shabd-logo

प्रकरण ५

22 June 2023

7 पाहिले 7
दिवाळीच्या यंदाच्या सुट्टीत त्रिंबकराव तेथेच आले होते. त्यांना विणता येत होते. मागे उन्हाळ्याच्य सुट्टीत ते शिकले होते. ते आता माग चालवीत तेही मुलांबरोबर सारखे विणीत. परंतु आश्रमात खाडी तर भरपूर साठली होती. मध्ये जरा देशात चळवळ उसळली होती. त्या वेळेस लोकांनी भराभरा खादी घेतली. त्या वेळेस गोविंदाच्या आश्रमात खादी शिल्लक राहात नसे. गोविंदाने आणखी कार्य वाढविले. दहा गावे त्याने केली. दहा गावचे सूत जमा होऊ लागले. जीवन आता याच कामाला आला होता. तो सूत गोळा करून आणी आणि हिरालालला मदत करी. परंतु राजकीय चळवळ मंदावली व पुन्हा खादीकडे दुर्लक्ष होऊ लागले. खादी हा आपद्धर्म नसून संततधर्म आहे हे अजून लोक शिकलेले नव्हते. गोविंदाने तर काम वाढवले होते. तोंडात दिलेला घास काढून कसा घ्यावयाचा? काय करावे कशा माझ्या अभागिनी गरीब भगिनी उत्सुक असतात. “ऊठा रे उठा भाऊ" असे म्हणून वाटोळ्या जमतात ! किती सुंदर दृश्य हृदयंगम हृदयमीलन प्रेमसिंधू.

आठादिशी दिवाळी होती. बायकांनी खूप सूत कातले होते. त्यांच्या लेकी माहेरा येणार होत्या. गोडधोड करायला नको का? रात्रंदिवस चरके फिरत होते. दिडकी जास्त मिळावी म्हणून सारखे व बारीक कातीत होत्या. उद्या सूत विकत घ्यायला येईल हिरा- बाया म्हणाल्या.

हिरा आला. त्याच्या भोवती बायका आपल्या सुंदर सुताच्या लड्या घेऊन जमल्या. काही भगिनी भराभरा चरक्यावर कातू लागल्या. 'थांब रे हिरा दाङ, थोडा वेळ थांब' असे काही सांगून जात होत्या.

हिराचे तोंड रडवेले झाले होते. आज सूत विकत घेत नाही असे सांगायला तो आला होता. परंतु त्याच्या तोंडातून ते मारक शब्द ते आशावेलीचे कोळसे करणारे वज्राघातासारखे शब्द ते बाहेर येत ना.

“मोज नारे हिरा" जानकी म्हणाली.

“आज हिरादादा, हासत नाही, बोलत नाही" पाणी रे का डोळ्याला आणलेस यमुना बोलली.

“मी काय सांगू? आश्रमात खादी पडून राहली आहे. गेल्या आठवड्यात फेरी केली तर खादी खपली नाही. दिवाळीला ज्याने त्याने झकपक कपडे घेतले आहेत. ही गरिबांची घेईना. माझ्या आया बहिणींची खादी कोणी घेईना. त्यांची दिवाळी परंतु माझ्या आयाबहिणींच्या घरात हाहाकार मी काय बोलू? एक दिडकी आमच्याजवळ नाही. आम्हाला गहाण ठेवून कोणी पैसे देईल तर आम्ही गहाण राहिलो असतो, स्वत:ला विकले असते ! मी आज तुमचे सूत कसे विकत घेऊ? मला विकत घेता येत नाही. क्षमा करा.” कसेतरी हिरालाल बोलला.

"असे नको रे हिरा, दोनचार दिवसांनी दिवाळी. पोरी घरी येतील. दोन दिडक्याही घरात नाहीत रे" एक बाई म्हणाली.

“हिरा माझ्या घरात धान्यसुद्धा नाही. दिवा लावायला तेल नाही. दिवाळीला दोन पणत्या नको का रे?" एक वृद्ध माता म्हणाली.

“मी काय करू, मी पापी आहे. मला नाही म्हणावे लागते मी पापी आहे.” असे म्हणून हिरा पळू लागला. “हिरा, हिरा नको रे निष्ठुर होऊ नको रे कठोर होऊ.” असे म्हणत बायांचा घोळका त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला. “हिरा, माझे तरी सूत घे.” एक गरीब बाई म्हणाली. हिरा पळाला. खाली मान घालून पळाला.

निरनिराळ्या गावांतील लोकांची निराशा झाली. त्रिंबकरावांजवळ थोडे पैसे होते ते विणकरांना दिले व त्यांचे कसेबसे समाधान झाले. परंतु गरीब भगिनींचे काय? गोविंदाला झोप येईना. काही सुचेना. तो परमेश्वराला आळवीत होता.

प्रभुजी, लाज माझी राख"

किंतिक मनोरथ हृदयी माझ्या | सकल होति खाक || प्र. ||
 नतमाऊली तू दीनजनति तू | धाव पाव ठाव || प्र. ||
 मम भगिनींचे अश्रु बघोनी | भरति मदिय आंख | | प्र. ||
 अमित विप्रगण जेवविले तू | भगिनीस देई शाक || प्र. ||

गोविंदा आळवीत होता. देवा, अश्रु माझे घे - हे लाखो अश्रु गोरगरिबांचे घे व ये. मदत कर. लाख नको रे देवा पण दोनतीनशे रुपये ये घेऊन कुबेराकडचे. जगातले श्रीमंत लोक हे तुझे भांडारी, तुझे गुमास्ते त्यांना खादी घ्यायला सांगा. खादीच्या नावे खर्ची घालायला सांग देवा देवा रागावू नकोस हो.
7
Articles
दीनबंधू
0.0
दीनबंधू हे साने गुरुजींनी लिहिलेले मराठी साहित्यिक आहे.
1

प्रकरण १

22 June 2023
3
0
0

विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांन

2

प्रकरण २

22 June 2023
1
0
0

बाबू इंग्रजी शाळेत जात होता. त्या शाळेत एक त्रिंबकराव म्हणून शिक्षक होते. त्यांचे हृदय फार थोर होते. मुलांच्या मनावर उत्कृष्ट संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण असे त्यांना वाटे. ते इतिहास व भाषाविषय शिकवीत,

3

प्रकरण ३

22 June 2023
1
0
0

वर्गात कधी स्वदेशावर बोलणे निघे. तुम्ही साधी खादी वापरत नाही - तुम्ही पुढे काय ध्वजा लावणार? देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे. देशभक्ती म्हणजे देशातील दीन लोकांचे दुःख दूर करणे. ते दूर करण्यासाठी स्वतः त्या

4

प्रकरण ४

22 June 2023
2
0
0

दिवाळीची सुट्टी पडून मुले घरोघर गेली होती. त्रिंबकराव मात्र घरी गेले नाहीत. त्यांना घरच नव्हते. त्यांना कोणी नव्हते. त्यांचा एक भाऊ आफ्रिकेत होता - एक डॉक्टर होता परंतु त्यांचा स्वभाव असा विचित्र असल्

5

प्रकरण ५

22 June 2023
0
0
0

दिवाळीच्या यंदाच्या सुट्टीत त्रिंबकराव तेथेच आले होते. त्यांना विणता येत होते. मागे उन्हाळ्याच्य सुट्टीत ते शिकले होते. ते आता माग चालवीत तेही मुलांबरोबर सारखे विणीत. परंतु आश्रमात खाडी तर भरपूर साठली

6

प्रकरण ६

22 June 2023
0
0
0

“बाबा, दिवाळीला अजून चार दिवस आहेत. मी मुंबईला जाऊ? मी चांगले चांगले कपडे घेईन, दारू आणीन. जाऊ का मुंबईल ? मी लगेच परत येईन. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला मी परत येईन.” बाबू वडिलांना म्हणाला. “पण तू एकट कस

7

प्रकरण ७

22 June 2023
0
0
0

गोविंदाच्या खेड्यातील आनंदी आनंदात दिवाळी गेली. चार दिवस गोरगरिबांनी आनंदात दवडले. हिंदुस्थानातील लोक किती अल्पसंतोषी असतात. थोडक्यातही ते किती राजी असातात, मजा करतात. कोंड्याचा मांडा करावा नवा संसार

---

एक पुस्तक वाचा