shabd-logo

मातेची आशा

8 June 2023

12 पाहिले 12
त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व संगले होती. परंतु आज काय आहे ? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोडकी घरे दिसतात. गाव पाहून वाईट वाटते. त्या गावचा जुना इतिहास आठवून डोळे भरून येतात. परंतु साऱ्या हिंदुस्थानचेच असे नाही का झाले ? किती रडणार, आणि रडून काय होणार ?

त्या गावात एक बाई होती. ती विधवा होती. लहान लहान मुले घरात होती, परंतु कर्ते माणूस घरात कोणी नव्हते. सारी त्या मातेवर जबाबदारी होती, काही शेतीवाडी होती. एक लहानसा मळा होता. ती बाई घरी शेती करी. शेजारी-पाजारी मदत करीत. कोणी नांगर देत, कोणी बैलाची जोडी दोन दिवस देई. तिचा संसार साजरा करीत..

परंतु सावकारीचा साप तिच्या संसारात शिरला होता. जेथे हा साप शिरतो तेथे सत्यानाश होतो. हा साप प्रथमच घरात शिरू देऊ नये. परंतु एकदा घरात आला म्हणजे त्याचा विळखा निघता निघत नाही. त्याचा दंश टळत नाही. मग मेल्याशिवाय सुटका नाही.

त्या बाईचा नवरा मेल्यावर सावकार काही दिवस शांत होता. वाईचा मोठा मुलगा सज्ञान केव्हा होतो, त्याची तो वाट पाहात होता. शेवटी आनंदा वयात आला. सज्ञान झाला. सावकाराचे हस्तक त्या गावात होते. एके दिवशी सावकार गावात आला. आनंदाला बोलावणे गेले. सावकार गोड बोलत होता. त्याच्या ओठांवर साखर होती, पोटात जहर होते.

सावकार आनंदा, आता तू मोठा झालास. आईला मदत करतोस की 'तू नाही? आनंदा : मदत न करीन तर पाप होईल. आम्हांला तिने काबाडकष्ट करून पोसले. लहानाचे मोठे केले. मी स्वतः मोट धरतो, मळा करतो. सावकार तुझा बाप फार देवमाणूस होता. त्याची नियत चांगली. त्याला मी कधी 'नाही' म्हणत नसे. रात्री बेरात्री आला तरी त्याला पैसे देत असे.

आनंदा : थोर आहात तुम्ही.

सावकार : हे बघ आनंदा, तुम्ही लहान होतात म्हणून आजपर्यंत मी बोललो नाही. म्हटले, तुझ्या आईला का द्यावा त्रास? परंतु तू आता मोठा झाला आहेस. तुझ्या वडिलांनी पैसे घेतले होते. आज पुनः नव्याने कागद करू. ही लिहून ठेवली आहे प्रॉमिसरी. सही कर म्हणजे झाले. आनंदा : सही मला येत नाही, शाळेत कोणी घातले नाही.

सावकार : बरे, आंगठा कर पुढे. त्याला शाई लावून येथे उठवितो.

आनंदा तयार होईना. परंतु सभोवतालच्या मंडळींनी 'दे आंगठा; सावकार का फसवील ?' असे सांगून आनंदाचा आंगठा घेतला. आनंदास सुपारी फोडून देण्यात आली. त्याच्यापुढे विडी फेकण्यात आली. आनंदा म्हणाला, “मी विडी ओढीत नाही."

ती लहानशी गोष्ट आनंदा घरी बोलला नाही. आंगठ्याला लागलेली ती शाई सारा संसार बुडवील असे त्याच्या मनातही नव्हते. ती काळी शाई म्हणजे काळसर्पाचे जहर होते. ती काळी शाई म्हणजे सारी कृष्ण कारस्थाने होती. परंतु अकपट आनंदाला काय माहीत ? प्रेमळ मातेच्या संगतीत वाढलेले ते पोर. त्याला जगातील छक्केपंजे माहीत नव्हते.

दोन-चार महिने गेले, आणि घरी बेलीफ आला. आनंदाला समन्स लागले. सावकाराने फिर्याद केली. आनंदाच्या बापाने दोनशे रुपये घेतले होते. आनंदाची आई म्हणाली, “त्यांनी १०० रुपये तर देऊन टाकले होते, व मला वाटले की, सारे देणे त्यांनी चुकते केले. कारण मरताना म्हणाले होते, 'कोणाचे देणे नाही. तुम्ही सुखाने कष्ट करा व राहा.' कोठले आले हे देणे ? मरताना का मनुष्य खोटे बोलेल ?"

ती अनाथ माता सावकाराकडे गेली. “माझ्या मुलांची भाकर ओढू नका. कोण आहे माझ्या मुलांना ? कोठे जातील ती ?” – किती तिने सांगितले. सावकाराचे गुमास्ते हसत होते. एक जण म्हणाला, “अग बाई, हा व्यवहार आहे. व्यवहारात का दयामाया असते ? कोर्ट-कचेरीत का डोळ्यांतील पाणी उपयोगी पडते ? तेथे शाईचे काम, हिशोबाचे काम. "

सावकाराने सारी शेतीवाडी जप्त केली. आता लिलाव होणार होता. आनंदाचा आनंद अस्तास गेला. त्याची भावंडे रडू लागली. माता लाचार झाली. ती आपली लहान मुले घेऊन सावकाराकडे गेली. मुलांना सावकाराच्या पायांवर घालून म्हणाली, “यांच्याकडे पाहा हो जरा. तो दीड दोन विघ्यांचा मळा तरी ठेवा. बाकीचे घ्या सारे पोरांना तेवढा तरी तुकडा ठेवा, पदर पसरते दादा. "

सावकाराला का दया आली ? मुसळाला का अंकुर फुटतो ? रक्ताला चटावलेला वाघ का दया करतो ? त्याने सारे घशात घातले. लिलावात कोण बोलणार ? तोच बोलणारा. मातीमोलाने सोन्यासारखी शेती गेली. ती माता व तिची मुले मजूर झाली.

ती माता एके दिवशी मजकडे आली व म्हणाली, “काँग्रेसचे सरकार आहे म्हणतात. माझे शेत परत मिळेल का ? बिघा दीड बिघ्याचा मळा तरी मिळेल का ? पोरांना आधार होईल.” मी म्हटले, “कर्जबिल येणार आहे. परंतु जुन्या हुकुमनाम्याची फेरतपासणी होईल की नाही देव जाणे! शेतकऱ्यांची मूळची शेते त्यांना परत मिळावी, असा कायदा केला पाहिजे. परंतु तसा आज करता येणार नाही, त्यासाठी झगडावे लागेल. एक दिवसमात्र असा खास उजाडेल की, ज्या दिवशी किसानांची शेती त्यांना परत मिळेल.”

त्या मातेच्या तोंडावर आशा फुटली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ती म्हणाली, “दहा वरसांनी का होईना, परंतु मळा परत मिळो. मी मेल्ये तरी मुलांना होईल. दहा वरसांनी तरी मिळेल ना ?"

22
Articles
अमोल गोष्टी
0.0
संस्कारक्षम अश्या लहान वयातच मुलांना नैतिक शिकवण देणाऱ्या थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगितल्या तर मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास त्या नक्कीच मदत करतात. साने गुरुजींनी लिहिलेले अमोल गोष्टी हे पुस्तक असंच असून साध्या सोप्या भाषेमुळे व त्यातील नितीगुणांमुळे त्या गोष्टी मुलांनी जरूर वाचाव्यात. हा अमोल खजिना खरोखर मूल्यशिक्षण घडविणाराच आहे.
1

गुणांचा गौरव

8 June 2023
2
0
0

ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुद्धा शूद्र वगैरे ईश्वरानेच

2

राजा शुद्धमती

8 June 2023
1
0
0

आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाट्यास दुःख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दुःखाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत ?

3

मातेची आशा

8 June 2023
0
0
0

त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व संगले होती. परंतु आज काय आहे ? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोड

4

किसन

8 June 2023
0
0
0

एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिनाऱ्यावर शिंपा- कवड्याची संपत्ती किती तरी विखुरलेली असे. किनाऱ्यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प

5

स्वतंत्रतादेवीची कहाणी

8 June 2023
0
0
0

आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाऱ्यायला काही कमी नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे

6

अब्बूखाँकी बकरी

8 June 2023
0
0
0

हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे.आ

7

आई, मी तुला आवडेन का ?

8 June 2023
0
0
0

“माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारट्यास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंडासारखा फुगला आहे! आवदसा आठवली आहे मेल्याला! पुण्यास दिवे लावून आले पळपुटेराव, आता येथे आईशीला गांजावया

8

राम-रहीम

10 June 2023
0
0
0

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, काँग्रेस म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बर

9

समाजाचे प्राण

10 June 2023
0
0
0

ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार ? गार वारा वाहत

10

तरी आईच !

10 June 2023
0
0
0

एक गरीब विधवा होती. तिचा एकुलता एक मुलगा होता. त्या मायलेकरांचे उभयांवर फार प्रेम. एकमेकांवर विसंबत नसत. तो मुलगा लहानाचा मोठा झाला. तो आता तारुण्यात आला. तो एका तरुणीच्या नादी लागला. तिच्या नादी लागू

11

खरा सुगंध

10 June 2023
0
0
0

गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात- फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण देणे, आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होत

12

सत्य केव्हा तरी बाहेर येतेच

10 June 2023
0
0
0

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आतां आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या ड

13

वृद्ध आणि बेटा

10 June 2023
0
0
0

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुद्ध त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते.एकवीस वर्षे वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होत

14

‘मुलांनो, सावध !’

10 June 2023
0
0
0

ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टांपैकी एक गोष्ट पुढे देतो.एक लहानसा ओढा होता. उन्हाळ्यात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ.

15

पहिले पुस्तक

10 June 2023
0
0
0

एक अत्यंत गरीब मुलगा होता. तो गरीब होता तरी त्याला शिकण्याची फार इच्छा होती. एक दिवस तो एका शेजारच्या मुलाजवळ खेळत होता. त्या मुलास तो म्हणाला, “मला जर तू अक्षरे वाचावयास शिकवशील तर सहा अक्षरांस एक बै

16

योग्य इलाज

10 June 2023
0
0
0

गोल्डस्मिथ हा इंग्रजी भाषेतील नामांकित कवी अठराव्या शतकात झाला. 'विकार ऑफ वेकफील्ड' ही त्याची कादंबरी व 'ट्रॅव्हलर अॅण्ड डेझर्टेड् व्हिलेज' या त्याच्या कविता जगप्रसिद्ध आहेत. गोल्डस्मिथ हा कवी होता. त

17

चित्रकार टॅव्हर्निअर

10 June 2023
0
0
0

ज्यूलस ट्रॅव्हर्निअर म्हणून अमेरिकेत एक मोठा चित्रकार होऊन गेला. एकदा एका लखपती व्यापाऱ्याने त्याला आपल्या बंगल्याशेजारच्या बागेत बसून समोर देखावा दिसेल त्याचे मोठे चित्र काढण्यास सांगितले. टँव्हर्निअ

18

मरीआईची कहाणी

10 June 2023
0
0
0

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. पाच सुना दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरल्या. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही. रोग नाही, राई नाही. कशा

19

कृतज्ञता

10 June 2023
0
0
0

गंगा नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती. त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटांत एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्ष

20

श्रेष्ठ बळ

10 June 2023
0
0
0

कुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव ह्यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे.देवदूत: प्रभो, या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का? सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात, पण दगड मात्र अभंग राहतो. द

21

समाधीटपणा

10 June 2023
0
0
0

फ्रान्स देशातला फोंतेन म्हणून एक गोष्टीलेखक होऊन गेळा. न्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यांपैकी एक देतो.पॅरिसमध्ये एक तरुण विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करीत होता. तो विद्वान होता, परंतु वक्तृत्व त्याच्या

22

चतुर राजा

10 June 2023
0
0
0

सालोमन म्हणून एक प्राचीन काळी पश्चिमेकडे राजा होऊन गेला. तो शहाणपणाविषयी फार प्रसिद्ध होता. त्याच्या चातुर्याची कीर्ती दुखर पोचली होती. कीर्तीही पंखाशिवाय उडत जात असते. एक दिवस सालोमन आपल्या दरबारात ब

---

एक पुस्तक वाचा