shabd-logo

रात्र तेहतिसावी

30 May 2023

1 पाहिले 1
गरिबांचे मनोरथ

श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी व

कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!

"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत?' रामने विचारले.

"राम! आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्रय आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते, रे! हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे! जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग ! लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत! कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले! पारतंत्र्य सर्वभक्षक आहे. सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही; शोक आहे. आनंद नाही; कृतघ्नता आहे, कृतज्ञता नाही; लोभ आहे, प्रेम नाही; पशुत्व आहे, माणुसकी नाही; अंधार आहे, उजेड नाही; अधर्म आहे, धर्म नाही, भीती आहे, निर्भयता नाही बंधने आहेत, मोकळेपणा नाही, रूढी आहेत विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख, माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये, तर काय करू?'

श्याम बोलेना. 'श्याम! दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे; अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे, बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक. ' राम म्हणाला.

परंतु मी वीर नाही; तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे, असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो; माझी ऐट उसनी असते; ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला.

निराश होणे म्हणजे देवाला विसरणे, निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल. अंधारातून उजेड येईल, असे मानणे म्हणजेच आस्तिक्यभाव.' राम म्हणाला.

"परंतु निशा संपून आलेल्या उपेची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे, ते मला समजत नाही. जाऊ दे. फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल, ते करावे. दगड उचलावा; काटा फेकावा! फुलझाड लावावे; रस्ता झावा; कोणाजवळ गोड बोलावे; गोड हसावे; आजाऱ्याजवळ बसावे; रडणान्याचे अश्रू पुसावे. दोन दिवस जगात राहणे! माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार!'

'अरे, आपण संघटना करू. नवविचार फैलावू, दैन्य हरू; भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे.' राम म्हणाला.

प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थनामंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला.

रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते. परंतु हा दिव्य, अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता? श्याम म्हणजे आशा-निराशांच्या द्वंद्वयुध्दाचे स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल. आज उडया मारील व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते.

प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला.-

'गडयांनो! दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काही तरी बोलण्यासाठी मी

गेलो होतो.'

'आई! या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, 'अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली.' आई! आपण एकदा श्रीमंत होतो, ते लोकांना माहीत आहे; परंतु आज घरी खायला नाही त्यांना माहीत नाही; सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो.'

'श्याम! तू आता शाळा सोडून दिली पाहिजे.' आई शांतपणे म्हणाली.

'आई! आताशी तर पाचवी इयत्ता माझी पास झाली. एवढयात शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमवता येणार आहे?' असे मी आईला विचारले.

'तुला कोठेतरी रेल्वेत लावून देऊ, असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठे नोकरी मिळाली, तर.' आई म्हणाली.

'आई! एव्हापासूनच का नोकरी करायवयास लागू? या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ? आई! माझ्या केवढाल्या उडया, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने! मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन! आई! सान्या आशांवर पाणी ओतावयाचे? सारे मनोरथ मातीत लोटावयाचे?' मी जणू कवी होऊनच बोलत होतो; भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती.

'श्याम! गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळया किडीच खाऊन टाकतात!' आई म्हणाली.

आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे, असे तुला वाटते! मी मोठा व्हावे, असे तुला नाही वाटत?' मी आईला विचारले.

'माझ्या मुलाने मोठे व्हावे; परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे; पित्यावर विसंबून रहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे.' आई म्हणाली.

'आई! मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकविलेस, या वेळेस काय करू? ते तूच सांग.' मी आईला म्हटले.

'आईबाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास

ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले, तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा, उपासतापास काढ, आयाससायास कर, विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू?' आईने स्वावलंबनाचा उपदेश केला.

'आई! मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस! माझ्या हृदयात तू आहेस म्हणून तू माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई! तिकडे एक औध म्हणून संस्थान आहे, तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून, जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे? तेथे कोणाला माहीत आहे? कोणाचे काही काम करीन; तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना? आईला मी विचारले.

जा. माधुकरी मागणे पाप नाही; विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नको, पाप करू नको. सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल, ती मदत देत जा. गोड बोलावे. हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको हृदये दुखवू नको, अभ्यास झटून कर, आईबापांची आठवण ठेव, बहीणभावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उध्दार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उध्दार कर.' आई प्रेरक मंत्र सांगत होती. तारक मंत्र देत होती.

'आई! तू भाऊंची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल.' मी सांगितले. ! तू

'मी तुला ती मिळवून देईन. निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते.' असे आईने

आश्वासन दिले.

रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते. कुळिथांचे पिठले होते. 'म्हटले, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला.' आई वडिलांना म्हणाली.

'कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रूपये मोजले; परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये, असे का मला वाटते? आपल्या होतकरू बुध्दिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये, असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय?' असे वडील मोठया खेदाने म्हणाले.

'तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण, म्हणे फुकट असते. तो

माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते दहा रूपये त्याला द्यावे, म्हणजे झाले.' आई म्हणाली. 'काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर, असे काही माझे सांगणे

नाही. फक्त, मी शिकवायला असमर्थ आहे, एवढेच. माझा आशीर्वाद आहे.' वडील म्हणाले.

आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. 'आई! मग अण्णा जाणार वाटते? लांब जाणार, लौकर परत नाही येणार?' धाकटा पुरूषोत्तम आईला विचारीत होता.

'हो, बाळ; तो शिकेल व मग तुम्हांला शिकवील. तुम्हांला शिकविता यावे, म्हणून तो लांब जात आहे.' आई त्याची समजूत घालीत होती.

शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले.

वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता, तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो! इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुर्रकन आईजवळ उडून येत होते; परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारीसुध्दा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठया सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे- जाणे थोडेच होणार! प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार ! मला दहा रूपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो; पुढे आईबापांस सुख देता यावे म्हणून जात होतो; आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो; हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यांतील पाण्याला थांबवीत होता. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? "श्याम! तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव, रे, माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही होत आहे.' असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण ध्रुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे, म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? 'आई! मी थारोळे भरून ठेवतो.' म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागरकळशी कोण भरून आणील ? मी घरी गेलो, की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईल, याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण ? मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया. साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच; एक तोच.

माझी बांधाबांध चालली होती. रात्रीची वेळी बैलगाडी निघावयाची होती. आज रात्री जाणार, हो जाणार; आईला सोडून जाणार! आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या. एक घोंगडी काढली. मी आईला म्हटले, 'घोंगडी कशाला मला? एक तरट खाली घालीन; त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे. मला नको.'

'अरे तू परक्या मुलखात चाललास. तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले, तर असू दे आपली. बाळ! आमचे येथे कसेही होईल. माझे ऐक.'

असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसांत ओठ फुटू नयेत, म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला; आगबोट लागू नये, म्हणून चार आवळयाच्या वडया दिल्या, चार बिब्वेही बरोबर असू देत, असे म्हणाली व लोटयाच्या कोनाडयातून तिने ते काढून आणिले. माझी ममताळू, कष्टाळू आई! बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते.

रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकटया भावाला म्हटले, 'आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो,' बाळ. आईला आता तू!' असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली. ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरविला. ते काही बोलू शकले नाहीत. आणि आईच्या पायांवर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकीवयनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, 'माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा.' 'जा, हो, श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. 'सांभाळ!' ती म्हणाली. मी मानेने हूं म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते. कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचे होते. तिठ्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळयांना लाविले. त्याच्या चरणींचा शेंदूर कपाळी लावला. 'माझ्या मायबापांना जप!' असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. 'जप, हो, बाळ. सांभाळ.' ते म्हणाले.

मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन-समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुडया मारून मोती काढणार? या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील? तारू कोठे रूतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. 'ध्रुवाप्रमाणे जा.' आई म्हणाली! कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेंबडालेंबडा, पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम! मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई! तिची कृपादृष्टी असली, म्हणजे झाले. मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडले होती. ती लेवून मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो; कधी चिखलात रूतलो; कधी वाळूत पडलो; कधी लाटांनी बुडविले; परंतु पुनः पुनः मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेत. परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही, तरी तिची कृपा आहेच. आई मेली, तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणांस नेहमी आतून मिळतच असतो.

इतर चरित्रात्मक आठवणी पुस्तके

43
Articles
श्यामची आई
0.0
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले मराठी आत्मचरित्र आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या पुस्तकाच्या 3 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. 1953 मध्ये या पुस्तकावर आधारित 'श्यामची आई' नावाचा चित्रपटही पडद्यावर आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रल्हाद केशव अत्रे यांनी केले होते. आईबद्दलचे प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडल्या आहेत. ही कथा साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात ९ फेब्रुवारी, इ.स. 1933 ला लिहायला सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी, इ.स. 1933 च्या पहाटे त्यांनी ते संपवले.
1

प्रारंभ

25 May 2023
6
0
0

श्यामची आईपुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच

2

रात्र पहिली

25 May 2023
4
1
0

सावित्री व्रतआश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवि

3

रात्र दुसरी

26 May 2023
2
0
0

अक्काचे लग्नआश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा ! नदीतीरावर एक लहानसे महा

4

रात्र तिसरी

26 May 2023
3
1
0

मुकी फुले"बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात ?' शिवाने विचारले.'आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट. ' बारकू आपल्या आईला घाई करू लागला.'कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घ

5

रात्र चवथी

26 May 2023
3
1
0

पुण्यात्मा यशवंत"त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली."जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. ' शिवा म्हणाला."तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्या

6

रात्र पाचवी

26 May 2023
3
1
0

मथुरीश्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तूपडून रहा.'"अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्

7

रात्र सहावी

26 May 2023
3
1
0

थोर अश्रूलहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे ना

8

रात्र सातवी

27 May 2023
2
0
0

पत्रावळ"कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी, माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासु

9

रात्र आठवी

27 May 2023
2
0
0

क्षमेविषयी प्रार्थनाबाहेर पिठुर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प

10

रात्र नववी

27 May 2023
2
0
0

मोरी गाय"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला."तो बाहेर बसला आहे ऐकत, आत

11

रात्र दहावी

27 May 2023
1
0
0

पर्णकुटी"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस आई सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.'ने रे तिलासुध्दा, ती

12

रात्र अकरावी

27 May 2023
1
0
0

भूतदया"राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको.' श्याम म्हणाला.आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श

13

रात्र बारावी

27 May 2023
1
0
0

श्यामचे पोहणेकोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हातानेसुध्दा पाणी घेता येते, इतक्या भरतात. पावसाळयामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच

14

रात्र तेरावी

27 May 2023
1
0
0

स्वाभिमान रक्षण"जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्याव

15

रात्र चौदावी

27 May 2023
1
0
0

श्रीखंडाच्या वडयाआमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वडया खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आ

16

रात्र पंधरावी

27 May 2023
1
0
0

रघुपती राघव राजारामलहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधु

17

रात्र सोळावी

29 May 2023
0
0
0

तीर्थयात्रार्थ पलायनसिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला स

18

रात्र सतरावी

29 May 2023
0
0
0

स्वावलंबनाची शिकवण"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं.. अनन्तं वासुकिं शेषं... अच्युतं केशवं विष्णु.., अशी दोन-चार लहान लहान स्

19

रात्र अठरावी

29 May 2023
0
0
0

अळणी भाजीराजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, 'राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्

20

रात्र एकोणिसावी

29 May 2023
0
0
0

पुनर्जन्म"माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथे शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी

21

रात्र विसावी

29 May 2023
0
0
0

सात्त्विक प्रेमाची भूक"काय, सुरूवात करू ना रे, गोविंदा?' श्यामने विचारले. 'थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबाअजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते.' गोविंदा म्हणाला."इतक

22

रात्र एकविसावी

29 May 2023
0
0
0

दूर्वांची आजी"आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्

23

रात्र बाविसावी

29 May 2023
0
0
0

आनंदाची दिवाळी"दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्य

24

रात्र तेविसावी

29 May 2023
0
0
0

अर्धनारी नटेश्वर"मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई; दुसऱ्या दिवशी ताप निघाला, की ती पुन्हा

25

रात्र चोवीसावी

29 May 2023
1
0
0

सोमवती अवसज्या सोमवारी अवस येते, तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राम्हणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी १०८ वस्तू देवाला वाहावयाच्या

26

रात्र पंचविसावी

29 May 2023
1
0
0

देवाला सारी प्रियसंध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेला होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. 'आई! मी जाऊ का

27

रात्र सव्विसावी

30 May 2023
0
0
0

बंधुप्रेमाची शिकवणमे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला

28

रात्र सत्ताविसावी

30 May 2023
0
0
0

उदार पितृहृदयआमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईचे दुधाच्या खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी ख

29

रात्र अठ्ठावीसवी

30 May 2023
0
0
0

सांब सदाशिव पाऊस देत्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला; परंतु मागून पडेना. लावणी झाली होती; परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू

30

रात्र एकोणतिसावी

30 May 2023
0
0
0

मोठा होण्यासाठी चोरीआपल्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिध्द सरदार त्यांच्यांतील ते आहेत. आमच्या वडिलांचा व त

31

रात्र तिसावी

30 May 2023
0
0
0

तू वयाने मोठा नाहीस.... मनाने...मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास स

32

रात्र एकतिसावी

30 May 2023
0
0
0

लाडघरचे तामस्तीर्थराजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टा

33

रात्र बत्तिसावी

30 May 2023
0
0
0

कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरकत्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक ह

34

रात्र तेहतिसावी

30 May 2023
0
0
0

गरिबांचे मनोरथश्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी वकष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस

35

रात्र चौतिसावी

30 May 2023
0
0
0

वित्तहीनाची हेटाळणीश्यामने सुरूवात केली.'आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एक दोन मोठी शेते विकली असती, तर

36

रात्र पस्तिसावी

30 May 2023
0
0
0

आईचे चिंतामय जीवन"मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो; परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात.

37

रात्र छत्तिसावी

30 May 2023
0
0
0

तेल आहे, तर मीठ नाही!"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस ?' भिकाने विचारले.'आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले. ' गोविंदा म्हणाला.

38

रात्र सदतिसावी

30 May 2023
1
0
0

अब्रूचे धिंडवडेश्यामने आरंभ केला.शेवटी आमच्यावर मारवाडयाने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे

39

रात्र अडतिसावी

30 May 2023
1
0
0

आईचा शेवटचा आजारश्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता."श्याम! पाय चेपू का?' गोविंदाने विचारले.'नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या म

40

रात्र एकोणचाळीसावी

30 May 2023
1
0
0

सारी प्रेमाने नांदाश्यामच्या गोष्टीस सुरूवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती. 'सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कश

41

रात्र चाळिसावी

30 May 2023
1
0
0

शेवटची निरवानिरव"त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाल.' आई वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक

42

रात्र एकेचाळिसावी

30 May 2023
1
0
0

भस्ममय मूर्तीआईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, 'का, रे, नाही भेटायला

43

रात्र बेचाळिसावी

30 May 2023
1
0
0

आईचे स्मृतिश्राध्द'गडयांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राध्द आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दा

---

एक पुस्तक वाचा