shabd-logo

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023

62 पाहिले 62
कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अंगाला ओधकारे भरणारी काटेरी झुडपे दूरपणामुळे त्या हिरवळीखाली दडून बसतात; हीच रमणीयता पुढच्या वाटेवरही पसरलेली दिसते, पण उलटपक्षी, पायाखालच्या वाटेवरचा मात्र वाईटपणाच जाणवतो. आणि त्याला शोभविणारी हिरवळ आपल्या डोक्याच्या वरकल्पनेच्या आटोक्याबाहेर असते. लीले. हीच गोष्ट आयुष्याच्या प्रवासाची! भूतकालाची रमणीयता वाटते ती याचमुळे आणखी याचमुळे भविष्याची आशा सुटत नाही! वर्तमानाचा वाईटपणा दूर लोटून द्यावयाची ताकद आपण अगी आणली पाहिजे.

लीला : तुमच्याच दृष्टांताप्रमाणे पाहिले तरी बाळपणाचे मोठेपण तिळमात्र कमी होत नाही, प्रवासाचे सारे टप्पे सारखेच त्रासदायक असले तरी सुरुवातीच्या दुपारीमुळे बाळपणाचा टप्पा तितका अवघड वाटत नाही; शिवाय त्यावरून खाली पडले तरी फार लागण्याचे भय नाही. वाढत्या वयाच्या प्रवासाबरोबर पडण्याची भीतीही उंचावत जाते. बाळपणी सुखदुःखाचे चक्र सारखे फिरते खरे, पण त्याच कारणामुळे त्याची तीव्रताही क्षणिकच भासते ती मुले पाहा: आजच्या सुखदुःखाच्या त्याच्या कल्पना रात्री झोपत थकव्याबरोबर विरून जातील; उद्याचे जग निराळे उद्याच्या आशा निराशा निराळ्या! वा-याच्या प्रत्येक लहरीसरशी सृष्टीदेवीच्या प्रत्येक श्वास-निश्वासासरशी बालमनाच्या सुखदुःखाची हालचाल बदलते! तेच आपले मन पहा! एकेक विचाराचे ओझे अगदी जन्मभर वागवावे लागते! कमलाकर, ही मुले आपल्याच लहानपणाच्या खेळगड्यांची ही हालचाल करणारी, हुबेहुब त्यांच्यासारखीच दिसणार चित्रे सारखे पहात बसले म्हणजे आपल्या बाळपणाचाच काळ अजून चालला आहे सृष्टी सर्वकाळ एकरूपच आहे असे वाटायला लागते. कमलाकर, सृष्टीच्या या कायमच्या

चित्रपटावर आपली नाही तुमचीही जमा आमच्यातच कशाला करू? देव तुमचा तरी संसार यशस्वी करो- पण कमलाकर, आमची चित्रे ठेविल्यावाचूनच आम्ही मी म्हणा. जयंत म्हणा, सुशीलाताई म्हणा सारखी काळाच्या ओघात वाहत चाललो आहोत! अहाहा! एकेकदा मनात येते की, बाळपणाचाच सारखा ध्यास करून मनाने तसेच शरीराने पण वालरूप व्हावे आणि या मुलात मिसळून आमच्या पुसलेल्या प्रतिमा कायमच्या कायापटावर पुन्हा लिहून काढाव्या। कमलाकर, तुम्हाला नाही असे वाटत? कमलाकर मुळीच नाही. लीलावती, तारुण्यात तुझी, तुम्हा सर्वांचीच निराशा झाली झाली कसची? पापपुण्याच्या नसत्या कल्पनेने तुम्हीच करून घेतली! म्हणून या वयातल्या सुखोपभोगाला लागणारा वेळ ते सुख नसल्यामुळे तुम्हाला जड झाला आहे; आणि या रिकामटेकड्या वेळात तुम्ही बाळपणाच्या वेड्यावाकड्या मूर्खपणाला सुख मानू लागला! लीले, तारुण्याच्या सुखाची तुला कल्पना नाही लहानणी तू चांगली दिसत होतीस, त्या वेळी मी तुला हजारदा पाहिली पण आजच्या दृष्टीने तुझ्याकडे पाहण्याची शक्ति त्या कोवळ्या कमलाकरच्या अगी नव्हती लीलावती, पापपुण्याच्या, देवाधर्माच्या कल्पना- लीले, हा पहा तुझा हात धरून तुला सुखाच्या मंदिरात नेऊन सोडतो, (तिचा एकदम हात धरतो) है. लीलावती, एकदम ओरडू नकोस, मी तुझा गुलाम आहे लीले, तुझी पायधरणी करण्याऐवजी एकदम हात धरिला त्याची क्षमा असा हात सोडवू नकोस!

लीला कमलाकर

कमलाकर तुझा हात सोडून हे तुझे पाय चरितो. (तिचे पाय धरितो तुझ्या तोंडातून मोठयाने एक शब्द निघाल्याबरोबर सारी माणसे जमून मी सातळाला जाईन हे मला माहीत आहे पण तुझ्यावर विश्वास ठेवून मी आपले प्राण तुझ्या हाती दिले आहेत. लीले, मला तारणार किंवा मारणार तूच आहेस लावण्यलतिके, विचार कर, दूर गेलेल्या सूर्याच्याच वैभवाने रंगलेल्या या सोनेरी ढगाकडे पहा, या नुकत्या उगवणा-या चादण्यांकडे पहा पूर्वेकडे तोंड काढणा-या त्या चंद्राकडे पहा! ही संच्या आपल्या मृत पतीच्या वैभवाची, या ढगाच्या आणि तारांच्या सोन्यामोत्याची रास पसरून त्या चंद्राला भुलविण्यासाठी नटून बसली आहे लीले सृष्टीला पापपुण्याच्या कल्पना मान्य नाहीत! दर महिन्याला सत्तावीस तारांची घरे घुडाळणा-या चंद्राची साक्ष घे सारी सृष्टी हेच सांगते लीले, नसत्या कल्पनेने माझा तिरस्कार-

लीला तुझा तिरस्कार तुझ्या छायेचा तुझ्याबद्दल कल्पनेचा सुध्दा तिरस्कार येईल: ऊठ, सोड पाया नाही सोडत पाय ओरडू मोठ्याने? -

कमलाकर नको झाली ही आगळीक केवळ चुकून अगदी क्षणिक आवेशामुळे! नीले, तुझ्या उदारतेची, तुझ्या पवित्रतेची तेजस्विता

क्षणभर कामाच झालेल्या या माझ्या पापी डोळयांना दिसली नाही म्हणूनच तुझा असा उपमर्द माझ्या हातून झाला! पण लीले, माझे प्राण

तुझ्या हाती आहेत. माझ्या हातून चुकून झालेल्या या भयंकर अपराधाचा कोणाजवळ उच्चार करणार नाही असे मला आश्वासन दे त्याखेरीज

मी तुझे पाय सोडणार नाही! तुझ्या विलक्षण तेजाने मी दिडमूढ झाली आहे!

लीला उठा! या गोष्टीचा कुठेही बचा न करण्याचे हे घ्या मी तुम्हाला वचन देते..

कमलाकर नको तुझ्या हाताला पुन्हा स्पर्श करण्याची माझी योग्यता नाही! तुझ्या नुसत्या शब्दावर माझा विश्वास आहे. तुझे प धरण्याचीच माझी योग्यता आहे!

लीला उठा, या अमृतेश्वराची शपथ घेऊन सांगते की, या जन्मी ही गोष्ट मी कोणाजवळ बोलणार नाही!

कमलाकर अहाहा! लीले धन्य आहे तुझी पापात पडणा-या माझ्या आत्म्याचा आज तू उध्दार केलासा माझ्या आयुष्याला आज तू नवीन

दिशा दाखवलीस! कमलाकरचा आज नवीन जन्म झाला! तूच हा नवा जन्म देणारी माता। लीले, या चुकलेल्या लेकराला नीट मार्गाला लावा

लीला यात मी काय केले? कमलाकर याबद्दल त्या अमृतेश्वराचे उपकार माना! त्याच्याजवळ चांगली बुध्दी मागा! तुमच्या मघाच्या घाणेरड्या कल्पना कमलाकर तुझ्या स्पर्शाने पावन झालेल्या देहात कशा राहतील? लीले. देवाबद्दल माझे विचार अशा त-हेने व्हावयाला आधी तूच कारण झालीस! आणि आज माझा उध्दार व्हावयाला कारणही तूच झालीसा लहानपणी तू आणि जयंत एकमनाने ज्या ज्या गोष्टी करीत आला त्या त्या गोष्टींचा मी तिरस्कार करायला शिकत आलो! तुम्ही मला नेहमी एकीकडे टाकीत होता म्हणूनच मी असा पतित झालो! तुमची देवाबद्दलची निष्ठा वाढत गेली तसा माझा तिरस्कार वाढत गेला! पण आज तू मला देवाची साक्ष पटवून दिलीस! ज्या देवाच्या कृपेने तुझ्या अंगी इतके प्रखर तेज आले, तो देव-लीले, मला सुमार्गाला लावणा-या देवतेचा देव मला पूज्या कसा नसेल?

लीला कमलाकर चला, झाले ते झाले. आजपर्यंतच्या जयताच्या कृतीचा तुम्ही तिरस्कार केला, आता तिचे अनुकरण करा! त्यांच्या मनोनिग्रह, त्याची उदार पुण्याशीलता, त्याची उदार विचारशीलता, त्याची उदार विचारशिलता डोळ्यांसमोर ठेवून यापूढे वागत चला

कमलाकर : (तुळशीवृंदावनातल्या महादेवावर हात ठेवून) व कैलासनाथाची शपथ घेऊन सांगतो की, तुझी आज्ञा मला शिरसामान्य आहे. लीले, जा तू आता. आजपर्यंत मनात आलेल्या नास्तिक कल्पनाचे, आताच्या अमंगल पापविचारांचे, क्षालन करण्यासाठी मी आज मोकळ्या मनाने त्या भगवताजवळ प्रथमच क्षमा मागणार आहे! घटकाभर हृदय मोकळे करून मला या मूर्तीला अश्रूचा अभिषेक करू दे लीलावती. या पाषाण हृदयातून वाहणा-या अश्रूच्या गंगेत ही पाषाणमूर्ती सुद्धा विरघळून टाकल्याखेरीज मी इथून हालणार नाही. (एकाग्र दृष्टीने देवाकडे पाहता राहतो. लीला जाते)
कमलाकर (एकदम उठून) उठा, कैलासनाथ, या नदीच्या तळातल्या गाळात बुडी मारून खरोखरीच कैलासवासी व्हा (देव नदीत झुगारतो.)) माझा, माझ्या छायेचा. माझ्याबद्दलच्या कल्पनेचा सुद्धा तिरस्कार आ! आकाशातल्या दिवटयानो पाहिलात आजचा हा नाटकी प्रकार? लौकरच या नाटकाचा शेवटचा अंक तुम्हाला दिसेला जयंताचा मनोनिग्रह, त्याची पुण्यशीलता- लीले, तुम्हा सर्वांची पुण्याशीलता मला चांगली समजते! जयतासाठी रात्रंदिवस झरणा-या या छबकडीने मला नीतिपाठ शिकवावे काय? इतका मी मूर्ख नाही! नीतीचे फाजील डावपेच मी ओळखून आहे! ठीक आहे, तुमची नीतिमत्ता पायाखाली तुडवून तुमच्या चोरट्या सुखाची राखरांगोळी करीन तरच नावाचा कमलाकर! मनोरमेचा जयंताला शह लावून त्याला सळो का पळोसे केले म्हणजे आपोआप तो या पोरीच्या पायाशी लोळण घेईल हळूहळू यांच्या पायाला पाय फुटून ते चारचौघात रंगू लागले म्हणजे लीले, तुला एखाद्या बाजारबसवीच्या पायरीवर नेऊन बसवायला कितीसा उशीर लागणार? इकडे मनोरमेला, केवळ ती जयताची लग्नाची बायको. एवढ्यासाठीत फसवून तिचे धिंडवडे काढतो आणि जयत्ताच्या तोंडाला काळे फसतो आणि नंतर सुशीलेचा समाचार खवळलेल्या पदमाकराने सुशीलेला घरातून दरवडा घालून पळविण्याचा घाट घातला आहे आणि त्या बाबतीत माझ्या साह्याबद्दल त्याने दहा हजार रुपये देऊ केलेच आहेत! ठीक आहे. दहा हजारांचा सुशीलेच्या पातिव्रत्याचा सौदा काही वावगा नाही! लीले, या दुखवलेल्या सापाचा डाव किती भयंकर असतो याची तुला लौकरच ओळख पटेल! (जातो)

(सुशीला निजली आहे विद्याधर भीत भीत प्रवेश करतो)

विद्याधर परमेश्वरा, या साहसात मला यश देऊ नकोस! माझ्या या साहसी हेतूला ही वेळ आणि त्याचा विषय किती तरी प्रतिकूल आहेत बाहेर शीतरश्मी निशापतीने आपल्या अमृतवर्षी कोमल किरणानी या भूतलावर चंद्रिकेचा पाऊस पाडून अंतराळाला दुग्धवर्णाची शोभा आणिली आहे. या उरफाटय दुग्धसमुद्राचा नीलवर्ण तळाशी मंदतेजोमय तारकामौक्तिके विरल पसरली आहेत! या पुण्यखानाने आनंदलेली भूदेवी मदवायूच्या रूपाने वाहणा-या समाधानाच्या निश्वासाबरोबर गगनमंडलात पुष्पराग उधळीत आहे. पुण्यवंताच्या निकट सहवासाने पापवृत्तीसुद्धा पुष्कळशी मावळून जाते, त्याप्रमाणे छायारूपाने वृक्षाखाली दडून बसलेल्या मूळच्या काळ्याकुट्ट अंधाराला सुद्धा या चांदण्याच्या निकटवर्ती प्रभावाने किती तरी उजाळा आला आहे! सजीव सृष्टीच्या शांतवृत्तीमुळे चंद्रिकेत हा सौम्य, शांत, स्पष्ट दुग्गोच्चार होणारा शहराचा भाग पहात असताना, सृष्टीच्या सत्यतेचा विसर पडून, दुर्बिणीतून एखाद्या चित्रातला देखावा मी पहात आहे असे वाटते! आणि चंद्रिका म्हणजे रवितेजाचे चित्रात उतरलेले, मद आणि दृष्टीसुसह रूपच नाही तर काय? या देखाव्यात पुण्यशील सुशीला तर मूर्तिमत शांतिदेवीय शोभते आहे. अहाहा! किती अलौकिक शोभा, मनोहर लावण्य, तेजोमय पवित्रता, गंभीर वृत्ती ही! या शात, पवित्र आणि रम्य चित्राकडे पाहून मला काश्मिरची, त्या रमणीय झेलम नदीची, आणि तिच्या भोवतालच्या गुलाबाच्या ताटव्यांची आठवण होते! हिंदुस्थानच्या नंदनवनातल्या त्या मंदाकिनीच्या झेलम नदीच्या दुतर्फा पसरलेल्या त्या गुलाबी गालिच्यावर जर ही शातिसुंदरी निजवली तर वेडावलेल्या कवींना तरी शारदादर्शनाचा भास होईल आणि झेलम नदीचा रमणीय प्रवाह कवितेचा मूर्तिमंत ओघच वाटेल. अहाहा! हे दर्शनसुख चिरकाल लाभेल काय? जगदीश्वरा, कधी काळी सृष्टीचा लय करण्याचा तुझा खरोखर हेतु असेल तर तो आताच या स्थितीत कर. आणि माझी दृष्टीची शक्ती मात्र जिवत ठेव अथवा ही पूर्वेकडची खिडकी उघडती म्हणजे चंद्राला हिच्या मुखमंडलाचे पूर्ण दर्शन मिळून मोहोने तो येथेच थांबेल आणि ही सुखमय रात्र अशीच चालू राहील पण नको; अशा रितीने काळाला फसविण्याच्या प्रयत्नापेक्षा अधिक सुख देणा-या या सुखमूर्तीलाच मोह पाडण्याचा प्रयत्न करावा हिला स्पर्श करू का? नको, माझ्या नुसत्या उष्ण निश्वासाने सुद्धा ही शांतिदेवता जागी होईल. सुशीले- (सुशीला उठून उभी राहते)

'सुशीला कोण विद्याधर?

विद्याधर सुशीलाबाई, अशा अकल्पित स्थितीत मला पाहून तुम्ही भ्याला नाही किंवा ओरडला नाही, यावरून आताच मी तुम्हाला शांतीदेवता म्हटले त्याची तुम्ही सार्थकता केलीत. आणि त्यावरून माझ्या विनंतीचा विचार सुद्धा तुम्ही शांत मनाने कराल अशी मला आशा वाटू लागली आहे!

सुशीला कोण विद्याधर?

विद्याधर सुशीलाबाई, अशा अकल्पित स्थिती मला पाहून तुम्ही भ्याला नाही किंवा ओरडला नाही, यावरून आताच मी तुम्हाला शांतीदेवता म्हटले त्याची तुम्ही सार्थकता केलीत आणि त्यावरून माझ्या विनंतीचा विचार सुद्धा तुम्ही शांत मनाने कराल अशी मला आशा वाटू लागली

आहे! सुशीला एकंदर प्रकारावरून मला तुमचा हेतु अधमुच कळून चुकून तुमच्याबद्दल तिरस्कार मात्र वाटतो! पण यात भिण्याचे किंवा ओरडण्याचे कारणच नाही! आत्मविश्वास हेच संरक्षणाचे साधन आहे! उत्कट पातिव्रत्याच्या अलोट शक्तीवर माझा फारच भरवसा आहे.

पापाचे पारिपत्य करण्यासाठी अणूरेणूत भरून उरलेला परमेश्वर, पतिव्रतेचा पाठिराखा असतो! शिवाय त्यांच्या आत्मा- या निशिगंधाच्या

सुवासात मिसळून चंद्रकिरणावर तरंगणारा, माझ्या नावांचा अदृश्य आत्मा-माझ्याभोवती नेहमी पहारा करीत असतो! तेव्हा मला

भिण्याचे कारणच नाही तसेच, अगदी बिकट प्रसंग आल्याखेरीज चारचौघांना जमवून बाजार भरविण्याचाही मला कंटाळा आहे बरे, तुमची

कोणती विनंती आहे?

विद्याधर : पण आधी हे सांगा, की तुमच्याशी बोलत बसायला काही भय नाही ना?

सुशीला भय, संशय ही सारी पापाची भावडे आहेता माझ्या शालाबद्दल सर्वांची चांगली खात्री आहे बोला लाकर काय बोलायचे आहे ते,

विद्याधर: सुशीले, कालपर्यंत माझ्या आयुष्याचे गलबत शून्य हेतूच्या समुद्रात वाटेल तिकडे संचारत होते, पण तुझ्या या तेजस्वी नेत्रदिपकाच्या खुणेने माझ्या विश्रांतीचे स्थान मला दाखविले! सुशीले, तुझ्याशी पुनर्विवाह करून सदैव या दिव्य दीपकाच्या प्रकाशात राहण्याची माझी उत्कट इच्छा आहे तू माझा स्वीकार करशील का?

सुशीला समुद्रातले जसे खुणेचे दिवे खाली खडक आहे असे दाखवित असतात, त्याप्रमाणे माझ्या या डोळ्यांची उभारणी सुद्धा माझ्या अभेद्य पाषाण हृदयावर झालेली आहे! तेव्हा तुमच्यासारख्या धाडशी खलाश्याने त्यापासून आपले गलबत दूर ठेवावे हेच बरे. विद्याधर, कालच्या वाटाघाटीनंतर आजच्या प्रश्नाचे कारणच नाही. आणि त्यातून तुमच्या आताच्या हिडीस चाडसाने तर तुमच्याशी पुनर्विवाह करण्याची कल्पना सुद्धा मनाला सहन होत नाही।।

विद्याधर सुशीले, लोकापवादाच्या भीतीने कदाचित उपर पुनर्विवाहाला तुझी तयारी नसेल तर-

सुशीला (रागाने) तर काय? विद्याधर तुम्ही शुद्धीवर नाही वाटते?

विद्याधर सुशीले, दया कर, माझी निराशा करू नकोस! तुझ्या सहवासावाचून सारे जग मला शून्य होईल! पुनर्विवाह नको तर निदान गुप्तपणे तरी माझा स्वीकार कर

सुशीला तुमच्या प्रत्येक शब्दाने तिरस्काराची परमावधी होते आहे विद्याधर, कालचा तुमचा विनय, ज्ञान, लाज ही काय झाली?

विद्याधर : सुशीले, मी वेडा झालो आहे. बाहेर चंद्राच्या प्रकाशाने चोहीकडे उजेड पसरला आहे; पण तुझ्या मुखचंद्राच्या प्रकाशाने माझ्या हृदयात अंधार पडून मला पापमार्गच स्पष्ट दिसत आहे; त्याच्या तेजाने माझे डोळे दीपून पापपुण्याचा भेद मला दिसत नाही! आयनि भांबावल्यामुळे माझी विचारशक्ती नष्ट झाली आहे। सुशीले, प्राणेश्वरी, माझा तिरस्कार करू नकोस. तुझ्यापायी माझे प्राण आणि प्राणपेिक्षाही अमूल्य असे माझे सच्छिल अर्पण करावयास मी तयार आहे!

सुशीला सच्छिल अर्पण करणारा तुमचे सच्छिल तुमच्याजवळ आहे कोठे? तुम्ही चोरासारखे आत शिरताना शील बाहेरच राहिले आहे! सच्छिल परस्त्रीच्या खोलीत कधीच शिरणार नाही!

विद्याधर रात्रीच्या पडद्याआड चोरट्या प्रेमाला झाकून ठेवले तर

सुशीला माझ्या बालपतिराजाच्या हक्काचा अभिलाष करणा-या राक्षसा, चल नीघ येवून! इतकेच नाही, तर सूर्योदय झाल्याबरोबर या

+

घरातूनही काळे कर! तू दृष्टीआड झाल्याखेरीज मी अन्नग्रहण करणार नाही!

विद्याधर : अशी प्रतिज्ञा करू नकोस. निदान माझ्या दृष्टीसुखाच्या तरी आड येऊ नकोस! चातक मेघमालेच्या नुसत्या दर्शनाने जिवंत राहतो

तसे तुझ्या दृष्टीच्या अमृतवर्षावानेच माझ्या दग्ध प्रेमाच पुनर्जीवन होईल! तुझ्या पतीच्या वैभवाचा उपभोग मिळाला नाही, तर त्याचे नुसते चित्र पाहण्यात मी समाधान मानीना कैलासनाथाप्रमाणे शशिकला प्रत्यक्ष मस्तकी धारण करता आली नाही तरी तिच्या चंद्रिकेच्या प्रभेवरच चकोर आपली तृषा भागवितो! सुशीले, माझा स्वीकार केला नाहीस हेच माझे मोठे दुर्दैव! तशात मला हृदपार करून माझ्या दुर्दैवाच्याही सीमेपलीकडे मला लोटू नकोस!

सुशीला यानतर तुम्हाला या घरात राहू देणे फार भयंकर नाही का?

विद्याधर: सुशीले, या घरातून बाहेर पडताच मी या जगालाही मुकेन नको, प्रेमाने विचारशून्य झालेला या तुझ्या वेड्या भक्ताची हत्या करू

नकोस!

सुशीला मला तुमची दया तर येते, पण तुमच्या राक्षसी कृतीचा त्यांच्या अल्लड मनाला मोह पाडून-

विद्याधर ही तुझी भीती निराधार आहे। लीला जशी तुझी बहीण तशीच माझीही तुझ्याखेरीज सर्व स्त्रिया मातेसमान आहेत शिवाय

परमेश्वराची माझ्यावर कृपादृष्टी झाली तर मागेपुढे तुझे माझ्याबद्दलचे इतके वाईट मत एका क्षणात बदलून टाकीन जशी मला आशा आहे! सुशीला : एका क्षणात दुस-याचे आपल्याबद्दलचे मत अजिबात बदलून टाकण्यांची अदभूत शक्ती तुमच्यात आहे. याबद्दल वाईट अनुभवाने का होईना माझी खात्री झालेली आहे. बरे तुम्हाला या घरात राहण्याची मी परवानगी देते; पण ज्या दिवशी मला तुमचे वर्तन वाईट दिसेल-

विद्याधर: त्या दिवशी त्या क्षणी हे घर सोडावयास माझी तयारी आहे. पण तोपर्यंत माझ्या आजच्या अपराधाची क्षमा करून त्याबद्दल कोठे

उच्चार करू नकोस.

सुशीला: ठीक आहे. जा आता आपल्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला तुमच्या पापाची क्षमा करो!

विद्याधर उदार सुशीले, शाबास तुझ्या मोठेपणाची! आजचा हा अपराध विसरून यापुढे मला तुझी भक्ती करण्याची आज्ञा दे। आज ना उद्या माझ्या तपश्चर्येचे फळ मला मिळाल्यावाचून राहणार नाही, तोपर्यंत मात्र अशाच उदारपणाने माझ्या या धाडसाच्या प्रवेशावर विस्मृतीचा पडदा टाकून हा देखावा दृष्टीआड कर, एवढीच, देवी, तुझ्या पायाजवळ याचना आहे.

