shabd-logo

‘मुलांनो, सावध !’

10 June 2023

1 पाहिले 1
ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टांपैकी एक गोष्ट पुढे देतो.

एक लहानसा ओढा होता. उन्हाळ्यात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ. पावसाळ्यात मात्र त्याची कोण ऐट व मिजास ! एकदा खूप मुसळधार पाऊस पडला, जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. आमचा हां लहानसा ओढा पाण्याने फुगून गेला. त्याच्या तीरावर धान्यांची सुंदर शेते होती. त्या नाल्याने आपले पाणी दूरवर पसरिले, ती सुंदर शेते वाहून गेली. त्या उद्धट धटिंगण ओढ्याने सामर्थ्याच्या जोरावर ती सुकुमार व उपकारक शेते वाहवून न्यावी ना ? त्या शेतांमुळे या ओढ्याचेच सौंदर्य वाढत असे, परंतु दुष्टाला दुसऱ्याचे नुकसान करण्यात स्वतःचेही शेवटी नुकसान होईल हे दिसत नसते.

त्या शेतांस वाईट वाटले. आपण मोठ्या नदीकडे फिर्याद न्यावी म्हणजे या गर्विष्ठ ओढ्यास ती चांगले शासन करील असे त्या गरीब शेतास वाटले. ती शेते उरलेले हिरव्या रंगाचे कपडे घालून महानदीकडे फिर्याद देण्यासाठी आली, परंतु एकदम 'आ' पसरून चकित झाली. हजारो शेते, हजारो गावे, प्रचंड वृक्ष, त्या महानदीच्या प्रचंड ओघाने वाहून जात होती. या ओढ्याने दोन चारच शेते बुडविली; परंतु ही सवाई राक्षसीण - हिने तर हजारो सुंदर शेतास मूठमाती दिली, गावच्या गाव उद्ध्वस्त केले ! स्वतःच्या संपन्मदाने मदांध झालेली ती बेफाम नदी पाहून आपली गाण्हाणी सांगून दाद मिळण्याची आशा त्य फिर्यादी शेतांस कोठून राहणार ?

ती शेते खाली मान घालून, खिन्नपणे सुस्कारे सोडीत माघारी गेली. मुलांनो, पुष्किनने लिहिलेली ही कल्पित गोष्ट त्या काळातील रशियातील स्थितीवर कितीतरी प्रकाश पाडते. रशियातील अधिकारी गोरगरिबांस नाडीत असत. खालच्यापेक्षा वरचा अधिकारी जास्त उर्मट, बेजबाबदार, जुलमी ! खालचे पुरवले पण वरचे नको. सारांश, रशियन लोकांस कोणी त्राता नव्हता. हीच स्थिती वाढत गेली व रशियात पुढे क्रांत्या झाल्य.

अधिकारी असतात ते जनतेचे नोकर असतात, परंतु आमच्याकडील पोलिस पाटलापासून तो थेट वरपर्यंत सर्वच मुळी बादशहा, लोकांस कस्पटासमान लेखणारे, त्यांस नाडणारे असे दिसतात. याचा परिणाम केव्हाही सुफलदायी होणार नाही. पुष्कळ वेळा युरोपियन अधिकारीही पुरवतात, परंतु आपली काळी नोकरशाहीच जास्त जाचते. 'कुल्हाडीच दांडा गोतास काळ' म्हणतात ना, तशातली गत. मुलांनो, तुम्ही पुढे मामलेदार, मुन्सफ कोणी झालात तर प्रजेच्या सुखासाठी कामे करा. फुकटाफाकट पगार घेऊ नका व बादशाही ऐटीने आपल्याच बांधवांस दडपू नका.

22
Articles
अमोल गोष्टी
0.0
संस्कारक्षम अश्या लहान वयातच मुलांना नैतिक शिकवण देणाऱ्या थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगितल्या तर मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास त्या नक्कीच मदत करतात. साने गुरुजींनी लिहिलेले अमोल गोष्टी हे पुस्तक असंच असून साध्या सोप्या भाषेमुळे व त्यातील नितीगुणांमुळे त्या गोष्टी मुलांनी जरूर वाचाव्यात. हा अमोल खजिना खरोखर मूल्यशिक्षण घडविणाराच आहे.
1

गुणांचा गौरव

8 June 2023
2
0
0

ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुद्धा शूद्र वगैरे ईश्वरानेच

2

राजा शुद्धमती

8 June 2023
1
0
0

आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाट्यास दुःख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दुःखाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत ?

3

मातेची आशा

8 June 2023
0
0
0

त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व संगले होती. परंतु आज काय आहे ? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोड

4

किसन

8 June 2023
0
0
0

एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिनाऱ्यावर शिंपा- कवड्याची संपत्ती किती तरी विखुरलेली असे. किनाऱ्यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प

5

स्वतंत्रतादेवीची कहाणी

8 June 2023
0
0
0

आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाऱ्यायला काही कमी नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे

6

अब्बूखाँकी बकरी

8 June 2023
0
0
0

हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे.आ

7

आई, मी तुला आवडेन का ?

8 June 2023
0
0
0

“माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारट्यास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंडासारखा फुगला आहे! आवदसा आठवली आहे मेल्याला! पुण्यास दिवे लावून आले पळपुटेराव, आता येथे आईशीला गांजावया

8

राम-रहीम

10 June 2023
0
0
0

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, काँग्रेस म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बर

9

समाजाचे प्राण

10 June 2023
0
0
0

ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार ? गार वारा वाहत

10

तरी आईच !

10 June 2023
0
0
0

एक गरीब विधवा होती. तिचा एकुलता एक मुलगा होता. त्या मायलेकरांचे उभयांवर फार प्रेम. एकमेकांवर विसंबत नसत. तो मुलगा लहानाचा मोठा झाला. तो आता तारुण्यात आला. तो एका तरुणीच्या नादी लागला. तिच्या नादी लागू

11

खरा सुगंध

10 June 2023
0
0
0

गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात- फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण देणे, आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होत

12

सत्य केव्हा तरी बाहेर येतेच

10 June 2023
0
0
0

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आतां आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या ड

13

वृद्ध आणि बेटा

10 June 2023
0
0
0

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुद्ध त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते.एकवीस वर्षे वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होत

14

‘मुलांनो, सावध !’

10 June 2023
0
0
0

ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टांपैकी एक गोष्ट पुढे देतो.एक लहानसा ओढा होता. उन्हाळ्यात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ.

15

पहिले पुस्तक

10 June 2023
0
0
0

एक अत्यंत गरीब मुलगा होता. तो गरीब होता तरी त्याला शिकण्याची फार इच्छा होती. एक दिवस तो एका शेजारच्या मुलाजवळ खेळत होता. त्या मुलास तो म्हणाला, “मला जर तू अक्षरे वाचावयास शिकवशील तर सहा अक्षरांस एक बै

16

योग्य इलाज

10 June 2023
0
0
0

गोल्डस्मिथ हा इंग्रजी भाषेतील नामांकित कवी अठराव्या शतकात झाला. 'विकार ऑफ वेकफील्ड' ही त्याची कादंबरी व 'ट्रॅव्हलर अॅण्ड डेझर्टेड् व्हिलेज' या त्याच्या कविता जगप्रसिद्ध आहेत. गोल्डस्मिथ हा कवी होता. त

17

चित्रकार टॅव्हर्निअर

10 June 2023
0
0
0

ज्यूलस ट्रॅव्हर्निअर म्हणून अमेरिकेत एक मोठा चित्रकार होऊन गेला. एकदा एका लखपती व्यापाऱ्याने त्याला आपल्या बंगल्याशेजारच्या बागेत बसून समोर देखावा दिसेल त्याचे मोठे चित्र काढण्यास सांगितले. टँव्हर्निअ

18

मरीआईची कहाणी

10 June 2023
0
0
0

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. पाच सुना दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरल्या. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही. रोग नाही, राई नाही. कशा

19

कृतज्ञता

10 June 2023
0
0
0

गंगा नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती. त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटांत एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्ष

20

श्रेष्ठ बळ

10 June 2023
0
0
0

कुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव ह्यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे.देवदूत: प्रभो, या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का? सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात, पण दगड मात्र अभंग राहतो. द

21

समाधीटपणा

10 June 2023
0
0
0

फ्रान्स देशातला फोंतेन म्हणून एक गोष्टीलेखक होऊन गेळा. न्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यांपैकी एक देतो.पॅरिसमध्ये एक तरुण विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करीत होता. तो विद्वान होता, परंतु वक्तृत्व त्याच्या

22

चतुर राजा

10 June 2023
0
0
0

सालोमन म्हणून एक प्राचीन काळी पश्चिमेकडे राजा होऊन गेला. तो शहाणपणाविषयी फार प्रसिद्ध होता. त्याच्या चातुर्याची कीर्ती दुखर पोचली होती. कीर्तीही पंखाशिवाय उडत जात असते. एक दिवस सालोमन आपल्या दरबारात ब

---

एक पुस्तक वाचा