shabd-logo

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023

12 पाहिले 12
प्रवेश पहिला

फाशीचा देखावा सर्व मंडळी)

जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?

तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची इच्छा दिसते स्वर्गात तरी तो तुम्हाला सुखात ठेवो!

जय लील स्वर्गाबद्दलचा माझी कल्पना क्षणोक्षणी ढासळत चालली आहे स्वर्गाची प्रत्यक्ष साक्ष अजून कोणाला पटली आहे का? त्यापेक्षा परिचयाने प्रिय झालेली ही पृथ्वी किती तरी हवीशी वाटत आहे. खरोखरीच स्वर्ग असेल का? परमेश्वर असेल का? ही देखता आठ होणारी प्रेमाची सृष्टी पुन्हा कल्पनातीत काळी तरी लाभेल का? एक ना दोन, हजारो तर्कानी जात्मा व्याकुळ झाला आहे; स्वर्गात अरारा असतील पण अशी बाळपणाची सोबतीण संस्कारजन्य प्रेमाची खाण, अशी लीला असेल काय? स्वाभाविक रीतीने मरण येताना मनुष्य बेशुद्ध होता है त्याचे केवढे भाग्य पण अगदी जागवणाने जगाचा निरोप घेताना सनायाच्या भोव-यात सापडून माझी काय स्थिती झाली ही।

सुशीला बाळा जयंता, चीरघर ही केवळ श्रद्धेपी कसोटी आहे. दृढभावाचा भुकेला भगवान कोणालाही अंतर देत नाही त्याच्यावर दृढविश्वास मात्र ठेव, जयंत अहाहा! सुशील, बोल बोल तुझ्या अमृतवाणीचा या कानास शेवटचा लाभ होऊ दे यापुढे मानवी शब्दाचा नाद त्यांना पारखा होणार मृत्यूच्या राज्यातल्या अज्ञात प्रदेशात माझे समाधान कोणती सुशीला करणारा पाहा. लीले. अशीच प्रेमदृष्टीने पाहा. काल. काही वेळ आपली गती थांबवून माझी भरत आलेली मृत्यूची घटका थोडी तरी लांबणीवर टाक पण लीले, अशी रडू नकोस, माझे हृदय आता बायकांच्या हृदयापेक्षाही कोमल झाले आहे तुझ्या डोळ्यातले पाणी पाहून हे पाहा, माझेही डोळे पाण्याने भरून येतात आणि त्यामुळे माझा पुढचा मार्ग मला स्पष्ट दिसत नाही मृत्यूची वेळ दूर असली म्हणजे तात्काविक निर्भयतेमुळे स्वर्गाच्या गोष्टीवर सहज विश्वास बसतो पण जसजशी ती सगळ्या जगाच्या ज्ञानाच्या कसोटीची वेळ जवळ येते तसतसा विश्वास डळमळू लागतो. नको, नीले, रहू नको! ते अमोलिक अभू जपुन ठेव या अभाग्यासाठी असे उधळू नकोस..

लीला रडू नको तर काय करू? आता या जगात मला कोणाचा हो आधार! माझे समाधान कोण हो करील? ही आपली लाडकी लीला दुःखाने गांजली म्हणजे यापुढे अशी कोणाच्या हो गळ्यात पडणार? त्याच्या गळ्याला मिठी मारते)

जयंत इहलोकीचा संबंध सुटल्यावर त्याची लाज तरी कशाला धरू आणि या अखेरच्या वेळी लीले, तुला दूर तरी कशाला लोटून देऊ आता स्वर्गात सुख लाभेल काय? अप्सरांच्या डोळ्यांतून दिव्य तेज लकाकत असेल पण या डोळ्याच्या आरशाप्रमाणे त्यांच्यात बाळपणाची हजारो चित्रे दिसतील काय? नंदनवनातल्या वाला या वासासारखी हुषारी आणिता येईल काय? या तनुलतेसारखे स्पर्शमुख स्वर्गातली ती कल्पकता कुठून देणार? आणि या एकेक अश्रुची संजीवनशक्ती तर अमृताच्या सागरात सुद्धा सापडणार नाही.

शिपाई बाई दूर व्हा अगदी काळाच्या दाढेत सापडलेल्या माणसाचा लोभ धरून काय कामाचा!

सुशीला बाबारे अगदी प्रेताला द्वारा लागू नये म्हणून त्याच्यावर सुद्धा पांघरूण घालण्याची माया जेथे आवरत नाही तेथे जिवंत माणसाचा

लोभ कसा सुटणार?

जयंत लौकर फार नौकर, हे सुख सोडावे लागत आहे. आजपर्यंत लोकलज्जेमुळे, पापाच्या ऐहिक कल्पनेमुळे या सुखाचा कधीच

अनुभव घेता आला नाही. आता या घाईच्या एका क्षणात साध्या आयुष्याचे सुख एकदम कसे अनुभवता येणार? दृढ अलिंगनाने या काचा

चुराडा होईल हपापलेल्या मुखाच्या कासाने हे ओठ करपून जातील आणि तीव्र प्रेमाच्या दृष्टीने हा देह विहित होईल

सीता साहा जयंत हा मी आता तुमची बाळपणाची अल्लड लीला नाही; पण समाजाने मानसिक संन्यास दिलेली प्रेमाच्या

शिपलीकडे लोटलेली अशुभमूर्ती बालविधवा आहे! (त्याच्यापासून दूर होऊ लागते)

कमलाकर (स्वगत) या हतभाग्याचे हे शेवटचे सुख पाहून सुद्धा अंगाची आग होते आहे. (उप) तात्यासाहेब हे कधीच आटोपणार नाही,

आपणच पुढे हा सरकारी माणसांची खोटी करणे गुन्हा होईल.

तात्यासाहेब तेही खरेच जयता, बाळाच सावध हो

जयंत ही खरेच आता सावध झाले पाहिजे नीले, दूर हो त्या दिवशी एक क्षणभर नसल्या कल्पनेला मनात धारा दिला त्याचे हे

प्रभोगतो आहे आता मरता मरता कशाला हवा हा मोहालीने आजन्म तुझ्याशी केवळ प्रेमाने वागत आली त्याची आठवण

करून आताच्या माझ्या या पवित्र निर्दयतेची क्षमा कर, हा पहा मी तुला शुद्धत्वाच्या कठोरतेने जस्सा दूर लोटून या स्वर्गाच्या मार्गाला लागतो..

(फासावर चढून जातो.)

नीला ताई. हा प्रसंग कसा गं पाहू? नुसत्या कल्पनेनेच मला घेरी येऊ लागत आहे. सारे शरीर लटपट कापत आहे..

सुशीला त्यापेक्षा मन दगडासारखे घट्ट करून तू घरी जा. इथे उभे राहून तरी आपल्याच्याने काय होणार आहे? जा. तिकडे जापनी गाड़ी आहे गाडीवाल्याला सांग म्हणजे तो तुला घरी घेऊन जाईल. जा. (नीला रडत जाते.)

जयंता, नीले, जा आता कायमचे डोळे झाकताना अंगावर अजून शहारे येत आहेत. (डोळे अर्धवट मिटून पुन्हा उत

पृथ्वीमातेकडे, : भोवतालच्या प्रियजनांकडे पाहण्याचा मोह पुन्हा अनावर होत आहे. माजन्मचरित्र एकदम डोळ्यांपुढे येऊन उभे राहते यस्स

पुरे. हा मोह. आता झाकलेले डोळे उघडल्यानंतर काय दृष्टीस पडेल त्याची कल्पना परमेश्वरा, फक्त तुलाच

(डोळे मिटून घेतो घाईने विद्याधर प्रवेश करतो.)

विद्याधर : (न्यायाधीशास) थांबा थांबा, अन्यायाने निरपराध्याला ठार मारू नका. न्यायमूर्तीनी हे दोन दाखले पाहण्याची कृपा करावी आरोपी जयंत याच्यावर कोणताच आरोप नाही, अशी या दाखल्यांवरून आपली खात्री होईल. मित्रा जयंता खाली येतू (दाखले देतो.)

ठरवायें.

कमलाकर : (स्वगत) हा काय घोटाळा आहे आणखी? असे आड बभे राहून पहावे काय आहे ते आणि प्रसंग पाहून पुढे कसे वागावयाचे हे (जातो)

न्यायाधीश : तात्यासाहेब आपल्याला सांगावयाला मोठा आनंद वाटतो की, जयंत हे अगदी निर्दोष आहेत. मनोरमाबाई काल एका भलत्याच गावात वारल्या (शिपायांस) अरे त्यांना उत्तरवा खाली! (जयंत खाली उतरतो.)

तात्यासाहेब : मग ते प्रेत कोणाचे?

विद्याधर : 4 ते द्रुमनचे तिने आत्महत्या केली आणि ती मात्र कमलाकरव्या अथमपणामुळे..

तात्यासाहेब : म्हणजे हा सर्वच प्रकार विलक्षण आहे!

विद्याधर : (पत्र देऊन) हे पत्र पहा, द्रुमनने मरताना लिहून ठेवलेले पत्र यात एकंदर प्रकार खुलासेवार लिहिला आहे. (न्यायाधीशास) मला

वाटते आता खटला पुन्हा चालवीपर्यंत आरोपीला जामिनावर सोडता येईलच!

न्यायाधीश : ही गोष्ट सरन्यायाधीशांच्या अधिकारातली आहे चला, जयंतांना घेऊन आपण कचेरीत जाऊ.

तात्यासाहेब : काय उरफाट्या काळजाचा राक्षस! कमलाकर! अरे, इतक्यात हा येथे होता आणि गेला कुठे?

विद्याधर : तो येथे कशाला राहतो?

तात्यासाहेब : हे पत्र तुमच्या हाती कसे लागले?

विद्याधर : कमलाकराच्याच एका रामोशाने चुकून मला दिले आणि त्यावरून मला सारा पत्ता लागत गेला. ती एकंदर हकिकत फार मोठी

आहे. पण तात्यासाहेब, खटल्याची मजल येथपर्यंत आली कशी? तहकुबी मागण्यासाठी मी आपल्याला तार केली होती ना?

तात्यासाहेब ;:मला तार केली होती? मला तर नाही मिळाली-

विद्याधर : ती सुद्धा त्या हरामखोराने नापत्ता केली असेल. चला, त्याचाही तपास केला पाहिजे, तात्यासाहेब, आपण न्यायाधीशसाहेबांबरोबर वाचेरीकडे चला मी त्या रामोशाला घेऊन येतो आणि साधल्यास तारेबद्दलही चौकशी करितो.