प्रवेश दुसरा

(तात्यासाहेब व कमलाकर फाशांनी सोंगट्या खेळत आहे. घाईने गोकुळ प्रवेश करतो.)

गोकुळ : (स्वगत) जी दुवार्ता तात्यासाहेबाना सांगण्यासाठी मी इतका धावत आलो, जी ऐकल्यापासून माझ्या मनात तिच्याखेरीज दुसरा विषय घोळत नाही, ती कोणती? इतक्या महत्वाची बातमी विसरलो म्हणावे तर हेही शक्य नाही. का गडबडीत ती बातमी ऐकून घेण्यापूर्वी

ती सांगण्यासाठी मी पळत सुटलो? काय बरे असावी ती? (विचार करीत उभा राहतो.)

तात्या काय रे गोकुळ, असा सचित का? काही मला आणलेला एखादा निरोप विसरला आहेस काय?

गोकुळ : छे छे तसे काही नाही! सहज उभा आहे आपला. (स्वगत) कोणती गोष्ट ती?

तात्या : (कमलाकरास) किती पडले? पोबारा! मग पळालीच ती आता हाती लागत नाही...

गोकुळ : (स्वगत) हो! दुमन पळून गेली हीच बातमी (प्रकट) तात्यासाहेब, एक मोठी चमत्कारिक बातमी सांगायची आहे आपल्याला! हो;

विसरेन म्हणून टाचण सुद्धा करून ठेवले आहे. हा घ्या वाचा कागद (एक कागद तात्यासाहेबांस देतो.) तात्या : (आश्चर्याने) काय, द्रुमन नाहीशी झाली? सांग पाहू, काय झाले ते? केव्हा गेली कुठे गेली, कुणाबरोबर? गोकुळ : त्याचा काही

मागमूस सुद्धा नाही! काल रात्रीपासून तिचा पत्ता नाही वसंतराव सारखा तपास करीत आहेत; पण कुठे बांग लागत नाही.

तात्या फारच आश्चर्य म्हणावयाचे का हो कमलाकर तुम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही यात?

कमलाकर : (स्वगत) द्रुमन पळाली हे ऐकुन यांना आश्चर्य वाटते; पण मला हे ऐकून आश्चर्य का वाटत नाही हे यांना कळले तर मात्र हे आश्चर्याने वेडे होतील! (प्रकट) मला यात मुळीच आश्चर्य वाटत नाही! तिच्याबद्दल अलीकडे माझ्या कानी थोडी कुजबूजही आली होती! गोकुळ : कानी थोडी कुजबुज ? आमची ही तर माझ्या कानी कपाळी सारखी ओरडत होती रोजा हा सारा स्त्रीस्वातंत्र्याचा परिणामः सोडा

म्हणावे बायकाना आणखी मोकळ्या! आता परत नाही आणता येत कुठे? सुधारणा, सुधारणा बरे ही कमलाकरा

तात्या फारच आश्चर्य आहे म्हणायचे! बरे, जा, वीणेला आधी इकडे पाठीवा विसरू नकोस!

गोकुळ (स्मरणवहीवर टिपतो) वीणेला आधी इकडे पाठीव (जातो.)

तात्या काय बोला फुलाला गाठ पडली पहा! त्या दिवशी बाबासाहेबांजवळ बोलल्याप्रमाणे वागण्याचा प्रसंग इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते.

कमलाकर : म्हणजे? स्त्रीस्वातंत्र्याच्या विरुद्ध खरेच जायचा विचार आहे आपला?

तात्या विचार नाही. निश्चय आहे! पण ही पाहा आलीच वीणा (वीणा व गोकुल येतात.) वीणे, ऐकली ना ही विलक्षण बातमी ?

वीणा हो बाबा, आणि म्हणून तिकडेच जायला निघाले आहे मी!

तात्या वीणे, वसंतरावाकडे जायचे कारण नाही.

वीणा: बाबा, अशा वेळी सुद्धा जाऊ नको म्हणता?

तात्या अशा वेळी नाही, पण इथून पुढे केव्हाही त्यांच्याकडे जाण्याची मी तुला मनाई करतो आहे!

वीणा मनाई? स्त्रियांच्या स्वतंत्रतेला तुम्ही स्वतःच निर्बंध घालणार?

तात्या हो, स्त्री-पुरुषाच्या स्वैर संचारापासून अनिष्ट परिणाम होतील असे मला वाटते.

वीणा म्हणजे दुमनच्या चुकीबद्दल मला शासन!

तात्या तुलाच काय? सुशीला, लीला यांना सुद्धा मी बंदी करणार! आजपासून पुरुषांची बैठक निराळी, आणखी स्त्रियाची निराळी! कारणावाचून कोणी कोणाशी संबंध ठेवायचा नाही. गोकुळ सर्वांना माझ्या दिवाणखान्यात घेऊन ये. (गोकुळ जातो.) आणखी वीणे, वसंतरावांशी यापुढे तुझा कोणताही संबंध असता कामा नये! मीच त्याला आपल्या इथे न येण्याची ताकीद करणार आहे!

कमलाकर काय, वसताला इथे येण्याची बंदी? त्याचा काय अपराध आहे यात?

तात्या असे करणे थोडेच निर्दयपणाचे आहे खरे, पण प्रत्यक्ष त्याच्या बहिणीनेच असा विपरीत प्रकार केल्यानंतर आता त्याला घरी येऊ देणे म्हणजे शुद्ध वेडेपणाचे होईल. चर्चाविषय झालेल्या मनुष्याच्या आसपासच्या माणसांवर सुद्धा कुटाळांची निंदाव्यंजक दृष्टी फिरते! एखादा अंधुक तारा दाखविण्यासाठी लोक आधी शेजारच्या ठळक ता-यांकडे बोट करितात.

वीणा : बाबा, माझे त्याच्यावर प्रेम आहे हे विसरता तुम्ही!
तात्या आणखी आता तुलाही हे विसरले पाहिजे!

वीणा : पण तुम्हीच आधी मला त्यांच्यावर प्रेम करायला सांगितले!

तात्या : तसेच आता न करायला सांगतो! वीणे, याबद्दल अधिक वाटाघाट करण्याचे कारण नाही, माझी आज्ञा तुला ऐकलीच पाहिजे. वीणा: ऐकली पाहिजे म्हणजे? मी नाही ऐकणार! स्त्रियांना वाटेल त्याच्यावर प्रेम करायला अधिकार आहे! प्रेमाच्या बाबतीत काही मी

तुमची बांधलेली नाही! माझ्या मनाप्रमाणे वागायला मी माझी मुखत्यार आहे.

कमलाकर (स्वगत) उच्छृंखल मनाला मोकळे सोडण्याचा हा परिणाम!

तात्या वीणे, जसे मी तुला पूर्वी स्वातंत्र दिले तसेच आज परत घेणार!

वीणा घेणार म्हणजे? ही गोष्ट काही तुमच्या हातची नाही. पक्ष्याला पिंज-यातून मोकळे सोडणे सोपे, पण पुन्हा कोंडणे कठीण! गोकुळ : (स्वगत) ऐका ही मुक्ताफळे ! आमच्या इकडे असले चोचले मुळीच उपयोगी नाहीत. मला तर स्त्रीः पुरुषांच्या तसविरा सुद्धा एकत्र ठेवण्याची भीती वाटते! (पाहून प्रकट) तात्यासाहेब, ते पहा वसंतरावच इकडे येत आहेत. सांगू का त्यांना आपली आज्ञा ?

वीणा थांबा, थांबा, आताच असा निष्ठुरपणा करू नका! मला त्यांची शेवटची भेट तरी घेऊ द्या!!

तात्या : ठीक आहे; मी वर जातो. मला त्यांची भेट घ्यावयाची इच्छा नाही; तू पण लौकरच ये! फार वेळ बोलत बसू नकोस. (वीणाखेरीज सर्व

मंडळी जातात.)

वीणा : विलायतेत असा अंधार खास नसेल! काय बाबांची लहर ही! हे ऐकून बिचा-या वसंतरावांना काय वाटेल? माझे मस्तक अगदी फिरून गेले आहे. वसंतरावांनाच यावर तोड विचारली पाहिजे! (वसंतराव येतो) या कळली सारी हकिकत मला! पण प्रिया, त्या

बातमीपेक्षाही विलक्षण आणखी दुःखकारक बातमी तुम्हाला ऐकवायची आहे. तुमच्याशी न बोलण्याबद्दल बाबानी मला ताकीद केली आहे आणि तुम्हालाही आमच्या घरी येण्याची बंदी होणार आहे. काय उपाय करावा आता?

वसंत : हा निव्वळ जुलूम आहे. विलायतेत एखाद्या मुलीवर असा प्रसंग आला तरी ती खुशाल आपल्या वल्लभाबरोबर निघून जाते! चीणा होय ना? मग मी पण तसेच करणारा झाली याबद्दल बाबांची नाचक्की तर मी काय करणार? त्यांची चूक झाली म्हणूनच मी तरी चूक करणार पर्वतावर चिखल झाला म्हणजे नदीचा प्रवाह गढूळ व्हायचाच!

वसंत : पण पळून गेली यात द्रुमनने काय वाईट केले? माझ्या प्राणा, विलायतेत असे प्रकार दररोज शेकडो होतात! मला द्रुमनबद्दल काहीच वाटत नाही. ती तरी आपल्या वल्लभाबरोबर निघून गेली असेल! तुझी आहे ना तयारी?

वीणा अगदी या घटकेला! चला आत विशेष काही होण्यापूर्वी बेत ठरवून टाकू. (गोकुळ येतो.)

गोकुळ : (स्वगत) थकलो युवा ही धावपळ करून दुमन पळून गेली पण तिला माझ्या इतके काही पळावे लागले नसेल! (प्रकट) वसंतराव, हे घ्या पत्र!

वसंत (पत्र वाचून यात तात्यासाहेबांनी मला येथे येण्याची बंदी केली आहे. गोकुळ त्यांना सांग तुमची आज्ञा मला मान्य आहे म्हणून! (गोकुळ जातो.)

वसंत : चल लाडके, पुढचा एकंदर बेत ठरवून टाकू (जातात.)

प्रवेश तिसरा

(भूतमहाल- द्रुमन व कमलाकर)

द्रुमन एकूण मी कुठे आहे याचा कुणालाही संशय आला नाही?

कमलाकर मुळीच नाही! मी तुला सांगतच होतो! अपराधाच्या जागेपासून प्रथम फार दूर जाण्याचा प्रयत्न कधीच करू नये! दूरच्या प्रवासाच्या आटाआटीत पकडणाराला सुगावा मात्र लागायचा! मी पसरून दिलेल्या बातम्यांमुळे त्यांचे भलभलत्या रीतीने तपास चालले आहेत.

द्रुमन तुम्ही येईपर्यंत माझ्या जिवात जीव नसतो अगदी सारखी तुमच्या वाटेकडे नजर लावून बसते.

कमलाकर पण कोणाच्या नजरेस पडत नाहीस ना?

द्रुमन मुळीच नाही. या घराची भुताटकीबद्दल बोलवा असल्यामुळे या रस्त्याने सुद्धा कोणी फारसे जात नाही! पण प्रिया, असा बंदिवास आणखी किती दिवस काढावा लागणार? अज्ञातवासाचे हे दिवस संपवून लग्नाच्या बंधनात कायमची मोकळी होऊन, एकदोन महिन्यांनी अवतार घेणा-या आपल्या कुलदीपकाला घेऊन राजरोस चारचौघात केव्हा हिंडेन असे झाले आहे मला! कधी निघणार आता? कमलाकर लाडके, थोडा धीर धरा आजच मी इथून निघालो तर उगीच संशयाला कारण होईल! एक-दोन दिवसात तात्यासाहेबांच्या

कामासाठी मला मुंबईसच जायचे आहे; तेव्हा सर्व व्यवस्था आपोआप होईल! द्रुमन मुंबईस कोणाला पत्ता लागणार नाही ना पण?

कमलाकर : वेडी कुठली! मुंबईसारख्या ठिकाणी बिनचूक पत्ता माहीत झाला तरी नेमके माणूस हुडकून काढता येत नाही; मग मुद्दाम नापत्ता

झालेल्या माणसाची गोष्टच नको! पण माझी ओळख फार असल्यामुळे, मुबईपर्यंतचा प्रवास माझ्यापासून दूर म्हणजे बायकाच्या डब्यात बसून करावा लागेल,

द्रुमन आपल्याबरोबर जन्माचा प्रवास करण्याच्या आशेवर हा एवढा प्रवास मी सहज पत्करीन! पण प्रिया, मी घर सोडण्याबद्दल फार

तगादा लाविला होता त्याची क्षमा केली आहे ना?

