shabd-logo

राजा शुद्धमती

8 June 2023

19 पाहिले 19
आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाट्यास दुःख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दुःखाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत ? मानसिक चिंता कोणास व्यग्र व व्यथित करीत नाहीत ? मरण तर सर्वांनाच प्रासावयास टपले आहे.

जर सर्वच जण या मर्त्य भूमीत दुःखात व विपत्तीत आहेत, तर अशा परिस्थितीत दुसऱ्याने दिलेल्या साहाय्याची किंमत फार थोर आहे. आपल्या विपत्तीत दुसऱ्याने दाखवलेल्या सहानुभूतीची व साहाय्याची जशी आपणास किंमत वाटते, त्याप्रमाणेच दुसरा विपत्तीत पडला असता त्यास आपण जर सहानुभूती दाखविली, त्यास मदत केली तर त्याला किती आनंद होईल ? आपण सुखात असू त्या वेळेस दुःखी दरिद्री लोकांची सेवा आनंदाने आपण केली पाहिजे; परंतु ज्या वेळेस आपण स्वतः दुःखात असू त्या वेळेसही आपले दुःख दूर सारून दुसऱ्याच्या दुःखाच्या दूरीकरणार्थं आपण धावून जावे.

आपल्या या परमपूज्य भरतखंडात दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे व ते दुःख दूर करण्याकरिता झटणारे, प्रसंगी प्राणदान करणारे असे थोर महात्मे कितीतरी होऊन गेले आहेत. अशाच एका थोर राजाची गोष्ट आज मी सांगणार आहे.

फार प्राचीन काळी आपल्या देशात शुद्धमती म्हणून एक राजा होऊन गेला. हा राजा दयाळू व उदार होता. लहानपणापासून त्याचे मन कोमल होते. हृदय हळूवार होते. लहानपणी मृगया करण्यास त्याने जाऊ नये, कारण कोमल हरणांचे बाणविद्ध देह पाहून त्याचे स्वतःचे पंचप्राण कासावीस होत. झाडांचे पल्लव त्याने खुडू नयेत, पुष्पे त्याने तोडू नयेत, का ? तर त्यांस दुःख होईल म्हणून ! लहानपणापासून अशी ही त्याची वृत्ती. हाताखालच्या नोकरमंडळींचे मन कठोर शब्दांनी तो कधी दुखवीत नसे. कठोर शब्द बोलणे म्हणजे देवाघरी पातक केले असे होईल असे तो म्हणे.

राजपदप्राप्ती झाल्यावर राजाच्या उदारपणाची सर्वत्र ख्यांती झाली. त्याच्या औदार्यांची सर्व मुक्तकंठाने स्तुती करू लागले. त्याचा यशपरिमल दशदिशांत भरून राहिला. जो दुसऱ्याच्या दुःखाने खिन्न होतो. जो गरिबांचा कैवार घेतो, अनाथांचा जो आधार, अशाच्या गुणांचे संकीर्तन विश्वजन का करणार नाहीत ? अशा थोर पुरुपास दुनिया दुवा का देणार नाही ?

राजा गोरगरिबांस सर्व प्रकारची भिक्षा वाटीत असे. हे काम तो आपल्या हाताखालच्या लोकांस सांगत असे. देणग्या वगैरे देण्याचे काम तो जातीने करी. कोणीही अतिथी त्याच्या दारातून विन्मुख होऊन परत गेला नाही. तो स्वतः भिक्षागृहात जाई व तेथे कोणी अनाथ निराश्रित नाही अशी खात्री करुन घेई.

एके दिवशी सकाळी राजा उठला व आपल्या प्रजेसाठी आपणास जास्तीत जास्त काय करता येईल या गोष्टीचा विचार करीत होता. दुसऱ्यास सुख देण्याचा विचारही किती सुखप्रद व उन्नतिकर असतो ! विचार करता करता राजा मनात म्हणाला, “मी गोरगरिबांस काही धनधान्य देतो यात विशेषसे काय करितो ? सोने, चांदी, वस्त्रप्रावरण या बाह्य वस्तुच मी आजपर्यंत देत आलो. माझे स्वतःचे असे मी काय दिले आहे ? हा देह माझा आहे. हा देह जर मला देता येईल, तर खरोखर मी माझे काही दिले असे म्हणता येईल. माझ्या प्रजेवर माझे जे अलोट प्रेम आहे ते दर्शित करण्यासाठी मी माझे प्राण देण्यास तयार असले पाहिजे. आज ज्या वेळेस मी भिक्षागृहात जाईन त्या वेळेस एखादा दीनदुबळा माणूस जर मला म्हणेल, 'महाराज, आपले काळीज मला कापून द्या.' तर मी आपले काळीज भाल्याच्या टोकाने कापून काढीन व एखाद्या शांत सरोवरातून कमळ खुडून आणून देवावर वाहावे त्याप्रमाणे माझे हृदयकमल त्या याचकाच्या पदरी मी अर्पण करीन! आज जर कोणी माझे रक्त व मांस मागेल तर मी आनंदाने देईन. 'माझे काम करण्यास कोणी नाही' अशी रड जर माझ्याजवळ कोणी गाईल तर मी त्यास साहाय्य करण्यास माझे सिंहासन सोडून जाईन. देवाने दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे जे हे दोन डोळे तेही जर एखाद्याने मागितले तर वृक्षावरची दोन फुले तोडून द्यावी. त्याप्रमाणे ही माझी नेत्रपुष्पे मी त्या याचकास देईन. माझ्या देहाचा अशा प्रकारे उपयोग करण्यास जर मला संधी मिळेल तर मला किती आनंद होईल!”

राजाचे मन प्रजेवरील प्रेमाने आज भरून आले होते. तो शुचिर्भूत झाला. त्याने स्नान केले. शृंगारलेल्या हत्तीवर बसून तो भिक्षागृहाकडे गेला. राजाच्या प्रशांत भालप्रदेशावर आज अलौकिक तेज दिसत होते. त्याच्या नेत्रद्वयात प्रेमाची मंदाकिनी अवतरली होती. त्याच्या ओठावर फारच मृदू व रमणीय हास्य विलसत होते.

भगवान कैलासपती शंकर यांच्या मनात राजाचे आज सत्व पाहावे असे आले. त्या राजाचा आज प्रात:काळचा निश्चय कमोटीस लावून पाहण्याचे शंकरांनी ठरविले. राजाचा हा खरा निश्चय आहे, की मनात हजारो सुंदर निश्चय येतात व मावळतात, तसेच हे लहरी विचार आहेत, हे भगवंतास पाहावयाचे होते. शंकरांनी पार्वतीस आपला मनोदय कळविला तेव्हा भक्तवत्सल पार्वती म्हणाली, “प्राणप्रिया, असे कठोर वर्तन करू नये. आजपर्यंत अनेक भक्तांचा आपण अमानुष छळ केला. माझे मन त्या त्या वेळी कसे तिळतिळ तुटले. श्रियाळ, चांगुणा यास तुम्ही किती बरे छळले होते ? भक्तमणीचा असा छळ करणे आपणांस उचित नव्हे. "

भगवान शंकर म्हणाले, “वेडीच आहेस तू ! अग सोने कसोटीस लावल्यावर मगच ते जवळ ठेवता येते. भट्टीत घालून सोने झगझगीत निघाले तरच त्यास मोल चढते. परीक्षा पाहिल्याशिवाय वस्तू घेतली व मागून फसलो तर आपल्यासारखे मूर्ख कोणीच नाही ! भक्तांचा मी छळ करतो. परंतु मागून मी त्यांचा बंदा गुलाम होतो. अक्षय त्यांचा ऋणी राहतो. वा कसल्याही आघातांचा वारा मी त्यास लागू देत नाही."

पार्वतीची समजूत घालून मृत्युंजयाची स्वारी मर्त्यलोकी येण्यास निघाली. शंकरांनी एका कुश्वळ अंध अतिथीचा वेष धारण केला आणि काठी टेकीत टेकीत व रस्ता विचारीत राजाच्या भिक्षागृहाजवळ ते पोचले.

अंध ब्राह्मणाम राजाने हात धरून सिंहासनावर बसविले, मग हात जोडून राजा म्हणाला, “भगवान, किमर्थं येणे झाले? आपली काय वांछा आहे कृपा

करून सांगावी. आपछे मनोरथ पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभेल का ?"

अंध ब्राह्मण राजास म्हणाला, “हे थोर कीर्तिमान राजा, या विस्तीर्ण पृथ्वीतलावर असे एकही स्थळ नाही, की जेथे तुझ्या थोर सदय अंत:- करणाची कीर्ती पसरलेली नाही. राजा, सांगू नये पण सांगतो; मागू नये पण मागतो. मी तरी काय करू ? गरजवंतास अक्कल नसते. राजा, मी आंधळा आहे, या पृथ्वीवरचे व वरील गगनातील ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्य मी कधी पाहिले नाही. नद्या, झरे, उत्तुंग पर्वत, रमणीय वनराजी, चंद्रसूर्य, नील नभाचा चांदवा, त्यातील लक्षावधी लुकल्लकणारे तारे-या सर्वांचे वर्णन मी कानांनी ऐकतो, पण दृष्टीने पाहण्याचे भाग्य माझ्या नशिबी नाही. राजा मी आंधळा आहे. तू आजपर्यंत या विश्वाची सौंदर्यशोभा पाहण्याची संधी मला तू देशील काय ? राजा, तू आपला एक डोळा मला दे, म्हणजे आपले दोघांचेही काम होईल.

आपल्या मनात सकाळी जे विचार आले, त्याची परिपूर्णता इतक्या लवकर होईल असे राजाला वाटले नव्हते. राजास फार आनंद झाला. अंतःकरणात झालेला आनंद बाहेर व्यक्त न करता राजा म्हणाला, “हे विप्रवरा, तुम्हाला या भिक्षागृहात मजकडे येण्यास कोणी सांगितले ? मनुष्याजवळ जी अत्यंत मौल्यवान् वस्तू आहे तीच तर तुम्ही मजजवळ मागत आहात; परंतु हे पाहा, ती वस्तू देणे कठीण आहे असे नाही तुम्हांस वाटत?”

 त्या अंध ब्राह्मणाने उत्तर दिले, “स्वप्नात परमेश्वराने येऊन तुजकडे येण्यास मला सांगितले, म्हणून मी आलो; तू देत नसशील व तुला कष्ट वाटत असतील तर मी आल्या वाटेने परत जातो.”

राजा म्हणाला, “आपली विनंती मी आनंदाने मान्य करतो. आपण एकच डोळा मागता, परंतु मी दोन्हीही देण्यास तयार आहे.”

राजा अंध ब्राह्मणास आपले सुंदर डोळे काढून देणार ही वार्ता सर्व नगरात लौकरच पसरली. राजाला या वेड्या निश्चयापासून परावृत्त करावे या हेतूने सेनापती व दुसरे अधिकारी राजाकडे आले. हजारो नगरवासी तेथे जमा झाले. ते राजास म्हणाले, “महाराज, कोणत्याही गोष्टीस मर्यादा असते. औदार्यासही काही सीमा आहे. द्रव्य, रत्ने, माणिकमोत्यांच्या राशी, भरजरी वस्त्रांनी व मोलवान अलंकारांनी शृंगारलेले हत्ती, वायुवेगाचे वारू, हे सर्व काही ब्राह्मणास द्या पाहिजे तर; परंतु आपण आपले हे सुंदर कमलसम डोळे देता हे काय ? महाराज, हा थोडा अविचार नाही का होत ?"

राजा म्हणाला, “प्रिय प्रजाजनहो व माझ्या मंत्र्यांनो, आपण हे सर्व सांगता हे माझ्यावरील अंधप्रेमामुळे सांगता. परंतु थोडा विचार करून पाहा बरे! शरीर हे नाशवंत आहे. निश्चयासाठी, स्वतःच्या वचनासाठी जो शरीरावर पाणी सोडतो, तो इंद्रालाही पूज्य होतो. तो निश्र्चय पवित्र असला म्हणजे झाले. दानासारखे महापुण्य दुसरे कोणते आहे ? या ब्राह्मणास जे सुख आजपावेतो मिळाले नाही व जे मी आजपर्यंत उपभोगिले, मनमुराद उपभोगिले, ते सुख या ब्राह्मणास आता देण्याची सुसंधी प्राप्त झाली यात वाईट वाटण्यासारखे काही नसून उलट ही आनंदाची पर्वणी आहे. नश्वर शरीर देऊन चिरंतन टिकणारी सत्कीर्ती व पुण्य यांची जोड होत असेल तर त्यात अयथार्थ व अविचाराचे असे काय आहे ? दधीची ऋषीने आपली स्वतःची हाडे विश्वाचा त्रास जावा म्हणून नाही का इंद्राच्या हवाली केली ? श्रियाळाने पोटचा गोळा दिला, शिबी राजाने मांडीचे मांस हसत कापून दिले, मयूरध्वज राजाने आपले अर्धांग करवतीने करवतून दिले, जीमूतवाहन राजाने नागांचा प्रतिपाल करण्यासाठी गरुडास आपला देह दिला. थोरामोठ्यांची ही उदाहरणे माझ्यासमोर आहेत. शरीर हे मृण्मय आहे; मातीचे शरीर मातीत आज ना उद्या जाणार; हे कमलपुष्पांप्रमाणे असलेले डोळे आणखी थोड्या दिवसांनी लोळ्यागोळ्याप्रमाणे होतील. शरीराचे सौंदर्य व या इंद्रियांची शक्ती ही क्षणिक आहेत. यांचा मोह कशाला धरावा ? धर्म हा सत्य व शाश्वत आहे. शाश्वत धर्माचा संग्रह करण्यासाठी मी अशाश्वत देऊन टाकीत आहे, यात वेडेपणा का आहे ? सांगा.” राजाचे हे उदात्त भाषण ऐकून सर्व विस्मित झाले. नारीनर रडू लागले; त्यांच्या डोळ्यांत अश्रु आले.