तात्यासाहेब : ठीक आहे. चला (सर्व जातात. सुशीला जाऊ लागते.)

विद्याधर : सुशीले, सुशीले, जरा थांब आज मी तुला आणखी पुनर्विवाहाबद्दल विनंती करणार आहे!

सुशीला : काय? या वेळी 2

विद्याधर हो, या वेळी आणि याच जागी! जी जागा जयंताची अमंगल मृत्यूभूमी म्हणून आपल्या स्मरणात राहणार होती तीच आता आपली

5G

65

विवाहभूमी म्हणून लक्षात रहावी अशी माझी इच्छा आहे. → सुशीला या भलत्या विषयाची अशा गडबडीच्या वेळी-

विद्याधर आता गडबडीची वेळ कसली? सकट नाहीसे झाल्यावरही ते फार भयंकर होते म्हणून भिण्यात काय अर्थ? भयंकर स्वप्नाचे

जागेपणी भय बाळगणे हे खंबीर मनाचे लक्षण नाही. शिवाय कैदेतून मुक्त झालेल्या जयंताला आपण दोघे विवाहपाशात बद्ध झालेली

दिसलो पाहिजे, असा माझा कृतनिश्चय झालेला आहे। सुशीले, अजून तुला माझी दया येत नाही काय? किती दिवस मला तू अशी अलोट *दुःखात ठेवणार?

सुशीला विद्याधर, मला असा आग्रह करू नका! तुमच्या विनवणीच्या प्रत्येक शब्दाने मी अधिक अधिक संकटात पडत आहे. त्या दिवशी तुम्ही त्या मांगाच्या हातून मला सोडविले त्या वेळी माझे मन बेभान झाले होते म्हणून रागाच्या आवेशात मी तुम्हाला भलतेच शब्द बोलून गेले त्याची मला क्षमा करा! आणखी मोठ्या मनाने हा पुनर्विवाहाचा हेतू सोडून द्या!

विद्याधर : सुशीले, मी तुझ्या गुणाला योग्य नाही का? का एकदा तुझा उपमर्द केला म्हणून अजून तू माझा तिरस्कार करीत आहेस?

सुशीला नाही, मी तुमचा तिरस्कार करीत नाही! माझ्या खोलीत तुम्ही पाऊल टाकिले तेवढ्या गोष्टीचा चांगला उलगडा करा, म्हणजे जी

स्त्री तुमच्याशी लग्न करील तिला मी जन्माची धन्य समजेना

विद्याधर : पण माझा तर तुझ्याबरोबर जन्म काढण्याचा संकल्प आहे..

सुशीला तो संकल्प कधीच पूरा व्हावयाचा नाही! तुम्ही त्या मांगाच्या हातून मला सोडविले, जयंताला जवळजवळ तुम्हीच जीवनदान दिले. तुमचे आम्हा सर्वांवर अगणित उपकार आहेत पण विद्याधर, तुमच्या पाया पडते त्या उपकाराच्या मोबदल्यात या देहाची मागणी करू नका! त्याच्यावर माझ्या पतीची सत्ता आहे.

विद्याधर : सुशीले, किती दिवस त्या पतीची सत्ता चालणार? पतीच्या लहानशा मूर्तीच्या आठवणीवर सारा जन्म घालविणार काय?

सुशीला विद्याधर, मोठमोठ्या साध्वीची चरित्रे असेच करायला सांगत नाहीत का? गिरिधरलालाच्या बालमूर्तीच्या चिंतनात मिरादेवीने सारा जन्म घालविला ना?

विद्याधर दतकयेच्या राज्यातल्या या गोष्टी! सुशीले, गिरिधरलालाने भक्तीसाठी मिरादेवीच्या पदरात उडी टाकली तसा तुझा पती स्वर्गातून

तुझ्यासाठी उडी टाकील का? सुशीला या हतभगिनीसाठी त्या कोमल बालमूर्तीला इतके श्रमः विद्याधर, माझा एवढा अधिकार नाही. त्यांच्या बाललीलाचे चिंतन

करावयाचे, कल्पनेच्या वातावरणात वाढणा-या त्यांच्या बालमूर्तीचे प्रेमाने संगोपन करावयाचे एवढाच या त्यांच्या दासीचा अधिकार! त्या

सुखाआड येऊ नका!

विद्याधर : पण अशा नुसत्या चिंतनात सारा जन्म गेल्यावर या तुझ्या देवी रूपाचा, लोकोत्तर गुणांचा काय उपयोग? ईश्वरदत्त देणगीचा हा दुरुपयोग नाही का? हे सारे एकदा गेले की कायमचे गेले! -

सुशीला एका जन्मानेच झाले का? विद्याधर, माझ्या यत्किंचित् रूपगुणाचे तर राहू द्या; पण जगात स्वैर पसरलेल्या सा-या सुदरतेचा एवढ्यापुरताच का अवतार आहे? अतुल सामर्थ्य खर्च करून ईश्वराने एवढा सुंदर वस्तूंचा पसारा निर्माण केला तो काय क्षणिक वृत्तीने नाश पावण्यासाठी? पुष्पांचा सुवास एकदा वा-यावर वहात दिगंतराला जातो एवढीच त्याची कामगिरी? आकाशातल्या तारका नुसत्या चमकतात हात त्याचा उपयोग? पवित्र प्रेमाची भाषणे, निर्दोष हास्याचे मंजुळ ध्वनी, आजाण बालकांचा उत्कट आनंद- आजपर्यंत जे जे क्षणिक, सुंदरतेचे सर्वस्व क्षणमात्र चमकून नाहीसे झाले ते काय कायमचे? या जगात त्यांचा जो तात्पुरता खेळ झाला तेवढ्यासाठीच ईश्वराने अनंत श्रमाने त्यांना निर्माण केले का? विद्याधर, आपले जग म्हणजे सुखदुःख निर्माण करण्याचा ईश्वराचा प्रचंड कारखाना आहे. इथे जे जे चांगले निर्माण होते ते ते एका जागी साठवून परमेश्वर त्याचा स्वर्ग तयार करितो आणि जे जे वाईट त्याची रौरवाकडे रवानगी होते. या जगाच्या कारखान्यात खेळणारा आत्मा म्हणजे ईश्वराची इच्छाशक्ती तुम्हाला नाही का असे वाटत? आपण आपल्या पुण्याईने स्वर्गाला गेलो तर या सर्वांचा कायमचा उपभोग घेऊ. अनंत कालाच्या हिशेबात या क्षणमात्र आयुष्याची काय कथा!

विद्याधर : सुशीले, ही सारी तुझ्या कल्पनेची भरारी आहे. वस्तुस्थिती कदाचित् याहून फार निराळी असेल हे वेड आहे

सुशीला : असेल, हे वेड असेल तरी मला ते फार सुखकारक आहे! ते काढून टाकण्याची माझी इच्छा नाही.

विद्याधर: शाबास, गुणिले शाबास!

सुशीला : (चपापून काय म्हणालातः काय नाव घेतले आता आपण?

विद्याधर : गुणिला का बरे, इतका चपापलीस तू?

सुशीला: गुणिला हे नाव माझ्या पतींनी लग्नाच्या गडबडीत मला सांगितले; घाबरत घाबरत चटकन माझ्या अगदी कानात सांगितले; त्यांनी मोठ्या आवडीने माझे हे गुजराथी नाव ठेविले, माझ्या पतीखेरीज हे नाल दुस-या कोणालाही ठाऊक नव्हते!

विद्याधर: गुणिले, तू म्हणतेस ते अगदी अक्षरशः खरे आहे!

सुशीला :म्हणजे? (त्याच्याकडे सारखी पहात उभी राहते.)

विद्याधर : वाढू दे, तुझी कल्पना स्वैर वाढू दे, आणि कल्पनेच्या राज्यातील तुझ्या पत्तीची बालमूर्ती पण वाढू दे! हे आता नीट पाहा, त्या वाढलेल्या दृष्टी तरळू देऊ नकोस, हा पाहा हातावरचा डाग लाजाहोमात मी आहुति टाकताना चोरट्या दृष्टीने तू सारखी त्याच्याकडे पहात होतीस ना?

सुशीला: मला नसती आशा लावून विद्याधर-

विद्याधर : विद्याधराचा अवतार मघाशीच सपला गुणिले, अजून या गुणाकराला ओळखले नाहीस? (सुशीला त्याला अलिंगन देते.)

सुशीला : ओळखले. चांगले ओळखले पण हे सारे खरे का हा भ्रम?

विद्याधर : हे खरे आहे हे तुला पूर्वीच समजायला पाहिजे होते मी जरी खरोखरी स्वर्गात असतो तरी सुद्धा भूलोकी या स्वर्गसुखासाठी उडी टाकिली असती! सुशीला, तुझ्या पातिव्रत्याच्या शक्तीची तुला कल्पना नाही. मी जर परपुरुष असतो तर पतिव्रते, त्या दिवशी तुझ्या खोलीत पाऊल टाकताच जळून भस्म झालो असतो!

सुशीला : मग ती दुष्ट बातमी-

विद्याधर: अगदी खोटी! आपल्या लग्नानंतर भी जाताना, आमच्या लहानग्या जहागिरीच्या आशेने काकानी मला समुद्रात ढकलून दिले खरे, पण बंदरावर होड्यांची गडबड असल्यामुळे एका नाखव्याच्या मदतीने मला आपला जीव वाचविता आला! पुढे ही सारी हकिकत मी गुप्तपणाने तेथल्या अधिकारी साहेबांस कळविली. काकाचा स्वभाव दीर्घद्वेषी आणि पाताळयंत्री, त्यामुळे लहानपणी मला त्यांचे भय वाटले आणि दुसरे एखादे संकट टाळावे म्हणून नाव बदलून साहेबांच्या समतीने उत्तर हिंदुस्थानात गेलो! साहेबानी ही सारी गोष्ट गुप्त ठेवून आमच्या उत्पन्नातून मला विद्याभ्यासाचा खर्च मिळण्याची व्यवस्था करून बाकीचे उत्पन्न मी कायद्यात येईपर्यंत सरकारजमा ठेविले! पुढे काकाही वारले. माझा विद्याभ्यास संपला आणि मी इथे आलो!

सुशीला : आणि इतके दिवस मला फसविले ना?

विद्याधर: त्याची मात्र मला क्षमा करा तुमच्या घरी चालणा-या फाजील सुधारणेचा तुझ्यावर क्ती परिणाम झाला आहे त्याची परीक्षा पाहिल्यावाचून लाडके क्षमा कर मला स्वीकार करवेना.

सुशीला : पण आता तरी स्वीकार-

विद्याधर : आता तूच माझा स्वीकार कर चल, हे सारे वर्तमान तात्यासाहेबांना कळवू आणि जयंताच्या आणि लीलेच्या पुनर्विवाहाचा आनंद द्विगुणित करू. हो, पण आधी एवढे सांग की, तुझे माझ्याबद्दलचे मत एका क्षणात तुला बदलावयाला लावीन असे मी म्हटले होते ते खरे झाले ना?

सुशीला : विद्याधरावरचा माझा राग काही कमी व्हावयाचा नाही. (जातात.)

प्रवेश दुसरा

(तात्यासाहेबांचे घर लीला)

लीला माझे आता या जगात काय उरले आहे? जयंतांचा दिव्य आत्मा त्यांच्या नश्वर शरीराला सोडून स्वर्गाला जाऊन खास पोहोचला असेल. इतके दिवस पुनर्विवाहाची आशा पापावर उभारलेली, मनोरमावहिनींच्या मरणाच्या इच्छेवर उभारलेली पुनर्विवाहाची आशा- अगदी हृदयाच्या हृदयात, कल्पनेच्या पलीकडे, शक्यतेच्या शेवटच्या टोकावर तरी तर्काच्या डोळ्यांनी दिसत होती! पण तीही गेली! त्यांच्या आत्म्यावाचून जसे त्याचे शरीर, तसे त्यांच्यावाचून सारे जग मला झाले आहे! माझ्या जगाचा आत्मा आज निघून गेला! गळ्यात फास बसून आत्म्याचा अखेरचा कोंडमारा होताना त्याचे हाल पाहू नयेत म्हणून डोळे फाटून बाहेर आले असतील, त्यांनी रक्ताचे अश्रू ढाळले असतील, त्यांचे दुःख सांगण्यासाठी जीभ हातभर बाहेर आली असेल. अनाथ विधवांच्या सुखकल्पनाप्रमाणे त्यांच्या हातापायांनी तिथल्या तिथेच निर्वाणीची धडपड केली असेल, आणि अखेर आत्मतेज तिथून जाताच सर्व शरीर काळेठिक्कर पडले असेल त्यांचे त्या काळचे भेसूर रूप माझ्यापुढे सारखे उभे रहात आहे. पण नको ग बाई, जगाने आपल्या हाती सापडलेल्या त्याच्या मूर्तीचे जसे हाल केले तसे मी माझ्या कल्पनासृष्टीतल्या त्यांच्या मूर्तीचे एक क्षणभरही करणार नाही. डोळे फोडून टाकीन, पण ही करुणमूर्ती पाहणार नाही! त्यापेक्षा त्यांच्याबरोबर मागोमाग जाऊन वर स्वर्गात माझ्या दिव्य जयंताचे अखंड दर्शन घेत बसेन पण कोणत्या मार्गाने अगदी लवकर मृत्यू

आणिता येईल? मंडळी घरी येण्याच्या पूर्वीच त्याच्या मागोमाग या जगातून धाव ठोकली पाहिजे! स्वर्गातल्या एखाद्या अप्सरेने त्याना भुरळ पाडण्यापूर्वीच पण छे, माझे जयंत इतक्या क्षुद्र मनाचे का आहेत? देवा, प्रणयी जनाना इच्छामरण का बरे दिले नाहीस? उत्कट इच्छेने हेतू पूर्ण होतात असे म्हणतात मग माझी इच्छा का बरे पूर्ण होत नाही? अहाहा! ते इतके उदार आहेत की, मला इथे टाकून स्वर्गात सुद्धा जाणार नाहीत! शरीराच्या कैदेतून सुटलेला त्यांचा आत्मा या हवेतच माझ्याभोवती घोटाळत असेल! मग या श्वासासरशी या सा-या वा-याचे हृदयात साठवण करून ठेवू का? देवा, किती अनुदार तू! मला मरणाची सुद्धा शिक्षा देत नाहीस ना? पण ही पाहा, अशी मी इच्छेच्या एकाग्रतेने प्राण सोडणार

(स्तब्ध उभी राहते, कमलाकर घाईने येतो.)

कमलाकर (स्वगत) अंतकरणात पेट घेऊन आतल्या आत भडकणा-या सूडाच्या निःश्वासांनी या वातावरणाला अजून आग कशी लागत नाही? द्वेषाने भरलेल्या या दृष्टीपाताने ही भूमी फाटून अगदी दुभंग का होत नाही? आणि आकाश तुटून खाली का कोसळत नाही? माझ्या पराभवाची सारखी परमावधी होत आहे. त्या दिवशी रात्री चुकून ते द्रुमनचे पत्र त्या रामोशाच्या हाती पडले आणि त्याच्या हातून विद्याधराला मिळून सारा घोटाळा झाला! विद्याधराला ती जागा दिली आणि तिथे तो दरोडोखोर ते पत्र बदलण्यासाठी येऊन असा प्रकार झाला असावा! जयंत दोषमुक्त झाला, मनोरमा मेली. आता लीलेचा आणि जयंताचा पुनर्विवाह होणार आणि तो आजन्म सुख भोगणार! विद्याधर हाच सुशीलेचा पती ठरला! सारे सुखी होणार! पण हे सारे मला कसे सहन होणार! ज्याच्या डोळ्यांना चंद्रिकेचा प्रकाश पाहवत नाही, टवटवीत फुले पाहवत नाहीत, ज्याला कोणाच्याही सुखाची कल्पना सहन होत नाही. त्याने स्वतःच्या भयाण निराशेवर उभारलेले, आपल्या लहानपणापासूनच्या वै-याचे सुख कसे पहावे? मी तेथून इतक्या वेगाने धावत आलो पण मार्गावर तरंगणा-या अणूरेणूहो, माझ्या हृदयातल्या श्वासाशी तुमची मिळणी झाल्यामुळे तुम्ही साक्ष आहा की, मी केवळ प्राणाच्या भयाने पळालो नाही, तर अजून जयंताचा सूड घेण्यासाठी पळालो आहे हा सूड घेतला नाही तर मेल्यावरही माझा प्राण जाणार नाही. भूतयोनि अजून उत्पन्न झाली नसली तर यापुढे माझ्या जीवशक्तीच्या चिकाटीमुळे तरी खास होईल. (पाहून) काय? लीला? ही इथे एकटी कशी? करू हिला अशीच ठार? म्हणजे झाले. जयंताच्या सुखाचे मातेरे! मग मी फाशी गेलो तरी बेहत्तर बस्स, हाच बेत ठरला! घरातील माणसे अजून आपल्या आनंदात मग्न आहेत तोच हे फूल चिरडून टाकावे! (प्रगट) लीले, लीलावती!

लीला कोण? कमलाकर? गेलाना हो जयताचा आत्मा आपल्याला सोडून?

कमलाकर (स्वगत) अस्से! जयंत मेला अशी हिची कल्पना आहे काय? ठीक! पण हा काय चमत्कार? ही अजून मरत कशी नाही? नुसत्या विषारी श्वासाने फुले कोमेजून जातील, ज्वालामय दृष्टीने तारका जळून त्यांचा काळोखाचा कोळसा होईल, ही कल्पना खोटी ठरू पाहते!

लीला कमलाकर, का हो बोलत नाही? आता कशाला कचरता? वाटेल ती कठोर बातमी ऐकायला मी आता तयार आहे! बोला, झाला ना त्यांचा शेवट ? नका सांगू, तुमच्या तोडावर ती वार्ता स्पष्ट लिहिलेली दिसते.

कमलाकर : लीलाबाई, काय सांगू? अखेर जयंत आपल्याला सोडून गेलेच.

लीला त्यात विशेष काय आहे? कमलाकर, माझा सुद्धा निश्चय ठरलेला आहे! ज्या जगात जयंताचा वास नाही त्यात राहून मला काय

करावयाचे आहे? मी पण माझ्या आयुष्याचा शेवट करणार! कमलाकर : अहाहा! लीले, धन्य आहे तुझ्या प्रेमाची! ख-या प्रणयिनीप्रमाणे बोललीस तू! असे तीव्र प्रेमाचे उदगार या भरतभूमीत पूर्वी

एकदा मात्र ऐकू येत होते. प्रियजनांच्या मृत्यूनंतर मागे रहाते ते कशाचे प्रेमळ हृदय?



लीला : होय ना? मला सुद्धा असेच वाटते. आत्महत्येचा माझा विचार तुम्हाला आवडला ना? कमलाकर नुसता आवडला? माझ्या 'विचाराशी पुरेपुर जमला!

लीला : म्हणजे तुम्हीही आत्महत्या करणार की काय?

कमलाकर : यात काय शंका? एवढ्यासाठी तर सर्वांच्या आधी धावत आलो. मोहात गुरफटलेली आप्तमंडळी आपल्याला अडथळा करील, आणि मग जयंतासारखा मित्र गेल्यावर या शून्य जगात आपल्याला रहावे लागणार, म्हणून तर मी सर्वांची नजर चुकवून इकडे आलो.

लीला : अहाहा! कमलाकर, धन्य आहे तुमची!

कमलाकर : यात धन्य कशाची? जयतासाठी कोण मरणार नाही? हे पहा, मी तेवढ्यासाठी जालीम विष सुद्धा आणून ठेविले आहे. हे इतके जालीम आहे की, एकदा पोटात गेले म्हणजे कोणताही उतारा त्यावर चालत नाही

प्रदेश दुसरा

(तात्यासाहेबांचे घर. लीला)

लीला: माझे आता या जगात काय उरले आहे? जयंतांचा दिव्य आत्मा त्यांच्या नश्वर शरीराला सोडून स्वर्गाला जाऊन खास पोहोचला असेल, इतके दिवस पुनर्विवाहाची आशा पापावर उभारलेली, मनोरमावहिनींच्या मरणाच्या इच्छेवर उभारलेली पुनर्विवाहाची आशा जगदी हृदयाच्या हृदयात, कल्पनेच्या पलीकडे, शक्यतेच्या शेवटच्या टोकावर तरी, तर्काच्या डोळ्यांनी दिसत होती! पण तीही गेली! त्यांच्या आत्म्यावाचून जसे त्यांचे शरीर, तसे त्यांच्यावाचून सारे जग मला झाले आहे! माझ्या जगाचा आत्मा आज निघून गेला! गळ्यात फास बसून आत्म्याचा अखेरचा कोंडमारा होताना त्याचे हाल पाहू नयेत म्हणून डोळे फाटून बाहेर आले असतील, त्यांनी रक्ताचे अश्रू ढाळले असतील. त्यांचे दुःख सांगण्यासाठी जीभ हातभर बाहेर आली असेल, अनाथ विधवांच्या सुखकल्पनाप्रमाणे त्यांच्या हातापायांनी तिथल्या तिथेच निर्वाणीची धडपड केली असेल, आणि अखेर आत्मतेज तिथून जाताच सर्व शरीर काळेठिक्कर पडले असेल त्यांचे त्या काळचे भेसूर रूप माझ्यापुढे सारखे उभे रहात आहे. पण नको गं बाई, जगाने आपल्या हाती सापडलेल्या त्यांच्या मूर्तीचे जसे हाल केले तसे मी माझ्या कल्पनासृष्टीतल्या त्यांच्या मूर्तीचे एक क्षणभरही करणार नाही. डोळे फोडून टाकीन, पण ही करुणमूर्ती पाहणार नाही! त्यापेक्षा त्यांच्याबरोबर मागोमाग जाऊन वर स्वर्गात माझ्या दिव्य जयंतांचे अखंड दर्शन घेत बसेन! पण कोणत्या मार्गाने अगदी लवकर मृत्यू आणिता येईल? मंडळी घरी येण्याच्या पूर्वीच त्यांच्या मागोमाग या जगातून धाव ठोकली पाहिजे! स्वर्गातल्या एखाद्या अप्सरेने त्यांना भुरळ पाडण्यापूर्वीच पण छे, माझे जयंत इतक्या क्षुद्र मनाचे का आहेत? देवा, प्रणयी जनांना इच्छामरण का बरे दिले नाहीस? उत्कट इच्छेने हेतू पूर्ण होतात असे म्हणतात मग माझी इच्छा का बरे पूर्ण होत नाही? अहाहा! ते इतके उदार आहेत की, मला इथे टाकून स्वर्गात सुद्धा जाणार नाहीत! शरीराच्या कैदेतून सुटलेला त्यांचा आत्मा या हवेतच माझ्याभोवती घोटाळत असेला मग या श्वासासरशी या सा-या वा-याचे हृदयात साठवण करून ठेवू का? देवा. किती अनुदार तू! मला मरणाची सुद्धा शिक्षा देत नाहीस ना? पण ही पाहा, अशी मी इच्छेच्या एकाग्रतेने प्राण सोडणार,

(स्तब्ध उभी राहते, कमलाकर घाईने येतो.)

कमलाकर : (स्वगत) अंतकरणात पेट घेऊन आतल्या आत भडकणा-या सूडाच्या निःश्वासांनी या वातावरणाला अजून आग कशी लागत नाही? द्वेषाने भरलेल्या या दृष्टीपाताने ही भूमी फाटून अगदी दुभंग का होत नाही? आणि आकाश तुटून खाली का कोसळत नाही? माझ्या पराभवाची सारखी परमावधी होत आहे. त्या दिवशी रात्री चुकून ते दुमनचे पत्र त्या रामोक्षाच्या हाती पडले आणि त्याच्या हातून विद्याधराला मिळून सारा घोटाळा झाला। विद्याधराला ती जागा दिली आणि तिथे तो दरोडोखोर ने पत्र बदलण्यासाठी येऊन असा प्रकार झाला असावा! जयंत दोषमुक्त झाला, मनोरमा मेली, आता लीलेचा आणि जयंताचा पुनर्विवाह होणार आणि तो आजन्म सुख भोगणारा विद्याधर हाच सुशीलेचा पती ठरला! सारे सुखी होणारा पण हे सारे मला कसे सहन होणारा! ज्याच्या डोळ्यांना चंद्रिकेचा प्रकाश पाहवत नाही, टवटवीत फुले पाहवत नाहीत, ज्याला कोणाच्याही सुखाची कल्पना सहन होत नाही, त्याने स्वतःच्या भयाण निराशेवर उभारलेले, आपल्या लहानपणापासूनच्या वै-याचे सुख कसे पहावे? मी तेथून इतक्या वेगाने धावत आलो पण मार्गावर तरंगणा-या अणूरेणूहो, माझ्या हृदयातल्या श्वासाशी तुमची मिळणी झाल्यामुळे तुम्ही साक्ष आहा की, मी केवळ प्राणाच्या भयाने पळालो नाही, तर अजून जयंताचा सूड घेण्यासाठी पळालो आहे. हा सूड घेतला नाही तर मेल्यावरही माझा प्राण जाणार नाही. भूतयोनि अजून उत्पन्न झाली नसली तर यापुढे माझ्या जीवशक्तीच्या चिकाटीमुळे तरी खास होईल. (पाहून) काय? लीला? ही इथे एकटी कशी? करू हिला अशीच ठार? म्हणजे झाले जयताच्या सुखाचे नातेरे! मग मी फाशी गेलो तरी बेहत्तरा बस्स, हाच बेत ठरला! घरातील माणसे अजून आपल्या आनंदात मग्न आहेत तोच हे फूल चिरडून टाकावे! (प्रगट) लीले, लीलावती

लीला : कोण? कमलाकर? गेलाना हो जयंताचा आत्मा आपल्याला सोडून?

कमलाकर : (स्वगत) अस्से! जयंत मेला अशी हिची कल्पना आहे काय? ठीक! पण हा काय चमत्कार? ही अजून मरत कशी नाही? नुसत्या

विषारी श्वासाने फुले कोमेजून जातील, ज्वालामय दृष्टीने तारका जळून त्यांचा काळोखाचा कोळसा होईल, ही कल्पना खोटी ठरू पाहते!

लीला : कमलाकर का हो बोलत नाही? आता कशाला कचरता? वाटेल ती कठोर बातमी ऐकायला मी आता तयार आहे! बोला, झाला ना

त्यांचा शेवट ? नका सांगू, तुमच्या तोडावर ती वार्ता स्पष्ट लिहिलेली दिसते.

कमलाकर : लीलाबाई काय सांगू? अखेर जयंत आपल्याला सोडून गेलेच.

लीला : त्यात विशेष काय आहे? कमलाकर, माझा सुद्धा निश्चय ठरलेला आहे! ज्या जगात जयंताचा वास नाही त्यात राहून मला काय करावयाचे आहे? मी पण माझ्या आयुष्याचा शेवट करणार!

कमलाकर : अहाहा! लीले, धन्य आहे तुझ्या प्रेमाची! ख-या प्रणयिनीप्रमाणे बोललीस तू! असे तीव्र प्रेमाचे उदगार या भरतभूमीत पूर्वी एकदा

मात्र ऐकू येत होते. प्रियजनांच्या मृत्यूनंतर मागे रहाते ते कशाचे प्रेमळ हृदय?

लीला : होय ना? मला सुद्धा असेच वाटते आत्महत्येचा माझा विचार तुम्हांला आवडला ना? कमलाकर नुसता आवडला? माझ्या

विचाराशी पुरेपुर जमला!

लीला : म्हणजे तुम्हीही आत्महत्या करणार की काय?

कमलाकर : यात काय का? एवढ्यासाठी तर सर्वांच्या आधी धावत आलो मोहात गुरफटलेली आप्तमंडळी आपल्याला अडथळा करील. आणि मग जयंतासारखा मित्र गेल्यावर या शून्य जगात आपल्याला रहावे लागणार, म्हणून तर मी सर्वांची नजर चुकवून इकडे आलो.

अहाहा! कमलाकर, धन्य आहे तुमची

ॐ कमलाकर यात चन्य कशाची? जयतासाठी कोण मरणार नाही? हे पहा, मी तेवढ्यासाठी जालीम विष सुद्धा आणून ठेविले आहे. हे इतके जालीम आहे की, एकदा पोटात गेले म्हणजे कोणताही उतारा त्यावर चालत नाही.

लीला : तर मग कमलाकर, तुमच्या पाया पडते, ते विष त्यांची भेट घडविणारे ते अमृत- मला द्या.

कमलाकर : काय तुम्हाला हे विष देऊ? आणि मी?

लीला : तुम्ही पुरुष आहात, तुम्हाला तुम्हा मिळविता येईल. द्या हो. घालाच एवढी भिक्षा.

कमलाकर : तुमची विनवणी ऐकून यमाला सुद्धा दया येईल, मग मी तर काय मनुष्यच आहे! घ्या हे मी दुसरे मिळवीन...

लीला : (विष हाती घेऊन) नेईल ना हे मला जयंतांच्या पायाजवळ? अहाहा, धन्य धन्य मी! (विष घेते.) कमलाकर (स्वगत) अहाहा! झाले

माझे कर्तव्य. आता सुटलो तरी चालेल किंवा सापडलो तरी चालेल. (प्रकट) सगळे घेतलेस?

लीला हो; आता होईल ना माझे काम?

कमलाकर : निखालस ! अविचारी लील ऐक! जयंत जिवंत आहे, त्याच्यावरचा आरोप दूर झाला. अर्ध्या घटकेत तो येथे येईल, तिकडे मनोरमा मेली. तुमच्या दोघांच्या पुनर्विवाहाला आता कोणतीच आडकाठी नव्हती. पण तशी ईश्वराची इच्छा नाही, तशी माझी इच्छा नव्हती! म्हणून तुमच्या प्रेमामृतात मी हे प्रत्यक्ष विष कालविले आहे. बोल, लीले, बोल, पण आता तू कशाची बोलतेस? तुझे डोळे या विषाच्या

प्रभावाने तारवटत चालले आहेत. लीले, अशा भयाण सौदर्याकडे पाहण्याची मला सवय आहे!

लीला : पण आता तरी घेतलास ना सूड? मग उगीच का उभा आहेस माझ्यापुढे आपले तोंड घेऊन?

कमलाकर : तुझ्या सौंदर्याचे मरण पहावयाला! क्षणोक्षणी तुझे सौंदर्य भयंकर निराशेत सारखे विरत चालले आहे. शुक्लाष्टमीची रम्य चंद्रिका रात्रीच्या ऐन भरात चंद्राच्या मृत्यूमुळे काळ्याकुट्ट काळोखात विरघळून जात असते, त्याचप्रमाणे तुझ्या आत्म्याची चंद्रिका-शरीरावर पसरलेली ही जिवंत शोभा आत्म्याचा लय होताना हा हा म्हणता मृत्यूच्या काळोखात-प्रेताच्या भयाणपणात विरून जाईल! आणि मग या हाताने, नीट ऐक- दुमनच्या काळवंडलेल्या रक्ताने रंगलेल्या हाताने, मनोरमेच्या संसाराची होळी करताना तिच्या शिव्याशापांच्या आगीने करपून कोळसा झालेल्या या हाताने दुमनच्या पोराच्या मुक्या किंकाळ्यांच्या प्रतिध्वनीने दुमदुमलेल्या या हाताने तुझ्या या जिवंत प्रेताला असे धरून तुझ्या ओठावर उरलेल्या विषाचा त्या अधरविषाचा आस्वाद घेईन, आणि मग येथून, त्या जगातूनही बाहेर जाईन! लीले, द्रमुन अशीच आत्महत्या करून मेली आणि तिच्या प्रेताकडे पाहताना मला अशीच मेलेल्या चुंबनाची इच्छा झाली होती; पण त्या वेळी तिचे ओठ साकळलेल्या रक्ताने काळे पडले होते आणि माझे ओठ आशेच्या जिवंतपणाने स्फुरत होते. पण आज तुझे ओठ जसे विषाने काळे पडले आहेत तसे माझे ओठही क्रूरपणाच्या काळिम्याने रंगले आहेत, त्यांची विषारी चुंबनाची आशा आज पूर्ण करीन लवकर जयंत येथे येईल आणि तुझ्या ओठांजवळ आपल्या ओठांनी मेलेल्या प्रेमाची मुकी गाणी गाईल; त्या वेळी त्याच्यासाठी तुझ्या ओठांवरच्या विषात माझ्या सुडाची भर घालून ठेवून नंतर तो नेत्रोत्सव पाहता पाहता मोठ्या आनंदाने मी आपले डोळे मिटीन!

लीला :कमलाकर, आता उगाच कशाला बोलता? माझ्या मनावर त्या बोलण्याचा परिणाम होण्याची वेळ निघून गेली आहे! इहलोकच्या सुखाची मी मुळीच पर्वा करीत नाही! हे सुख किती झाले तरी चंचल आज जरी मिळाले असते तरी उद्या खास नाहीसे झाले असते! माझी दृष्टी, माझी आशा आता स्वर्गातल्या सुखाकडे लागली आहे! आज ना उद्या जयंत तिथेच येतील आणि मग आम्ही जगन्नाथाच्या कृपादृष्टीच्या अक्षम्य किरणात अनंत सुखाचा उपभोग घेऊ तिथे तर तुमचे विष बाधणार नाही ना?

कमलाकर : लीले, कालनिद्रेतले हे तुला स्वप्र पडायला लागले आहे. अहाहा! हा पहा जयंत पण आलाचा (हातात फुलांची माळ घेऊन जयंत ती त्याला तरी माझा चांगलाच मानवेला लीले, बाळपणी तुम्ही दोघे ज्या दृष्टीने माझ्याकडे पहात होता त्या दृष्टीने भी आज तुमच्याकडे पाहणार आहे.

जयत: आनंदी आनंद गडे! इकडे तिकडे चहूकडे!

लीला: अहाहा! आनंदी आनंद गडे! इकडे तिकडे चहूकडे!

कमलाकर : खरोखर आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चहूकडे!

जयत: लीले, आपल्या बालकवीच्या 'आनंदी आनंदाचे खरे रहस्य मला आज कळत आहे! मी आज ब्रह्मानंदात आहे, लीले जे सुख- कायमचे नाहीसे झाले म्हणून वाटत होते त्यांचा खराखुरा आरंभ मात्र झाला आहे लीले माझ्यावरचा नसता अपराध दूर झाला! सुशीलाताईंचे भाग्य पुन्हा उदयाला आले! विद्याधर हेच गुणाकर त्याचा अंत मुळी झालाच नव्हता आणखी, नीले, आपल्या पुनर्विवाहाला

बाबासाहेब सहानुभूती देत आहेत

कमलाकर : पुनर्विवाह आता पुनर्जन्मी

जयंत : कोण कमलाकरा जा इथून लौकर बाहेर निघून जा सरकारचे शिपाई तुला धरण्यासाठी तपासात आहेत! पण मी ब्रह्मानंदात बुडाली आहे आणि माझ्या उत्कट आनंदाच्या वेळी दुस-याला दुःख बहाने ही कल्पना सुद्धा मला सहन होत नाही जा पट, कमलाकर आपले प्राण याची माझ्या आनंदाचा उत्कट प्रकाश लीलेची लावण्यचंद्रिका आणि तुझ्या कृष्णकर्माचा दाट काळोख ही सारी एकाच जागी एकाच वेळी शोभत नाहीता लीले या कमलाकराचे अपराध तुला माहीत नाहीत; पण ते कळण्यापूर्वीच तू त्याला क्षमा करा हा पाहा सुंदर फुलपा होता याच्या वासाने मी वेडा झालो आहे हा मी तुला अर्पण करणार आहे. याच्या वासाने पुन्हा फुललेल्या प्रेमाच्या या वासाने तू गुग होशील. माझ्यासारखी होशील पण लीले. तू बोलत का नाहीस?

कमलाकर : ती काय बोलणारा जयता, असा बेफाम होऊ नकोस माझ्यासारखा जिवलग मित्र जिवंत असताना तो तुला आनदाचे वेड कसे लागू देईल? दुःखाचा तुला चांगलाच अनुभव आहे आणि तोच मी यावे तुझ्या कपाळी कायमचा लिहून ठेविला आहे.

जयत: अरेरे! मला तुझी दया येते पण बोल, कमलाकर, तुला वाटेल ते बोल मी जसा प्रेमाच्या ब्रह्मानंदात वेडा झालो आहे तरी तुला तरी

निराशच्या तीव्रतेने वेड लावल्यावाचून कसे राहील? तुझ्या बोलण्याचे मला काहीच वाटत नाही.

कमलाकर : अरेश जयंत माझे योगसाधन अजून पूर्ण झाले नाही त्याला माझा हा आहे माझ्या कृतीची शक्ती अजून माझ्या वाणीत माझ्या दृष्टीत भिनली नाही! अजून माझ्या नुसत्या रागाने तुझे हृदय फाटून जात नाही! दृष्टीने तुझ्या हातातली फुले कोमेजून जात नाहीत पण कृतीने मात्र तुझ्या हृदयातले नाजूक फूल तुझी लीला अगदी करपून पार जाळून टाकिली आहे तुझ्या मरणाची बातमी कानी पडू नये म्हणून घाईने लीला इकडे निघून आली. नंतर मी इथे आलो लोलेच्या गैरसमजाचा फायदा घेऊन मी तिला हे विष घातले आहे या विपाला कसलाही उतारा चालत नाही ऐकलेस है? आता सीड आपल्या आनंदाचे वेड

जी काय ऐकतो हे मी

लीला : अगदी रात्य: विषापेक्षाही सत्य?

जयंत : हाया लील! काय केलेस है? कमलाकर, तुझ्या राक्षसी वृत्तीचा अपमान केला त्याची क्षमा करा तुझ्या वाणीने खरोखरीच माझे हृदय फाटून गेले आहे. तुझ्या दृष्टीने ही फुले खरोखर एका क्षणात करपून गेली आहेत त्यांच्यात आता फूलपण राहिले आहे कुठे? लीले लाडके तीने काय केलेसे है?

(तिच्या गळ्याला मिठी मारतो )

कमलाकर : बस्स! झाले माझे काम आता माझा पराक्रम सुशीलेला त्या दुस-या मानी पारीला कळवितो! आणि मग मग काय होईल ते

होवो.

(जातो. वसंत पाईने प्रवेश करतो.)

जयत: यसता घाता सर्वस्वी घात झाला रे! धाव, आधी बाबासाहेबाना घेऊन ये। लीलेने हे भयंकर विष घेतले आहे!

वसंत : (पुडीचा कागद पाहून आणि तेही हे विषा

जयंत : जातू आधी दादासाहेब धा (वसंत जातो)

लीला : जयंत, काय हे? यात रडण्याचे काय बरे कारण आहे इहलोकच्या कृत्रिम ताटातुटीने हृदयाचा प्रेममय ऋणानुबंध कामयथा का तुटणार आहे दोन दिवस धीर धरा क्षणिक सुख गेले म्हणून काय झाले? ही पाहा विषाच्या जोराने आतल्या आत माझी दृष्टी चालली आहे, दृश्यसृष्टी आकुचित दिसून अदृश्य सृष्टीचे वैभव दिसायला लागले आहे उठा, अनंत सुख, अनंत प्रेम, अनंत ऐक्य, मिळवायची आशा धरा

जयंत: प्रणयसृष्टी. माझी प्रणयष्टी जळून खाक झाली लीले भेट, मला कडकडून भेट इतकी कडकडून भेट. की देहाच्या स्पर्शाबरोबर यातल्या विषाच्या लहरी माझ्याही देशात भिनू लागतीला लीले, माझे सारे शरीर जड झाले आहे. शरीरातले अणुरेणु जागच्या जागी खिळून एकाची वृत्ती दुस-याला कळत नाही परमेश्वरा, राक्षसी परमेश्वरा सुखदुःखाचा काय खेळ मांडला आहेस हा चल, लीले, चल मी पण तुझ्याबरोबर येतो या पापी जगाचा सँग सोडून आपण केवळ प्रेमाचे देह धारण करून एखाचा कळीच्या हृदयात लपून बसू प्रेममय काव्यवधाने तिचे तोंड कायमचे बंद करून टाकू आणि अनंत काळपर्यंत त्या कलिकेच्या गर्भातल्या परागरेणूच्या सृष्टीत या रेणूवरून त्या रेणूवर सारखा प्रेमाचा लपंडाव खेळत वसूलीले त्या कलिकेच्या सुगंधी ब्रह्माडात घटकेत एका रेणूच्या आडपडद्याने सुखमय विरहाचे सु भोग त्या स्थितीत या बाहेरच्या जगात खेळणारा वारा सुद्धा आत येताना कलिकेच्या कोमलपणातून गाळून शुद्ध करून घेता येईल

लीला : नाही, लीले, परमेश्वर प्रेममय नाही! नको त्याच्या सृष्टीतली कलिका नको, त्याचा स्वर्गलोकही नकोलीले मघाशी फासावर चढताना मी मरणाला भीत होती; पण आता मला प्रेमाचे विलक्षण धैर्य चढले आहे. मी पण विष घेतो आणि दोघे बरोबरच मरून प्रणयाची निराळी सृष्टी करू ही भूमी नको, आकाशको ताराचा रस पिळून त्याने मेघमंडलातल्या गाराचा वाडा बांधू आणि चिरकाल त्यातच राहू पण या परमेश्वराचे आता नाव सुद्धा नको पूर्वसचितामुळे तुझ्यासारख्या नाजूक फुलाला सुद्धा जो कोमेजून टाकतो, तिचे अपराध मगले. किती का असेनात, ज्याला माफ करता येत नाहीत तो परमेश्वर निर्विकार आहे असे कोणी म्हणावे? लीले मनुष्याला एखादे फूल निर्माण करिता आले तर तो त्याला नुसते हातावर झेलीत आणि आजन्म त्याचे पोवाडे गात बसेला पण परमेश्वर दररोज हजारी फुले फुलवितो आणि दुसरे दिवशी निर्दयपणाने ती सारी चिरडून टाकिती एखाद्या कवीने तुझ्यासारखी नायिका निर्माण करून तिचा असा निर्दय शेवट करण्याचे मनात आणले असते तर ते भयंकर शब्दचित्र रेखाटताना त्याची लेखणी बंद पडली असती आणि त्याच्याच अश्रूच्या ओघात कठोर अक्षरे पार वाहून गेली असती पण अमानुष परमेश्वर हे सारे खेळ सहज करीत असतो! लोले, हा ईश्वरी कोप मी कसा सहन करू.

लीला: नका, जयंत, परमेश्वराला दोष देऊ नका! परमेश्वराची कृती सुद्धा अजून बाल्यावस्थेत आहे! ही ब्रह्मांडाची कळी अजून उमलायची आहे! ब्रह्मांडाचे फूल कायमचे फुलिवण्यासाठी परमेश्वर दररोज हजारी फुले निर्माण करण्याचा अभ्यास करीत आहे! बालपरमेश्वर आकाशाच्या पाठीवर विजेच्या वेड्यावाकड्या रेघोट्याच ओढीत आहे, त्याचा हा सृष्टीचा अभ्यास पुरा झाला, अक्षयतारुण्य प्राणिमात्राला देता आले, सूर्यप्रकाशात चंद्रिकेची शीतलता आणिता आली. फुले कायमची फुलविता आली, म्हणजे प्रेममय परमात्मा या ब्रह्मांडकलिकेचा अक्षय्य विकास करील आणि आज या गोलकलिकेत अटकलेल्या तारका मृतांच्या आत्म्याचे हे परागरेणू, विश्वाचे पुष्प उमलताच अमर्याद अनंतात चहूकडे उधळू लागतील तोपर्यंत ख-या सुखासाठी आपण धीर धरिला पाहिजे!

जयंत: लीले, या आशीर्वादाने मला धीर कसा येईल ? लीले, लीले, मला आज्ञा दे, मी पण आत्महत्या करून तुझ्या पाठोपाठ येतो; या लीलाशून्य जगात मी कसा राहू ?

लीला: मरणकाळच्या शब्दांइतके सत्य दुसऱ्या कशातही नसते. जयंत, तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही आत्महत्या करू नका ! तुमचे कार्य अजून झाले नाही! माझी करुणकथा सर्व जगाला सांगा माझ्यासारख्या हजारो बालविधवा हृदयात मेलेल्या आशेच्या समाधीवर अश्रूची फुले वाहत असतील त्यांचा उद्धार करा. कठोर समाजाचे पाषाणहृदय भेदून त्यातून शुद्ध प्रेमाचे पाट वहावयाला मार्ग मोकळा करून द्या आणि मग कालावधीने परमेश्वराजवळ या. म्हणजे आपण अक्षय्य सुख भोगीत बसू !

जयंत : लीले, या जडवृत्ती, निर्जीव प्रेताच्या हातून हे काम कसे होणार ? कोणत्या संजीवनीच्या सामध्यनि मला हालचाल करण्याची शक्ती

मिळेल ? लीला असे निराश होऊ नका ! माझी इच्छा, माझी आज्ञा, मूर्तीमंत प्रेमाचे उद्

जयंत : लीले, या आशीर्वादाने मला धीर कसा येईल ? लीले, लीले, मला आज्ञा दे. मी पण आत्महत्या करून तुझ्या पाठोपाठ येतो; या लीलाशून्य जगात मी कसा राहू ?

लीला : मरणकाळच्या शब्दाइतके सत्य दुसऱ्या कशातही नसते. जयंत, तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही आत्महत्या करू नका ! तुमचे कार्य अजून झाले नाही! माझी करुणकथा सर्व जगाला सांगा माझ्यासारख्या हजारो बालविधवा हृदयात मेलेल्या आशेच्या समाधीवर अश्रूची फुले वाहत असतील त्यांचा उद्धार करा. कठोर समाजाचे पाषाणहृदय भेदून त्यातून शुद्ध प्रेमाचे पाट वहावयाला मार्ग मोकळा करून द्या आणि मग कालावधीने परमेश्वराजवळ या, म्हणजे आपण अक्षय्य सुख भोगीत बसू !

जयत लीले, या जडवृत्ती, निर्जीव प्रेताच्या हातून हे काम कसे होणार ? कोणत्या सजीवनीच्या सामर्थ्याने मला हालचाल करण्याची शक्ती मिळेल ?

लीला : असे निराश होऊ नका ! माझी इच्छा, माझी आज्ञा, मूर्तीमित प्रेमाचे उद्गार समजून तरी माझ्या शब्दांना मान द्या!

जयत: ठीक आहे. तुझी आज्ञा मला शिरसावंद्य आहे पण तू मात्र मला असा अनाथासारखा भूलोकावर टाकून स्वगांत जाऊ नकोस ! तेजोमय तारका होऊन आकाशात सारखी चमकत रहा म्हणजे मला नेहमी धीर मिळत जाईल! लीले, लीले, मनात होते काय, आणि हो झाले काय ? (सुशील, गोकुळ, विद्याधर वगैरे मंडळी येतात)

गोकुळ : लीलाताई, काय हो केले हे ? आता या तुमच्या गोकुळाला वेळोवेळी सांभाळून कोण हो घेईल ? भाऊबिजेच्या दिवशी या दरिद्री भावाची आसवाची ओवाळणी आनंदाने घ्यावयाला माझी कोणती लीलाताई पुढे येईल ?

सुशीला : लीलाताई, काय ही तुझी दशा! पहा गं या तुझ्या सुशीलेकडे, तुझ्या त्या तेजस्वी डोळ्यांनी एकदा तरी पाहा! लहानपणी तुझ्या गज-यातली फुले एखादे वेळी कोमेजून जात आणि तू रडू लागलीस म्हणजे मी माझ्या गज-यातली फुले तुला देत होते; पण आज तुझ्या डोळ्याची ही फुले कोमेजून जाताहेत तेथे कोणती फुले बसवू ? या माझ्या डोळ्यांची की माझ्या जिवाची ? ( लीला जयंत व सुशीला यांच्या अंगावर पडते.)

लीला (हसत) : गोकुळ, सुशीलाताई, काय हा मोह ताई, तू मला नेहमी धीर देत होतीस आणि आज हे काय मांडिले आहेस ? आज ना उद्या आपल्या भेटी होणार खास ! विद्याधर, तुम्ही तरी सा-यांना धीर द्या हो, पण तुम्ही तर माझ्या ताईचे गुणाकार गुणाकार, ताईला, 1. जयताना, गोकुळला नीट सांभाळा.

सुशीला : लीले, लीले, तू नाजूक कळी, तुझ्या अंगी हे धैर्य कुठून ग आले ? नको, अशी हसू नकोस माझ्या हृदयाचे कसे पाणी पाणी होते.

आहे ! तुला होते आहे तरी काय? ही कठोरता कोठून आणलीस ? या तुझ्या स्थितीला म्हणू तरी काय ? लीला काय म्हणू ? केशवसुतांचे

ते गाणे आठवले ना तुला ? अहाहा! हर्षखेद ते मावळले हास्य निमाले, अश्रू पळाले । कटकशल्ये बोथटली मखमालीची लव वठली

। काही न दिसे दृष्टीला | प्रकाश गेला, तिमिर हरपला काय म्हणावे या स्थितीला झपूर्झा गडे झपूर्झा ताई, हाच बरे झपूर्झा ताई,

येते मी आता जयंत, माझी विनंती लक्षात ठेवा! अहाहा! झपूर्झा, गडे झपूर्झा (निश्चेष्ट मरते.)

जयत: गेली गेली, शापभ्रष्ट देवी, माझ्या हृदयाची देवी. या जगातून निघून गेली! लीला, हाय हाय, लीला। लीलालाल हृदया! आता तुझ्या उड्या बंद ठेवलीला अखेर काय बरे म्हणाली ? झपूर्झा गडे झपूर्झा हेच खरे! हीच स्थिती आता मलाही स्वीकारली पाहिजे.. तुटला जगाचा आणि जयताचा पार संबंध तुटला लीले. आता फक्त एक तुझी आज्ञा हीच माझ्या हृदयाची गीता दुसरे काही नको! या जगातले आपले जीवन सपले आपला अवतार संपला !

(उठून उभा राहतो.) जल गई है दिलसे ये जहा. अब क्या रहा है यहा ।

ये कलिया दिले चमनकी, अब फूल फिरसे और कहा ।

न फिक्र है बागे जहाकी, न उसके कुलमुखत्यारकी । है तुटगई कड़िया कडिया, अब जंजिरे प्यारकी ।।

(फुलांची माळ तोडून फुले लीलेच्या प्रेतावर पसरतो. पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा

(बाबासाहेब प्रवेश करतात.)

बाबासाहेब : अरेरे, कोण भयंकर स्थिती ही! सा-या आनंदाचा कळस झाला! लीले, काय केलेस है! असे किती तरी प्रेममय जीव समाजाच्या राक्षसी पावलांखाली चिरडून जात असतील याची आम्हाला कल्पना तरी आहे काय? अरेरे! बदललेल्या परिस्थितीमुळे तरुणाच्या मनाची स्थिती काय होत चालली आहे हे लक्षात घ्यावयाचे नाही; हजारो वर्षांच्या वहिवाटीप्रमाणे लग्न करताना वधूवरांची हृदये कशी आहेत हे पहायचे नाही; आजन्म सुख ज्यावर अवलंबून रहावयाचे तो एकदा बिनसला की कायमचा असा लग्नविधी निव्वळ आंधळेपणाने घडवून आणावयाचा एकदा लग्नाची घडी मोडल्यावर ती कोणत्याही मार्गाने पुन्हा नीट बसवावयाची नाही; अनाथ विधवाच्या अनुजलात त्यांच्या हृदयाचे प्रतिबिंब दिसू लागले की जुनाट श्रुतिस्मृतींची फाटकी पाने डोळ्यापुढे धरावयाची! हरहर! राक्षसी समाजा! किती दिवस तू असे भयानक खेळ करणार? जुनेपणाच्या नसत्या अभिमानात किती डोळे झाकून पडणार? राक्षसी पण निर्जीव रुडीला आणखी किती कोमल आणि जिवंत हृदयाचे बळी देणार? लीले, काय भयंकर जागृती करून गेलीस ही! (गोकुळ येतो)

गोकुळ : बाबासाहेब, चला लौकर! तिकडे मंडळी वाट पहात आहेत.

बाबासाहेब चल; संकटाला तोंड हे दिलेच पाहिजे.

(जातात.)

(भूतमहाल कमलाकर प्रवेश करतो.)

कमलाकर : त्या दरोडेखोराला इतक्या तातडीने यायला सांगितले तरी अजून का बरे आला नाही? त्या रामोशाच्या तोंडात एकदा चादी सोन्याचा बोळा कोंबून त्याला कायमचा मुका केला म्हणजे माझ्याविरुद्ध प्रत्यक्ष पुराव्यानिशी ओरडायला दुसरे कोणते तोड उरणार? एवढा साक्षीदार नाहीसा केला म्हणजे माझ्यावर कायद्याची कुरघोडी करण्याची कोणाची छाती होणार आहे हेच मला पहावयाचे आहे! अजून माझ्या कर्तबगारीने मी या बावळ्या जगाला या हातावर खेळवीन ! या दुनियेच्या बाजारात अशी एकही चीज नाही की, जिचे मोल ठरले नाही- की जी पैशाने विकत घेता येत नाही! माझा सारा विश्वास कसलेल्या कर्तबगारीवर आहे! माझी कर्तबगारी, माझी एवढी कर्तबगारी- पण कमलाकर, तुझी कर्तबगारी तरी काय किमतीची ठरली? तुझ्या मनाची आशा, तुझ्या कर्तव्याचे कर्तव्य, लीला जयंतावर दुःखाचा वर्षाव करून त्यांची मने मारून टाकायचा तुझा हेतू खरोखरीच साधला आहे का? नाही, नाही, माझ्या मनाच्या तळातून या प्रश्नाचे 'नाही, नाही,' हेच उत्तर निघत आहे. लीलाजयतावर मी संकटे आणली खरे; पण त्यांना दुःख मात्र मनासारखे मुळीच झाले नाही! त्यांचे दुःख सुद्धा सुखाचे, लीलेचे मरण शांतवृत्तीच्या सुखाचे, आणि जयंताचा उद्वेग सुद्धा सुखमय प्रेमकल्पनांत गुरफटलेला! ही पाहा मी कोंडून ठेविला असता आत्महत्या करून सुटून गेलेली द्रुमन, माझ्या हाताला झटका देऊन गाडीतून उडी टाकताना तिरस्काराने माझ्याकडे पाहणारी मनोरमा, ही चढत्या विषाच्या अमलात सुद्धा मला तुच्छ समजणारी लीला, तिघी विजयी मुद्रेने माझ्याकडे पाहून हसून माझा उपहास करीत आहेत! मग मी त्यांना खरेखुरे दुःखी ते काय केले? छे: छे: ही नुसती माझ्या कर्तबगारीची थट्टा झाली! उलट त्यामुळे माझ्या मनाला आग लागून राहिली आहे! नाही; झाले एवढ्याने माझे समाधान व्हावयाचे नाही. अजून जयंत जिवंत आहे. सुशीला आहे. माझा दोन वेळा घात करणारा तो विद्याधर आहे, या सर्वांना अजून माझ्या सुडाची जाणीव करून देईन, तेव्हाच मरायला तयार होईल. तोपर्यंत, यम खरोखरीच असला, आणि प्रत्यक्ष त्याने जरी कमलाकर, कमलाकर म्हणून सारख्या हाका मारल्या- (पडद्यात कमलाकर, अहो कमलाकर)

कमलाकर : (दचकून नंतर हसून) कमलाकर काय हे? यमाच्या प्रत्यक्ष कृती हसून थट्टा करणारा तू, आता नुसत्या त्याच्या कल्पनेने दचकलास! हा तो दरोडेखोर! मनुष्यरूपाने वावरणा-या या यमदूताची भीती मला काय म्हणून वाटावी? (दरोडेखोर येतो.) ये, जरा उशीरसा केलास?

दरोडेखोर : अरेच्या, ही काय चुकामुक आहे? कमलाकर कोण? तुम्ही का मी त्या दिवशी ज्यांना कागद दिला ते? आणि मला बोलाविले कुणी?

कमलाकर : तुला बोलाविले मीच कमलाकर मीच पण तू ज्याला पत्र दिलेस तो मात्र निराळा! आणि त्या तुझ्या चुकीमुळेच मोठा घोटाळा

झाला आहे!

दरोडोखोर : तो कसा काय?

कमलाकर : ती भानगड सांगायला फार वेळ लागेल, आणि मी तर अगदी डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप मोजावयाच्या बेतास आलो आहे. त्या दिवशी त्या पेटीची जी भानगड केली ती आता जिवावर येऊन घेतली आहे. तिच्यामुळे मी सापडणार आहे एका खटल्यात तुलाही त्यात बराच शेक लागणार आहे. माझा साथीदार म्हणून माझ्याविरुद्ध खरा साक्षीदार तू एकटाच आहेस. तुझ्या साक्षीमुळे तू आणखी मी

दोघेही गोत्यात येणार आहोत; म्हणून त्या भानगडीची मिटवामिटवी करण्यासाठी मी तुला बोलाविले आहे.

दरोडेखोर : कशी काय मिटवामिटवी करणार सांगा पाहू?

कमलाकर : त्यात काही विशेष नाही. हे पाचशे रुपये तू घे आणि कोठे तरी दूर देशी निघून जा तू निघून गेल्यावर मला शहाजोग पकडण्याची कोणाची छाती नाही. आणि यामुळे तुझ्या मागचा जंजाळ चुकेल. समज, या साक्षीसाठी तू सरकारी लोकाच्या एकदा नजरेस आलास म्हणजे तुझ्या धंद्याच्या बाबतीत तुला पहिल्यासारखा मोकळेपणा मिळेल का? अरे वेड्या, कदाचित या बाबतीत तू सुद्धा खोड्यात पडशील! त्यापेक्षा आपले ठाणेच इथून हलविलेस तर आपण दोघेही सुखी होणार नाही का? पहा! फार विचार करीत बसण्याची ही वेळ नाही. हे पाचशे रुपये आणखी लागले तर मागून घे आणि इथून आपला पाय काढा काय पसंत आहे का हा विचार?

दरोडेखोर : पसंत आहे. या ते रुपये (रुपये घेतो.) ठरला माझा विचार कायम! आता तुम्हाला युक्ती सांगतो. जरा जवळ या कान करा इकडे!

(कमलाकर जवळ येतो. दरोडेखोर त्याच्या मानेवर हात देतो.)

कमलाकर : अरे, हे काय! माझ्यावर का

दरोडेखोर : गप्प, रावसाहेब, अगदी गप्प, आरडाओरड करून काही उपयोग नाही नीट मुकाट्याने उभे रहा. माझ्या कामात कोणी अडथळा

आणलेला मला खपायचा नाही.

कमलाकर : म्हणजे तू माझा जीव घेणार की काय?

दरोडेखोर : अगदी सहज ! तुमच्यासारखा उगीच विचार करीत बसणारा हा गडी नव्हे!

कमलाकर : अरे पण, या संथपणाने माझा प्राण घ्यायला तयार झालास त्याला कारण तरी काय?

दरोडेखोर : हे बघा रावसाहेब, तुम्हा पाढरपेशा लोकाशी भागीबट्ट्याने एकदा धंदा केला की त्यात ही कुलगडी निघायची! समजा, आज एक मी पळून गेलो; पण पुढे तुम्हाला पकडले; आणि तुम्ही माझे नाव घेतले म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या आणि अशी भागूबाई वाटेल त्याचे नाव घ्यावयाची! तेव्हा ही तुमची शिकलेली अक्कल आम्हाला नको! सरकार तरी तुम्हाला पकडून शिक्षाच करणार ना? मग मीच ते काम केलं तर काय वाईट मग तर झाले ना मी मोकळा?

कमलाकर : काय राक्षस आहेस रे तुला काही अंत:करण- विचार-

दरोडेखोर : रावसाहेब, बस्स करा हे च-हाट! दयामाया तुम्हाला दाखवायची? अहो, घरच्या बायकांना तुम्ही बाहेर विकणारे! आणि मला हे विचारता? रावसाहेब, देवाला पण डोळे असतात! देव नेहमी काट्याने काटा काढतो! अहो, पापच पापाला गिळते. विचारी भली माणसे का आपली कामे सोडून तुमच्या आमच्या मागे धावत येणार आहेत? तुम्ही आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचे! आज तुमच्या गळ्यावर आमचा हात; उद्या आमच्या गळ्यावर आणखी तिस-याचा होता (त्याला खाली पाडून त्याचा गळा दाबतो.) है. रावसाहेब, ताकद ओळखून मग अशी धडपड करा! उगीच का मरताना अशी मेहनत करिता?

कमलाकर : अरेरे, अखेर हेच तत्त्व खरे की-

कलजुग नही करजुग है, तू दिनको और रात ले। क्या खूब सवदा नन्द है, इस हाथ से इस हाथ ले।। (दरोडेखोर त्याचा गळा दाबून प्राण घेतो. पडदा पडतो.)

(लीलेची चिता जळते आहे. सन्यासवेष घेतलेला जयंत व इतर मंडळी)

जयंत : हर्षखेद ते मावळले हास्य निमाले, अश्रू पळाले ।।

कटकाशल्ये बोथटली मखमालीची लव वठली ।। काही न दिसे दृष्टीला प्रकाश गेला, तिमिर हरपला ||

काय म्हणावे या स्थिताला झपूर्झा गडे झपूर्झा अहाहा विद्याधर ही पाहा माझ्या हृदयाची होळी या पाहा आशेच्या ज्वाळा आणि हा पाहा माझ्या मनोरयाचा धूर प्रीतीचे प्रेत जाळण्यासाठी आणखी किती कठोर व्हावयाला पाहिजे? स्मशानात अदृश्यरूपाने वावरणा-या पिशाच्यांनी, भूतानो, सांभाळा, या पवित्र होळीची जागा कल्पान्तापर्यंत नीट सांभाळा! तुमच्यापेक्षा भयकर, क्रूर अशा मनुष्याचे दयामाया यांचे स्मशान झालेल्या जगातल्या मानवी भुतांचे या पवित्र प्रणयसमाधीवर पाऊलसुद्धा फिरकू देऊ नका. हे लीलाभक्षक अग्रिनारायणा, मनुष्याच्या वासाने पापी झालेला वारा जर या चितेत शिरू लागला तर त्याला जाळून दिव्य करून मग लीलेजवळ येऊ दे! आणखी तुझ्या तेजाने जसा या रात्रीच्या वेळी हा स्मशानातला काळोख नाहीसा केला आहेस तसा आमच्या समाजातल्या अंधारावर या लीलाललित ज्याला पसरून चोहीकडे प्रकाश पाह! अहाहा! माझ्या लीलेच्या पवित्र देहाच्या अशाशासाठी पंचमहाभूतांची कोण धडपड चालली आहे ही! हा अग्नी तिच्या जडदेहाला आपल्या व्याळाशी एकजीव करीत आहे. भूदेवी आपल्या प्रेमळ बालिकेची रक्षा मातृप्रेमाने ओढीत आहे. सोसाटयाचा वारा तिच्या रोषा एखाद-दुसरा कण मिळाला तेवढाच घेऊन दिगंतराला पळून जात आहे! लीलेचा आत्माच आपल्याला मिळणार म्हणून हे आकाश आनंदाने तारकारूपी नेत्र मिचकावीत आहे. आणि ही जलदेवता तर राखेत मिळून एकरूप होण्यासाठी अश्रूच्या पवित्र रूपाने माझ्या डोळ्यातून सारखी धावत आहे आणखी लीलेसाठी असे कोण होणार नाही? तरी पण हे पवना, तू असा निर्दय होऊन सारेच रक्षाकण उडवून नेऊ नकोसा हिच्या प्रेमासाठी खराखुरा सन्यास घेण्यासाठी थोडीशी रक्षा तरी राहू दे म्हणजे ती प्रेमाची राख माझ्या अभूत भिजवून या माझ्या शरीराला मी लावीना

विद्याधर: जयंत झाले ते झाले, आता शोक करून काय फळ

जयंत : विद्याधर हा तुम्ही शोक समजता? नाही. हा शोक नाही माझे हृदय, माझे प्रेम माझा जीव माझे सर्वस्व मी या होळीत टाकले आहे. लीलेची आज्ञा पाळण्यासाठी मी एक दगडाचा पुतळा झालो आहे आणि लीलेच्या प्रेताला स्वाहा करणा-या अग्रीच्या या ज्वालारूपी हजारो निभातून धडधड निघणारे निराशेचे उद्गार माझ्या पाषाणहृदयावर आदळून तोडावाटे हा त्याचा प्रतिध्वनी मात्र बाहेर पडत आहे. मला जर शोक करावयाचा असता तर सारे ब्रम्हा हालवून सोडिले असते. माझ्या करुणावाने पाषाणाच्या हृदयाचा भेद केला असता, आणि अश्रूच्या ओघाने ही धडधडणारी चिता एका क्षणात विझवून टाकली असती! पण मी तसे करणार नाही. अग्री नारायणा तुझा भयानक खेळ चालू दे तुझ्या ज्वालांच्या पंखांनी माझ्या लीलेच्या आत्म्याला स्वर्गात उडून जाऊ दे! अहाहा विद्याधर, पाहा, पाहा, बोलता बोलता आकाशात कशी गर्दी होत चालली आहे ती! पण या तारका, तुमच्या नेहमीच्या निर्दय तारका सुखात रमलेल्या किया दुखात करपलेल्या जिवाकडे फत्तराप्रमाणे सारख्याच दृष्टीने डोळे मिचकाविणा-या, भविष्यात होरपळून काढणा-या पण चालत्या काळी ख-या वाटणा-या आशेच्या समुद्रावर शेवटी बुडण्यासाठी आपण होऊन तरंगणा-या अल्लड बालकांच्या हृदयभेदक मनोरथांना हसणा-या नेहमीच्या तारका नाहीत बरे! या माझ्या लीलेच्या प्रेमतारका! तिच्या कोंडलेल्या मनात उरलेल्या प्रेमाचा एक एक बोल या आगीच्या लाटात मंगलस्नान करून दिव्यरूपाने वर जात आहे लीलेच्या प्राणज्योतीबरोबर या चितेच्या ठिणग्या पावन होऊन तारकापदाला पोहोचत आहेता आणि विद्याधर, उद्याच्या या नव्या तारामंडळात या ताराक्षरानी खचिलेल्या प्रेमस्वस्तिकात माझ्या लीलेचा आत्मा कौस्तुभासारखा चमकताना दिसेल! तो देदीप्यमान, प्रणयतारा आजच्या हतभागी पण उद्याच्या भाग्यशाली जयंतावर स्वर्गीय, तेजोमय प्रेमस्वर्गाची दृष्टी करील काय, विद्याधर, तुम्हाला हे खरे वाटत नाही? छे: माझी लीला मला तसे वचनच देऊन गेली आहे! आणि तिने एकदा शब्द काढला की तो कायमचा लहानपणी तिने मला प्रेमाचे वचन दिले, आणि पण तिचे प्रेम तुम्हाला कसे कळणारा विद्याधर, तुमची आमची लीला साक्षात देवता होती बरे! आता उद्या तुम्हाला कळेल, उद्या आकाशात चमकणा-या तारामंडळातून माझ्यावर जेव्हा प्रेमाचा पाऊस पडेल, लीलेच्या ताराकिरणाशी माझ्या डोळ्याची किरणे प्रेमप्रलाप बोलू लागतील तेव्हा तुमची खात्री होईल! विद्याधर तिने मरताना असेच ठरविले आहे अरे पण किती वेडा मी (चितेकडे जाऊ लागतो)

विद्याधर : (त्याला याबवून) जयंत, काय हे चालला कुठे त्या आगीत ?

जयंत आगीत? अहो तुम्हाला ती आग वाटते पण माझ्या आत्म्याची ती चंद्रिका आहे बरे! लीला जिये आहे तिथे आगीचे सुद्धा चांदणे होईला सोडा हो, एकदा तिच्या ओठाला ओठ लावून एवढेच विचारून घेतो की, माझा उद्धार केव्हा करशील म्हणून? ते विचारायचे राहिले आहे! एक चुंबन! सोचा हो किती निर्दय आहात ही तुम्ही नाही जाऊ देत? नशीब माझे! लाने! जा तू बिनदिक्कत जा तुझी आज्ञा मी अक्षरश: पाळीन ईश्वराने निर्मिलेल्या सुंदर आणि भेसूर, सा-याच वस्तू तुझ्या चितेचेच चित्र पाहीनः सा-या नादब्रम्हान या चितेचा धडधड आवाजच ऐकत राहीन, आणि केवळ तुझ्या आज्ञेचा उच्चार करण्यासाठीच तोंडातून शब्द काढीन. आहाहा! काय ही चिता भडकली आहे! जितकी भीषण तितकी सुंदरा पाहा, पाहा विद्याधर पाहा ही भयाण शोभा ही चिंता समाजाच्या चिखलातून निघालेल्या कमलपुष्पासारखी रमणीय दिसत नाही का? आणि या चितारुपी कमळाच्या ज्वालामय दळाच्या आय माझी लीला, माझी प्रणयलक्ष्मी, साक्षात लक्ष्मीप्रमाणेच निजली असेल नाही? सुदरता भयानक वस्तूवर सुद्धा आपली छाप बसविते, हेच या चितेत तुम्हाला दिसत नाही काय?

विद्याधर : हरहर जयंत, काय उत्तर देऊ तुम्हाला? एकीकडे सुशीलेची प्राप्ती आणि एकीकडे जिवलग मित्राचा असा घात, यामुळे मी अगदी दिड झाली आहे! एकाच काळी जलवृष्टी आणि विद्युत्पात यांचा अनुभव घेणा-या वृक्षाप्रमाणे माझी स्थिती झाली आहे!

जयंत : विद्याधर, असे भांबावून जाऊ नका हृदयाच्या पडद्यावर आतल्या आत गिळलेल्या असूनी या चित्तभेदक चितेचे चित्र चांगले रंगवून ठेवा! उद्या या राखेच्या ढिगात कणाकणागणिक, जळलेल्या आशा, मेलेले मनोरोय, प्रेमाचे प्रेतप्राय प्रलाप, करपलेल्या कल्पना, मुक्या मनाच्या मातीत मिसळलेल्या महत्त्वाकांक्षा सापडतील त्या मोजून ठेवा! आणि ईश्वराच्या कृपेने उद्या तुमचं घर गोजिरवाण्या लीला - जयतानी गजबजून गेले म्हणजे स्मृतीच्या तीव्र डोळ्यांनी हृदयाला त्या चित्राचित्राकडे पहा, आणि मग त्यांच्या आयुष्याच्या दिशा ठरवा! कोमल हृदयात सावडती रुजून फोफावणा-या प्रेमवृक्षाचे अंकुर दिसतात न दिसतात तीच त्याचे निर्बीज करून तुमच्या लीला जयंताना समाधानाचे धडे शिकवा! जे आहे ते आपले आणि नाही ते नको हेच तत्त्व त्याच्या मनात लहानपणीच विश्वून द्या बाळपणी वाढत्या प्रेमाकडे, आवडीनावडीकडे दुर्लक्ष करून त्यांना वाढू दिल्यावर तारुण्याच्या जोमात अवेळी समूळ उपटून टाकू नका बाळपणी बीजारोपण झाल्यामुळे तारुण्यात हृदयाच्या तळापर्यंत दूरवर मुळे पसरणारा प्रेमवृक्ष एकदम समूळ उपटताना हृदयाच्या चिंधड्या होतात हे लक्षात ठेवा! विवाहसंबंध घडवून आणताना डोळ्यात या चितेतल्या राखेचे चांगले अंजन घाला, विवाहसंबंधाने एकतर स्वर्ग तरी हाती येती नाही तर पाताळात तरी पडावे लागते, हाच अनुभव यापुढे बदलत्या परिस्थितीमुळे येत जाणार आहे का, मी म्हणलो हे खरे आहे ना!

विद्याधर : अगदी अक्षरशः खरे!

जयंत : कडू अनुभवाचे औषध पाजणा-या ईश्वराचे खेळ अगाध आहेत!

विद्याधर : हे लीलालाघवी जगतसूत्रधारा या तुझ्या संसारनाटकाला म्हणावे तरी काय?

जयंत प्रेमसन्यासः प्रेमसंन्यास! विद्याधर, या सामाजिक खेळाचे नाव प्रेमसंन्यासः

"ब्रम्हार्पण ब्रम्ह हविर्ब्रम्हाग्री ब्रम्हणा हुतम् । श्रम् तेन गन्तव्ये ब्रम्हकर्मसमाधिना ।।
श्रीभगवद गीतोपपनिषत्सु श्रीभगवान् ।।

Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
2
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा