हे तर झाले असे कि मी शास्त्राचे पुस्तक वाचत होतो, तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला कि 'दादाजी, मला काही तरी ज्ञान द्याच. ' तो माझ्याकडे नोकरी करत होता. तेव्हा मी त्याला म्हटले 'तुला काय ज्ञान द्यायचे? तू तर सगळया जगाशी भांडून येतोस. मारामारी करून येतोस' रेल्वेतही तू मारामारी केलीस, तू पैसाचे पाणी करतो आणि रेल्वेला जे कायदेशीर भरायचे आहे, ते पैसे तू भरत नाहीस. आणि वरुन भांडण करतोस, हे सारे मला माहित आहे. जेव्हा त्याला सांगितले कि 'तुला शिकवून काय करायचे? तू तर सगळयांशी भांडतोस!' तेव्हा तो म्हणाला, 'दादाजी हे आपण सगळ्यांना जे ज्ञान सांगता ते मलाही शिकवा.' मी म्हणालो 'तुला शिकवून काय करायचे? तू तर रोज गाडीत मारमारी, घोटाळे करून येतोस.' सरकारात दहा रुपये भरण्या एवढे सामान असेल तरीही तो पैसे भरल्याशिवाय आणयचा आणि लोकांना वीस रुपायाचे चहापाणी पाजायचा! त्यामुळे तर दहा रुपये वाचत नाहीत, उलट दहा रुपये जास्त वापरले जातात असा तो नोबल (!) माणूस.
पुन्हा तो मला म्हणाला कि तुम्ही मला काही ज्ञान शिकवा, मी म्हणालो, 'तू तर रोज भांडण करून येत असतो, आणि रोज मला ते ऐकावे लागते. ' 'तरीही काका, काहीतरी द्या, काहीतरी द्या मला' असे तो म्हणाला. तेव्हा मी म्हणालो 'एक वाक्य मी तुला देतो. तू पाळशील का?' तेव्हा तो म्हणाला 'नक्कीच पाळीन.' मी म्हणालो 'कोणाच्याही बरोबर संघर्ष करू नकोस' तेव्हा तो म्हणाला, 'संघर्ष म्हणजे काय, दादाजी ? मला सांगा, मला नीट समजवून सांगा.'
मी म्हणालो, 'आपण अगदी सरळ चालत आहोत, मध्येच रस्त्यावर खांब आला तर आपण बाजूला सरकायला पाहिजे कि आपण त्या खांबाला आदव्ययचे?' तेव्हा तो म्हणाला, 'नाही, आदळले तर डोके फूटेल.' मी म्हणालो, 'समोरुन म्हैंस येत असेल तर बाजूने जायला पाहिजे कि तिला टक्कर द्यायाची?' तेव्हा तो म्हणाला, 'जर टक्कर झाली तर ती म्हैस, मला मारेल त्यामुळे मी बाजूला जायला हवे.' मग मी विचारले 'साप येत असेल तर? मोठा दगड पडला असेल तर?' तर तो म्हणाला 'बाजूनेच जावे लागेल' मी विचारले, 'कोणाला बाजूने जायला पाहिजे?' तेव्हा तो म्हणाला 'आपणच बाजूने जायला पाहिजे.' मी विचारले, 'कशासाठी?' तेव्हा तो म्हणाला, 'आपल्या सुखासाठी, जर आपण त्यांना टक्कर दिली तर आपल्याला लागेल.' मी म्हणालो, 'या जगात कित्येक जण दगडासारखे आहेत, काही म्हशीसारखे आहेत, काहीजण गाईसारखे आहेत, काही जण मनुष्यासारखे आहेत, काहीजण सापासारखे आहेत, काहीजण खांबासारखे आहेत, सर्व प्रकाराची माणसे आहेत. त्या सर्व लोकांशी तू संघर्षात पडू नकोस. अशा रीतीने तू आता मार्ग काढ.'
हे सारे मी त्याला १९५१ साली समजाविले होते. पण तो आता सुद्धा त्यात कमी पडत नाही. त्यानंतर त्याने कधीच कोणाशी वादविवाद केला नाही. हे शेठजी त्याचे काका लागतात. त्यांच्या हे लक्षात आले होते कि, हा आता कोणाशी संघर्ष करीत नाही. म्हणून ते शेठजी जाणून-बुजून त्याची कळ काढायचे. ते एखाद्या बाजूने काही कोंडी करायचे तर दुसऱ्या बाजूने हा मुकाटेने निघून जायचा. दुसऱ्या बाजूने कोंड्या केल्या कि फिरुन दुसया बाजूने निघून जायचा. संघर्ष तो टाळत होता १९५१ नंतर त्याने कोणाशीच संघर्ष केला नाही.