राजास पुन्हा एकदा त्याचे मंत्री म्हणाले, “राजा, तू हे सर्व

कशासाठी करतोस? आपल्या जीविताकरिता, सौंदर्याकरिता, शक्तीकरता,

कीर्तीकरिता ? तुझा हेतू तरी काय ?? राजा म्हणाला, “ह्यांपैकी कशासाठीही नाही. हे सर्व दान करून जो एक

सात्विक आनंद मिळतो, त्यासाठी मी हे करण्यास उद्युक्त आहे."

राजाच्या शस्त्रवैद्यास बोलविण्यात आले. त्या शस्त्रवैद्यांचे हात ते कर्म करण्यास धजेनात. परंतु करणार काय ? मोठ्या कष्टाने त्याने राजाचा एक कमलनेत्र काढला. राजाने तो डोळा ब्राह्मणाच्या खाचेत बसविण्यास सांगितले. एखाद्या नीलोत्पलाप्रमाणे तो डोळा ब्राह्मणास लागला. दुसऱ्या डोळ्याने त्या याचकाकडे पाहून राजा म्हणाला, “आपणांस माझा डोळा फारच सुंदर दिसतो; दुसरा डोळा पण तुम्ही ध्याच. " राजाने दुसरा डोळा पण ब्राह्मणास दिला. राजाच्या खाचा रक्ताने भरून गेल्या व ब्राह्मणाच्या मुखमंडलावर ते सुंदर विशाल डोळे दोन ताऱ्यांप्रमाणे शोभू लागले.

राजाचे चर्मचक्षू गेले, पण ज्ञानचक्षू त्यास मिळाले. त्या राजाच्या अंतःकरणात डोकावून पाहा. परमेश्वरकृपेने त्यास दिव्यज्ञान झाले. त्याच्या अंतरी ज्ञानदिवा प्रशांतपणे प्रकाशू लागला. ज्या दृष्टीने केवळ सत्य दिसते, अशी दैवी दृष्टी देवाने त्यास दिली. त्या राजाने पुढे काही वर्षे न्यायाने व नीतीने राज्य केले आणि लोक त्याच्यापासून जगात कसे राहावे, परमेश्वर कसा मिळवावा, हे शिकते झाले.

थोर लोक दुसऱ्याचे दुःख स्वप्राणत्यागानेही दूर करण्यास मागेपुढे पाहात नाहीत, असा हा भारतवर्ष होता. हाच मनाचा थोरपणा आज भारतवर्षात कितपत दृष्टीस पडतो ? आपण पैशाने गरीब झालो आहोतच: आता मनाची श्रीमंती, हृदयाचीही श्रीमंती, ती पण आपण गमावून बसत आहो का ? प्रत्येकाने विचार करून पाहावे झाले.

22
Articles
अमोल गोष्टी
0.0
संस्कारक्षम अश्या लहान वयातच मुलांना नैतिक शिकवण देणाऱ्या थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगितल्या तर मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास त्या नक्कीच मदत करतात. साने गुरुजींनी लिहिलेले अमोल गोष्टी हे पुस्तक असंच असून साध्या सोप्या भाषेमुळे व त्यातील नितीगुणांमुळे त्या गोष्टी मुलांनी जरूर वाचाव्यात. हा अमोल खजिना खरोखर मूल्यशिक्षण घडविणाराच आहे.
1

गुणांचा गौरव

8 June 2023
2
0
0

ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुद्धा शूद्र वगैरे ईश्वरानेच

2

राजा शुद्धमती

8 June 2023
1
0
0

आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाट्यास दुःख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दुःखाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत ?

3

मातेची आशा

8 June 2023
0
0
0

त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व संगले होती. परंतु आज काय आहे ? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोड

4

किसन

8 June 2023
0
0
0

एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिनाऱ्यावर शिंपा- कवड्याची संपत्ती किती तरी विखुरलेली असे. किनाऱ्यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प

5

स्वतंत्रतादेवीची कहाणी

8 June 2023
0
0
0

आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाऱ्यायला काही कमी नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे

6

अब्बूखाँकी बकरी

8 June 2023
0
0
0

हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे.आ

7

आई, मी तुला आवडेन का ?

8 June 2023
0
0
0

“माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारट्यास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंडासारखा फुगला आहे! आवदसा आठवली आहे मेल्याला! पुण्यास दिवे लावून आले पळपुटेराव, आता येथे आईशीला गांजावया

8

राम-रहीम

10 June 2023
0
0
0

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, काँग्रेस म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बर

9

समाजाचे प्राण

10 June 2023
0
0
0

ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार ? गार वारा वाहत

10

तरी आईच !

10 June 2023
0
0
0

एक गरीब विधवा होती. तिचा एकुलता एक मुलगा होता. त्या मायलेकरांचे उभयांवर फार प्रेम. एकमेकांवर विसंबत नसत. तो मुलगा लहानाचा मोठा झाला. तो आता तारुण्यात आला. तो एका तरुणीच्या नादी लागला. तिच्या नादी लागू

11

खरा सुगंध

10 June 2023
0
0
0

गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात- फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण देणे, आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होत

12

सत्य केव्हा तरी बाहेर येतेच

10 June 2023
0
0
0

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आतां आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या ड

13

वृद्ध आणि बेटा

10 June 2023
0
0
0

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुद्ध त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते.एकवीस वर्षे वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होत

14

‘मुलांनो, सावध !’

10 June 2023
0
0
0

ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टांपैकी एक गोष्ट पुढे देतो.एक लहानसा ओढा होता. उन्हाळ्यात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ.

15

पहिले पुस्तक

10 June 2023
0
0
0

एक अत्यंत गरीब मुलगा होता. तो गरीब होता तरी त्याला शिकण्याची फार इच्छा होती. एक दिवस तो एका शेजारच्या मुलाजवळ खेळत होता. त्या मुलास तो म्हणाला, “मला जर तू अक्षरे वाचावयास शिकवशील तर सहा अक्षरांस एक बै

16

योग्य इलाज

10 June 2023
0
0
0

गोल्डस्मिथ हा इंग्रजी भाषेतील नामांकित कवी अठराव्या शतकात झाला. 'विकार ऑफ वेकफील्ड' ही त्याची कादंबरी व 'ट्रॅव्हलर अॅण्ड डेझर्टेड् व्हिलेज' या त्याच्या कविता जगप्रसिद्ध आहेत. गोल्डस्मिथ हा कवी होता. त

17

चित्रकार टॅव्हर्निअर

10 June 2023
0
0
0

ज्यूलस ट्रॅव्हर्निअर म्हणून अमेरिकेत एक मोठा चित्रकार होऊन गेला. एकदा एका लखपती व्यापाऱ्याने त्याला आपल्या बंगल्याशेजारच्या बागेत बसून समोर देखावा दिसेल त्याचे मोठे चित्र काढण्यास सांगितले. टँव्हर्निअ

18

मरीआईची कहाणी

10 June 2023
0
0
0

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. पाच सुना दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरल्या. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही. रोग नाही, राई नाही. कशा

19

कृतज्ञता

10 June 2023
0
0
0

गंगा नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती. त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटांत एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्ष

20

श्रेष्ठ बळ

10 June 2023
0
0
0

कुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव ह्यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे.देवदूत: प्रभो, या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का? सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात, पण दगड मात्र अभंग राहतो. द

21

समाधीटपणा

10 June 2023
0
0
0

फ्रान्स देशातला फोंतेन म्हणून एक गोष्टीलेखक होऊन गेळा. न्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यांपैकी एक देतो.पॅरिसमध्ये एक तरुण विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करीत होता. तो विद्वान होता, परंतु वक्तृत्व त्याच्या

22

चतुर राजा

10 June 2023
0
0
0

सालोमन म्हणून एक प्राचीन काळी पश्चिमेकडे राजा होऊन गेला. तो शहाणपणाविषयी फार प्रसिद्ध होता. त्याच्या चातुर्याची कीर्ती दुखर पोचली होती. कीर्तीही पंखाशिवाय उडत जात असते. एक दिवस सालोमन आपल्या दरबारात ब

---

एक पुस्तक वाचा