shabd-logo

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023

38 पाहिले 38
अंक चवथा

प्रवेश पहिला

(स्थळ भूतमहाल)

विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे गावात जावे यावे लागते बाकी आजपर्यंत झालेल्या जबन्यावरून आणि साक्षीवरून खटल्याचा निकाल काय होणार हे उघड दिसून येतच आहे कोणी कपटाने पसरून ठेविलेल्या जाळ्यात बिचारा जयंत अचूक सापडला आहे अशा जिवलग आणि उदार मित्रासाठी काय वाटेल ते करण्याची माझी तयारी आहे पण उपयोग काय? फिर्यादी पक्षाचा पुरावा इतका भरपूर आहे की, जयताने मनोरमेचा खून केला असा निकाल पंचांना एकमताने द्यावाच लागेल! मनोरमेच्या प्रेताचे तुकडे पेटीत भरून ती विहीरीत टाकण्यासाठी रात्री जयंत आला कसा हे मोठे नवल आहे नाही म्हणावे तर तिचे डोके त्याच्या हातात! प्रेत मनोरमेचे नाही म्हणावे तर पेटीत तिचे दागिने, पत्रे वगैरे पुराव्याला हजरा आता खटला बहुतेक संपल्यासारखाच झाला आहे येऊन जाऊन त्या पत्राबद्दल आमच्या बाजूने गोकुळची तेवढी साक्ष कावयाची राहिली आहे पण तिचा काय उपयोग? ती होऊन न होऊन सारखीच! अरेरे! गरीब विचारा जयंत फुकट प्राणाला मुकणारा पण या उलाढाली कोणी केल्या? परमेश्वरा, मानवी मनीला कुठित करणारे हे कोडे सोडवायला तूच अकल्पित देवी साहाय्य पाठवशील तरच बिच्चारा निरपराची जयंत सुटणार आहे (दरोडेखोर येतात) दरोडेखोर राम राम, रावसाहेब! आज इतके दिवस हेलपाटे घालतो आहे, तेव्हा आज आपली गाठ पडते आहे?

विद्याधर : कोण रे बाबा तू?

दरोडेखोर मी आपला मानकाप्या दरवडेखोर नको का?

विद्याधर : (स्वगत) हरहर परमेश्वरा निव्वळ थट्टा मांडली आमची मी साह्याची अपेक्षा करताच हे उत्तर पाठविलेस!

दरोडेखोर का रावसाहेब, अंधारातली ओळख उजेडात पटन नाही वाटत! आपणच नाही का त्या दिवशी रात्री ती पेटी मला उजेडात न्यायाला सांगितली?

विद्याधर : (स्वगत) पेटी? खास कमलाकराचे काही कुलंगडे असावे ! (प्रकट) पेटी? हा हा, ती पेटी म्हणतोस? आले लक्ष्यात बरे मग तिचे

काय म्हणतोस आता?

दरोडेखोर त्या वेळी आपण मला शंभर रुपयांची नोट दिली

विद्याधर दिली. मग पुढे काय?

-

दरोडेखोर अहो ती नोट नाही? हा पहा चुकून आपण भलताच कागद मला दिला ता घ्या आपला कागद आणि (विद्याधरास कागद देतो.)

विद्याधर (कागद पाहून धपापतो स्वगत काय? मनोरमे अजून जिवता परमेश्वरा तुला दोष दिला त्याची क्षमा करा

दरोडेखोर आहे ना आपलाच कागद

विद्याधर : शंकाच नाही! मी आज किती दिवस त्याच्या तपासात होतो; शाबास, तू मोठेच काम केलेस,

दरोडेखोर मग आता मला नोट मिळावी एवढाच अर्ज आहे!

विद्याधर : (नोट देऊन या एक सोडून दोन! ही एक शंभराची पहिल्या कामाबद्दल आणि ही दुसरी, हा कागद परत आणून दिल्याबद्दल.

दरोडेखोर वाहवा! रावसाहेब आपणच आमच्यासारख्या गरिबांचे पर्शिदा

विद्याचर: पण माझे अजून तुझ्याशी बरेच काम आहे।

दरोडेखोर आपला गुलाम आहे मी. साहेब!

विद्याधर : कोठला आहेस तू?

दरोडेखोर मूळचा राहणारा होय? चोरांच्या आळंदीचा

विद्याधर नाही नाही. येथे राहतोस कोठे? तुझा पत्ता पाहिजे!

दरोडेखोर असे म्हणता? मी राहतो वेताळ पेठेत मोठ्या म्हसोबाच्या समोर आणि खुन्या मुरलीधराच्या उजव्या हाताला (विद्याधर पत्ता

टिपून घेतो)

विद्याचर नेहमी तुझ्याशी काम पडते तेव्हा पत्ता उतरून घेतला! नाव काय म्हणालास तुझे

दरोडेखोर च्या मानकाप्या दिवसा हमेशा घरी सापडावयाचा मी.

विद्याधर बरे जा तू आता सध्या मी फार कामात आहे!

दरोडेखोर ठीक आहे आपली गरिबाची ओळख असू द्या एवढेच मागणे आहे. विद्याधर का हे काय विचारतोस? तुझ्यावर सारी आमची मदारा (दरोडोखोर जातो.)

विद्याधर (स्वगत) अहाहा! परमेश्वरा निरपराध्याचा तू खरा साह्यकारी आहेसा हा कागद म्हणजे जिवलग मित्राचा प्राण वाचविणारी साक्षात संजीवनीच! याच्या साह्याने जयंत एका क्षणात दोषमुक्त होईल मुळी खूनच झाला नाही तर अपराध कोठला राहणार? द्रुमनने आत्महत्या केली, तिचे प्रेत कमलाकराने पेटीत भरून नेले, लीलेला भेटण्यासाठी आलेला जयत आयताच या हरामखोराच्या जाळ्यात सापडला, आणि मनोरमा घाटपायथ्याच्या दवाखान्यात पडली आहे. द्रुमनने स्पष्ट लिहून ठेवले आहे सारी दुमन, मरता मरता केवढा उपकार करून गेलीसा कमलाकराबरोबर कथा फसगतीने गेली याचा सुद्धा साफ उलगडा या पत्रात केला आहे. चला, आता कामाला लागले पाहिजे नुसत्या या पत्राने काम भागावयाचे नाही मरणोन्मुख झालेली मनोरमा कदाचित मेली तर पुन्हा पंचाईत व्हावयाची गाडीची वेळ झाली आहे. याच गाडीने निघतो ती कोणत्या दवाखान्यात आहे हे नक्की कळले असते तर बरे झाले असते. घाटपायथ्याला जातो आणि तपास करतो! निदान ती मेली असल्यास तिच्या मरणाच्या ख-या प्रकाराचा तेथील अधिका-यांचा दाखला आणतो! गावात जाऊन ही हकिगत सांगावयाला सुद्धा वेळ नाही वेळ तर पालवून उपयोगी नाही घाटपायध्यावरून तात्यासाहेबांना तार करून खटल्याची मुदत वाढविण्याचा अर्ज करायला सागतो! परमेश्वरा, मी जाईपर्यंत मनोरमेला मात्र जिवंत ठेव म्हणजे झाले. (जातो. पडदा पडतो)

प्रवेश दुसरा

SG Kis all 85

(हातात कागद घेऊन गोकुळ प्रवेश करतो)

गोकुळ (कागदाकडे पहात वाक्ये पुटपुटून) छे युवा या जयताच्या खटल्याने जीव जेरीस आणला अगदी! आज इतके दिवस ही साक्ष सारखा पाठ करीत आहे; पण चार प्रश्नोत्तरांपलीकडे मजल जात नाही. आणि या वकिलांचा म्हणजे साक्षीदारावर मोठा कटाक्षा भारतीय युद्धातल्या सेनापतीची आणि या वकिलाची लढण्याची एक रीत आहे अगदी म्हणजे मुख्य मालक धर्मदुर्योधनाप्रमाणे रहावयाचे बाजूला आणि खटल्यातला या सेनापतीचा साक्षीदारांच्या फौजेवर सारखा हल्ला फेरतपासणीच्या चक्रव्यूहात एखादा प्रतिपक्षाचा वार सापडला, की मारे. त्याच्यावर दरखास्त, सुनावणी कैफियत, हुकूमनामा या वाग्बाणांचा मारा सुरू व्हावयाचा काय हे शब्दा दरखास्त जातमुचलका फैसला! बोलताना कसे अवसान भरते अगात! मला वाटते या सा-या शब्दांना एक अर्थ असावा किंवा एकाही शब्दाला कोठलाय अर्थ नसावा, आज पंधरा दिवस या शब्दांनी अगदी भंडावून सोडिले आहे स्वप्रात सुद्धा मोठमोठाल्या अक्षरांनी लिहिलेले हेच शब्द दिसतात वकिलाचे नेहमी कसे होत असेल कोणास ठाऊक? आमच्या समोरच्या वकिलाने जर माझ्यावर या शब्दाचा मारा केला तर मीही पण उलट मारा करणार! त्याने म्हटले 'दरखास्त' की आपण म्हणावे 'कैफियत' आणि मला सतावून सोडण्यासाठी तो खात्रीने हे विचारणार. वकिलाच्या अंगात पक्षकार संचरला, की तो अगदी बेफाम होतो. परकाय प्रवेशाच्या विद्येवर ज्याचा भरवसा नसेल त्याने वकिलाकडे पहावे! पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिलावे वैसा! छे! पण पाण्याचा रंग दुसरा पदार्थ त्यात असेपर्यंत तरी कायम राहतो! वकील खटला संपण्याची वाट पहात नाही! आता एकमेकांच्या मानगुटीस बसणारे वकील घटकेने एकमेकांच्या गळ्यात गळा घालून बसतील! वकिलाला फक्त एका परिसाची उरफाटी उपमा शोभेल परिसाचा स्पर्श होताच लोखडाचे सोने होते आणि वकिलीच्या स्पर्शाने सोन्याचे लोखंड होते! वकिलाने पक्षकाराला एकदा हाती धरले, की बिचा-याच्या हातातल्या सोन्याच्या लकडीच्या लोखंडी बेड्या बनावयाच्या वकिलाचा धंदाय असा हजारो पक्षकारांची घरे बसवावयाची आणि आपले घर उभारावयाचे! लोकानी बेअब्रू केली, की यांची अबू वाढली! मग का पैशाच्या देववीच्या खटल्यात पैसे काढून जसे हे पैसेवाले बनतात तसे अब्रुनुकसानीच्या खटल्यातून प्रतिवादीने घेतलेली वादीची अबू परत भरून देवविताना मध्ये असूची दलाली काढून अबूदार होतात कोणास ठाऊक! बरे इतक्या वड्यांच्या घालमेलीत जन्म घालविताना तरी वकील स्वतः त्यात कधी पडावयाचा नाही! न्यायाच्या बाजारातला हा दलाल स्वतः कज्जेदलाल कधी नसावयाचा! संसारात राहून संसारापासून अलिप्त राहिल्याबद्दल तुकाराम प्रौढी मिरवितो; पण या वकिलांत असे हजारो संसर्गरहित तुकाराम दाखविता येतील! पण जाऊ चा या खटल्याच्या दगदगीने मी सुद्धा अर्धामुर्धा वकीलच झालो आहे, तेव्हा पर्यायाने स्वतःचीच नालस्ती करण्यात काय अर्थ ही साक्ष उद्याला पाठ झालीच पाहिजे! काय करावे? नुसते सवालजवाब आपल्याशी म्हणून उपयोगी नाही प्रश्न कोणी तरी विचारावयाला पाहिजे होते; म्हणजे उत्तरे द्यावयास ठीक पडले असते! पण कोण मिळणार असे? ती जर या वेळी असती तर किती उपयोगी पडली असती! पण ती कोठली यावयाला

येथे या वेळी!

(मथुरा येऊन एकदम त्याचे पाय धरते)

गोकुळ : अरे बापरे! कोण? मथुरा? दरखास्ता कैफियता

मथुरा हो मीच मी चुकले! मला क्षमा करा.

गोकुळ : (स्वगत) पत्राचा परिणाम झाल्यासारखा दिसतो (प्रकट) नाही खरे वाटत! मथुरे, तू क्षमा मागणार? ही भुताटकी असली पाहिजे!

मथुरा: आता माझा अंत पाहू नका मी आजपासून आपल्या आज्ञेबाहेर कधी वागणार नाही! हे पाहा बाबानी पत्र दिले आहे! (पत्र देते)

गोकुळ : (पत्र वाचून) असे! ऊठ, तुझ्या क्षमेचा अर्ज आहे एकूण मला वाटले की, माझे पाय धरून तू माझा कब्जा करून घेणार! ऊत

मथुरा मला क्षमा केल्याखेरीज मी हे पाय सोडणार नाही...

गोकुळ हा क्षमेचा अर्ज आहे! मथुरे यांचा निकाल कायद्याबरहुकुम केला पाहिजे! उठ रहा अर्जदारासारखी उभी! अर्जाची सुनावणी ही झालीच पाहिजे! उठा (मथुरा उठून दूर उभी राहते.)

मथुरा का बरे उगीच छळ असा हा? क्षमा करावयाची एकदा लौकर

गोकुळ अशी कायद्याच्या कामात घादल उपयोगी नाही! त्यातून हा तर घरातला ताबा मिळविण्याचा दिवाणीतला दावा। यात तर तारखा पुढे सारख्या टाकीतच गेले पाहिजे! दिवाणीच्या दाव्यात दिरंगाईखेरीज शोभा नाही! एकदा एका गृहस्थाने बायको ताब्यात मिळण्यासाठी दिवाणीत दावा केला; तेव्हा, तो खटला त्या गृहस्थाच्या हयातीपर्यंत चालून अखेर त्याच्या मुलाच्या नावाने हुकूमनामा झाला

मथुरा पुरे ही थट्टा करायची ना क्षमा

गोकुळ ही नुसती खटल्याची सुनावणी झाली अजून इंगा तर पुढेच आहे! दरखास्त न कैफियत न् मुकदमा! बरे. तुझ्यातर्फे वकील कोणता?

मथुरा: माझे वकील, माझे न्यायाधीश, सारे आपणच.

गोकुळ : बेडी रे वेडी! न्यायाधीशाला कधी वकील होता येईल का? बरे, एकतर्फी निवाडा देऊा ऐक आता निकाल. अर्जदार मथुरा कीम गोकुळ अह कोम हलक्या जातीसाठी वापरावयाचा ब्राह्मणांसाठी काय बरे शब्द आहे? (आठवण करीत बसतो)

मथुराबाई, बाई, शर्थ झाली आता!

गोकुळ ठीक आहे: चुकभूल द्यावी घ्यावी. शब्द आठवला म्हणजे कळवू . अर्जदार मथुरा कोम गोकुळ, तू अर्जात मागितल्याप्रमाणे तुझ्या नावे क्षमेचा हुकूमनामा देण्यात येऊन सरकारात ताबेगहाण पडलेल्या घराचा हक्क तुझ्या नावे नोंदविण्यात येत आहे. परंतु एक महिनाभर सरकारकडे ही मिळकत नजरगहाण राहून तुझ्या वागण्याकडे सरकार सारखे लक्ष देईल! वर्तन कमजास्त दिसले, की मिळकतीवरचा हक्क उडवून तुला माहेरी राहण्याची शिक्षा होईना आहे कबूल?

मथुरा आहे कबूल! आहे कबूला पण हे काय भलतेच वेड?

गोकुळ : है, कोर्टाचा अपमान होत आहे हा! वेढे, या जयताच्या खटल्यासाठी कोटांत बसून बसून ही किफायत केली आहे. समजलीस?

फौजदारी खटल्याची तोंडाला मिठी बसली की. चव बदलण्यासाठी दिवाणीकडे धाव घ्यायची.
मथुरा बिचा-या जयंतावर नसते संकट आले है!

गोकुळ : बरी आठवण केलीसा माझी उद्या साक्ष आहे! तेवढी पाठ म्हणून घे पाहू. मी आताच तुझी आठवण केली! आता तू कोर्ट हो, बैस या खुर्चीवर है, लाजू नकोस! ही सारी रंगाची तालीम झालीच पाहिजे! घे हा कागद! चल बैस लौकर,

मथुरा: इश्श, हे काय भलतेच!

गोकुळ : बैस लौकर है, बसते आहेस का पाठवू माहेरी पुन्हा कोर्टाला?

मथुरा है. ही घ्या बसले!

गोकुळ : अस्से लकडीशिवाय मकडी वळत नाही! या कागदातला एकेक प्रश्न विचार आता!

मथुरा (कागद वाचून) ईश्वरसाक्ष खरे सांगेन, खोटे सांगणार नाही. गोकुळ : ईश्वरसाक्ष खरे सांगेन, खोटे सांगणार नाही अन हा काही प्रश्न नाही! नुसते म्हणा, मम आत्मनः श्रुतिस्मृती यातला हा प्रकार आहे!

ह, पुढे..

मथुरा: तुमचे नाव का?

गोकुळ : गोकुळ

मथुरा: बापाचे नाव?

गोकुळ वृंदावन

मथुरा: आडनाव?

गोकुळ : विसरभोळे.

मथुरा: तुमचे वय काय?

गोकुळ : वय काय बरे ठरविले आहे? छे: नाही येत लक्षाता एक अक्षर साग पाहा

मथुरा: पं

गोकुळ पंधरा!

मथुरा: भलतेच काही तरी! खरे तरी वाटेल कोणाला?

गौकुळ : अरे हो, पंचवीस! (घोकतो) छे. हे वय दगा देणार! आकडा लक्ष्यात ठेवणे मोठे कठीण! आण पाहू तो कागद (कागद घेऊन घोकतो.)

मथुरा: काही तरी खूण बसवून ठेवावी त्या आकड्याची.

गोकुळ : हो, हो, हा प्रश्न आहे पाचवा तेव्हा पाचा पाचा पंचवीसा प्रश्नसंख्येचा वर्ग केला, की झाले काम! पंचवीस!

मथुरा आणि वकीलाने पवव्यादाय हा प्रश्न विचारला तर?

गोकुळ : जरेच्या खरेच फटदिशी चारचोक होऊन नऊ वर्षांची खोट बसायची काय करावे बरे?

मथुरा: खरेच मोठी पंचाईत आहे ही!

गोकुळ हा पेच असतात पाचा तेव्हा पाच पंचात हातापायांची बोटे मिळविली की झाले पंचवीस

मथुरा: पण भीतीने घाबरून हातपाय गळाले तर बोटे कोठली आणणार?

गोकुळ आणि डोळ्यापुढे अंधारी आली तर पथ तरी कोठून दिसणार! इकडूनही अडचण आहे (कागदाकडे पाहून) हा हा, आठवली अगदी

सोपी युक्ती!

मथुरा: कोणती ती?

गोकुळ : गोकुळ वृंदावन विसरभोळा माझ्या नावात अक्षरे आहेत बारा तेव्हा स्वतःच्या नावातल्या अक्षरांना दोन्ही बाजूच्या दोन वकिलानी गुणून त्यात एक न्यायाधीश मिळवला की झाले बारादुणे चोवीस आणि एक पंचवीस!

मथुरा: पण न्यायाधीशाकडे पहावयाचा होईल का धीर?

गोकुळ जी न्यायाधीश नाही तर आरोपी मिळवला नगास नग असला म्हणजे झाले! बरे, पुढे, सहावा प्रश्न

(कागद तिला देतो)

मथुरा: तुमचा धंदा काय?

गोकुळ अरे, घदा कोणता सांगावा? हा चंदा वाटेल ती गोष्ट विसरण्याचा!

मथुरा आणि जेवणाखाण्याची सोय?

गोकुळ : तेही विसरलो! पण नाही, हा प्रश्न तुझा आहे मी फिरून उत्तर देतो की, मी उत्तर देण्याचे नाकारितो ! या प्रश्नाला माझी हरकत आहे! अशी सावधगिरी ठेवावी लागते बघितलीस!

मथुरा: बरे, ही इतकी सावधगिरी ठेवण्यासारखी साक्ष तरी महत्त्वाची आहे का?

गोकुळ महत्त्वाची? अगं, माझ्या साक्षीवर तर सारी भिस्त आहे आमची नाही तर जयताला चार वेळा फाशी जाण्याइतका पुरावा आहे! पण

माझ्या शब्दासाठी त्याची सुटका आहे। या खटल्याचा चालक, याचा सूत्रधार, तर मीच आहे उगीच नाही साक्षीसाठी जिवाचा आटापिटा चालविला इतका घरात ती कायद्याच्या पुस्तकाची रास पाहिलीस? वकीलावर ताण झाली आहे माझी!

मथुरा: एका खटल्यातल्या साक्षीने वकिलीपर्यंत मजल गेली. मग चार खटल्याच्या भानगडीने आपण न्यायाधीशच व्हाल! आता आपल्या

बाजूला काही वकिलाची जरूर राहिली नसेल?

गोकुळ अरेरे, अगदी विसरलो! आमच्या तर्फेचा विद्याधर वकील कालपासून कोठे गडप झाला आहे. पत्ता नाही आजपर्यंत खटल्यातले आरोपी फरारी होत असत; पण वकीलच परागंदा झाल्याचा हा पहिला घटला आहे! त्यामुळे तात्यासाहेब मोठ्या फिकिरीत पडले आहेत आणि सारखे वकिलाच्या शोधात आहेत. मी दोन चार वकिलाकडे नन्नाचा पाढा ऐकून आलो, ते तात्यासाहेबाना सांगावयाचे राहिले आहे!

वकील कोणी नाही.

मथुरा: मग आपले वसंतराव नाही का चालावाचे? ते वकीलच आहेत ना!

गोकुळ पण त्याचा पत्ता आहे कोठे? ते वीताबरोबर कधीच फरारी झाले आहेत.

मथुरा: हात्तीच्या. एवढेच ना! त्याचा पत्ता मी सांगते ती दोघेही आमच्या बाबांच्या शांतिसदनात आहेत.

गोकुळ काय म्हणतेस? मग आत्ताच्या आता हे तात्यासाहेबांना कळविले पाहिजे म्हणजे तारेने बोलावल्याबरोबर उद्याच वसंतराव येथे येतीला जा. तू घरातले पाहा आता मी जाऊन येतो (ती जाते.) वसंतरावांचा पत्ता सांगितला हे फार नामी झाले आणि मथुरा ताळ्यावर आली हेही नामी झाले! आता आपला मूळचा विसरा स्वभाव विसरला पाहिजे. आणि तेवढेच जरा कठीण आहे एखादी गोष्ट विसरण्याची अडचण मला जन्मात प्रथम भासते काय ती याच वेळी! हिला अगदी कह्यात ठेवले पाहिजे सारखे! हे याच त्या खुर्च्या आम्हाला तिने ओढावयाला लावल्या, नाही का? आता घेतो सूड! अग ए मधुरे, आलीस का? दरखास्त! कैफियत! (मथुरा येते) त्या दिवशीच्या त्या खुर्च्या, ने पाहू ओढून आत! चलाव, मुकदमा, हुकूमनामा? काय जोर आहे शब्दाता (मथुरा खुख नेते) आपण तर पुढे मागे पौरांची नावे सुद्धा हीच ठेवणारा दरखास्त, कैफियत, जप्ती ही मुलींची नावे: आणि मुकादम हकूमनामा, फैसला ही मर्दानी नावे मुलांना आणि स्वतः मुक्त्यार वकील

होणारा बरस ठरला हा कायम बेता (जातो. पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा

(कमलाकर प्रवेश करतो.)

कमलाकर : काय चमत्कार आहे! जयताच्या गळ्याभोवती फास बसावयाची वेळ आली तरी या मूर्ख पोरीच्या त्याच्या गळ्याभोवतालच्या मिठ्या सुटत नाही. अजून एका दृष्टीने भाग्यवानच म्हणायचा! एकंदर जगात हाच प्रकार दिसून येतो! ज्याला जे नको तेच त्याला मिळावयाचे! तात्यासाहेब, तरी या जयंताला सोडविण्याची खटपट का करीत आहेत कोणाला ठाऊक? विद्याधर मात्र मनुष्य खरा! जयताच्या वशिल्याने घरात नाचावयाचा यापूढे संभव नाही असे पाहून त्या राजश्रीनी पळता पाय काढला! त्याची या पोरीवर खरोखरीच नजर होती, की नुसता हा माझा तर्क आहे? उदाची उपजत पाठीची कमान पाहून मांजराला उट रागावल्याची शंका यावी तशातला माझ्या मनाचा संशय तर नसेल? या वसंताने जयताचे वकीलपत्र घेतले हे ठीक झाले! या विलायती वेड्याच्या हातून काय होणार? (तावाला येतो.) कमलाकर : काय रे? काही तार आहे काय?

तारवाला होय भाऊसाहेब, तात्यासाहेबांच्या नावाची तार आहे.

कमलाकर मग मी सही करून दिली तर चालेल ना?

तारवाला : न चालायला काय झाले? नेहमी तर तुम्ही त्यांची तार, पत्रे घेता ही घ्या. (तार देतो. कमलाकर सही करून देतो.)

तारवाला रामराम साहेब.

कमलाकर (आर्श्वयाने) विद्याधराची तार ही खटल्याची तहकुबी मगावी म्हणून तात्यासाहेबांना सांगतो आहे हा! का बरे? याला काही पत्ता लागला आहे की काय? आठ दहा दिवस यावयाला सापडत नाही; जरूरीचे काम आहे म्हणतो: ठीक आहे! माझ्याच हाती आली हे नशीब म्हणायचे! ही तार आता चालली काळाच्या कबजात! इतकेच नाही, पण आता टपालावर सात-आठ दिवस विशेष नजर ठेवली पाहिजे! चला, खटला चालावयाची वेळ झाली! आज खटल्याचा निकाल, बहुधा जयताचाच निकाल लागणार! (जातो. पडदा पडतो.)

प्रवेश चवथा

(विद्याधर, डॉक्टर, फौजदार, मनोरमा मरणोन्मुख निजली आहे.)

मनोरमा विद्याधरपंत, माझ्या अविचाराने मी त्यांना इतक्या सकटात पाडिले आणि आता स्वतः तर घटकेची सोबतीण होऊन बसली आहे.

विद्याधर: मनोरमाबाई, झाल्या गोष्टीला इलाज नाही. अरेरे! तुम्ही घाटपायथ्याच्या दवाखान्यात राहिला असता तर तुमचा पत्ता लौकरच लागून जयंताची आणि तुमची दृष्टीभेट तरी झाली असती.

मनोरमा : हे काळे तोड घेऊन त्याच दवाखान्यात कसे राहता आले असते? बाबासाहेब मामजी दोन दिवसातच परत दवाखान्यात येणार होते, म्हणून दुमनताई गेल्याबरोबर मी पण तेथून निघून या दवाखान्यात आले. आता माझ्याने जास्त बोलवत नाही. विद्याधर मग काय, डॉक्टरसाहेब, यांना आता येथून हलविणे शक्य नाही म्हणता? डॉक्टर (हळूच हा प्रश्न विचारण्याचे कारणच नाही.

आज पाच सहा दिवस बाईंची प्रकृती सारखी बिघडत चालली आहे. आज तर आता घटकेचा भरवसा नाही; बहुतेक अर्ध्या तासाच्या आतच-

मनोरमा डॉक्टरसाहेब, आता हळू कशाला बोलता? मरायला मी भीत का आहे?

विद्याधर : मग फौजदारसाहेब, आपण यांची ही स्थिती पाहिलीच आहे; त्याबरहुकूम एक दाखला मला लिहून द्या, की जिचा खून झाला ती बाई येथे आहे म्हणून!

मनोरमा : आता आहे म्हणून कशाला हवे! विद्याधर, त्यांचे पाप पुरे झाले. त्याबद्दल त्यांनी भोगावयाच्या त्या यातना भोगल्या! त्यासाठीच

देवाने मला जन्माला घातली! माझ्यासाठी त्याच्याजवळ क्षमा मागा! झाले! माझ्याने आता बोलवत नाही. जयंत, क्षमा करा देवा आले- आता

मला--- (मरते)

विद्याधर : अरेरे! किती भयानक शेवट हा! हा सारा आततायी वृत्तीचा परिणाम!

फौजदार : जाऊ द्या; ही खेद करीत बसण्याची वेळ नाही. खटल्याची तुम्ही जरी दहा दिवस तहकुबी मागितली आहे तरी तुम्ही लवकर जावे हे बरे. आमच्याकडला आणि डॉक्टरसाहेबांकडला दाखला घेऊन तुम्ही आताच्या गाडीनेच येथून निघा. खरे की नाही डॉक्टरसाहेब?

डॉक्टर : रास्त आहे आपले म्हणणे! त्याचप्रमाणे विशेष पुराव्यासाठी हे प्रेत आम्ही असेच ठेवतो.

फौजदार : प्रेत ठेवण्याची काही जरुरी नाही. येथील चार वजनदार लोकांसमक्ष पंचनामा केला म्हणजे झाले!

विद्याधर : हो, तसे करावे तेच बरे चला, आता त्याच खटपटीला लागू


प्रवेश पाचवा

Page -

39

(स्थळ कारागृह)

जयत: हातातील पत्राकडे पाहून) एक गोष्ट-लीले केवळ एकच गोष्ट समजण्यासाठी मी आज इतके दिवस तुझी विनवणी करीत असताना आज या पत्राच्या रुपाने माझे समाधान करीत आहेस मी अपराधी आहे असे सर्वांचे एकमत झाले तरी लीले, तुझ्या आश्वासनाच्या एका शब्दासरसा मी स्वतःला धन्य समजेना लीलेची प्राप्ती करून घेण्यासाठी मी मनोरमेला मारीन काय? मग यापूर्वीच दुसरे लग्न करून घ्यावयाला मला कोणाची हरकत होती? पुरुषाच्याच सुखासाठी अवतरलेल्या आमच्या समाजाने दुस-या लग्नाच्या वेळी माझ्यावर पहिल्याइतकाच उत्साहाने आनंदाच्या अक्षता उधळल्या असल्या आणखी तिसरे लग्न केले असते चौथे केले असते अगदी वेश्यामगन केले असते तरी सुद्धा समाजाने माझे तोंडापुरते अभिनंदन केले असते- मला कृष्णास्वरूप समजूनही माझी अवतारी पुरुषांत सुद्धा गणना केली असती! पण, लीले, असल्या अन्यायी सवलतीचा फायदा घ्यावयाची कल्पना माझ्या मनाला तरी शिवली होती का? या एकतर्फी सुटकेने मी कदाचित सुखी तुझ्याशी पुनर्विवाह करून खात्रीने सुखी झालो असतो पण, लीले, माझ्या दुस-या लग्नाच्या समारंभाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहताच मनोरमेची मूर्ती माझ्यासमोर उभी रहात असे त्या स्थितीतल्या तिच्या मनाची कल्पना करताना माझे मन विरघळून जात असे. माझ्या सुखाची हानी झाली तशी तिच्या सुखाची हानी झाली आहे, या विचाराने मी भांबावून जात असे तोच मी. लीले, बाबासाहेबांनी तुला पुनर्विवाहाची मोकळीक देताच तिचा जीव घेईन? छे छे । असा नुसता उडता विचार माझ्या डोक्यात असता तर भी आपल्या हाताने माझे ढोके उडवून टाकले असते! माझे हृदय कसे आहे याची पुरेपूर साक्ष तुला पटली असूनही, लीले, मी निर्दोष आहे की नाही हे मला कळविण्यासाठी तू हा पत्राचा रस्ता शोधून काढिलास! या पत्रात कदाचित अनिष्ट मत असेल या भीतीमुळे अजून मला ते उघडून पाहण्याचा धीर होत नाही. उद्या न्यायाधीशाच्या तोंडचे निकालाचे शब्द ऐकण्यापेक्षा या पत्रातल्या शब्दाभोवतीच आत्मा घुटमळत राहिला आहे. पण मी आता मनाचा पक्का धडा केला आहे. पत्राच्या आरंभीच जर भलत्या कल्पनेचा पूर्वरंग दिसू लागला तर अश्रूनी पत्राचा पुढचा भाग साफ धुऊन टाकीन आणि सशयमग्र चित्ताने लीले, तुझा कठोर निवाडा पुरतेपणी ऐकून घेतल्यावाचून उद्या प्राण सोडीना (पत्र फोडून पाहतो.) काय पाहतो हे मी? अगदी कोरे पत्रा लीले. माझ्या हृदयाप्रमाणेच शून्यवृत्ती झालेल्या या को-या पत्रावरून मी काय समजू? या कारागृहातल्या या अंधारामुळे ही पुसटलेली अक्षरे दिसत नाहीत? (नीट पाहून) छे! छे! आता या पत्राचा अर्थ पुरता लक्ष्यात आला! या पत्रावर नुसता अश्रूचा पाऊस पाडून ठेविला आहे. कारागृहातला काळोख कितीही काळाकुट्ट असला तरी हृदयात असा लख्ख प्रकाश-प्रेमाचा प्रकाश पडल्यावर ही प्रेमाक्षरे कुठे लपून राहतील? अहाहा! मी निरपराध आहे, अशीच लीले, तुझी खात्री आहे ना? पण आता असल्या शंकेचे कारणच नाही! तुझे माझ्याबद्दल वाईट मत असले तर ते दाखविण्यासाठी हा अश्रूंचा पूर धावत आलाच नसता, पत्र पुढे ठेवून कोणत्या शब्दांनी आपल्या हृदयाचे प्रतिबिंब त्यावर उमटवावे या विचाराने तू क्षणभर गोंधळली असशील, इतक्यात हृदयातल्या या अश्रूनी पत्रावर उडी टाकून तुला नकळत त्याचे हे निर्मल चित्रे रेखाटले असेल. लीले, आजपर्यंत चित्रकारांनी मनुष्याच्या बाह्याचे चित्र काढले असेल, महाकवींनी त्यांच्या जरा पुढे जाऊन मनुष्याच्या हृदयाचे केवळ कल्पनेचे चित्र वेड्यावाकड्या शब्दांनी चितारले असेल; पण लीले मर्यादित अर्थाला उजेडात आणण्यासाठी अवतरलेल्या आणि अनुचित उपयोगाने भ्रष्ट झालेल्या शब्दांना दूर झुगारून प्रेमपूर्ण हृदयातून निघालेल्या शुद्ध अश्रूनी आज तू मात्र हे खरेखुरे हृदयचित्र काढिले आहेस होऊ दे, लीले, माझ्यावर याहूनही काळ्याकुट्ट आरोपाचा वर्षाव होऊ दे! डोळे मिटून घेऊन, बाहेरच्या जगाला विसरून, या चित्तचित्रावरची ही अश्रूची अक्षरे ही मनाची मिताक्षरी, हृदयाच्या डोळ्यांनी वाचीत असताना, जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार! आनंदामुळे द्विगुणित जीराने धडधडणारे हे हृदय जणू काय या प्रेमशब्दाचा प्रतिध्वनीच करीत आहे! परमेश्वरा, उद्या माझ्या आयुष्याचा जर शेवट व्हावयाचा असेल तर हे चराचर जग हे शरीर सुद्धा मी मोठ्या आनंदाने इथेच टाकीन, पण हा एवढा हृदयलेख- दुःखाच्या दाबाखाली हृदयाचे फूल पिळून काढून निर्मिलेल्या अश्रूच्या अत्तराने सुवासिक केलेली ही प्रेमपत्रिका मात्र वर नेण्याची मला आज्ञा दे, म्हणजे लीला स्वर्गात येईपर्यंत आत्मानंदाने मी या हृदयाची सारखी पारायणे करीत राहीन! अरेरे! इतके प्रेमळ, इतके शुद्ध हृदय, हृदयापासून हातावर असताना पण नको, याच विचारामुळे आज या स्थितीत येऊन पडलो आहे! देवा, पवित्र प्रेमाचे असे अपुरतेचे चित्र काढून का बरे थावलास? परमेश्वरा, पुढचा जन्म जर असाच असेल, आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे खरोखरीच आत्म्याची लग्ने लागत असतील आणि त्याप्रमाणे पुढल्या जन्मीही पुन्हा मला मनोरमेचीच जोड मिळायची असेल तर मात्र लीलेला माझ्या आणखी जवळ आण. असे दोन्ही प्रकारचे प्रेम अर्धवट दाखविण्यापेक्षा आम्हा दोघांना एकाच मातेच्या उदरात जन्म दे. सख्ख्या बहीण-भावडांच्या प्रेमाचा तरी आम्हाला पुरता अनुभव दे आणि एकाच जागी जन्म आणि मरण देऊन एका शुद्ध प्रेमाचाच आस्वाद घेऊ दे! अशा कोणत्याही शुद्ध पवित्र आणि निकट प्रेमाने आमची अंतःकरणे जोडून टाक, की ज्यापासून ऐहिक सुखाच्या कल्पनेचा सुद्धा उद्भव होणार नाही..

प्रवेश सहावा

(कचेरीचा देखावा, सर्व मंडळी, साक्षीच्या पिंज-यात गोकुळ)

शिरस्तेदार ईश्वरसाक्ष खरे बोलेन, खोटे बोलणार नाही.

गोकुळ ईश्वरसाक्ष खरे बोलेन, खोटे बोलणार नाही.

शिरस्तेदार तुमचे नाव काय ?

गोकुळ गोकुळ

शिरस्तेदार बापाचे नाव काय ?

गोकुळ वृंदावन,

शिरस्तेदार आडनाव ?

गोकुळ विसरभोळे,

वकील बरे, आता सांगा पाहू. तुमचे वय काय ?

गोकुळ : (स्वगत) है; तोच प्रश्न आता काय करायचे? नावातल्या अक्षरांना दोन्ही वकिलांनी गुणून त्यात

न्यायाधीश मिळवावयाचा? हो, असेचा नाही पण मला वाटते अक्षरांना न्यायाधीशाने गुणून दोन वकील मिळवावयाचे असे असावे! हैं, हेच बरोबर आहे! बारा एके वारा न दोन चवदा (प्रकट) चवदा वर्षे

वकील : चवदा वर्षे? तुम्ही शुद्धीवर आहात का?

गोकुळ : (स्वगत) चुकलो, वकिलांनीच गुणावयाचे! बारा दुणे चोवीस न् एक पंचवीस (प्रकट) पंचवीस..

वकील : पहिल्याने चवदा कशी सांगितली?

गोकुळ : पहिल्याने फुकट गेलेली वर्षे जमेस धरली नव्हती.

वकील : वा! या हिशेबाने पहिल्याने शून्यच उत्तर द्यायला हवे होते. तुम्ही घाबरला काय?

गोकुळ : मी घाबरलो? तो काय म्हणून मी काही माझ्या बायकोचा खून केला नाही!

वकील : तुम्ही आरोपीला ओळखता का?

गोकुळ : तुम्ही आपल्या बधूना ओळखता का? न्यायाधीशसाहेब या शिरस्तेदाराना ओळखतात का?

वकील: माझ्या प्रश्नाचे नीट उत्तर द्या. तुम्ही आरोपीला ओळखता का?

गोकुळ हो; त्यांना ओळखतो आणि आपल्याला पण चांगला ओळखून आहे बरे

मी

?

वकील : जयताला सोडविण्यासाठी तुम्ही एखादी खोटी शपथ घ्याल का?

गोकुळ : अलबत का नाही? एक सोडून हजार घेईन! प्रत्यक्ष श्रीकृष्णानी सुद्धा सांगितले,

वकील: ते राहू था! हे पत्र माहीत आहे का तुम्हाला?

गोकुळ : हो! माहीत आहे! लीलाताईंनी जयताना पाठविलेले पत्र हे!

वकील : किती वेळा पाहिले आहे तुम्ही हे?

गोकुळ : एक वेळा !

वकील : जयताचे बायकोशी पटत नाही हे खरे आहे की नाही

गोकुळ : हे खरे आहे जयंत बायकोचा अत्यंत तिरस्कार करीत असत.

वकील : तुमची बायको तुम्हाला वागवून घेता येत नाही हे खरे आहे ना?

गोकुळ : त्याच्याशी तुम्हाला काय करावयाचे आहे? तुम्ही आपली बायको संभाळा

न्यायाधीश गप्प बसा ते विचारतात त्याचे उत्तर द्या.

गोकुळ : न्यायमूर्तीना माझी एक विनंती आहे. माझ्या मते आमची घरगुती भांडणे न्यायासनासमोर आणण्याचे काही कारण नाही. असल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार नाही! नाही तर आम्ही मुळी साक्षच द्यायला तयार नाही!

न्यायाधीश असे कसे चालेल? साक्ष दिलीच पाहिजे! न्यायाला मदत ही प्रत्येकाने केलीच पाहिजे!

गोकुळ : हा चांगला न्याय आहे! यांनी आमच्या बायकांच्या वाटेल तशा चौकशा कराव्या आणि आम्ही यांच्या बायकोचे नाव काढिले की

आपण आम्हाला गप्प बसा म्हणून म्हणता! मी जरा तोंडाचा फटकळ आहे आपण आणि हे वकील लोक नेहमी एक ठिकाणी काम करिता तेव्हा आपला त्यांच्याकडे थोडासा ओढा असणे स्वाभाविक आहे. त्याला कोण गैर म्हणेल? (लोक हसतात हे साहेब, हशावारी बाबत घालवू निका! आपण न्यायाधीश आहा, असा पक्षपात आपल्याला शोभत नाही! आपल्याला वकील आणि साक्षीदार सारखेच! मीही थोडाबहुत कायदा जाणतो! चार पुस्तके पाहिली-

न्यायाधीश (हसून ) काय वेडगळ मनुष्य! ( वकिलास) चालू द्या तुमचे सवाल !

वकील : तुमचा स्वभाव थोडासा विसराळू आहे की नाही?

गोकुळ : असेल, तुम्हाला काय त्याचे? तुम्ही आपले प्रश्न विचारा; उत्तर मिळाले नाही, मग बोला! आमच्या वकिलानी पढविलेले सारे जबाब सवालावाचून पाठ म्हणून घ्या हवे तर.

वसंत : अरे गोकुळ, मी कधी तुला पळवून ठेविला आहे रे?

गोकुळ : अरे का बरे वसतराव? मी नाही प्रतिज्ञेवर खोटे बोलावयाचा!

वसंत : (स्वगत) चांगली सोय आणि हा आमच्यातर्फेचा साक्षीदारा

वकील : काय हो. हे पत्र तुम्ही किती वेळा पाहिले आहे?

गोकुळ काय हो, हा प्रश्न किती वेळ विचारणार?

वकील तुम्ही उत्तर द्या आधी..

गोकुळ : दोन वेळा

वकील: मघाशी एक वेळ पाहिले म्हणाला, आता दोन वेळा पाहिले म्हणता हे काय? गोकुळ : मघाशी विचारले त्यापूर्वी एक वेळा पाहिले होते, आताच्या विचारण्याला मघाशी पाहिले ती वेळ हिशेबी धरिली पाहिजे! पूर्वीची

एक व मधाची एक मिळून दोन! वकील : वसंतराव, झालेल्या प्रश्नोत्तरावरून तुमच्या साक्षीदाराची नालायकी दिसून येत आहे. या मनुष्याला व्यवहारज्ञान नाही, हा

विसरभोळा आहे; त्याची आणखी फेरतपासणी केली तर तुमचे नुकसान होणारा तेव्हा तुमची इच्छा असल्यास त्याची साक्ष काढून घेण्याची मी संधी देतो.

वसंत : या संधीबद्दल मी आपला आभारी आहे! न्यायमूर्तीनी असे करण्याचा हुकूम द्यावा.

न्यायाधीश गोकुळ तुझ्या नालायकीमुळे तुझी साक्ष काढून टाकण्यात येत आहे. तुला बाहेर येण्याची परवानगी आहे. गोकुळ इतकेही करून मी नालायक शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणून वाडवडील म्हणत आले ते काही खोटे नाही! (पिंज-यातून

बाहेर येतो.)

वकील ही साक्ष होण्यापूर्वी जो पुरावा आला त्यावरून मला काय सांगावयाचे ते मी मघाशी सांगितले आहे! अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही.

वसंत त्याचप्रमाणे मलाही काही बोलावयाचे नाही. फक्त न्यायमूर्तीनी व पंचांनी आरोपीच्या स्थितीकडे लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती आहे.

न्यायाधीश पंचातील सद्गृहस्थ हो, आपल्याला आत जावयाचे आहे काय?

प्रमुख पंच नाही.

न्यायाधीश : मग आपले मत काय आहे?

प्रमुख पंच दोषी!

न्यायाधीश : आपल्या सर्वांचे एकमत आहे?

प्रमुख पंच होय, सर्वांचे एकमत आहे.

न्यायाधीश : आरोपी जयत, आमच्यापुढे आलेल्या पुराव्यावरून तुझ्यावर खुनाचा आरोप शाबीत होत आहे! पंचाचा निकालही तुझ्याविरुद्ध आहे तुझ्या बायकोबद्दल तुला अत्यंत तिटकारा होता. तिचा नापत्ता झाल्यानंतर तीन चार दिवसानी तिच्या प्रेताचे तुकडे विहिरीत टाकताना तुला पुराव्यानिशी शिपायांनी पकडले आहे! पेटीतील दागिन्यांवरून व पत्रावरून आणि लीला व सुशीला यांच्या साक्षीवरून ते प्रेत मनोरमेचेच होते हे सिद्ध होते. तुझी बायको नापत्ता होण्यापूर्वी, नीला व तू यांना अयोग्य रीतीने बोलताना सर्वांनी पाहिल्यावर त्यावरून तुझा मनोरमेचा मोठा तंटा झाला असे कमलाकराच्या साक्षीवरून सिद्ध झाले आहे. तुझा आणि लीलेचा पत्रव्यवहार होत असे हेही सिद्ध झाले आहे. बाबासाहेबानी लोलेला पुनर्विवाहाची परवानगी दिलेली ऐकल्यापासून तुझ्या मनाची चलबिचल होऊ लागली असेही ठरलेच आहे.. त्या अर्थी हा खून तू बुद्धिपुरस्सर केलास, याबद्दल मुळीच संशय उरत नाही अशा अमानुष रीतीने खून करणारावर दया करणे म्हणजे दयेचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. तुझ्या शिक्षेबद्दल तूच जबाबदार आहेस ह्याची जबाबदारी परमेश्वराकडे नाही; राजाकडे नाहीः मनुष्याकडे नाही सबब आपली बायको मनोरमा हिचा बुद्धिपुरस्सर खून केल्याचा आरोप तुझ्यावर पूर्णपणे शाबीत होत असल्यामुळे तुला मेरपर्यंत फासावर लटकविण्याची शिक्षा देण्यात येत आहे.

जयंत हा दुर्दैवा!

(न्यायाधीश सही करतात, व टाक मोडून टाकतात. पडदा पडतो.)

Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
3
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा