shabd-logo

प्रकरण १

22 June 2023

18 पाहिले 18
विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.

हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांनी एक दत्तक मुलगा घेतला होता. त्याचे नाव होते दीपचंद - परंतु त्याला प्रेमाने सारे बाबू अशीच हाक मारीत.

बाबू ज्या वेळेस दतक घेतला गेला, त्यावेळेस रतनशेटनी हजारो रुपये खर्च केले. मुंबईहून नाचणाऱ्या व गाणाऱ्या नृत्यांगना बोलावण्यात आल्या होत्या. संगीताच्या जलशात व मेजवान्यात वाटेल तसा पैसा खर्च केला गेला. खेड्यापाड्यांतून लोक भुकेने मरत होते. त्यांच्या किंकाळ्या या संगीतबहाद्दरांना, बासुंदीबहाद्दरांना, विलासलोलुपांना कोठून ऐकू येणार? सारे नाचतमाशात दंग होते.

तो पाहा एक स्वयंसेवक खाली रस्त्यात गाणे म्हणत आहे. किती करुणरसपूर्ण तो गाणे म्हणत आहे. त्याचा आवाज मोठा परंतु गोडही आहे. त्याचा खादीचा पोशाख आहे. खांद्यावर काही खादी का आहे विकायसाठी? त्याचे गीत आपण ऐकू या.

हृदय जणू तुम्हा ते नसे || हृदय ||

बंधुपाशी लाखो मरती || विलास सुचती कसे || हृ.||

निज भगिनीच्या अंगावरती | चिंधीही ती ना दिसे || ह.|| गरिबांच्या मरणाने सतत | तुमचे भरति खिसे || हृ.|| खादि वापरा, खादी घाला | इतुके मागीतसे || हृ.|| नाचतमाशे करण्याचा हा | अवसर का हो असे || || हृ.|| देव ओळखा धर्म ओळखा | चरणा मी नमितसे || हृ.||

बाबू सोन्यामोत्याच्या दागिन्यांनी नटलेला होता. त्याच्या अंगावर भरजरी पोशाख होता. बाबू ते गाणे वरून ऐकत होता. बाबूच्या भोवती श्रीमंतापुढे गोंडे घोळणारे अनेक लाळघोटे होते. 'काय ऐकता भिकारड्याचे, चलो दिवाणखान्यात, ती दुसरी प्लेट लावू' - एकजण श्रीमंत बाबूस म्हणाला.

'कोको केला आहे - तो घ्यायला येता ना आधी शिरा खा पण मग वर कोको गोड लागेल का? मध्ये थोडी शेव खावी' - दुसऱ्याने सुचविले. बाबू खालचे गाणे ऐकत होता.

'गरिबा नाही घास परि | खाऊनि हा मरतसे ||. ||

'चला बाबूशेट - शिरा निवत आहे' - एकजण म्हणाला.

" हाकला रे त्या भिकाऱ्याला येथे आला रडगाणे गात - येथे केवढा आनंदाचा प्रसंग' एकजण म्हणाला. -

खाली कोणीतरी त्या स्वयंसेवकास पुढे जाण्यास सांगितले. तो स्वयंसेवक शांतपणे पुढे चालला.

"मला मुळीच भूक नाही पोटात - " बाबुशेट म्हणाले.

बाबू एकटाच एका बाजूला गेला व रडू लागला. सगळीकडे हाकाहाक झाली. बाबू रडू लागला. बाबुला उचलून आणण्यात आले. त्याला गादीवर पलंगावर निजवण्यात आले. डॉक्टर आले. डॉक्टरांनी घाबरण्याचे कारण नाही सांगितले व औषध पाठवतो असे म्हटले. आजूबाजूचे लोक तोंडावर चिंता दाखवू लागले. 'काय झाले एकाएकी बाबू - बेटा काय झाले' रतन शेटनी विचारले.

"आता मला बरे वाटते. हे कपडे काढले म्हणजे आणखी बरे वाटेल. बाबा हे जरीचे कपडे नकोत. 'बाबू म्हणाला.

"काढ रे त्याचे कपडे. नुसता तो रेशमी शर्ट घाल.' शेटजी म्हणाले. बाबू जास्त काही बोलला नाही. बाबू बरा आहे असे वाटल्यामुळे रात्री जास्तच नाचरंग उडाला. बाबू मात्र अंथरुणावर रडत होता.
7
Articles
दीनबंधू
0.0
दीनबंधू हे साने गुरुजींनी लिहिलेले मराठी साहित्यिक आहे.
1

प्रकरण १

22 June 2023
3
0
0

विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांन

2

प्रकरण २

22 June 2023
1
0
0

बाबू इंग्रजी शाळेत जात होता. त्या शाळेत एक त्रिंबकराव म्हणून शिक्षक होते. त्यांचे हृदय फार थोर होते. मुलांच्या मनावर उत्कृष्ट संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण असे त्यांना वाटे. ते इतिहास व भाषाविषय शिकवीत,

3

प्रकरण ३

22 June 2023
1
0
0

वर्गात कधी स्वदेशावर बोलणे निघे. तुम्ही साधी खादी वापरत नाही - तुम्ही पुढे काय ध्वजा लावणार? देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे. देशभक्ती म्हणजे देशातील दीन लोकांचे दुःख दूर करणे. ते दूर करण्यासाठी स्वतः त्या

4

प्रकरण ४

22 June 2023
2
0
0

दिवाळीची सुट्टी पडून मुले घरोघर गेली होती. त्रिंबकराव मात्र घरी गेले नाहीत. त्यांना घरच नव्हते. त्यांना कोणी नव्हते. त्यांचा एक भाऊ आफ्रिकेत होता - एक डॉक्टर होता परंतु त्यांचा स्वभाव असा विचित्र असल्

5

प्रकरण ५

22 June 2023
0
0
0

दिवाळीच्या यंदाच्या सुट्टीत त्रिंबकराव तेथेच आले होते. त्यांना विणता येत होते. मागे उन्हाळ्याच्य सुट्टीत ते शिकले होते. ते आता माग चालवीत तेही मुलांबरोबर सारखे विणीत. परंतु आश्रमात खाडी तर भरपूर साठली

6

प्रकरण ६

22 June 2023
0
0
0

“बाबा, दिवाळीला अजून चार दिवस आहेत. मी मुंबईला जाऊ? मी चांगले चांगले कपडे घेईन, दारू आणीन. जाऊ का मुंबईल ? मी लगेच परत येईन. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला मी परत येईन.” बाबू वडिलांना म्हणाला. “पण तू एकट कस

7

प्रकरण ७

22 June 2023
0
0
0

गोविंदाच्या खेड्यातील आनंदी आनंदात दिवाळी गेली. चार दिवस गोरगरिबांनी आनंदात दवडले. हिंदुस्थानातील लोक किती अल्पसंतोषी असतात. थोडक्यातही ते किती राजी असातात, मजा करतात. कोंड्याचा मांडा करावा नवा संसार

---

एक पुस्तक वाचा