे आपटतात ती सर्व हिरवी झाडेच आहेत! गाईचा पाय आपल्यावर पडला तर आपण काही म्हणतो का? तसेच ह्या सर्व लोकांचे आहे. ज्ञानी पुरुष सर्वांनाच कशाप्रकारे माफ करतात? ते समजतात कि, हे बिचारे समजत नाही, झाडासारखे आहेत. आणि ज्यांना समजते त्यांना सांगावे लागतच नाही, ते तर लागलीच प्रतिक्रमण करतात.