shabd-logo

रात्र एकतिसावी

30 May 2023

4 पाहिले 4
लाडघरचे तामस्तीर्थ

राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही; तर चांगल्या गोष्टींचेही असतात.

'श्याम! आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस, त्या असतात साध्या; परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले; तसे तुझ्या या लहान गोष्टींत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम ! काल मी रामजवळ म्हटले, की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टीरूपाने तू धर्म सांगत आहेस; धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणांस ओतता येईल, हे तू दाखवीत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीणभावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृध्द, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम! तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले! त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास. त्या वेळेस मला गहिवरून आले होते. श्याम! आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही?'

'राजा! अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे; तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो, तेव्हा संगीतगायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने व कळकळीने भरून काढतो. राजा! मजजवळ दुसरे काय आहे? काही नाही. खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता.

मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्दवेल्हाळ मी; परंतु तुम्ही कार्यवेल्हाळ आहात. राजा! मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिमा, नामदेव, राम हे किती काम करतात! तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी मजजवळ काही नाही, हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात.' श्याम बोलत होता.

इतक्यात राम आला.

'काय रे राम ? गाडी आली की काय? श्यामने विचारले.

'नाही. बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा! रात्री जा, काही उशीर होणार नाही!' राम म्हणाला.

'देवाची इच्छा!' राजा म्हणाला.

सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते, लाल, निळे, पिवळे सारे रंग

तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदीतीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातांत घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते.

"श्याम! चला परत जाऊ.' राजा म्हणाला.

'राजा! असे भव्य सृष्टिदर्शन झाले, म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा.' श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती.

शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एकेक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एकेक माणूस जमता जमता सारी गची भरून गेली. प्रार्थनेला सुरूवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती.

श्यामने गोष्ट सांगण्यास सुरूवात केली.

आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते, त्या वेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामस्तीर्थं आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस्तीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस किती तरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्याइतकी सशक्त राहिली नव्हती, तरी हिंदू-फिरू शकत होती, दोन धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ, वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरास जावयाचे, असे ठरले होते.

आई केव्हा येते, याची मी वाट पाहात होतो. किती तरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती! बारा वर्षांत पालगडाच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवापालट, ना कधी थापालट, आई आली. दापोलीहून लाडघरास जाण्यासाठी मी गाडी ठरविली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर तीन कोस होते. तीन तासांचा रस्ता होता.

पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मी उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरविले होते. सकाळी सात आठ वाजता पोचू, असे वाटत होते.

गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठया आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टिमंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या! फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टिमंदिरात काकडआरती सुरू झाली होती..

गाडीमध्ये मी व माझी आई दोघे जणच होतो. मी व माझी आई माझी आई आणि मी. दोघे,

अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय चौदा-पंधरा वर्षाचे होते; तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली, असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती.

'किती रे भरभरीत शेंडी ? श्याम ? तेलबील नाही वाटते लावीत कधी?" आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो.

सुखावले मन । प्रेमे पाझरती लोचन

अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी, आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे, आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी होय. आम्हां दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही; तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन, वगैरे मनोरथ मी मनात मांडीत होतो. मनोरथाचे मनोरे रवावयाचे व पाडावयाचे, हा मनाचा चंचल स्वभावच आहे.

आई मला म्हणाली, 'श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली?"

'आई तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई, मला थोपट. आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे, असेच मला वाटते. थोपट मला ओव्या म्हण.' माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धो धो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती; परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहात होतो. झोप येत नव्हती. तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ; परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वत: ही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. या वेळेसही तोच अनुभव आला.

घनदाट या रानात धो धो स्वच्छ वाहे पाणी

माझ्या श्यामच्या जीवनी । देव राहो ॥

आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो.

आईने विचारले, 'काय रे उठलाससा? कंटाळलास, वाटते? नीज, हो. माझी मांडी दुखायची नाही.

मी म्हटले, 'आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का?"

दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा, की तिथे हा आनंद तुम्हांला भेटेल.

दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैलरहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कुऊ कुऊ आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहात होते. पोफळी, नारळी, केळी अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळीपोफळीचे नारळींचे आगर मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृध्द मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेचचेल, दाट झाडी.

आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हांस माहीत नव्हते. विचारीत विचारीत चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते

सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुध्दा किती तरी दिवसांनी तिला

पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठया मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहताच चकितच झाली. 'वयनी! ये. किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत!' अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. 'आणि हा कोण?' तिने माझ्याकडे पाहून विचारले.

आई म्हणाली, 'सुभ्ये! हा श्याम हो. लहानपणी हट्ट करणारा. सर्वांशी भांडणारा तो हो हा. तुला नाही का आठवत?'

'बराच की रे मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते?' सुभाताईने विचारले.

'हो, मी चौथ्या इयत्तेत आहे.' असे मी उत्तर दिले.

त्या प्रेमळ, भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, 'वयनी, समुद्रावर आताच स्नाने करावयास जा; म्हणजे दहा-अकरा वाजायला परत याल. दुपारी जेवणे खाणे झाल्यावर देवीला जाऊ; म्हणजे सायंकाळी तुम्हांला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढी आल्यासारखी आठ दिवस राहतीस, तर किती चांगले झाले असते! मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का?'

'सुभ्ये! ही गाडी परत भाडयाची ठरविली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आल्ये आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो. ' आई म्हणाली.

आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोराने निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस्तीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळयांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो! अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र.

आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हास दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. 'येथेच लाल पाणी का बरे?' असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला.

ते म्हणाले, 'देवाचा चमत्कार; दुसरे काय?"

आई म्हणाली, 'येथे देवाने राक्षसास मारले असेल, म्हणून हे पाणी लाल झाले!" सुभाताईचे यजमान म्हणाले, 'हो! तसा तर्क करावयास हरकत नाही.'

लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोडया जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुऊ लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत खेळत खिदळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपासमुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते, तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदकुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली; चार आणे समुद्रात फेकून दिले! मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने चार आणे दिले! ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणान्या देवाला भक्त काडवातीने, निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काही तरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहात असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुध्दी नको का शिकावयाला?

कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली, तो बारा वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नानसंध्या, देवतार्चन, पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या, आगराच्या कामाला लागत असत.

आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रूचकर होते. सुभाताईने तेवढयातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा आंगरस काढला होता; नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रूची आली होती. वांगी व त्यात मुळयाच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकढे तूप होते.

'श्याम, श्लोक म्हण चांगलासा.' आई म्हणाली.

मी 'केयूरा न विभूषयन्ति पुरुष' हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक

फार आवडला.

इंग्रजी शाळेत जातोस, तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते? अलीकडच्या मुलांना चार श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे, श्याम?' त्यांनी मला विचारले..

'दुसरा.' मी सांगितले.

'वा! चांगला हुशार दिसतोस!' ते म्हणाले.

सुभाताईचा मुलगा पाच वर्षांचा होता व मुलगी दोन-अडीच वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखविला.

'श्याम! खांडवी घे हो आणखी. लाजू-विजू नकोस.' सुभाताई म्हणाली.

"श्याम मुळी सान्या जगाचा भिडस्त. येथे नको हो लाजायला! श्याम !' आई हसत म्हणाली. माझी

आईही जेवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली, 'वयनी! तू आपली सावकाश जेव. त्यांना

जाऊ दे उठून '

सान्यांची जेवणे झाली. ओल्या पोफळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे; परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवराआवर केली. दोघी जणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईंच्या मुलग्याबरोबर मी आगरात गेलो. आगरातील मजा पाहात होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात. परंतु फार असले, म्हणजे त्यांना कोण विचारतो! केळफुलाची एकेक पारी उघडत होती व केळयाची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते. त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुभाताईने हाक मारली, म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला.

'श्याम! त्या पपनशीवरची दोन-तीन पपनसे तोडून आण. दोन येथे फोडू व एक बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल.' सुभाताईने सांगितले.

'कोठे आहे झाड?' असे मी विचारताच 'चल, मी दाखवितो, मामा!' असे मधू म्हणाला व माझा

हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुखडीएवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती; परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून दोन-तीन पपनसे पाडली, पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली, की रानात देवाला जावयाचे तेथेच पपनसे फोडावी. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली 'रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा.' पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे.

देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायांवर वाहिल्या. खणनारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोऱ्यात आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते, मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने, तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो.

देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हांला आता परत दापोलीस जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला.

'तू दापोलीस जवळच आहेस; एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे, तर

येथे येत जा. ऐकलेस ना, श्याम !' सुभाताई म्हणाली.

तिचे यजमान म्हणाले, 'श्याम! येत जा रे. आम्ही काही परकी नाही. अरे गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार. ये हो!' मी 'हूँ' म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली. पपनसेही दोन घेतली.

'सुभ्ये, येते हो!' आई म्हणाली आई निरोप मागू लागली.

'वयनी ! आता पुन्हा, ग, केव्हा भेटशील?' सुभाताई भरल्या मनाने म्हणाली.

आई म्हणाली, 'सुभ्ये! देवाला माहीत, केव्हा भेटू, ते बारा वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडल्ये. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे दोन भाऊ पुण्या-मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेल्ये तर! परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी ? सुभ्ये, गेली पाच वर्षे सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला, की पडावे अंथरूणावर; घाम येऊन ताप निघाला, की उठावे कामाला, घरात तरी दुसरे कोण आहे? गरिबाला दुखणी येऊ नयेत हो. पापच ते. जिभेला चव मुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कसे तरी दोन घास घशाखाली ढकलायचे. असो. देवाची इच्छा! आपण माणसे तरी काय करणार दुसरे आला भोग भोगावा आलेला दिवस दवडावा. हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दुःख उगाळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस; तुझा प्रेमळ स्वभाव, म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू. चंद्री नि तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू, म्हणून बोलत्ये. जरा दुःख हलके होते. बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो, हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे' असे म्हणता म्हणता आईच्या डोळयांना पाणी आले व सुभाताईनेही डोळयांना पदर लावला.

'वयनी! आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वयनी! श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही हो ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी!" सुभाताई म्हणाली..

आई म्हणाली, 'हो. तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला, की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे, येत्ये हो!' असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात एकेक रूपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला.

'वयनी! रूपया कशाला?' सुभाताई म्हणाली.

'राहू दे, ग! मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुभ्ये, तुझी वयनी आता श्रीमंत नाही, हो. असू दे

हो तो रूपया.' असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली.

आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली.

सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामस्तीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तास जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या- भागलेल्या सूर्याला सहस्त्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. बुडाला, सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला, त्या वेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणारा होता.

दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली.

'आई! पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई ! तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे, असे वाटते.' मी आईचा हात हातात घेऊन म्हटले.

आई म्हणाली, 'तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका, सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुध्दा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर! आपल्यात म्हण आहे ना? 'काशीस जावे नित्य वदावे । यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे'. जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी ही सोय आहे. बाळ! आपण कोठे जावयाचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिणे! पुरे हा संसार! कोठल्या यात्रा नि वित्रा! अरे, ही संसारयात्रा हीच मोठी यात्रा, हो! या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रूनिशी मला डोळे मिटू दे, म्हणजे झाले. '

डोंगरावर धो धो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यांतूनही शांत प्रवाह होता. गालांवर घळघळत होता. त्या पवित्र गंगा-यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले.

'आई, तू मला हवीस, आम्हांला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस, तर कोणासाठी शिकावयाचे, कोणासाठी जगावयाचे? आई! तुला देव नाही हो नेणार!" असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेविले. जणू त्या वेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवीत होतो.

'देव करतो ते सारे बन्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले.' आई म्हणाली.

आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेविले होते. मी थोडया वेळाने पुन्हा आईला म्हटले, 'आई! तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील चार दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई, आई! आपलेही तसेच सारे चांगले होईल. नाही का? आपले दारिद्रय जाईल, चांगले दिवस येतील.'

'श्याम! देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो. विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारीची माणसे. आपली कोठे तेवढी लायकी आहे? आई म्हणाली.

"आई ! देवाची कृपा नेहमीच असते. होय ना? गरिवी आली, अपमान झाले, हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच, असे म्हणतात, ते खरे का ग?' मी प्रश्न विचारला.

'बाळ! तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे, देव जे जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले, ते तुझ्या बऱ्यासाठी ना? मग माझ्याहून किती तरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रध्दा असावी.' आई जणू श्रध्दोपनिषदच गाऊन राहिली होती.

एकदम माझे लक्ष समोर गेले. 'वाघ! आई! वाघ!' मी घाबऱ्या घावऱ्या म्हटले.

काय तेजस्वी डोळे

व भव्य भेसूर मुद्रा ! काय ती ऐट! उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो. तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करूणा पटवून द्यावयाला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत. गाईगुरे, मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी, माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता.

हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री नऊ वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही. दुसऱ्या दिवशी गेली.

मित्रांनो! तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधीही मी व आई एकत्र कोठे गेलो नाही. तो एकच दिवस! त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टिमाऊलीच्या समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो. प्रेमात डुंबलो. हृदये हृदयांत ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने, अस्सल शंभर नंबरी सोने करू पाहात होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला.

गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती.

असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोडया वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंत:करणाने गेली.

इतर चरित्रात्मक आठवणी पुस्तके

43
Articles
श्यामची आई
0.0
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले मराठी आत्मचरित्र आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या पुस्तकाच्या 3 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. 1953 मध्ये या पुस्तकावर आधारित 'श्यामची आई' नावाचा चित्रपटही पडद्यावर आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रल्हाद केशव अत्रे यांनी केले होते. आईबद्दलचे प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडल्या आहेत. ही कथा साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात ९ फेब्रुवारी, इ.स. 1933 ला लिहायला सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी, इ.स. 1933 च्या पहाटे त्यांनी ते संपवले.
1

प्रारंभ

25 May 2023
6
0
0

श्यामची आईपुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच

2

रात्र पहिली

25 May 2023
4
1
0

सावित्री व्रतआश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवि

3

रात्र दुसरी

26 May 2023
2
0
0

अक्काचे लग्नआश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा ! नदीतीरावर एक लहानसे महा

4

रात्र तिसरी

26 May 2023
3
1
0

मुकी फुले"बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात ?' शिवाने विचारले.'आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट. ' बारकू आपल्या आईला घाई करू लागला.'कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घ

5

रात्र चवथी

26 May 2023
3
1
0

पुण्यात्मा यशवंत"त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली."जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. ' शिवा म्हणाला."तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्या

6

रात्र पाचवी

26 May 2023
3
1
0

मथुरीश्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तूपडून रहा.'"अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्

7

रात्र सहावी

26 May 2023
3
1
0

थोर अश्रूलहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे ना

8

रात्र सातवी

27 May 2023
2
0
0

पत्रावळ"कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी, माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासु

9

रात्र आठवी

27 May 2023
2
0
0

क्षमेविषयी प्रार्थनाबाहेर पिठुर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प

10

रात्र नववी

27 May 2023
2
0
0

मोरी गाय"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला."तो बाहेर बसला आहे ऐकत, आत

11

रात्र दहावी

27 May 2023
1
0
0

पर्णकुटी"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस आई सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.'ने रे तिलासुध्दा, ती

12

रात्र अकरावी

27 May 2023
1
0
0

भूतदया"राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको.' श्याम म्हणाला.आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श

13

रात्र बारावी

27 May 2023
1
0
0

श्यामचे पोहणेकोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हातानेसुध्दा पाणी घेता येते, इतक्या भरतात. पावसाळयामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच

14

रात्र तेरावी

27 May 2023
1
0
0

स्वाभिमान रक्षण"जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्याव

15

रात्र चौदावी

27 May 2023
1
0
0

श्रीखंडाच्या वडयाआमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वडया खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आ

16

रात्र पंधरावी

27 May 2023
1
0
0

रघुपती राघव राजारामलहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधु

17

रात्र सोळावी

29 May 2023
0
0
0

तीर्थयात्रार्थ पलायनसिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला स

18

रात्र सतरावी

29 May 2023
0
0
0

स्वावलंबनाची शिकवण"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं.. अनन्तं वासुकिं शेषं... अच्युतं केशवं विष्णु.., अशी दोन-चार लहान लहान स्

19

रात्र अठरावी

29 May 2023
0
0
0

अळणी भाजीराजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, 'राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्

20

रात्र एकोणिसावी

29 May 2023
0
0
0

पुनर्जन्म"माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथे शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी

21

रात्र विसावी

29 May 2023
0
0
0

सात्त्विक प्रेमाची भूक"काय, सुरूवात करू ना रे, गोविंदा?' श्यामने विचारले. 'थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबाअजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते.' गोविंदा म्हणाला."इतक

22

रात्र एकविसावी

29 May 2023
0
0
0

दूर्वांची आजी"आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्

23

रात्र बाविसावी

29 May 2023
0
0
0

आनंदाची दिवाळी"दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्य

24

रात्र तेविसावी

29 May 2023
0
0
0

अर्धनारी नटेश्वर"मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई; दुसऱ्या दिवशी ताप निघाला, की ती पुन्हा

25

रात्र चोवीसावी

29 May 2023
1
0
0

सोमवती अवसज्या सोमवारी अवस येते, तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राम्हणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी १०८ वस्तू देवाला वाहावयाच्या

26

रात्र पंचविसावी

29 May 2023
1
0
0

देवाला सारी प्रियसंध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेला होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. 'आई! मी जाऊ का

27

रात्र सव्विसावी

30 May 2023
0
0
0

बंधुप्रेमाची शिकवणमे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला

28

रात्र सत्ताविसावी

30 May 2023
0
0
0

उदार पितृहृदयआमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईचे दुधाच्या खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी ख

29

रात्र अठ्ठावीसवी

30 May 2023
0
0
0

सांब सदाशिव पाऊस देत्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला; परंतु मागून पडेना. लावणी झाली होती; परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू

30

रात्र एकोणतिसावी

30 May 2023
0
0
0

मोठा होण्यासाठी चोरीआपल्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिध्द सरदार त्यांच्यांतील ते आहेत. आमच्या वडिलांचा व त

31

रात्र तिसावी

30 May 2023
0
0
0

तू वयाने मोठा नाहीस.... मनाने...मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास स

32

रात्र एकतिसावी

30 May 2023
0
0
0

लाडघरचे तामस्तीर्थराजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टा

33

रात्र बत्तिसावी

30 May 2023
0
0
0

कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरकत्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक ह

34

रात्र तेहतिसावी

30 May 2023
0
0
0

गरिबांचे मनोरथश्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी वकष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस

35

रात्र चौतिसावी

30 May 2023
0
0
0

वित्तहीनाची हेटाळणीश्यामने सुरूवात केली.'आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एक दोन मोठी शेते विकली असती, तर

36

रात्र पस्तिसावी

30 May 2023
0
0
0

आईचे चिंतामय जीवन"मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो; परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात.

37

रात्र छत्तिसावी

30 May 2023
0
0
0

तेल आहे, तर मीठ नाही!"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस ?' भिकाने विचारले.'आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले. ' गोविंदा म्हणाला.

38

रात्र सदतिसावी

30 May 2023
1
0
0

अब्रूचे धिंडवडेश्यामने आरंभ केला.शेवटी आमच्यावर मारवाडयाने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे

39

रात्र अडतिसावी

30 May 2023
1
0
0

आईचा शेवटचा आजारश्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता."श्याम! पाय चेपू का?' गोविंदाने विचारले.'नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या म

40

रात्र एकोणचाळीसावी

30 May 2023
1
0
0

सारी प्रेमाने नांदाश्यामच्या गोष्टीस सुरूवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती. 'सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कश

41

रात्र चाळिसावी

30 May 2023
1
0
0

शेवटची निरवानिरव"त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाल.' आई वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक

42

रात्र एकेचाळिसावी

30 May 2023
1
0
0

भस्ममय मूर्तीआईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, 'का, रे, नाही भेटायला

43

रात्र बेचाळिसावी

30 May 2023
1
0
0

आईचे स्मृतिश्राध्द'गडयांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राध्द आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दा

---

एक पुस्तक वाचा