कमलाकर : अगदी मनापासून! बरे, तू तुझ्याबरोबर आणलेला तो दागिन्यांचा डबा काढून ठेव! आलोच मी. (दुमन जातो.) सुधारक चिखलात पडलेल्या गाईंचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतात पण अशा सवत्स धेनूचा उद्धार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. काय मूर्ख पोरा माझ्या वाटेकडे नजर लावून बसते! ठीक आहे! तुला वाटेला लावल्याखेरीज माझी वाट मोकळी होणार नाही. आता मुंबईस जाण्यापूर्वी बायकाच्या डब्यात बसवून सोडून द्यावी झाले! मग जाईल नशीब फिरेल तिकडे (जातो. पडदा पडतो.)

प्रवेश चवथा

(गोकुळचे घर गोकुळ विचार करीत उभा आहे)

गोकुळ : उपरण्याला गाठी मारून आठवण राहात नाही म्हणून स्मरणवही तयार केली, पण तिचाही उपयोग होत नाही; कित्येक गोष्टींचे टाचण करण्याची आठवण होत नाही; आणि आज तर स्मरणवही कुठे ठेवली हेच स्मरत नाही, स्मरणवही सापडती म्हणजे विद्याधरांच्या भेटीचा दिवस आजचाच ठरविला आहे की नाही याचा शहानिशा करून घेता आला असता. मला वाटते आज त्यांनी यायचे आम्ही ठरविलेले नाही नाही तर त्याच्या नियमितपणावरून म्हणजे या वेळेस त्यांनी यायलाच हवे! का कबूल केल्याप्रमाणे यायचा त्यांना विसर पडला? या लोकांना आठवण राहत नाही तर स्मरणवह्या का ठेवीत नाहीत? त्यांच्या स्वागताची तयारी तर चोख झाली आहे. या देशमुखांकडच्या जुन्या खुर्च्या वगैरे किती उपयोगी पडल्या आज पडद्यात गोकुळ, अहो गोकुळ) आले वाटते विद्याधरा (मोठयाने) या हो असेच नीटा (विद्याधर •येतो) या बसा मला वाटले तुम्ही आता येत नाही म्हणून.

विद्याधर: एकदा कबूल केल्यावर माझ्याकडून दिरंगाई व्हावयाची नाही.

गोकुळ बरे, आता आमचे कुटुंब गेले आहे बाहेर, सोबतीणीकडे बसायला आणखी आपल्याला तिच्याबद्दल बोलायचे आहे; तेव्हा ती आली + तर आपल्याला कळावे म्हणून एकदा सगळ्या दारांना कड्या आहेत की नाहीत ते पाहून येतो. मग बोलू अगदी मोकळ्या मनाने. (जातो.)

विद्याधर : मला इथे बसवून हा गृहस्थ बाहेर गेला खरा, पण परत यायची याला आठवण कशी होणार? मी गेली असती बरोबर तरी बरे झाले असते. बरे हा महात्मा आता काय बोलणार आहे याचा तर्क सुद्धा होत नाही. या आताच्या प्रस्तावनेवरून त्याच्या बोयकोबद्दल बोलणार आहेसे दिसते! परस्त्रीबद्दल अशा वाटाघाटी करण्याचा हा प्रसंग जरासा विकट तर खराचा (गोकुळ येतो) या जलातच ताबडतोब ! मला वाटले पुन्हा यायचे विसरता वाटते! गोकुळ छ विसरतो कसचा! मी इतका विसरा नाही. या लोकानी उगीच बभ्रा केला आहे झाले! मी हे तुम्हाला पूर्वीच सांगणार होतो; पण आठवणच राहिली नाही बरे, विद्याधरपंत, तुम्हाला येथपर्यंत येण्याची तसदी देण्याचे कारण सांगतो आता दोन-चार दिवसांच्या बोलण्यावरून तुम्हा ताडलेच असेल की, आमच्या खटल्याचा प्रकार थोडासा विचित्र आहे!

विद्याधर : तुमच्यावर खटला वगैरे-

गोकुळ : गैरसमज झाला तुमचा! खटले म्हणजे कुटुबा माझी बायको, द्राष्ट, कजाग आणि भांडकुदळ आहे! तेव्हा तिला ताळ्यावर आणण्यासाठी काय युक्ती करावी? तुमच्यासारख्या पोक्त विचाराच्या मनुष्याचा या बाबतीत सल्ला घ्यावा म्हणून तुम्हाला ही तसदी दिली आहे सांगा पाहू आता एखादा उपाय!

विद्याधर अशा बायकोला हळूहळू धाक दाखवून-

गोकुळ धाक दाखवण्याचे दूरच राहिले अहो, तोंडावाटे ब्र काढायची चोरी! घरात मला तोड उघडायचा प्रसंग फक्त जेवतानाच काय तो येतो फार कशाला? गेल्या वर्षी वायूमुळे तिची दातखिळी बसली तेव्हा वैद्यबुवांना तिच्या प्रकृतीचे मान मी सांगितल्यामुळे ती माझ्यावर रागावली! दातखिळी बसली होती तरी सुद्धा आपणच वैद्यबुवाना समजावून सांगावे अशी तिची इच्छा दिसली. शेवटी त्याच संतापाच्या भरात तिची दातखिळी उघडली आणि तिचा त्या वेळचा आवेश पाहून भीतीने बिचा-या वैद्यबुवांची मात्र दातखिळी बसली! तिच्या तोंडाशी तोंड देण्याची सोय नाही. तिच्या भांडखोरपणाची साक्ष ही सारी आळीच देहला भुतांच्या भुताटकीने एखादे दुसरे घरच ओसाड पडते! पण या डाकिणीच्या तोंडामुळे ही आळी उठून गेली आहे. शेजारच्या घरात तीन माणसांच्या कुटुंबाची वस्ती आहे; तिच्यावर आमच्या हिच्या तोडाची मात्रा चालत नाही. कारण त्या गृहस्थाला बोललेले ऐकायला येत नाही, त्याच्या बायकोला बोलता येत नाही; आणि मुलीला बोललेले आणि ऐकलेले दोन्ही कळत नाहीत.

विद्याधर ही दातखिळीची कथा म्हणजे खरोखरीच दंतकथा आहे. मला वाटते तुमचा स्वभाव जरा विनोदी आहे.

गोकुळ यात विनोद मुळीच नाही. नदीच्या पुरात वाहून जात असताना तिच्या वेगाला कसली उपमा द्यावी याचा विचार कोण करीत बसेल? खरे विचाराल तर मी आता जिवाला सुद्धा कंटाळून गेलो आहे!

विद्याचर अरेरे! मग तुम्ही काडी का मोडून देत नाही?

गोकुळ : अहो, काडी मोडून द्यायला घरात काडीवर तरी सत्ता चालली पाहिजे ना! विद्याधर, ब्रह्माडात मायेने जसे ईसरालाही व्यापून टाकले आहे, तसेच आमच्या घरात बायकोने नव-याला अगदी त्रासून टाकले आहे. (हळूच मथुरा येते व विद्याधरना गप्प बसण्याची खूण करते ) मथुरा: (स्वगत) माझीच निंदा चालली आहे वाटते! ऐकले पाहिजे सारे बोलणे.

गोकुळ : तिच्या रूपाचे वर्णन तर विचारूच नका! दुस-या कोणत्या प्राण्याशी सादृश नाही एवढ्यासाठीच तिला मनुष्य म्हणायचे!

मथुरा : (स्वगत) आणि यांना तर मनुष्य म्हणायचे कारण नाही. परक्या माणसाला घरी आणून त्याच्यासमोर माझी नालस्ती करीत आहेत काय?

गोकुळ : तिचा तो मर्दानी बाधा, पहाडी आवाज, भरदार अवयव, तेल्या रंग वगैरे लक्षात आली म्हणजे शूर्पणखा, हिडिंबा यांची वर्णने खरी वाटू लागतात. जुन्या कवींच्या ठरावीक उपमाची अदलाबदल केली तर तिथे यथायोग्य वर्णन थोडक्यात देता येईल. कोकिळेचा आवाज आणि नागिणीची काती याचा विपर्यास होऊन, कोकिळेचा काळा कुळकुळीत वर्ण आणि नागिनीचे फोफावणे याची ती धनीण झाली आहे. हत्तीची मदगती आणि हरिणीचे विशाल नेत्र याची अशीच दिशाभूल होऊन हत्तीचे बारीक डोळे आणि हरिणीची चचल गती तिच्या वाटणीस आली आहेत. दाताच्या बाबतीतही हत्तीचेच तिच्यावर ऋण आहे. नाकाचा सरळपणा भिवयांकडे जाऊन त्यांच्या धनुष्याची कमान नाकावर वठली आहे. ओठानी केसांच्या काळेपणाचा पत्कर घेऊन त्यांच्यावर आपली गुलाबी छटा पसरून दिली आहे.
विद्याधर : मला वाटत आता हे वर्णन तुम्ही बाबवाल तर बरे..

गोकुळ नाही हो; मला तिची इतकी ओकारी आली आहे की, तिच्या सा-या गोष्टी कोणापाशी केव्हा ओकून टाकीन असे झाले आहे. तिचा वर्ण इतका काळा आहे की, अमावस्येच्या काळोखात सुद्धा ती स्पष्ट दिसते मेरु आणि विध्याद्रीप्रमाणे दोन गालांत उंच होण्याची स्पर्धा चालली आहे आणि नाकाने गालाच्या त्या खिंडीत बैठक मारली आहे. जिभेच्या सहवासाला भिऊन आळीतल्या लोकाप्रमाणे हनुवटीही नापत्ता झाली आहे. याप्रमाणे सा-या अवयवाचा ठळकपणा नाहीसा झाल्यामुळे चेहे-याचे स्पष्ट मैदान झाले आहे!

विद्याधर : हे पाहा, गोकुळ, तुम्ही स्वतःच त्यांचा असा डांगोरा पिटू लागला तर लोकाना बरेच होईल. आपण आपला आब राखिला पाहिजे!

मागे कोण काय बोलेल हे पाहिले पाहिजे!

गोकुळ : पाठीमागे कोण काय बोलते याची मी मुळीच पर्वा करीत नाही.

मथुरा : (स्वगत) आणि तोंडावर बोलू लागले तर तोड देत नाही!

गोकुळ : विद्याधर, माझा असा बेरंग करू नका! आजपर्यंत तिच्या निंदेचे सुख सुद्धा मिळाले नाही. ऐका पुढे! तिचे गाल मुळचे गुलाबी तर नाहीतच, पण काळ्या रंगाचे त्यांच्यावर इतके तकतकीत रोगण चढले आहे की, रागाने किंवा लज्जेने लाली आलीच तर गालांवर करड्या रंगाची छटा दिसेल! पण दुर्दैवाने हे रंगीत काम अजून कोणालाही पहायला सापडले नाही! कारण रागाने लाल झाल्यावर तिच्या तोंडाकडे पाहण्याची कोणाची छाती नाही. आणि लज्जेने म्हणाल तर, ती कोणाला लाजल्याचे मला स्मरत नाही का, कशी आहे गालाची शोभा?

मथुरा : (स्वगत) माझ्या गालांना नावे ठेवीत आहेत आणि याचे गाल मात्र अगदी गुलाबी असतील नाही? गुलाबाचा रंग तर नाहीच; पण भोवतालच्या मिसाळ खुटानी आणि त्या वरखंडानी काट्याचे रान मात्र माजले आहे खरे!

विद्याधर : (स्वगत) या बार्हच्या धुमसणा-या आवेशावरून लौकरच याचे गाल मात्र लाल होण्याचा रंग दिसतो. आणि हा तर ऐकत नाही.

44

(प्रकट) गोकुळ स्त्रियांच्या सौदर्यावर असे तोड़ टाकणे चांगले नाही. गोकुळ का बरे, तिच्या गालावर तोंडसुख घेण्याचा माझा अधिकार नाही का?

विद्याधर पण त्यात इतकी अतिशयोक्ती नसावी.

गोकुळ अतिशयोक्ती ? मुळीच नाही तुम्ही तिला पाहिली तर तुमची खात्री होईल की, तिच्या कपोलवर्णनात कपोलकल्पित असे काहीच

नाही।।।

विद्याधर : पण आता हे वर्णन पुरे करा एक्क्यावरून मला त्यांच्या स्पाची सहज कल्पना होईल.

गोकुळ कल्पना होईल? निव्वळ कल्पना आहे ही! तिच्या सर्व अवयवांचा सलोखा सांभाळून तिच्या रुपाची एकदम कल्पना करणे शक्यच

नाही. इकडे काळ्या कुळकुळीत रंगावरून वाटते की, ही आफ्रिकेची हुडी गफलतीने पत्ता चुकून हिंदुस्थानच्या पेढीवर जाली असावी तर

तिकडे काही अवयवाच्या फाजील वाढीमुळे आणि काहींच्या फाजील कमीपणामुळे यवकट बनविलेल्या चेहे-या तबकडीवरून, हे जपानी

कलाकौशल्य असावे असे वाटते. मग अशा लपडावात तिच्या रूपाची कशी कल्पना होणार तुम्हाला?

विद्याधर: अहो, नुसती कल्पनाच नाही, पण त्याची प्रत्यक्ष मूर्ती उभी आहे माझ्यापुढे!।

गोकुळ : भ्रम आहे तुम्हाला तिथे तोड तुम्हाला दिसले तर तुम्ही तोड तिकडे फिरवाल! अहो, आमची आई प्रथम सुनमुख पाहताच घावरून

रामरक्षा म्हणायला लागली! याच घरातली गोष्ट. विद्याचर (स्वागत) आता विषय तरी बदलावा. (प्रकट) घर सुरख आहे मोठे! काय भावे देता यांचे?

गोकुळ : ते सारे तिला माहीत! आमच्या हिशेबी कामाची निम्मेनिम वाटणी झाली आहे. खर्चाचे खाते तिच्या हाती असून जमा माझ्या हस्ते

व्हायची साखरेच्या गोण्या तिच्या कामी आणि मी नुसता ओझ्याचा बैल मथुरा (स्वगत) हे मात्र अगदी खरे म्हणून तर ऋषिपंचमीच्या दिवशी मला खणखणीत उपास पडतो

विद्याधर (स्वगत) मी मुद्दाम विषय बदलतो आणि हा पूर्वपदावर येतो. (प्रकट) का हो, एवढद्या घरात सोबतीवाचून तुम्हाला भीती वाटत नाही?

गोकुळ एकटा असलो तर नाही वाचत भीती पण ती जन्माची सोबतीण जवळ असली तर मात्र भीती वाटते

विद्याधर तुम्ही तुमच्या कुटुंबाला फार भिता असे दाखविता, पण तुमच्या बोलण्यावरून तसे दिसत नाही!

गोकुळ दिसत नाही? ती इथे असती तर दाखविले असते कसे काय आहे ते! अहो, ती इथे नाही म्हणून तर मी हे बोलतो आहे. मागे एकदा अशीच ती बाहेर गेलेली पाहून मी जयतांना घरी आणले आणि असाच या बाबतीचा खल करीत बसलो अगदी असाच प्रसंगा पण मागे तिने चोरून उभे राहून सारे बोलणे ऐकून घेतले आणि मग काय गहजब माझ्यावर माहेरी जायला काय तयारी झाली! बाकी ती हजारदा ही भीती घालते. पण खरोखरी काही कधी जात नाही ती माहेरी गेली तर तिच्याऐवजी माझा तरी सासुरवास चुकेल खास!

विद्याचर: बरे, त्या अशा मागे उभ्या आहेत हे तुम्हाला कसे कळले?

गोकुळ : त्यात काही विशेष नाही तिला पाहून जयतानी मला विचारले की, हे बोलणे चोरून ऐकून तुझ्या बायकोने तुझ्यावर तोंड टाकले तर मी असे इकडचे तोंड तिकडे करून टाकीन! असे म्हणून असा झटक्याने मागे पाहतो

मथुरा: तो मी ही अशीच मागे उभी! असेच ना? बोला! आता का वाचा बसली?

गोकुळ : भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।

मथुरा: आता हे सोग करिता काय म्हणे गालावर रोगण बसले आहे करू का आपल्या गालावर रोषणाई? मी आफ्रिकेची हुडी, जपानी

कलाकौशल्या मला लाज नाही? होय ना? बोला, आता का गप्प

गोकुळ मी तुझ्या पाया पडतो! माझी चूक झाली! एवढा अपराध पदरात घे

मथुरा: कशाला एवढे पण तुम्हाला माझा सासुरवास होतो नाही? आणि जन्माची सोबतीण नको नाही का? ही मी जाते माहेरी! म्हणे ती खरोखरच जात नाही! आता पाहा डोळे फाडूना माझा अडला आहे सेंटर या घरात

गोकुळ हवी तितकी खेटरे मला दे पण पाहुण्यांच्या देखत तरी नको!

मथुरा आणि तुम्ही मात्र पाहुण्याजवळ माझी नाही ती नालस्ती करावी पण पाहुण्याचे मला काय भया पाहुणे तुमचे! त्यांना नाही लाज

वाटली परक्या बायकोबद्दल वाटाघाटी करताना?

गोकुळ : (एकीकडे) विद्याधर, आता पळा, त्या खिडकीतून धुराड्यातून जिथून सापडेल तिथून रस्ता गाठा आणि जीव वाचवा! आमची ओळख ठेवा! पळा

मथुरा: माझे कान काही फुटले नाहीता त्यांना कशाला जायला सांगता? मीच जात्ये आपल्या माहेरी !

गोकुळ : आज आपल्या दोघाचा पुनर्जन्म झाला! माझ्या अशा यमपुरीच्या वेशीपर्यंत कैक फे-या झाल्या आहेत म्हणा! पण तुम्हाला हा प्रसंग जरा नवीनच आहे! मघाशी दार लावलेले पहावयाला गेलो खरा पण पहायचे विसरलो त्याचा हा परिणाम!

विद्याधर : पण त्याचा परिणाम काय होणार पुढे?

गोकुळ आज ती खास माहेरी जाणार आता काय करावे?

विद्याधर बरे, यांचे वडील तरी चांगले सुखी आहेत का?
गोकुळ सुखी आहे साधारण! पण तो हिला फार दिवस राहू देणार नाही! पक्का चिकू आहे तो! दस-याचे सोने सुद्धा त्याच्या हातून सुटत नाही! कोणी निरोप एखादा सांगितला तर त्यातले देखईल चार शब्द दलालीदाखल ठेवून घेईल!

विद्याधर : मग आता कसे करू? तात्यासाहेब वगैरे त्याच्या ओळखीच्या मोठ्या माणसाच्या सहीचे तुमच्या सास-यांना पत्र पाठवू? त्यात सर्व हकिकत कळवून तुमच्या कुटुंबाला थारा देऊन चढवून ठेवू नये असे लिहू? म्हणजे तो समजूतदार असला तर आपणच तिला येथे आणून पोचती करील अशा निराधार स्थितीचा अनुभव आला म्हणजे त्यांचा वरचढपणा आपोआप नाहीसा होईल!

गोकुळ आली ती जरा थांबा! (मथुरा येते)

मथुरा : चला जरा आत! मला त्या भितींच्या लगीवरून माझी पेटी काढायची आहे म्हणून भिंतीखाली या खुच्यांची उतरंड लावायची आहे.. ओढा त्या खुर्च्या (विद्याधरास) तुम्हीही उचला एक! तुमचेही अंग आहेच या चारगटपणात; तेव्हा तुम्हालाही शिक्षा पाहिजेच! चला, बघता काय? माझी गाडी चुकेल! मी याच गाडीने जाणार बाबांकडे!

गोकुळ : विद्याधर, चला उचला ते मेज, काही इलाज नाही: (खुर्च्या ओढीत सर्व जातात.)
प्रवेश पाचवा

(घराच्या मागील बाजूचा बाग. एका बाकावर बसून लीला व जयंत बोलत आहेत))

जयंत लीले तात्यासाहेबांनी तुझ्याशी बोलण्याची बंदी केल्यामुळेच आपल्याला या रमणीय वेळी चोरून भेट घेण्याची बुद्धी उत्पन्न झाली. काय मनुष्य स्वभाव आहे पहा! आजपर्यंत कित्येकदा तरी दिवसच्या दिवस आपण एकमेकाशी बोलल्यावाचून काढिले असतील; पण स्वाधीनच्या गोष्टीमुळे त्याचे आपल्याला काहीच वाटले नाही! तेच आता पाहा! ही बंदी केल्याबरोबर कारण नसतानाही आपल्याला एकमेकाच्या सहवासातून एक क्षणभरही रहावेनासे झाले आहे! आणि अगदी निर्दोष भेटीसाठी सुद्धा अशी पहाटेची चोरटी वेळ ठरवून ठेवणे भाग पडले आहे.

लीला जयंत, लहानपणी थट्टेत आपले लग्न ठरल्यामुळे म्हणा, किंवा कशामुळे तरी म्हणा, काय असेल ते असो, निष्पाप बुद्धीने तुमच्यापाशी चार शब्द बोलत बसून मनाचे दुःख हलके करण्याइतके समाधान मला दुस-या कशानेही वाटत नाही!

जयंत लीले, हा उषःकाल किती रमणीय आहे. पश्चिमेचे पटांगण बहुतेक ओलाहून, चंद्रमा मार्गश्रमाने खिन्न झाल्यामुळे, पलीकडच्या गोलाकडे वळण्यापूर्वी अस्ताचलावर थोडा वेळ विसावा घेत आहे आणि म्हणूनच त्याची प्रभा थोडी मंद झाली आहे! तिकडे उदयाचलावर भगवान चडिकिरणाच्या स्थावर तावच्या यशाचा एखादा दुसरा पदर दिसू लागला आहे! पूर्वेकडे तारका कमी कमी होत चालल्या आहेत जणू काय रथवेगाने उदभवलेल्या ध्वजपटाच्या वा-याने ही आकाशतील फुले उडून जात आहेत! लीला या तारका मंदतेज झाल्या तरी त्याची चमक अजून तशीच आहे! या मंद चंद्रिकेच्या वृष्टीवरून असा भास होतो की, सृष्टीदेवता दिवसाच्या श्रमासाठी आपल्या बालकांना या दुग्धपानाने ताजीतवानी करीत आहे

जयंत (स्वगत मातृपदाला मुकलेल्या लीलेची ही प्रेमळ कल्पना किती हृदयभेदक आहे (प्रकट) लीले अनतकालापासून तारका या पापी

पृथ्वीला शिवल्या नाहीत म्हणूनच त्यांचे तेज चिरकाल चमकत आहे! आपल्या पदापासून ढळणारा उल्का पृथ्वीच्या पापी वातावरणात

शिरताच जळू लागून तिचा स्पर्श होण्यापूर्वी भरम होऊन जातो.

लीला आकाश आणि भूमी यांच्यात किती तरी विरोध हा तिकडे आकाशातील फुले सूर्यप्रकाशाच्या दूरदर्शनानेच कोमेजून जाताहेत आणि

खाली आपल्या चिमुकल्या बागेतील फुले उमलत आहेत! जयंत या हिरव्यागार तृणशय्येवर पडलेल्या जवाच्या वेदातून मावळत्या चंद्राची किरणे चमकत असल्यामुळे मखमालीच्या गालिच्यावर जरतारीचे काम केले आहे असे वाटते! ही सुंदर फुले तारकांच्या प्रतिबिंदासारखी शोभत आहेत तो पाहा, नीले, जगन्नाथाच्या या उपवनात खेळण्यासाठी आकाशगंगेचा पाट काढला आहे! ही शीतल चंद्रिका तिच्या अमृतजलाची तुषारवृष्टी तर नसेल ना?

लीला जयंत, आपल्या फुलोप्रमाणेच तारकांना जगदीशाच्या बागेतील या तेजस्वी फुलांना सुद्धा सुवास असेल का?

जयंत (हसून ) किती स्वर आणि मनोहर कल्पना ही! लीले. या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. आपल्या पापक्षालनासाठी अनंत यातना भोगल्यानंतर कालांतराने आपण ज्या वेळी गगनमदलात तारकारुपाने चमकू लागू त्या वेळी अनुभवानेच आपल्या तेजोमय आत्म्याला या प्रश्नाचे उत्तर सापडणार आहे तोपर्यंत अनुमानानेच समाधान मानून घेतले पाहिजे!

लीला पुण्यवताचे आगे आकाशात तारे होऊन राहतात तेव्हा त्यांच्या पुण्याईच्या तेजाप्रमाणे त्यांच्या कीर्तीचा सुवासही खास पसरत असेल, पण पृथ्वीच्या पापगंधाने त्याचा नाश होत असेल, एवढेच

जयंत लीले, लहानपणी एकएकदा मला असे वाटे की, या चांदण्या म्हणजे मृतांच्या प्राणांना स्वर्गात जाण्यासाठी केलेले मार्ग असावेत आणि या आकाशाच्या चाळणीतून त्याच्या पलीकडचा स्वर्गाचा तेजोमय प्रदेश आम्हाला दिसत असावा! आणि उत्कंठतेने पहात असे!

लीला अगदी लहानपणी त्याच्या मांडीवर बसून आपण मोठमोठाल्या चांदण्या आळीपाळीने वाटून घेत होतो आणि वेळोवेळी अगणित

ईश्वरी संपत्तीच्या वाटणीसाठी भांडत होतो; आठवते का तुम्हाला?

जयत हो। एकदा तर आईने तुझी कागाळी ऐकून तुला सांगितले होते की, या चादण्यासाठी एवढी भांडतेस का? त्याची लक्ष-माळा अखेर जयताच्याच गळ्यात घालणार ना? लीले, अगदी कालच्या या गोष्टी! सुखाच्या त्या प्रत्येक क्षणाचे आज दःखमय प्रेत मात्र राहिले आहे! हा सारा आठवणीचा प्रभावा मनुष्याला जर स्मृती नसती तरी किती तरी दुःखांचा नाश झाला असता! अरे त्या वेळच्या त्याच या तारका आम्हाला आज अशा स्थितीत पाहून काय म्हणत असतील ? आमचे मनोरथ ऐकून क्रूर काळपुरुषाचे हे दिव्य डोळे त्या वेळी असेच लुकलुकत होते! हे अनतयुगसाक्षी तारकांनो, आमच्यासारखी अल्लड अर्भक आशेने आमच्याप्रमाणे भविष्यकालाची सुखदायक चित्रे काढताना कधी तुमच्या दृष्टीस पडली तर आमच्याप्रमाणेच त्यांच्याकडे पाहून निर्दयपणाने बोळे मिचकावून हसू नका. तुमच्या त्रिकालदर्शी किरणाच्या प्रकाशात भविष्याचे भयानक खेळ दाखवून त्यांना वेळीच सावध करा. (दचकून) हा पाहा माझ्या अंगावर दवाचा देव (पडला आमची ही करुणस्विती पाहून द्रवलेल्या माझ्या मातेच्या ता-याचा हा अश्रुबिंदू तर नसेल ना?

लीला: जयत, मागच्या आठवणी कशाला काळता? या वेळी त्यानी आजचा अल्प आनंद मात्र नाहिसा होत आहे. या सरत्या रात्रीच्या शोभेने जिक तिकडे आनदृष्टी चालविली आहे हा आनंद पाहून नेहमी दुस-याला दुःख देण्यात आनंद मानणारा विधाता आज मेला असावा असेच वाटत नाही का?

जयंत लीले, तुझी करुणमूर्ती पुढे असताना तो निर्दय विधाता मेला असावा असे माझ्या मनाला कसे वाटेल? या सरत्या रात्रीप्रमाणेच तुझी शोभा सुद्धा उदासपणाची आहे! तुझी मूळची आरक्तगौर काती या निर्जीव चादण्याप्रमाणे फिकट झालेली आहे. पूर्वेकडे नुकच दिसू लागणा-या संध्यारागाप्रमाणे तुझ्या गालावर कोमजलेल्या गुलाबाची छाया मात्र राहिली आहे! या निस्तेज ता-याप्रमाणे तुझ्या डोळ्याची चमक क्षणोक्षणी कमी होत आहे! हा मंद वात तुझ्या निराशेच्या वासाप्रमाणे नाही का? आणखी नुकत्याच पुसून टाकिलेल्या कुकवाचा तुझ्या कपाळावर अजून राहिलेला हा पांढरा व्रण या फटफटीत चंद्राची साक्ष पटवीत आहे! अरेरे! लीले, आणखी किती दिवस तू अशी दुःखात राहणार? या रात्रीचा आणखी घटकेने रम्य, आनदमय अशा प्रभातकाळात शेवट होईल; पण तुझ्या आयुष्याची अघोरी रात्र मात्र शेवटपर्यंत अशीच राहणार ना? तुला या करुणस्थितीतून सोडविण्याचा मृत्यूखेरीज हरहर, निराशेने आलेल्या भयाण मृत्यूची आणि तुझ्यासारख्या नाजूक बालिकेची सांगड कल्पनेला सुद्धा सहन होत नाही!

जयंत बेड्या मनाची फसवणूक करण्यासाठी जरी भविष्य आपण आपल्यापुढे कधीही येऊ दिले नाही. तरी अशाने ते खरोखरीच चुकणार आहे का? अनाथ विधवेला दुःखमुक्त होण्यासाठी समाजाने मरणाखेरीज एक तरी मार्ग मोकळा ठेविला आहे का?

जयत: लीले या निजीय नेमया समाजाची का तू पर्वा करीत बसणार? प्रत्येक घटकेला जिये निःपक्षपाताने न्याय मिळतो तिथेच समाज या

नावाची सार्थकता होते पण आमच्या एकदृष्टी एकहाती जुलमी समाजाच्या आज्ञा आस्थेने कोण पाळणार? विधवाच्या माना मुरगळण्यात पुरुषार्थ मानणारा शिक्षणापासून स्त्रियांना दूर ठेवून केवळ पशुवृत्तीने त्यांची पायमल्ली करणारा समाज वंदनीय कसा होणार? अरे! एकाच धर्माच्या छायेखाली विसावा घेणा-या स्त्रियांच्या आणि पुरुषाच्या आचारबंधनात किती भयंकर विसंगतपणा संसारातील जोडी फुटली तर विधवेच्या मस्तकावरचा केशकलाप नाहीसा होती आणि विधुराच्या मस्तकाला बाशिंग बांधण्यात येते! गुडघ्याएवढ्या पोरीशी लग्न

लावण्यासाठी उतावळेपणाने गुडघ्याला बाशिंग बांधणा-या विधुराला अगदी वृद्धपणी सुद्धा नवरामुलगा बनून आपल्या पोरकटपणाची वरात

चंद्रज्योतीच्या प्रकाशामध्ये मिरविण्याचा परवाना मिळतो आणि गुडघ्यात मान घालून बसलेल्या बिचा-या बालविधवेला अंधारकोठडीत जुलमाने बालपणी सन्यासदीक्षेची शिक्षा भोगावी लागते! एकाच घरात एखादा देरबा नवरदेव इकडे मंगलवाद्याच्या कडकडाटामध्ये एखाद्या अजाण अर्भकाची विवाहमोहात आहुति टाकितो, आणि तिकडे त्या अमंगल मंगलकार्यात आपल्या विद्रुप दुर्दैवाचा अपशकून होऊ नये म्हणून कोप-यात तोंड घालून बसलेली बालविधवा आपल्या अंतःकरणाच्या होमात स्वतःची आहूति देत जनते! बालबधूचे गतायुष्य वृद्ध वराच्या शेषायुष्याइतके असले तरी त्या विवाहाला परवानगी मिळते. इतकेच नाही तर तो थेरडा मेला तर त्या बालिकेचे काळे केस जाऊन कपाळ पांढरे फटफटील व्हायची भीती आणि ती वधू मेली तर त्याला मात्र पिन्हा दुस-या बालिकेला फरविण्यासाठी पाठ या केसाना काळा कलप लावण्याची मुभा विधवेला स्वतःच्या दाराबाहेर पडण्याची चोरी, तर विधुराला परदारागमनापर्यंत आणि विश्वदारागमनापर्यंत मोकळीकाणी जिवलग मित्रांचे सुद्धा केसाने गळे कापणा-या नौचाला मेल्यावर आपल्या स्त्रिच्या वेणीच्या पिळदार पेडाच्या दोरखंडाने स्वर्गाच्या किल्ल्यावर चढून आपल्या पापाची पताका फडकविण्याची धार्मिक सवलत, आणि पवित्र आचरणाच्या त्याच्या अनाथ विधवेला जिवंतपणीच अपमानाच्या नरकयातना भोगण्याचा हा लीले, अशा प्रकारच्या दुहेरी अन्यायात गढून गेलेल्या समाजाची पर्वा कोण करील?

लीला पण अशा भयंकर अन्यायाचे सुद्धा प्राचीन ऋषीच्या वचनाचे आधार दाखवून आजचे शास्त्री समर्थन तर करतात ना?

जयत: वर्षाकाळाच्या मेघगर्जनानंतरची ही नुसती बेडकाची ओरड आहे. याकाळी दृष्टी करून परोपकाराने पृथ्वीवर समाधान पसरणा-या त्या वर्षामधाची ती गंभीर गर्जना कोणीकडे आणि त्यांच्यानंतर त्यांच्यानंतर त्यांच्या चार थेंबांनी रंग बदलून पिवळ्या शालजो पांघरणा-या ज्ञानगंगेच्या तयातल्या चिखलात रुतून बसलेल्या या बेडकांची औरह कोणीकडे! शापाने दग्ध करून उशापच्या सामर्थ्यानि ब्रह्मांडाला पुनः चिरंजीव करणारे ते प्राचीन ऋषी, आजच्या या शिव्याशापाच्या धन्याना, आपल्या जागी बसून आपल्या ल्या काळी लिहिलेल्या त्या वेळच्या बालसमाजाला योग्य असलेल्या धर्मसूत्रांचा गळफास आजच्या वाढल्या समाजाच्या मळ्यात अडकविताना पाहून काय म्हणत असतील! नीले, धर्मशास्त्र प्राणिमात्राच्या कल्याणासाठी आहे. आजचा आमचा धर्म पूर्वीच्या कणीत मृत धर्माचे

केवळ पिशाच्च आहे. आणि या पिशाच्चाची भीती घालून धर्ममार्तंड म्हणविणारे हे पोटभरू जादूगार बायका पोराच्या डोळ्यात धूळ टाकीत

आहेत! लीले, तू धाडस करून पुनः विवाहाला तयार हो!

लीला पण पुनर्विवाहाच्या प्रसंगी तुमचाच हात द्याल का?

जयंत म्हणजे?

लीला या प्रश्नाचे उत्तर द्यायलाच पाहिजे का? जयत, सुशीलाताईचा पती परलोकी गेल्यामुळे तरी तिला दुःख भोगावे लागते; पण माझ्या प्रेमाचे पती माझ्या जिवाचा विसावा-

जयंत कोण! अजून मीच

लीला नाही तर कोण? जयंत बाळपणीच्या भोळ्या मनाने वाचलेल्या खूणगाठी सोडविणे मोठे कठीण आहे. पुनर्विवाहाबद्दल मी कधी फारशी उत्कंठा दाखवत नाही याचे कारण हेच दुस-या कोणाबद्दल माझ्या मनात प्रेमाचा उदभव होणे कालत्रयही शक्य नाही! केवळ तुमच्या मूर्तीवर माझे अवळ प्रेम-

जयंत आणि मनोरमेची तितकीच अढळ सत्ता हे विसरू नकोस, लीले, लहानपणच्या गोड कल्पना आपण वस्तुस्थितीला बळी दिल्या पाहिजेता भोळ्याभाबड्या भूतकाळाला त्याच्या विरोधी वर्तमानकाळाखाली झाकून भयानक भविष्याशी टक्कर द्यायला आपली तयारी

असली पाहिजे! मनोरमेला माझ्या लग्नाच्या स्त्रीला सोडून-

लीला नको, नको ती कल्पना सुद्धा नको! विवाहित स्त्रीचा तुमच्या हातून असा अनादर झाला तर मला सुद्धा तुमच्याबद्दल अनादरच वाटेल! त्यापेक्षा आपण समदुःखित्वाने अशीच जीवयात्रा संपवून परमेसराजवळ जाऊ आणि त्याच्या पायाजवळ दाद मागा

जयंत नीले, अशा दुःखातापाची प्रखरता अगदी असा असली तरी तिने हृदयातला प्रेमाचा समुद्र कसा आटणार? क्षणोक्षणी दिसणा-या आपल्या मुखचंद्राच्या दर्शनाने भरती येऊन त्याच्या अमर्याद लाटा अनुसरूपाने कितीदा तरी या पहा अशा उचलून बाहेर येतात जयंत माझ्या दुर्देवाला सीमा आहे का? काळ्या रात्रीच्या अंधारात चक्रवाकीला प्रियवियोगाचा भास व्हावयाला कमळाचे पान तरी आड यावे लागते; पण या सामाजिक अन्यायाच्या अंधारात तुमच्या माझ्यामध्ये काही देखील अंतर नसून तुम्ही मला अंतराला आहात. हाताजवळ असून हाती लागत नाही, अगदी जवळ असल्यामुळे विरहाची वृद्धी करीत आहात

जयंत लीले, रडू नकोसा ही पहा उषकाल आणि प्रभात यांच्यामध्ये अल्पकालीन कालीमा पसरली आहे, तशी माझ्या आणि तुझ्यामध्ये मनोरमा उभी आहे मनोरमेच्या लग्नाला श्रृंखलेने चतुर्भुज झाल्यामुळे राजले गेले नसते तर लीले लाडके लीले या हाताने अशी प्रेमाने जवळ ओवली असती. तिचा हात आपल्या हातात धरतो) आणि अर्ध्या घटकेने प्रभात होण्यापूर्वीच तुझ्यावर प्रभातसृष्टीची शोभा पसरून दिली असती. रक्तवर्ण वालरवीप्रमाणे सौभाग्यसूयांचा कुमतिलक या भव्य निटिलाकाशावर लावताच ही नेत्रकमले प्रफुल्लित झाली असती आनंदाच्या दवाने धुतलेल्या या गुलाबाच्या शोभेने संध्यारागाची रक्तिमा लागली असती स्मितहास्यामुळे दुगोच्चार होणा-या दतावलीने कुंदफुलाचे तोंड बंद केले असते, आणि या तुझ्या द्विजपक्तीच्या मंजुळ हास्यच्वनीने द्विजगणाच्या अस्फुट संगीताला कर्णकठोर ठरविले अराते! पण लीले एक विवाहबंधनामुळे माझा नाइलाज झाला आहे

लीलाही सकाळची वेळ मोठी पापी आहे आणि मन मोठे स्वार्थी आहे. दशदिशांत दरवळणा-या या सुवासाशी एकजीव झालेल्या आणि हिमतुषारात स्नान केल्यामुळे शीतस्पर्शी झालेल्या या सकाळच्या वा-याने गारठलेल्या या माझ्या देहाला आपल्या उष्ण वासाचा विसावा सोडावासा वाटत नाही! मनोरमावहिनीच्या हक्काची चोरी करताना वरथर कापणा-या पायांचा आधार या शरीराला अपुरता असल्यामुळे या हाताचा आधार सोडवत नाही
जयत: (हात सोडवून) दूर हो लीले, दूर हो, मन पापी आहे तसेच ते अनावरही आहे! अशा स्थितीत शुद्ध भगिनीप्रेमाचा लोप झाल्यावाचून कसा राहील? हा निर्मल बंधुप्रेमाचा ओघ आहे असे मी माझ्या मनाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे; पण त्यांची साक्ष अगदी निराळी पडते आहे! लीले, लीले दूर हो! माझ्या कोंडलेल्या कंठातून कसाबसा बाहेर येणारा हा कंपित स्वर ऐकून तरी दूर हो! अविचाराच्या अमावस्येमुळे खळबळणा-या हृदयसमुद्रातल्या प्रेमजलाच्या लाटाचा हा धडधडाट तुला ऐकू येत नाही का? या उष्ण निःश्वासाने दग्ध होत चाललेल्या विवेकाच्या या धुराने तुझी कोमल काया करपून जाणार नाही का? चोरट्या पापरंध्रातून आत शिरू पाहणा-या या अस्थानी आनंदाला बाहेरच्या बाहेर थांबवून माझ्या शरीराच्या किल्ल्याच्या रक्षणासाठी प्रतिरक्षाजवळ पुलकाच्या बुरुजावर उठून उभी राहिलेली ही रोमचसेना तुला मागे लाटीत नाही का? दूर हो, लाडके लीलावती, समोहाने अर्धवट मिटलेल्या आपल्या डोळ्यांची शक्ती अजून थोडी तरी कायम काया आहे तोच विवेकाचा मार्ग शोधून काढू नाही तर एका क्षणात या कसोटीच्या कड्यावरुन लटलटणा-या शरिराचा तोल चुकून आपण दोघेही पापाच्या समुद्रात पडू!
लीला जयत, दया करा हा कठोरपणा एक क्षणभर आवरून धरा अशा निर्दयपणाने आपल्या अनाथ भगिनीला पण नको, खोटे कशाला बोलू? आपल्या मनोमन साक्षी पत्नीला या लहानपणच्या लाडक्या लीलेला लोटू नका! आजपर्यंत दुःखाच्या आगीत करणा-या, पुढेही त्यातच भाजून निघणा-या या सुकलेल्या जिवाला एक क्षणभर तरी जिव्हाळ्याचा ओलावा मिळू द्या! संसाराच्या अरण्यात भ्रमिष्टासारखे भटकणा-या या तापसीला, तिच्या एक वेळच्या या हक्काच्या हृदयमंदिरात, पण आजच्या केवळ धर्मशाळेत एक क्षणाचा तरी विसावा घेऊ था! माझ्या पापस्पर्शाने आपली पवित्र काया भ्रष्ट झाली तर अलोट अश्रूच्या मंगलखानाने तिला अशी धुऊन काढीना

जयंत नको, नको! लीले, हा अश्रूंचा पूर आवरून घरा चौदा रत्नापेक्षाही अमूल्य अशा या अश्रूची, अदृश्य प्रेमसूत्रात गुंफलेली ही मोहनमाळ या अभाग्याच्या गळ्यात कशाला घालतेस? हे पापी वैभव परमेश्वराला आवडणार नाही.

लीला गतसुखाच्या देवानी आणि चालत्या दुःखाच्या दानवानी आतड्यांच्या पिळाने आवळलेल्या मनाच्या मेरूने हृदयसागराचे मंचन करून बाहेर काढलेल्या या अनुमय स्त्रांची वैजयती. या माझ्या वैकुठेश्वराखेरीज दुस-या कोणाच्या गळ्यात घालू? प्राणजीवन, आपणच माझ्या देवाचे देव, आजवर खोल हृदयसागरात दाबून ठेवलेली ही प्रेममौक्तिके ज्या मनकवड्या पाणबुड्याने बाहेर काढिली त्यालाच ती दिली नाहीत तर तू सुद्धा मला क्षमा करणार नाहीस! (त्याला अलिंगन द्यावयास पुढे जाते; तो तिचे दोन्ही हात धरतो)

कमलाकर : (स्वगत) याा- हरवलेल्या वीणेच्या ऐवजी ही जोडी सापडली! ठीक! आवाजाच्या धोरणाने इकडे आलो ते वाजवीपेक्षा फाजील

सफळ झाले! आता तात्यासाहेबांच्या लांबलचक कानात अगदी खुबीने यांचा आवाज घुमवायला किती वेळ लागणारा जोधळ्या जयंता, मात्र

आणखी एक क्षणभर असाच रहा (जातो.)

जयंत परमेश्वरा, सर्वहृदयसाक्षी परमेश्वरा, क्षणोक्षणी खचत चाललेल्या माझ्या दुबळ्या हृदयाला या वेळी मेरूमांदारांचे स्थैर्य देऊन या कसोटीच्या प्रसंगातून मला पार पाडलीले, लीले, लज्जाललिते लीले दूर हो! आपल्यावरची जबाबदारी ओळखून दूर हो! आपल्या प्रत्येक आचाराबद्दल, उच्चाराबद्दल प्रत्येक विचाराबद्दल अगदी स्वप्नातल्या स्वप्नात येणा-या तरळत्या कल्पनेबद्दल सुद्धा आपण समाजाला, देवी मानवतेला आपल्या हृदयस्थ परमेश्वराला जबाबदार आहोत! पापविचाराच्या नुसत्या छायेनेही दूषित झालेल्या हृदयाच्या सिंहासनावर विश्वसम्राज्याचा पवित्र प्रभू एक क्षणभर सुद्धा विसांबणार नाही ती पाहा. राक्षसी रुवीशी जिवापाड झगडून मोठ्या कष्टाने आमच्या समाजात एकेक पुढते पाऊल टाकणारी देवी सुधारणा, आमची मूढवृत्ती पाहून खिळल्यासारखी जागच्या जागीच थबकून उभी राहिली आहे! आमच्या उद्धारासाठी, लोकनिदेला न जुमानता स्त्री-पुरुषावर अमृताची समवृष्टी करणारी श्रीविद्यादेवी, आमच्या आचरणाकडे पाहून थरथर कापावयाला लागली आहे तशीच ती पाहा, केवळ परमपावित्र्याच्या दिव्यामृताचेच पान करून अखिल मानवकोटीच्या कल्याणसर्वस्वासाठी हृदयाच्या मंगल ब्रह्मांडात भरा-या मारणारी, तुझ्या हृदयाचे शुद्ध संदेश एकमेकाना सांगणारी श्रीकवितादेवी आपली आवडती कवितादेवी! आपल्या पापनि वासांच्या वातावरणात तिचे कोमल पंख करपून शिथिल होऊन, ती गगनदेवता मातीत मिसळून मातीमोल होऊन जाईल! जाणखी या सर्वांच्याही वरच्या विश्वात तरंगणारी तेजोमय देहधारिणी देवीची देवी श्रीनीतिदेवी आमच्याकडे पाहून काळवंडून जाईला नको नको, लीले, या ईश्वरमय देवतांच्या शापापासून दूर हो! आपला क्षणिक प्रमाद या सर्वाच्या उज्ज्वल मुखमंडलाला काळे फासल्यावाचून राहणार नाही! ते पाहा. पूर्वेकडे मनोमय महन्मंगलाने आपला सर्वसाक्षी नेत्र उघडला आहे! आमच्याकडे पाहून तो रागाने किती लाल झालेला आहे। भगिनी, पवित्रप्रेम-पूर्ण भगिनी, आपल्या बंधूचा हात धरा चल, इहलोकच्या सर्व आशा. प्रेम कल्पना, हृदयवृत्ती या सर्वांच्या, ईश्वरी महायज्ञातल्या या उपेच्या निर्मल वेदिकत आहूति देऊन टाकू, आणि शुद्ध प्रेमाने एकमेकांचे हात धरून उष्ण अश्रूच्या अध्यान या उगवत्या तरी आमच्या अंतर्दग्ध आशा पुन्हा सजीव होतील! प्रीतीच्या साम्राज्यात जेवढे दिव्य, मंगल, पवित्र असेल वयाचा काय तो समावेश होतो! (दोघेही गुडघे टेकून व डोळे मिटून सूर्यासन्मुख होतात. तात्यासाहेब, कमलाकर, मनोरमा व गोकुळ येतात.)

तात्यासाहेब काय पाहतो हे मी? एकाएकी वीणा नाहीशी झाली. तिचा तपासासाठी घरभर फिरताना बागेत बोलण्याचा आवाज ऐकून इकडे आलो. तो हा अघटित प्रकारा

मनोरमा (स्वगत) अगबाई दिवसाढवळ्या असा अंधारा एकमेकाचा हातात हाता सूर्यनारायणा, तूच साक्षी आहेस रा

गोकुळ : (स्वगत) स्त्रीशिक्षणा स्त्रीस्वातंत्र्या पुनर्विवाहा घ्या सा-या सुधारणा एकदम

तात्यासाहेब जयंत, लीले, पुरे झाला हा फाजीलपणा! (दोघे दूर सरतात) फार चांगले आरंभिले आहे हे! इष्ट सुधारणेला अशी अनिष्ट फळे येतील असे मला वाटले असते तर तिचा रोपटा उगवण्यापूर्वीच मी तिचा बीमोड केला असता! तिकडे वीणेचा पत्ता नाही, इकडे तुमचा हा

रोजगारा तोंड काळे करण्याची वेळ आणलीत अगदी

जयंत : नामा, क्षमा करा: अगदी स्वतःचा विसर पडून तुमची आज्ञा-

तात्यासाहेब: चूक झाली माझी आता तिची फळे मला भोगलीच पाहिजेत जयंत मी काय म्हणतो ते नीट ऐकुन घे. आजपासून लीलेशी बोलावयाचे नाही, तिच्याकडे पहावयाचे सुद्धा नाही अगदी योग्य कारणाशिवाय आपल्या खोलीतून घरात तुला आश्रय मिळेल नाही तर चारी दिशा तुला मोकल्या आहेत! सुधारणेचा आला तो अनुभव पुरा झाला जर पाश्चिमात्य सुधारणा इष्टच असतील तर त्यांची पेरणी अगदी सावकाश व्हावयाला पाहिजे. व्यक्तीप्रमाणे समाजावरही आनुवंशिक संस्कार होत असतात. स्त्रियांना पुरुषात मिसळण्याची मनाई करण्याचे कारण व्याभिचारभय; आणि हाडीमासी खिळलेल्या या स्त्रीचे बीज, दुरून एकमेकाकडे पाहणा-या स्त्री-पुरुषांच्या मनात सदैव वागत

असल्यामुळे थोडीशी मोकळीक मिळताच आधी तेच डोळ्यापुढे येऊन उभे राहते! हा संस्कार जाण्याला कालावधी पाहिजे.

कमलाकर : भिन्न पायावर उभारलेल्या समाजाच्या स्त्री एकदम एकमेकावर लादण्याचा प्रयत्न केला तर हेमाडपती देवळावर मंगलोरी कौलाचे छप्पर घातल्यासारखे विसंगत होईल! (सुशीला घाईने येते.)

सुशीला: काका, वीणेच्या खोलीत हे पाहा तुमच्या नावाचे पत्र सापडले. त्यात ती म्हणजे की, मी वसंतरावाबरोबर निघून गेले; माझा त्याच्याशी लग्न करण्याचा निर्धार झालेला आहे. लग्न झाल्यावर आम्ही आमचा पत्ता कळवू तोपर्यंत तपास करण्यात अर्थ नाही!

तात्यासाहेब: वसंतरावाबरोबर कारटी गेली ना?

कमलाकर : मग ती दोघे सुबहंसच गेली असतील! कारण त्या विलायती वेड्याला विलायतेचे चार करायला थोडीशी सवड फक्त बहस मिळण्याजोगी आहे.

तात्यासाहेब तुमचा तर्क बरोबर आहे. कमलाकर, आताच्या आता जी गाडी सापडेल तिने मुंबईस जाऊन बारकाईने तपास करा. चला, एक क्षणही घालवू नका जयंत मी मघाशी सांगितले त्याचा नीट विचार कर लीले, चल पुढे (तात्यासाहेब, कमलाकर, लीला व सुशीला जातात.)

गोकुळ : (स्वगत) बायकांना पाय फुटण्याचा हा हंगाम दिसतो! द्रुमन गेली, वीणाताई गेली. लीलाताई गेल्यासारखीच आहे आमच्या घरातील सुद्धा गेली तेव्हा आता सुशीलाताईंच्या पातळीवर असले पाहिजे! अजून विद्याचर रिकामा आहे या समवयस्क जोडण्याचा भरवसा धरवत नाही मी तर प्रत्यक्ष तात्यासाहेब आणि स्वयंपाकीण आजीबाई या दुकलीवरही आपली दुरुन देहळणी ठेवणारा (जाती)
जयंत : (स्वगत) परमेश्वरा, आमच्या शुद्धत्वाचा साक्षी तू आहेस! मामांच्या या नसल्या गैरसमजाचे निराकरण तुझ्यावाचून दुसरे कोण करणारा

मनोरमा का आता उघडले डोळे?

जयंत कोण तू का? दुःखावर तिरस्काराचा कळस पाहिजेच होता!

मनोरमा : बघितले, घरच्या बायकोला टाकून तिसरीच्या पायावर लोळण घातली म्हणजे चारचौघात अश्शा लाया बसतात! आता तरी ठिकाणावर या!

जयंत नागिणी, मामाच्या वाग्बानानी झालेल्या जखमांवर हे विष कशआला ओततेस?

मनोरमा अगबाई, अजून हेच बोलणे! इतकी फजिती झाली तरी अजून लाज नाही ना?

जयंत मनोरमे, जा माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस.

मनोरमा अहाहा, वाटते का काही बोलायला? फार दिवस ऐकून घेतले हो! आज आपल्याला चांगले राजरोस पकडले आहे!

जयंत मनोरमे मनोरमे, जा; आपले तोड़ काळे कर

मनोरमा आपलेच तोंड काळे झाले आहे बरे! चला, आता कान धरून नेते आणि घरात अडकवून ठेवते, समजला

जयंत त्या घरावर अशी लाथ मारून चालता होतो; समजलीस) (रागाने निघून जातो.)

मनोरमा : (रडत) देवा, मेल्या तुझे डोळे फुटले का आहेत? (कमलाकर प्रवेश करतो.)

कमलाकर (स्वगत) मनोरमेला घरातून काढावयाला हीच संधी आहे! हिचा हा राग शांत झाली नाही, तोच आजच्या आज माझ्याबरोबर

माहेरी जाण्याची कल्पना तिच्या डोक्यात भरवून दिली पाहिजे! घरातून पाऊल टाकले की पूरी ताब्यात आली. (प्रकट) मनोरमाबाई, उठा, रडू

नका अशा

मनोरमा कमलाकर, आज जगदी अखेर झाली हो! मला अगदी लाथेने तुडविले! मनोरमा प्रत्यक्ष नाही हो! पण घरावर अश्शी लाथ मारतो म्हणून निघून गेले! आता घर म्हणजे मी नाही का? शहाण्याला शब्दाचा मार नि

मूर्खाला टोणप्याचा नार!

कमलाकर अरेरे, सुधारणेची सारी फळे बरे ही! पण असे रडून काय होणार? चल घरात

मनोरमा कमलाकर, आता मी घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही अश्शी विहिरीचा रस्ता धरणारा

कमलाकर तुम्ही आईबापांच्या इतक्या आवडत्या, तुमच्या आईला काय वाटेल?

मनोरमा आईला बाबांना तुम्हीच सांगा सारे आता.

कमलाकर तुमच्या वडिलांनी हा प्रकार पाहिला असता तर आकाशपाताळ एक करून सोडले असते!

मनोरमा त्यांच्या हाती काय आहे विचा-यांच्या?

कमलाकर का बरे, दिवाणीत दावा केला तर सरकार उडाणटप्पू नव-याला सक्तीने त्याच्या बायकोच्या ताब्यात देते!

मनोरमा होय का? मग मला पोचवा बाबाकडे! माही म्हणणे ते खास ऐकतील.

कमलाकर पण मी कसा पोचविणार? मला आताच्या गाडीने जावयाचे आहे.

मनोरमा मग मी सुद्धा आताच्या गाडीने येते! ही अश्शी निघते !

कमलाकर : वा तात्यासाहेबांना विचारले पाहिजे! असे कसे जाता येईल तुम्हाला? हा सारा प्रकार प्रथम त्यांनी जयंताला मोकळीक

दिल्यामुळे जरी झाला असला तरी ते तुम्हाला जावयाला परवानगी खास देतील.

मनोरमा भलतेच काही तरी तुम्ही फारच भोळे अहो, त्यांची नाही का यात फजिती व्हायची? ते कशाला देतात परवानगी आणि मी

विचारते तरी कशाला? तेच या सा-या अनर्थाला कारण!

कमलाकर : पण तुम्हाला माहेरी नेऊन पोहोचविल्याबद्दल ते माझ्यावर रागावल्याखेरीज कसे राहतील?

मनोरमा : अहो, त्यांना काहीच कळवायचे नाही यातले मी मुकाट्याने निघते तुमच्याबरोबर म्हणजे झाले.

कमलाकर मग माझी काही हरकत नाही; पण मी पहिल्या गाडीने दिवसा-

मनोरमा आता काही अडचणी काढू नका! कसेही करून मला बाबांच्या घरी नेऊन पोचवा, नाही तर मी काही जीव ठेवणार नाही!

कमलाकर बरे असे करू मी आत्ताच्या गाडीने जातो म्हणून घरातून बाहेर पडतो आणि रात्री बरोबर साडेनऊ वाजता टांगा घेऊन आपल्या मागल्या रस्त्यावर उभा राहतो. साडे नवाची तोफ झाल्याबरोबर तुम्ही घरातून निघून या म्हणजे झाले चालेल असे केले तर?

मनोरमा चालेल कसे तरी करून मला माहेरी पोचवा म्हणजे झाले! पण कोणाजवळ याबद्दल अगदी चकार-

+

कमलाकर वा इतका मी मूर्ख आहे? चला, ते पाहा विद्याधर इकडे येत आहेत. ठरल्याप्रमाणे यावयाला मात्र चुकू नका! (मनोरमा जाते)

कमलाकर : (स्वगत) मानी मनोरमे, शेवटी सापडलीस माझ्या जाळ्यात! आज रात्रीच्या गाडीने द्रुमनला आणि मनोरमेला एकमेकीच्या नकळत निरनिराळ्या डब्यात बसवून मनोरमेसह मध्येच उतरून पडतो म्हणजे झाले! सकाळच्या गाडीने जावयाचा बहाणा केला म्हणजे मनोरमेबद्दल मागे जी ओरड होईल तिच्यात माझे नाव मुळीच निघणार नाही. पण ही पीड़ा कशाला मध्येच आली? (जातो. विद्याधर येतो.)

विद्याधर झालेला प्रकार फार गैर झाला! खरेखोटे केल्यावाचून तात्यासाहेबांनी जयताला एकदम कडक शासन केले! एकट्याला एका बाजूला नेऊन नीट विचारले असते तर फार चांगले झाले असते! त्याला गाठून तसाच थोपवून धरिला पाहिजे. नाही तर या रामाच्या भरात तो आत्महत्या करावयाचा! जयंत जरी उतावळा आणि आत्यंतिक मनोवृत्तीचा आहे तरी अगदी खुल्या दिलाचा, नीतिमान आणि काटेतील सरळ पालीचा आहे! परिस्थितीचा परिणाम अशा माणसावर फारच नौकर होतो. लौकर जाऊन त्याला थांबविला नाही तर भलताच प्रकार झाल्यावाचून राहणार नाही. (जाती).

प्रवेश सहावा

(घाटातील पुलावर गाडी उभी राहिली आहे कमलाकर व मनोरमा एका डब्यात)

मनोरमा मेल्या मागा, एका भोळ्या भाबडया गाईला अशी एकटी गाठून तिचा गळा कापतीस? परमेश्वरापुढे याचा काय जाब देशील?

कमलाकर परमेश्वरासमोर उभे राहण्याचा माझा मुळीच विचार नाही! मनोहर मनोरमे, आता आरडाओरड करण्यात काय हशील आहे? घाट संपण्यापूर्वीच माझा मनोरथ-

मनोरमा मेल्या, तुझी जीभ झडून जावो! आता अशी उलट गाडीने जाऊन तुझ्या काळ्या कर्माचा जगभर डांगोरा वाजवितो. कमलाकर मूर्ख मनोरमे, तुझ्या घरातून बाहेर पडणा-या चोरट्या चालीकडे लक्ष देऊन मग या पोरखेळाच्या गोष्टी सांगा आपण होऊन माझ्यामागे निघून आलीस असे मी सांगितले तर तुझी काय वाट होईल? बायकाची बदनामी करण्यात आनंद मानणारे आमचे लोक तुझ्या कडू सत्यापेक्षा माझ्या असत्यालाच उचलून धरतील! मग अशा साहसाने निर्दोषपणावरही पापाचा शिक्का मारण्यापेक्षा पापावरचः

निर्दोषपणाचा मुलामा का लावीत नाहीस? मनोरमा राक्षसा, तात्यासाहेब मामजीच्या पायावर लोळण घेईन, तिकडच्या मनाची खात्री करून देईन, आणि तुला यांच्याकडून तुझ्या पापाचे शासन देववीना! कमलाकर ते काय शासन करणार! फार झाले तर त्यांच्या घरचा आश्रय तुटेल! पण लहानपणीइतकी मलाही त्यांच्या आश्रयाची आता जरूर नाही. पंख फुटलेल्या पक्ष्याच्या पिलाला घरट्याचा आधार देणा-या फांदीची काय परवा? ती फांदी कडाडली तरी ती मोडून पडण्यापूर्वीच त्याला दुस-या झाडावर झेप टाकता येते. पण काय मी मूर्खी उगीच बोलून वेळ चालवीत आहे मानी मनोरमे,

जितक्या उतावळेपणाने घरातून माझा हात धरून बाहेर निघालीस तितक्याच उतावळेपणाने अस्सा तुझा हात धरून (तिचा हात धरावयास

जातो.)

मनोरमा पण त्यापेक्षाही उतावळेपणाने मी जगाबाहेर निघून जाते! देवा, घे मला पदरात (डब्यातून खाली पुलावर उडी टाकते, पण पुलाच्या तारातच अडकून मूर्च्छित पडते.)

कमलकार मूर्ख मनोरमे गेलीस! प्राणाचे मोल देऊन शील सांभाळलेस! दोन पर्वताच्या विशाल ओठावरून आणि पुलाच्या दंतपंक्तिंतून काळाच्या या खोल दरीच्या जबड्यात गडप झालीसा अरे, क्षणभर थाबलेली गाडीही चालू झाली! काही हरकत नाही. उद्या सकाळी घारीगिधाडाना मनोरमच्या दगडावर पडलेल्या मासखंडाची मेजवानी दिल्याचे समाधान काही थोडे-थोडके नव्हे!

(गाडी निघून जाते. पडदा पडतो).

Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
3
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा