जेव्हा आपण गाडीतून उतरतो कि लगेच हमालाला इकडे ये! इकडे
ये ! असे ओरडतो. तीन-चार हमाल धावत येतात. आपण म्हणतो. 'चल हे सामान उचल'. त्याने सामान उचलून घेतल्यानंतर, स्टेशनातून बाहेर आल्याने वर पैसासाठी आपण कटकट करतो. 'मास्तरला बोलवू का? असे करू का? इतके जास्त पैसे घेतात का? तू असे करतो आणि तसे 'तू करतो.' अरे वेड्या येथे असे करून नाही चालणार. त्याच्या बरोबर वादविवाद करू नकोस. तो पंचवीस रुपये म्हणत असेल तर आपण त्याला समजावून सांगायचे, 'भाऊ, हे खरोखर दहा रुपयाचे काम आहे. परंतु मी वीस रुपये देत आहे. आपल्याला माहित आहे कि आपण फसवले जात आहोत, तरी थोडे फार कमी-जास्त पैसे देऊन निकाल करावा तेथे वादविवाद करून नये. नाहीतर तो खूप वैतागून जाईल. आधीच तो घरुन चिडून आलेला असणार आणि स्टेशनवर आपण त्याच्याशी कटकट केली तर तो वेड्या सांड सारखा आहे, लागलीच चाकू मारेल तुम्हाला. सांड होतो !
एखादा माणूस भांडायला आला, त्याचे शब्द बॉम्बगोळ्यासारखे येत असतील तेव्हा आपण समजायला पाहिजे कि संघर्ष टाळायचा आहे. आपल्या मनावर कुठलाही परिणाम नसेल तरी ही अचानक काही परिणाम होऊ लागला, तेव्हा आपल्या लक्षात येते कि समोरच्या व्यक्तिचा प्रभाव आपल्यावर होत आहे, अशा वेळेला आपण थोडे बाजूला व्हावे. हे सर्व संघर्ष आहे. हे जसे जसे तुम्हाला कळत जाईल तसे तसे तुम्ही हे संघर्ष टाळत जाल, संघर्ष टाळल्याने मोक्ष मिळतो।
हे सारे जग संघर्षांचे आहे, स्पंदन स्वरूपी आहे, म्हणून संघर्ष टाळा. संघर्ष, वादविवादाने हे जग निर्माण झाले आहे. भगवंताने त्याला वैरामुळे निर्माण झाले आहे असे म्हटले आहे. प्रत्येक माणूस, प्राणीमात्र वैर ठेवतो. जास्त प्रमाणात वाद वाढला असेल तर वैर ठेवल्याशिवाय राहत नाही. मग तो साप असो, विंचू असो, सांड असो किंवा पाडा असो. कोणीही असेल ते वैर ठेवतात. सगळ्यांच्यात आत्मा आहे. आत्मशक्ति सर्वांमध्ये सारखी आहे. कारण पुद्गलच्या कमजोरीमुळे सहन करावे लागत असते. पण सहन करण्याबरोबर वैर ठेवल्याशिवाय राहात नाही. आणि पुढच्या जन्मी ते परत वैराचा बदला घेतात!
एखादा माणूस खूप बोलतो तर त्याचा बोलण्याने आपल्याला संघर्ष व्हायला नको, हा धर्म आहे. हो, बोलणे तर कसेही असू शकते. त्याची बोलण्याची पद्धत कशी ही असली तरी आपण वाद, संघर्ष करावाच असे नियम आहे का? ही तर सकाळपर्यंत वादविवाद करणारी अशी माणस, पण आपल्यामुळे समोरच्याला वाईट वाटेल असे बोलणे हा फार मोठा गुन्हा आहे उलट असे कोणी बोलत असेल तर त्यांना लागलीच थांबविले पाहिजे, त्याचेच नांव माणूस होय!